३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

टाक धिनाधिन

कार्यसर्माऽऽट बाबू बने
प्रशांत लोके
बॅनर लावा, बॅनर काढा असल्या किरकोळ कामाशिवाय बाबूला पक्षातही किंमत नाही. तरी तो दुखावला जाऊ नये म्हणून साहेब त्यांच्या होìडगवर त्यांच्या फोटोखाली कार्यकर्त्यांचे जे फोटो टाकतात त्यात बाबूचाही फोटो टाकतात. त्याचा बाबूला खूप अभिमान वाटतो. फोटोग्राफीच्या प्रदर्शनात आपला काढलेला फोटो लावलाय अशा थाटात तो वावरत असतो. होìडगवर फोटो आला की मांदेली मिळेल या आशेने कोळणीमागे घुटमळणाऱ्या मांजरीसारखा त्या बॅनर खाली घुटमळत असतो. आशा हीच की लोकांनी त्याला ओळखावं आणि म्हणावं, ‘अरे तो बघा होìडगवरच्या फोटोतला माणूस.. प्रत्यक्षात!

पार्वती टॉकीजचा एरिया अचानक दलाल स्ट्रीट नावाने फेमस झाला. गणपत नगर एरियात गवत उगवावे तसे इस्टेट एजंट उगवले. एरियातला जो उठतो तो इस्टेट एजंट होतोय. हा बिन इनव्हेस्टमेण्टचा धंदा सगळ्यांनाच खुणवायला लागला. दुपारी नाक्यावर उभं राहून टाइमपास पण करायचा आणि व्यवसाय पण.
आता किती जणांचा इस्टेट एजंटचा व्यवसाय चालतो त्यांचं त्यांनाच माहीत. एखादा एजंट एकच घर चार वेळा विकून कमिशन कमावतो, तर चार वर्षांत अनेक एजंटचं एकही डील झालेल नसतं.
अशातलाच एक एजंट बाबू बने. राहुल रॉयचा छावा नावाचा सिनेमा कित्येक वर्ष येणार आहे, महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सादर होणार आहे, असं त्याच प्रत्येक काम हे होणारं असतं.. झालेलं कधीच नसतं.
एकाच पोरीच्या प्रेमात असलेल्या टपोरींसारखे या एरियातले एजंटही एकाच घराच्या डीलवर नजर ठेवून असतात. मग दोन-तीन एजंटचे वेगवेगळे गृप पडून त्यांच्या कोपरा मीटिंग सुरू होतात. बाबू बनेला या कोपरा मीटिंगचा प्रचंड तिटकारा. म्हणून तो कायम म्हणत असतो, ‘जे काय ते खुल्ला बोला ना! कोपऱ्यात जाऊन खुसपूस काय करता?’
बाबूला मस्करी लेवलला सोडला तर बाकी कोणी गंभीरपणे उभं करत नाही. त्याचा फिक्स असा ग्रुप नाही. तो सार्वजनिक शौचालयासारखा सगळ्यांचाच. वापरतात पण पाणी कोणी ओतत नाही. बाबूला कुठल्याच कामाचा मोबदला मिळत नाही. त्याला ग्रुप नाही, म्हणून तो आपल्याला ग्रुपिझम आवडत नाही, असं बोलत असतो.
एका पाचजणांच्या ग्रुपबरोबर त्याचं काही वर्षांपूर्वी जमायचं. एकदा बाबू धरून ते सहाजण चकाटय़ा पिटायला जमले होते आणि नेमकी तेव्हा जमावबंदी होती. पोलिस आले आणि म्हणाले, ‘जमावबंदी आहे, पाच जणांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमायच नाही.’ तेव्हा त्या पाचजणांनी त्याला ‘ए बाबू! तू आमच्यात नको. घरी जा!’ असं सांगितलं. त्या अपमानानंतर त्याने ग्रुप टाकला तो टाकलाच.
एजंटबरोबरच तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याला त्याच्या साहेबांची पण बरीच कामं असतात. आणि ती दुनियादारीवाली कामं त्याच्या व्यवसायिक कामाच्या आड येत असतात. पण तो साहेबांच्या कामाला जाऊन पक्षप्रेम निभावतो.
बॅनर लावा, बॅनर काढा असल्या किरकोळ कामाशिवाय त्याला पक्षातही किंमत नाही. तरी तो दुखावला जाऊ नये म्हणून साहेब त्यांच्या होìडगवर त्यांच्या फोटोखाली कार्यकर्त्यांचे जे फोटो टाकतात त्यात बाबूचाही फोटो टाकतात. त्याचा बाबूला खूप अभिमान वाटतो. फोटोग्राफीच्या प्रदर्शनात आपला काढलेला फोटो लावलाय अशा थाटात तो वावरत असतो. होìडगवर फोटो आला की मांदेली मिळेल या आशेने कोळणीमागे घुटमळणाऱ्या मांजरीसारखा त्या बॅनर खाली घुटमळत असतो. आशा हीच की लोकांनी त्याला ओळखावं आणि म्हणावं, ‘अरे तो बघा होìडगवरच्या फोटोतला माणूस.. प्रत्यक्षात!
मांजरीचं तरी पोट भरून समाधान होतं. पण याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही.
एखाद्या फिल्मस्टारने, आता मी फॅमिलीला पंधरा दिवस देणार आहे, तेव्हा शूटिंग-डिबग काही करणार नाही, असं म्हणावं; तसा हा सणासुदीला क्लायण्टला भेटायचं टाळतो. कारण सार्वजनिक सणांची सगळी जबाबदारी त्याच्यावर असते. या वर्षीची एरियातली दहीहंडी बाबूनेच फोडली होती (बांधताना हातातून पाडून.) म्हणून साहेबांच्या शिव्यापण खाल्ल्या होत्या. पण त्याचं त्याला वाईट वाटलं नाही. साहेबांच्या शिव्या खाणं म्हणजे डॉक्टरने लिहून दिलेला डायट आहे, सकाळ-संध्याकाळ खायलाच हवा, अशी त्याची भावना.
शिवाय दहीहंडी हिट झाली की आपला पक्ष भाव खाऊन जाणार, हे त्याच्या पक्क डोक्यात. साहेबांनी लावलेले बॅनर चोरून, जडीबुटी विकणारे गरीब लोक त्याच्या चड्डय़ा शिवतात. म्हणून बॅनर चोरांवर लक्ष ठेवायला तो रात्रभर जागला होता. तशी त्याला रात्रीचं जागरण करायची सवय होतीच. काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी, एरियाल्या टगेगिरी करणाऱ्या मुलांच्या मदतीने रात्री गस्त घालण्याचा उपक्रम राबवला होता. त्याला ‘ईगल ब्रिगेड’ असं नाव दिलं होतं. त्यात बाबू होता. चारजणांच्या ईगल ब्रिगेडचा तो कॅप्टन होता. म्हणून दिवसभर तो ब्रिगेडिअर असल्याच्या थाटात वावरायचा.
रात्रभर जागून बॅनरचोर तर त्याला सापडला नाहीच. मग पहाटे मालपेकरांच्या दूध लाइनच्या दुधाच्या पिशव्या दुधाची गाडी ठेवून गेली. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत तो त्यातली एक ढापून घरी घेऊन गेला.
आंघोळ वगैरे करून तो नाक्यावर हजर झाला. समोरची पार्टी त्याला भेटायला येणार होती. दुबेंचा फ्लॅट त्याला भाडय़ाने द्यायचा होता. समोरची पार्टी आली, नाक्यावरच्या चहावाल्याला त्याने सांगितलं तीन स्पेशल देना. चहावाल्याचा नवीनच आलेला पोऱ्या त्याला म्हणाला, ‘आपका कल का भी तीन कटींग का बाकी है.’ पार्टी समोरच तो उधारीच बोलल्यामुळे बाबूची कोंडी झाली. पण पार्टी समोरच असल्याने तो काही रिअ‍ॅक्ट झाला नाही. तो पोऱ्याला म्हणाला, ‘जा महाराज को बोल बाबू बनेका चाय है, हमारा अलग हिसाब है!’ पोऱ्या आता मुंबईत काय काय बघावं लागणार आहे, असे भाव चेहऱ्यावर देऊन निघून गेला. तसा बाबू सारवासारव करत पार्टीला म्हणाला, ‘काय आहे ना, दिवसभर चहा मागवणं चालू असतं. सारखे सारखे सुटे कोण करत बसणार? म्हणून मी महिन्याचे चार-पाच हजार काय होतील ते एकदम देऊन टाकतो. पार्टी म्हणाली, ‘घर दाखवतायना?’
पार्टी जाताना म्हणाली, ‘घर आवडलं आहे, दोन तीन दिवसांत फोन करून कळवतो.’
पार्टी गेली. बाबूला कळलं. दोन-तीन दिवसांत कळवतो, म्हणजे हे डील काही होणार नाही. बाबू पुन्हा नाक्यावर आला. मन्या म्हशेळकर आज सुटीवर होता. त्याला सोमवारी सुटी असते. म्हणून सगळयांना संशय आहे की तो, कुठेतरी सलूनमध्ये कामाला आहे. त्याने घरी चिकन आणून दिलं होतं. नाक्यावरच्या रिकामटेकडय़ा एजंटबरोबर टाइमपास करून मग दुपारची बियर उडवूया, या उदात्त विचाराने तो नाक्यावर आला होता. बाबू बनेला त्याने विचारलं, ‘तुझं एक पण डील कधी यशस्वी का होत नाही?’ बाबू भडकून खोटं बोलला, ‘माझी बरीच डील झाली आहेत, तुला माहीत नाही तर कायपण फालतू वार्ता करू नकोस.’ तेवढय़ात घोरपडे आजी चक्कर येऊन पडल्यात, असा निरोप एरियाच्या हेल्प लाइनवर आला. म्हणजेच बाबूच्या मोबाइलवर आला.
‘या वयात म्हातारीला चक्कर आली? कुठे गुण उधळले?’ न राहवून मन्या म्हशेळकरने घिसापिटा विनोद केला. बाबू वैतागला. म्हणाला,‘तुम्ही लोक कायपण कामाचे नाय. कोणाची मदत करणार नाय. फक्त भंकस करायला पाहिजे. असं बोलून एकाची बाइक घेऊन निघून गेला.
दुपारी आणखी एक पार्टी आली, मामा मालवणकरांचं घर भाडय़ाने द्यायचं होतं. घर बघायला आलेल्या त्या दोन मुलांना त्याने घर दाखवलं. मामा म्हणाले, ‘मला सडाफटिंग लोकांना घर भाडय़ाने द्यायचं नाही, नवरा बायको वैगरे असतील तरच मी घर भाडय़ाने देणार.
बाबू गडबडला. मुलांना म्हणाला, ‘दुसरं घर आहे ते मी दाखवतो. ते म्हणाले, ‘आम्हाला ऑफिसला जायचं आहे. आम्ही नंतर येतो.’
बाबूचं क्लायंट इज्जतीसारखं असतं. एकदा गेलं की गेलं.
बाबू चहावाल्याच्या पोराला म्हणाला, ‘दू क्या एक चमाट? वो पार्टी के सामने क्या बोलता है, पसा बाकी है!’
चहावाला महाराज म्हणाला, ‘अरे बाबूभाय काय तुम्ही पण? तुम्हाला काय पसा मागितला काय. तुम्ही काय पळून जाणार काय? इकडेच तर असणार.’
थोडक्यात काय? तर त्याची प्रगती होणार नाही, असं त्याने ऐकवून टाकलं. पोरगा नवीन आहे, चुकी झाला त्याचा. राजस्थानी महाराजला चांगलं माहीत होतं की मराठी माणसाशी मराठीत बोलला की तो खुश होऊन शांत होतो. आणि त्यात बाबू बने तर, दोन अधिक दोन किती, हे गणित सोडवण्याइतका सोप्पा होता.
त्यानंतर वायरीत अडकलेला कावळा, फायरब्रिगेड यायच्या आधी त्याने सोडवला. संध्याकाळी येणारी पार्टी कॅन्सल झाली होती. मग साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या माहेश घाटपांडे उर्फ महेश राही यांच्या कवितांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्याने एखादा सिद्धांत मांडावा, या श्रद्धेने खुच्र्या मांडल्या. कवितेतलं त्याला काही कळत नाही, म्हणून तो ते कार्य करून निघाला.
राजू नामजोशीला ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’मध्ये पकडल्याचा त्याच्या हेल्पलाइन वर फोन आला. त्याला सोडवायला गेला. साहेब म्हणाला, ‘आता याची मेडिकल करतो.’ बाबू म्हणाला, ‘असं नका करू!’ साहेब म्हणले, ‘मग आता मी काय करू? याचा सत्कार करू? याने गाडी चालवून काय मायकल शुमाकरचा रेकॉर्ड मोडला नाही, कायदा मोडलाय, मी पोलिस आहे ना? मग माला माझ काम करू दे ना!’
बाबू म्हणाला, ‘याची मेडीकल झाली तर याची जिंदगी बर्बाद होईल, नोकरी जाईल, साहेब जाऊ द्या ना आपला मराठी पोरगा आहे.’
साहेब म्हणाला, ‘बास झालं हे मराठी मराठी! परवा एक अरब मला म्हणाला की जाने दो ना सहाब आप भी मराठी म भी मराठी!’
साहेबांना कसंतरी समजावून राजू नामजोशीला घेऊन एरियात आला. ‘बाबू तू माझा मोठा भाऊ आहेस. तुझी शप्पथ मी परत दारू पिऊन गाडी चालवणार नाही. आय लव यू!’ असं म्हणत गुटखा खाल्ल्या ओठांनी गालावर कीस करत नामजोशीने बाबूचा गाल रंगवला. बाबू वैतागून म्हणाला, ‘हे गुटख्याचे कीस देत नको जाऊस, जळजळतं. कधी तरी मला प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. जा आता घरी. संध्याकाळचे सहा ही काय टाईट व्हायची वेळ आहे का?’ राजू म्हणाला.
‘आज ऑफिसमध्ये पार्टी होती. त्या केतन परेखला प्रमोशन मिळालं, च्यायला मी ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी मर-मर मरवतो, पण माझी कोणाला कदरच नाही. च्यायला ते रचतात तेव्हा इतिहास. आम्ही रचतो तेव्हा लगोरी?’
राजू फ्रस्ट्रेशन ओकला. मग खरोखरच ओकला. फेकलेलं खरकट खायला कावळे जमावेत तसे, टाइट राजूला बघायला छोटी मुलं जमली. ते बघून बाबूने राजूकडून दोनशे रुपये खर्ची घेऊन त्याला घरी पिटाळला.
चिमण्या घरटय़ात जायला निघाल्या. गुजराथी बायका गाडीवरच खायला निघाल्या. गाई-बल गोठय़ावर जायला निघाले, डायमंड मर्चण्ट कोठय़ावर जायला निघाले. साहेब निघणार म्हणून ड्रायवर कारकडे जायला निघाले आणि असंख्य बाबू बने बारकडे जायला निघाले.

response.lokprabha@expressindia.com