३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पूजन

माघी गणेशोत्सव
प्रतिनिधी

माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जन्माचा दिवस आणि त्यानुसार काही ठिकाणी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. काही वर्षांपासून हा उत्सव बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक रूपाने साजरा करताना दिसतो, माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने..

गणेशोत्सव म्हटलं की भाद्रपद महिना डोळ्यासमोर येतो आणि त्या दिवसातला लोकांचा उत्साह हा काही वेगळाच असतो. पण पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जन्माचा दिवस, सिद्धिविनायकाचा दिवस आणि त्यानुसार काही ठिकाणी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. सिद्धटेक, गणपतीपुळे, पाली, प्रभादेवी अशा काही मोजक्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जायचा. पण काही वर्षांपासून हा उत्सव बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक रूपाने साजरा करताना दिसतो, तर काहींच्या घरीसुद्धा हा उत्सव साजरा होताना दिसतो.
साधारणत: ५-६ वर्षांपूर्वी नालासोपारा येथील पास्कोल नगरमधील बाळगोपाळ सार्वजनिक मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे २६ जानेवारी या दिवशी सार्वजनिक पूजेचे आयोजन केले गेले होते. आरास म्हणून हिमालय उभारला गेला होता. शंकराच्या जटेतून गंगा बाहेर येतानाचा देखावा होता. जिथे त्या जटेतून पाणी पडत होते तिथे एक गणपतीचा आकार तयार झाला होता आणि तो लोकांना भावला. गेला. त्यानंतर या गणेशाबाबत लोकांना स्वप्नदृष्टांताची अनुभूती येऊ लागली. स्थानिक लोकांनी एकत्रित विचार करून आपण सार्वजनिक गणपतीची स्थापना करावी, अशी एक कल्पना पुढे आली. त्यातूनच माघी गणपतीच्या उत्सवाची स्थापना झाली. तसे या मंडळातर्फे वर्षभर जनतेच्या सेवेसाठी काही ना काहीतरी उपक्रम चालूच असतात. उदा. रक्तदान, गरिबांना मदत करणे वगैरे. अडल्यानडल्यांच्या उपयोगी पडण्यात तर हे नेहमीच तयार असतात.
मंडळाचे महेश शिर्के व वैभव मोरे हे मनोभावे इथल्या उत्सवाचे आयोजन करतात. ते सांगतात, ‘जेव्हापासून आम्ही हा उत्सव साजरा करायला लागलो तेव्हापासून आमच्या श्रद्धाळू मनांमध्ये सकारात्मक ऊर्जा विकसित होत गेली. त्यामुळे आम्ही हा उत्सव मनोभावे साजरा करतो.’
ह्य़ा गणेशाच्या पूजनाने इच्छाबळ वाढते, असे भाविकांचे अनुभव आहेत. त्यामुळे त्या भागातील स्थानिक जनता ‘सर्वधर्मसमभावे’ हा उत्सव साजरा करतात.
उत्कृष्ट भव्य देखावा, विधिवत पूजाअर्चा, विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो.
ह्य गणपतीची मूर्ती घडविण्याचे भाग्य आपल्याला मिळावे म्हणून वसई पापडी येथील कृणाल पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात. आतापर्यंत त्यांच्या प्रयत्नाला यशपण आले आहे. कृणाल पाटील म्हणतात- ‘ह्य गणपतीची मूर्ती घडवताना मला वेगळाच आनंद मिळतो. तसे पाहता आम्ही भाद्रपदमध्ये अनेक लहानमोठे गणपती बनवतो, पण हा गणपती काही वेगळाच वाटतो. हा गणपती तयार करताना मला काही वेगळेच पॉझिटिव्ह अनुभव येतात.’
थोडक्यात काय तर एकदंरीत नालासोपारा येथील माघी गणपती उत्सवाची झालेली सुरुवात ही आपल्याला काही वेगळेच संदेश देऊन जाते. दरवर्षी या उत्सवाची महती वाढत गेली आहे. स्थानिक रहिवाशांना एकत्रित ठेवण्याचा या मंडळाला एक नवा मार्ग सापडला आणि तो यशस्वी झाला.
response.lokprabha@expressindia.com