३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

घिरटय़ा

वायुसैनिकांच्या संगिनी
उमा सहस्रबुद्धे

दरवर्षी जानेवारी महिन्यात एखाद्या शांत, निवांत ठिकाणी हवाईदलातील निवृत्त अधिकारी व वायुसनिक एकत्र भेटतात. या संमेलनाला रत्नगुंफा असे म्हणतात. गेली ११ वर्षे नियमितपणे या संमेलनांचे आयोजन केले जात आहे. या संमेलनाचे अनुभवकथन खुद्द एका वायुसैनिकाच्या पत्नीच्या शब्दांत...

‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सनिकहो तुमच्या साठी’ ह्य गाण्याच्या ओळी नुसत्या ऐकताना अंगावर अजूनही रोमांच उभे रहातात. मग ज्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी स्वतच्या तारुण्याची काही वष्रे दिली त्यांचे काय होत असेल. ते दिवस त्यांच्या डोळ्यांसमोरून पुन्हा-पुन्हा जात नसतील? एकेक क्षण ज्यांना त्यावेळी युगासारखा वाटला ते क्षण आठवून काय होत असेल? या युद्धवीरांना रत्न ही उपाधी दिली तर खरोखरच किती सार्थ ठरेल! आपल्या देशाची ही खरी संपत्ती आहे. अशाच काही माजी रत्नवीरांचे प्रतापगडच्या पायथ्याशी पोलादपूर येथे नुकतेच संमेलन झाले. यासाठी वायुसेनेतून निवृत्त झालेल्या आणि वयाची साठी उलटलेल्या वायुपुत्रांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी आपल्या संमेलनाला ‘रत्नगुंफा’ असे नाव दिले आहे. या सगळ्याच वीरांचे अनुभव ऐकताना हे नाव किती योग्य आहे ते जाणवते.
दरवर्षी जानेवारी महिन्यात एखाद्या शांत, निवांत ठिकाणी हवाईदलातील निवृत्त अधिकारी व वायुसनिक एकत्र भेटतात. ह्य वर्षी पोलादपूर येथे भरलेल्या अशा संमेलनाला मला माझ्या यजमानाबरोबर जायचा योग आला. गेली ११ वष्रे वेगवेगळ्या ठिकाणी अशी रत्नगुंफेची संमेलने झाली पण पती वायुदलातून निवृत्त होऊनही ह्या संमेलनाना जायचा योग आला नव्हता. अखेर या वर्षी तो योग जुळून आला..
रत्नगुंफाचे संमेलन सुरू कसे झाले ह्याचीही एक गोष्ट आहे. रिसबूड नावाच्या माजी अधिकाऱ्यांनी सुमारे १९९८ साली बडोद्याला घरगुती सोहळ्यासाठी आपल्या नातेवाईकांना न बोलावता जुन्या सहकाऱ्यांना निमंत्रित केले. हा सोहळा पुनभ्रेटीचा आनंद देणारा ठरला आणि मग आपण घेतलेला आनंद आपल्या इतर जुन्या सहकाऱ्यांना मिळावा ही संकल्पना सवार्ंनीच उचलून धरली. ती प्रत्यक्षात यायला २००२ साल उजाडले आणि तेव्हापासून गेली ११ वष्रे दरवर्षी रत्नगुंफेचे संमेलन भरते आहे.

युद्धात शत्रुवर हल्ला करताना सर्व निर्णय पायलटला झटपट घ्यावे लागतात, त्यावेळी आपल्या हल्ल्यात कुठे व किती मरतील ह्यचा विचार अशक्यच. बऱ्याचदा आमची अवस्था महाभारतातल्या रणभूमीवरच्या अर्जुनासारखी होते.

ह्य वर्षी पोलादपूर येथे प्रतापगडाच्या पायथ्याशी भरलेल्या संमेलनात सुमारे ४० वर्षांंपूर्वी एअरफोर्समध्ये माझ्या पतींबरोबरचे जुने सहकारी व त्यांच्या बायका ह्यंच्या भेटीचा आनंद अवर्णनीयच होता. त्या वेळी युद्धकाळात घेतलेले थरारक अनुभव पुनश्च अनुभवायला मिळाले. खरे तर, स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि अफझलखानरूपी संकट स्वतच्या पराक्रमाने व साहसाने परतवणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीवर ह्य एकविसाव्या शतकातल्या मावळ्यांबरोबर काढलेले दिवस लिहायला पाने अपुरी पडतील. साधारण १९५५ ते १९७२ दरम्यान वयाच्या १७व्या-१८व्या वर्षी एअरफोर्सच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर काम करीत असलेले हे सनिक आता वयाची साठी ओलांडली तरी मनाने तरुणच आहेत. त्यातल्या एकाने १९६२ सालचे स्वतचे अनुभव सांगताना भारत-चीन युद्ध डोळ्यासमोर उभे केले. त्यावेळी त्यांनी अनुभवलेली लडाखमधली थंडी, चिनी विमानांनी केलेला बॉम्ब वर्षांव, आपल्या विमानभेदी तोफांचे आवाज मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले होते. बहुतेकांचे अनुभव १९६५ चे पकिस्तान युद्ध व १९७१ चे बांगलादेश व पकिस्तान युद्धाचे होते. त्यामुळे या युद्धातील आठवणींचे शेअरिंग हा संमेलनाचा जणू मुख्य उद्देश होता. वीरचक्र विजेते िवग कमांडर कर्णिक यांचे अनुभव इतके रोमांचक व अंतर्मुख करणारे होते की आम्हा सर्वांनाच आम्ही त्यांच्यातलेच एक आहोत ह्यचा अभिमान वाटला. त्यांच्याच शब्दात,
‘युद्धात शत्रुवर हल्ला करताना सर्व निर्णय पायलटला झटपट घ्यावे लागतात, त्यावेळी आपल्या हल्ल्यात कुठे व किती मरतील ह्यचा विचार अशक्यच. बऱ्याचदा आमची अवस्था महाभारतातल्या रणभूमीवरच्या अर्जुनासारखी होते. परंतु शत्रुचा बिमोड वेळीच केला नाही तर ते माझ्या देशाला धोका निर्माण करतात जे मी व माझे सहकारी कधीही सहन करू शकणार नाही. त्यामुळे अटॅक हे एकच सूत्र डोक्यात ठेवून काम करावे लागते.’
ह्य वायुसनिकांच्या अशा अनेक थरारक गोष्टी ऐकताना ह्यंनी युद्धजन्य पभरस्थितीत स्वतच्या जिवाची पर्वा न करता कसा सामना केला असेल हे जाणवते आणि त्यांनी हा पराक्रम केला म्हणून आपण सुरक्षित आहोत ह्याची खात्री पटते.
माझ्या पतींच्या तोंडून त्यांनी १९६५ व १९७१ च्या युद्धात कसे दिवस काढले हे ऐकले होते. माझा स्वतचा अनुभव असा आहे की १९७१ मध्ये जेव्हा भारत पकिस्तान युद्ध पेटले तेव्हा माझे पती राजस्थान बॉर्डरवर होते व मी मुंबईत माझ्या ६ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी राहात होते. २२ ते २५ दिवस त्यांचा ठावठिकाणा आम्हाला माहीत नव्हता. तेव्हा फोन किंवा मोबाइलही नव्हते, पत्रांवरच अवलंबून राहावे लागायचे. ती पत्रेसुद्धा सेन्सॉर होऊन यायची त्यामुळे खूप वेळ लागायचा. इथे मुंबईत सरावासाठी जेव्हा आकाशात ट्रेसर्स उडविले, युद्धाच्या हवाईहल्ल्याचे सायरन वाजले तेव्हा हल्ल्याच्या नुसत्या कल्पनेनेच मुंबईकर हादरले होते.
माझ्याकडे बघताना जणू काही युद्धावर असलेला हिचा नवरा परत येतो की नाही, हिचे पुढे काय होणार असे भाव लोकांच्या चेहऱ्यावर बघितलेले मला अजूनही आठवतात. त्यावेळेला प्रत्यक्ष युद्धभूमीवर असलेल्या आणि शत्रुच्या बॉम्बहल्ल्याला तोंड देत असलेल्या माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली असेल ह्याचा विचारही मनाला अस्वस्थ करी! ह्य रत्नगुंफेच्या संमेलनात आलेल्या माझ्यासारख्या इतर निवृत्त सनिकांच्या पत्नींचे अनुभव काही वेगळे नव्हते. त्यातल्या बऱ्याच जणींनी त्या वेळचे त्यांचे अनुभव सांगितले आणि आज जरी आम्ही सगळ्या जणी सुरक्षित, सुखात आहोत तरी त्या वेळी ज्या विरहवेदना आम्ही सहन केल्या त्यामुळे आम्ही एकमेकींच्या फार जवळ आहोत. इथे आलेल्या बऱ्याचशा माजी सनिकांनी हे स्पष्ट सांगितले की, आम्ही जेव्हा देशसेवेत कार्यरत होतो तेव्हा घरची आघाडी आमच्या पत्नीनींच लढवली त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि प्रत्येकजण ह्यचा उल्लेख आवर्जून करताना दिसले.

संमेलनात आलेल्या काही सनिकांच्या विधवासुद्धा आपल्या नवऱ्याचे कर्तृत्व लक्षात ठेवून त्यासुद्धा समाजातील तळगाळातल्या महिलांना मदत करण्यात पुढे होत्या. एका निवृत्त सनिकाची पत्नी आपला सर्व वेळ अंध मुलांना शिक्षणात मदत करण्याला देत होती.

ह्य तीन दिवसांच्या संमेलनात नुसतेच एकमेकांचे अनुभव वा जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला नाही तर आपल्यासारख्या निवृत्त सनिकांना जी काही आदराची जागा मिळाली पहिजे ती मिळत नसल्याची खंतही बोलण्यात जाणवली. सध्या देशाची जी बिकट अवस्था आहे त्याचे मूळ भ्रष्टाचारात व भ्रष्टाचाराचे मूळ निवडणुकीत होणाऱ्या पशांच्या गरव्यवहारात आहे असा सूर बऱ्याच जणांनी काढला. परदेशातील गणवेशातील सनिकांनी देशासाठी जे कार्य केले त्याचा ते निवृत्त झाल्यानंतर कुठलेही सरकार असो ते उचित गौरव करते पण आपल्या देशात अशा निवृत्त सनिकांच्या समस्या जाणून घ्यायचे कष्टसुद्धा केले जात नाहीत.
संमेलनात आलेले सर्वजण एकेकाळी तरुण वयात वेगळ्याच उत्साहाने भारलेले होते तोच उत्साह, तीच धडाडी, तेच आशावादी विचार त्या सर्वाच्या वागण्यात मला दिसून आले. आपल्या सहकाऱ्यांच्या अडी-अडचणींचे विचार, आपले आप्तस्वकीय करणार नाहीत त्यापेक्षाही जास्त हे सारे जण करताना दिसले. ह्यतील बहुतेक जणांनी ‘आपले मरण आपण पहिले आपुल्या डोळा’ हा अनुभव तरुणपणी युद्धभूमीवर घेतलेला होता आणि म्हणूनच साठीनंतरच्या उतारवयातसुद्धा ‘हरी हरी ’करत बसण्यापेक्षा काहीतरी भरीव समाजकार्य करावं ही ओढ त्यांच्या बोलण्यात वागण्यात मला दिसली. प्रत्येक गोष्ट करताना त्यात जीव ओतून कार्य करायची आणि वाईटात वाईट काय होईल तर मृत्यू, तो तर आपण तरुणपणीच पहिला आहे तर मग आता सदैव सनिका, पुढेच जायचे हेच जणू त्यांचे ब्रिदवाक्य होते.
दरवर्षी विविध ठिकाणी हे सारे एकत्र येतात, जुन्या आठवणींबरोबर नवीन विचारांची देवाण घेवाण करतात. निवृत्त झाल्यानंतर बहुतेकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय गाठलेले आहे. एका वायुसनिकाने अनुभव सांगताना एक अत्यंत मोलाचे वाक्य वापरले, ‘माझा असा विचार आहे की तरुणपण देशसेवा करण्यात गेले, प्रौढावस्था प्रपंचाकडे बघण्यात गेली आणि आता रहिलेला काळ ह्य देशाची नवीन पिढी घडविण्यात गेली तर जीवनाचे सार्थक होईल’.
ते स्वत: नवोदितांना मार्गदर्शन करण्यात आपला वेळ घालवतात. संमेलनात आलेल्या काही सनिकांच्या विधवासुद्धा आपल्या नवऱ्याचे कर्तृत्व लक्षात ठेवून त्यासुद्धा समाजातील तळगाळातल्या महिलांना मदत करण्यात पुढे होत्या. एका निवृत्त सनिकाची पत्नी आपला सर्व वेळ अंध मुलांना शिक्षणात मदत करण्याला देत होती. तिच्या कार्याची माहिती ऐकल्यावर अभिमानाने सर्वानांच भरून आले. सनिक सैन्यात असताना देशासाठी प्राणार्पण करण्याची तयारी दर्शवतो आणि आपले देशप्रेम व्यक्त करतो. पण सैनिकांच्या पत्नीही देशप्रेम व्यक्त करण्यात मागे नसतात. त्या फक्त स्वतच्या संसाराकडे न बघता इतरांचे संसार कसे उभे राहतील, स्वत:ला जे स्थैर्य आयुष्यात मिळाले ते इतरांनाही कसे मिळेल, ह्य विचाराने भारावलेल्या असतात. संमेलनाला आलेल्या, पुण्याच्या कित्येक भगिनी अनेक समाजकार्यात मग्न होत्या.
हे संमेलन अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक संमेलनात पुढचे संमेलनाचे ठिकाण ठरवले जाते. संमेलनाचे यजमानपद घेण्यासाठी प्रत्येक जण पुढे असतो. ठिकाणाची व्यवस्था कमी खर्चाची, जागा सर्वाच्या सोयीची, प्रवास सोपा असलेली आणि बऱ्याच वेळा यजमानाच्याच मालकीची असलेली असते. ह्य वेळी पोलदपूरचे संमेलन ‘गोल्डन पॅलेस रिसोर्ट, येथे झाले, जे एका निवृत वायुसनिकाचे होते. ते त्याने उपलब्ध करून दिले होते. ह्य पूर्वीची झालेली संमेलने अशाच पद्धतीने भरवली गेली होती. ह्य संमेलनासाठी वर्षांतून एकदाच जरी सारे भेटत असले तरी संबंध वर्षांची ऊर्जा, उमेद त्यांना इथे मिळते. हे तीन दिवस सर्वस्वी त्यांचे स्वतचे असतात. ह्य वेळी श्रीमंती-गरीबी, अधिकार, प्रापंचिक व्यथा, विवंचना बाजूला सारून हे सारे पुन्हा गणवेषात गेल्यासारखे वाटतात. मरण अत्यंत जवळून बघितलेले हे सारे रोजच्या आयुष्यातले हेवेदावे, स्पर्धा, एकमेकांचा मत्सर ह्य साऱ्या नकारात्मक भावनांच्या पलीकडे गेलेले वाटतात आणि ते पाहताना कवी बा. भ. बोरकरांच्या ओळी आठवतात,
मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जीवन त्याना कळले हो!
response.lokprabha@expressindia.com