३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

नक्षत्रांचे नाते

अश्विनी नक्षत्र भाग ३
आनंद जोहरी

आकाशमंडळामध्ये राशीपथाच्या चारी बाजूला ताऱ्यांचे अनेक समूह दिसतात. याच ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र असं म्हणतात. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण किंवा चार पदं असतात. आकाशात एकूण २७ नक्षत्रांना नावं देण्यात आली आहेत. या प्रत्येक नक्षत्राचा स्वत:चा वेगळा स्वभाव, गुण आणि काही खास वैशिष्टय़ं असतात. जन्माच्या वेळी असलेलं नक्षत्र त्या व्यक्तीचं नक्षत्र असतं. त्या नक्षत्रांनुसार अनेकदा समस्याही बदलतात. या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न-

माझं प्रमोशन होत नाहीये. माझ्या मागून आलेली माणसं पुढे गेली. मला रागही भरपूर येतो. खूप प्रयत्न करूनही ताबा मिळवता येत नाही. माझं नक्षत्र अश्विनी आहे. मला उपाय सांगा.
- प्रशांत पाटकर

अश्विनी नक्षत्राचं चिन्ह घोडा आहे. घोडा हजारो वर्षांपासून शक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे या नक्षत्राच्या लोकांमध्ये भरपूर ऊर्जा असते. योग्य पद्धतीने याचा वापर न झाल्यास ती ऊर्जा क्रोध किंवा कटू वाणीच्या माध्यमातून बाहेर पडते. तुमच्या प्रमोशनला उशीर होतोय याचं कारण ग्रहस्थितीसोबतच तुम्ही स्वत: आहात. ऊर्जा आणि राग व्यवस्थापन तुम्ही योग्य पद्धतीने करीत नाही. यशासाठी तुम्ही मधुर वाणीचा वापर करणं आवश्यक आहे. लोकांशी चांगलं वागा. स्वत:च्या स्वभावात प्रामाणिकपणा आणा. वागणं बदला. मोती आणि पुष्कराज धारण केल्याने काम होऊ शकतं. चांदीच्या ग्लासमधून पाणी आणि दूध प्यायल्यास शुभ होईल. येणारा काळ चांगला आहे.

माझा जन्म अश्विनी नक्षत्रात झाला आहे. माझं वैवाहिक जीवन तसं वाईट नाही, पण माझा सेक्समध्ये इंटरेस्ट जास्त आहे आणि माझ्या पतीचा तेवढा नाही असं मला वाटतं. त्यांचा मला पूर्ण सहयोग असतो तरी माझ्या मनातून ही शंका जात नाही. मी कुठेतरी वाचलं होतं की अश्विनी नक्षत्रांच्या लोकांचे एकाहून अधिक लोकांशी संबंध असतात. मला काय केलं पाहिजे?
- सुवर्णा गावडे

प्रत्येक अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तीचे एकाहून अधिक लोकांशी संबंध असतातच असं नाही. या नक्षत्राच्या लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत कामेच्छा अधिक असते हे नक्की. पण प्रत्येक दोन व्यक्ती वेगळ्या असल्याने हे स्वाभाविकच आहे. त्याची चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या पतीचं नक्षत्र न सांगितल्याने त्यांच्या संदर्भात सांगता येत नाही. तुम्ही स्वत:च सांगत आहात की तुमचं वैवाहिक जीवन वाईट नाही त्यामुळे चिंता करू नका. पण त्यांना हिरा धारण करण्यासंदर्भात तुम्ही सुचवू शकता. त्यामुळे त्यांच्या शुक्राच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने फायदा होईल. शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक केल्यानेही वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो.

माझ्या मुलाचं अभ्यासात लक्ष नाही. तो अश्विनी नक्षत्राचा आहे. अभ्यासात त्याचं लक्ष नसल्याने माझी पत्नी त्याच्या भविष्याबाबत चिंतित असते. कृपया मार्गदर्शन करा.
- सुदेश देसाई
तुमचा मुलगा अभ्यास करीत नाही याचं कारण त्याचं नक्षत्र नाही. या नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड बुद्धिमान आणि विद्याव्रती असतात. जर तुमचा मुलगा चांगले मार्क मिळवत नाही तर त्याची एकाग्रता कुठेतरी कमी पडतेय. त्याचं लक्ष विचलित होतं. त्याला भ्रामरी प्राणायाम शिकवा. रोज दही-साखरेचा नैवेद्य गणपतीला दाखवा. फायदा होईल. ज्ञान बीज ‘ऐं’चा जप, गायीला हिरवं गवत खाऊ घालणं आणि पुष्कराज धारण केल्याने विशेष लाभ होईल. त्याच्या भविष्याबद्दल चिंता करू नका, कारण त्याचे ग्रह त्याच्या चांगल्या भविष्याची खात्री देत आहेत.

माझं नक्षत्र अश्विनी आहे. माझी तब्येत ठीक नसते. मासिक पाळी अनियमित आहे. प्रत्येक वेळी त्रास होतो. याचा काही नक्षत्राशी संबंध आहे का?
- स्मिता लोके

प्राचीन ग्रंथांमध्ये या समस्येचा संबंध नक्षत्रांशी जोडला जातो. अश्विनी नक्षत्राच्या स्त्रियांमध्ये इतर नक्षत्रांच्या स्त्रियांच्या तुलनेत स्त्री-रोगाची संभावना जास्त असते. या नक्षत्राच्या व्यक्तींना लहान-मोठी इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते. शारीरिक अनियमिततेमुळे काही रोगांची शक्यताही उद्भवते. अश्विनी नक्षत्राच्या चौथ्या चरणामध्ये चंद्राची दृष्टी जर शुक्रावर पडली असेल तर त्या स्त्रियांना अनियमित मासिक पाळीचा त्रास संभवतो. त्यामुळे त्रासही होऊ शकतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पांढरी आणि काळी वस्तू दान केल्याने लाभ होईल. सोन्यामध्ये लसनिया खडा मधल्या बोटात धारण केल्याने समस्यांचं निराकरण होईल. महामृत्युंजयाच्या बीजमंत्राने लाभ होईल.
‘ॐ हृैं जूं स:।’

माझ्या पतीचं नक्षत्र अश्विनी आहे. ते कुटुंबीयांवर अफाट प्रेम करतात, काळजी घेतात. पण त्यांना त्याचं श्रेय मिळत नाही. त्यांचेच आई-वडील, बहीण-भाऊ त्यांच्या पाठीवर त्यांची नालस्ती करतात. काही उपाय सुचवा.
- निर्मला पंत

अश्विनी नक्षत्राची माणसं आपल्या कुटुंबीयांवर खूप प्रेम करतात. त्यांची काळजीही घेतात. पण त्यांच्या वाणीमुळे त्यांच्या जवळची माणसं दुखावली जातात. या लोकांचा हटवादी स्वभावही त्यांना त्यांच्या माणसांपासून दूर नेतो. मधुर भाषेचा उपयोग आणि विवेक यामुळे त्यांना मदत होऊ शकेल. रोज सूर्याला अघ्र्य अर्पण करावे. त्यामुळे प्रतिष्ठा प्राप्ती होईल. करंगळीमध्ये मोती धारण केल्याने आणि गोड पदार्थाचे वाटप केल्याने फायदा होईल.
response.lokprabha@expressindia.com