३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

गर्भलिंग चाचणी सक्तीची व्हावी
आपल्या २७ जानेवारीच्या अंकातले राष्ट्रीय बालिका दिन विशेष विभागातले लेख वाचले. लोकसंख्येतल्या स्त्रियांच्या घटणाऱ्या प्रमाणाचं स्त्रीभ्रूण हत्या हे एक कारण आहे हे लक्षात घेऊन सरकारने गर्भिलग चाचणीवर बंदी घातली आहे. अशी बेकायदा चाचणी करणाऱ्या काही केंद्रांतल्या सोनोग्राफी मशीन्सना सरकारने सीलही ठोकल्याचं वाचनात आलं होतं. तथापि, सोनोग्राफीसाठी येणाऱ्या पेशंट्सच्या घरच्यांचे डॉक्टरांशी असलेले स्नेहसंबंध, पशांचं आमिष नि सांकेतिक भाषेचा वापर यामुळे हा कायदा फारसा परिणामकारक होऊ शकत नाही असंच दिसून येतं. त्यासाठी आणि मूळ समस्या स्त्रियांच्या घटणाऱ्या प्रमाणाची आहे हे लक्षात घेऊन खालील पर्यायांचा विचार करण्यात यावा. त्यानुसार
१) प्रत्येक गरोदर स्त्रीला सोनोग्राफीने गर्भिलग चाचणी सक्तीची करण्यात यावी. ती सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सरकारने उपलब्ध करून द्यावी.
२) गर्भिलग चाचणीचं निदान गर्भवतीला लेखी स्वरूपात देण्यात यावं. त्यात गर्भ मुलाचा आहे की मुलीचा आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा. तसा दाखला दाखवल्याशिवाय कुठल्याही गर्भवती स्त्रीला प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी प्रविष्ट करून घेऊ नये. चाचणी केंद्रांनी त्याची एक प्रत सरकारच्या आरोग्य खात्याला पाठवावी. आरोग्य खात्याने त्याच्या बिनचूकपणाची खात्री करून घ्यावी.
३) गर्भ मुलीचा असल्यास आरोग्य खात्याने ती मुलगी जन्माला येईपर्यंत व नंतरही पाच वर्षांची होईपर्यंत तिचं संगोपन बरोबर होतं आहे की नाही यावर लक्ष ठेवावं. त्यासाठी तिच्यावर होणारा वैद्यकीय उपचारांचा खर्च सरकारने करावा. त्या अवधीत मुलीचा मृत्यू झाल्यास त्याची कसून चौकशी करावी. यामुळे केवळ स्त्रीभ्रूणहत्याच थांबतील असं नाही तर काही मुलींच्या हत्या जन्माला आल्यानंतरही होतात त्याला आळा बसेल.
शरद कोर्डे, ठाणे.

देशपांडेंचा चष्मा कोणता?
बहुजनीयांतील महानायकांची नव्याने चिकित्सा करण्याच्या प्रयत्नांना जातीयवादी ठरवून मोकळे व्हायचे हा प्रकार मोठा आहे. बरं ते पुरावे देऊनही करीत नाहीत. संकेत देशपांडे यांनी मूळ लेख कोणत्या चष्म्यातून वाचला हे समजत नाही. अन्यथा त्यांनी माझ्यावर जातीय दृष्टिकोनाचा आरोप केला नसता.
पानिपत युद्धाबाबत ‘..आणि पेशवे हे घृणास्पद राजकारण करीत असताना छत्रपती काय करीत होते?’ असा प्रश्न देशपांडेंनी विचारला आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगतो की, १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी खुद्द छत्रपतींचा जामदारखाना लुटला होता. तो पुरंदऱ्यांनी सांगूनही त्यांनी परत केला नाही. थोडक्यात, छत्रपतींना पूर्णतया दुय्यम बनवण्यात आले होते. अशा स्थितीत छत्रपती कोठून हस्तक्षेप करणार? पेशव्यांनी िशदेंना मराठय़ांचाच पूर्वापार मित्र असलेल्या शुजाच्या प्रांतावरच हल्ला करून खंडणी वसूल करण्याचा दिलेला आदेश कोणत्या दर्जाचे राजकारण दर्शवतो? याबाबत चिकित्सा करण्यास जातीय दृष्टिकोन म्हणतात काय?
संजय सोनवणी

मल्हाररावांचं योगदान
सदाशिवभाऊ यांना समोर पराभव स्पष्ट दिसू लागल्यावर आपले सर्वात विश्वासू सरदार मल्हारराव यांना पार्वतीबाई यांना सुखरूप एक लाख सनिकांच्या वेढय़ातून बाहेर काढण्यास सांगितले. कारण त्यांना माहीत होते की फक्त मल्हाररावांची तलवारच हा सनिकांचा वेढा कापू शकते. आणि ते मल्हाररावांनी करून दाखवले..
सर्व पेशव्यांच्या आणि मराठा सरदारांच्या स्त्रियांना सुखरूप स्वगृही आणले.. आणि अब्दालीच्या राक्षसी सन्यापासून त्यांचे शील वाचवले..
यातून पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर २२,५०० लोकांना बंदी बनवण्यात आले, ज्यामध्ये फक्त स्त्रिया आणि लहान मुले होती.. त्यांचे काय झाले हे सांगायची गरज नाही. चार महिने अनन्वित अत्याचार केल्यानंतर जे बंदी जिवंत राहिले त्यांना अफगाणिस्तानमध्ये गुलाम म्हणून विकण्यात आले.
ज्या मल्हाररावांनी सर्व पेशव्यांच्या आणि मराठा सरदारांच्या स्त्रियांना सुखरूप स्वगृही आणले.. आणि अब्दालीच्या राक्षसी सन्यापासून त्यांचे शील वाचवले.. एवढे सगळे होऊन त्यांच्यावर पळपुटेपणाचे आरोप केले जातात.. हा निर्लज्जपणा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन होताना उगाचच सगळ्या गोष्टी चुकीच्या दृष्टीने पाहू नयेत. संजय सोनवणी एक अभ्यासू लेखक आहेत.
रोहित पांढरे

सोनवणींचे संशोधन वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे!
सोनवणी इतिहासाकडे जातीयवादी दृष्टीने बघतात, ही संकेत देशपांडे यांची प्रतिक्रिया वाचली. लेखात देशपांडे म्हणतात तसे काहीच आढळून आले नाही. सोनवणी यांनी फक्त पुरावे वाचकांसमोर मांडले आहेत. यावरून ते जातिवाचक आकस ठेवून लिहितात हे कसे? सोनवणी यांनी त्यांची मते मांडताना सर्व मान्यताप्राप्त इतिहासकारांचे दाखले दिले आहेत. उदा. ‘रियासतकार’ गो. स. सरदेसाई यांचा (मराठी रियासत- खंड ४), ‘भारताचार्य’ म्हणून ज्यांना आदराने गौरविले जाते त्या चिं. वि. वैद्य यांच्या ‘दुर्दैवी रंगू’ या पुस्तकाच्या तळटीपेत (ही तळटीप मी स्वत: सोनवणी यांच्या लेखामुळे पुस्तक मिळवून पाहिली आहे.) भाऊ युद्धात पडले नसल्याचे मत व्यक्त केलेले आहे. ही उदाहरणे पाहिली की सोनवणी पुराव्यांच्या आधारे वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाऊन पानिपत युद्धाच्या शोकांतिकेचे प्रामाणिक मूल्यमापन करीत आहेत हे तर्कबुद्धीला पटते.
मुख्य म्हणजे पानिपतच्या मोहिमेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊंच्याच हातात सर्वस्वी होते, त्यामुळे मोहिमेचा नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही सर्वस्वी त्यांच्यावर येणारच येणार हे सत्य नाकारून चालणार नाही.
पेशवा हे एक पद आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पेशवा हे पद भूषविणारे कोणत्या ज्ञातीचे होते हा सोनवणी यांच्या लेखाचा विषय होता असे अजिबात वाटत नाही. केवळ पेशवा या पदामुळे लाभलेल्या अमर्याद सत्तेमुळे (जी टिकवण्यासाठी खेळावयास लागणाऱ्या) राजकारणाची (जे कोणत्याही काळातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये अगदी कॉमन आहे) जबाबदारी ही नतिकतेने पेशव्यांचीच ठरते. मग ते आपल्या ज्ञातीचे असतील तर त्या अनुषंगाने मनात रोष बाळगू नये ही कळकळीची विनंती.
राहिले राघोबादादांच्या अटकेपार झेंडे फडकवण्याच्या मोहिमेच्या यशाचे श्रेय. मोहिमेचे नेतृत्व राघोबादादांनी केले, त्यामुळे त्यांना हे श्रेय दिले जाते हे तर आहेच. आणि एक कोटी रुपयांच्या कर्जामुळे पेशव्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, असेही सोनवणी यांनी लिहिले आहे; पण प्रतिसादकर्त्यांला टीका करताना ही गोष्ट का दिसली नाही?
पेशवे हे दुसऱ्या कोणत्याही ज्ञातीचे असते तरी सोनवणी यांच्यासारख्या संशोधकवृत्तीच्या व्यक्तीचे लेखन बदलले नसते, कारण त्यांनी लेख लिहिताना इतिहासाचे पुराव्यांनिशी संशोधन केले आहे हे त्यांच्या लेखनातून जाणवते आहे.
सागर भंडारे, बंगलोर.

जावईशोध!
संकेत देशपांडे यांची संजय सोनवणी यांच्या लेखावरील प्रतिक्रिया वाचली. ज्ञातिनिकटता नसतानाही यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर यांच्यावर पोटतिडिकेने लिहिणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर अविरत लिहिणारे, महारांचा पुरातन काळापासूनचा इतिहास लिहिणारे, ब्राह्मणविरोधी जाहीर आवाहने देणाऱ्यांविरुद्ध लिहिणारे व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात सहभाग घेणारे संजय सोनवणी हे जातीयवादी दृष्टिकोनातून लिहितात, असा जावईशोध देशपांडे यांनी लावला आहे.
प्रकाश खाडे, पुणे.

सुरेख लेख
एन. डी. आपटे यांचं संवादकौशल्याचं तंत्र आणि रामदास यांचा ‘डालडा’ हे लेख सुरेख. वाचकांना अशाच प्रकारचे लेख हवेत. धन्यवाद.
- सतीश कदम, मस्कत.

जगद्जननीचा पती कोण?
मी आर्यप्रश्न आणि जनुकीय शास्त्र, भाग एक, या दिनांक ६ जानेवारीच्या अंकातील लेखाकडे लक्ष वेधू इच्छितो. पृष्ठ क्रमांक ५८ वर मायटोकॉण्ड्रियल ईव्ह या एक लाख वर्षांपूर्वीच्या जगद्जननीचा उल्लेख आहे. आपण आधुनिक मानव वंश या एका स्त्रीचेच वंशज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मग एक सामान्य माणूस म्हणून मला हे उमगत नाही की ही जगद्जननी कुणाच्या वीर्यामुळे गर्भार राहिली? शुक्राणूच्या अनुपस्थितीत ती आपल्या उदरातील बीजांड फलित कशी करू शकली?
अरुण मालणकर, कलिना

तीन पिढय़ांचा जन्मयोग
आपला २३ डिसेंबरचा ‘भविष्य २०१२’ चा अंक वाचला. अंक अतिशय चांगला आणि वाचनीय झाला आहे.
या अंकामधील श्री. श्री. भटांच्या ‘ज्योतिषाचे सत्य स्वरूप’ हा लेख वाचला. मनाला चांगलाच भावला. त्यामध्ये त्यांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, तसेच जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार यांचा एका महिन्यामध्येच झालेला जन्मयोग सांगितलेला आहे. अशी उदाहरणे फारच क्वचित बघायला मिळतात.
तसाच एक तीन पिढय़ांचा अतिशय एकाच महिन्यातला जन्मयोग माझ्या घरी झालेला आहे. सौ.चा २२ जून, लेकीचा १५ जून, तर नातीचा २५ जून असा तीन पिढय़ांचा दुर्मीळ जन्मयोग आमच्याकडे एकाच महिन्यामध्ये घडलेला आहे.
अरुण वाघ, चिंचवड.

होमियोपथीने रोग बरा होत नाही.
होमियोपथीची औषधं इतकी डायल्यूटेड असतात की त्यामुळे कोणताच रोग बरा होऊ शकत नाही. कृपया चुकीचे लेख प्रसिद्ध करू नये. डॉ. जेम्स रॅण्डी यांनी होमियोपथीने रोग बरा झाल्यास दहा लाख डॉलर्सचं बक्षीस ठेवलंय आणि ते अजूनही कुणी जिंकलेलं नाही. कृपया पुढील लिन्क पहावी.
http://www.youtube.com/watch?v=BWE1tH93G9U
अजित दामले,

ही गॅझेट्स कुठे मिळतात?
‘कदम कदम गिनते जा’ हा डॉ. पाटणकरांचा लेख आवडला. अशाच गॅझेट्सची माहिती आम्हाला लोकप्रभातून मिळो. ही गॅझेट्स कुठे मिळतात हे समजलं तर आणखी मजा येईल.
देवेश देसाई