३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

ज्ञानपीठाचे मानकरी

ताराशंकर बंदोपाध्याय
विजय गोळेसर

सत्यजित राय यांचा ‘जलसाघर’ हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना सत्यजित राय यांनी ज्यांच्या कादंबरीवर हा चित्रपट काढला त्या ताराशंकर बंदोपाध्याय यांच्याविषयी सांगायलाच नको. पूर्वी रविवारी दुपारी दूरदर्शनवर इंग्रजी सब-टायटल्ससह प्रादेशिक चित्रपट दाखवीत. त्या वेळी कधीतरी ताराशंकरांच्या ‘गणदेवता’ या त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या कादंबरीवर ‘गणदेवता’ याच नावाचा बंगाली चित्रपट पाहिल्याचे आठवते...

बंगालची भूमी देशभक्त, क्रांतिकारक आणि साहित्यिकांच्या दृष्टीने पहिल्यापासूनच समृद्ध आहे. रवींद्रनाथ टागोरांसारखा साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळविणारा एकमेव भारतीय साहित्यिक ज्या भूमीत जन्मला त्याच बंगालीभूमीत ज्ञानपीठ या भारतीय साहित्यातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळविणारे दुसरे मानकरी ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म झाला. प. बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातील लाभपूर या निसर्गसौंदर्याने नटलेल्या एका लहानशा खेडेगावात २३ जुल १८९८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव प्रभाबती देवी होते आणि वडील हरिदास त्या भागातले नावाजलेले जमीनदार होते. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण लाभपूरच्या जदाबलाल एच. ई. स्कूलमध्ये घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोलकोत्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतली. प्री-डिग्रीचे पहिले वर्ष ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, पण ते इंटरमिजिएटला असताना त्या वेळी देशभर सुरू असलेल्या महात्मा गांधीजींच्या आंदोलनाकडे ते आकृष्ट झाले. त्यामुळे काही काळ त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. चळवळीतील सक्रिय सहभाग आणि तब्येतीच्या कुरबुरी यामुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.
समाजाशी एकरूपता
१९३० च्या शेवटी तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी ग्रामीण भागातच सामाजिक कार्य करायचं ठरवलं आणि स्वत:ला त्याच कामाला जुंपून घेतलं. न दमता न थकता त्यांनी हे कार्य केलं. त्यामुळे त्यांना समाजातील गरिबांच्या दुख-दैन्याचं जवळून निरीक्षण करता आलं. प. बंगालच्या बिरभूम जिल्ह्यात त्यांनी या काळात जे पाहिलं, अनुभवलं तेच त्यांनी पुढे आयुष्यभर त्यांच्या कथा कादंबऱ्यांतून व्यक्त केलं. इथे कार्य करीत असतानाच त्यांनी स्वत:ला साहित्यसेवेला वाहून घ्यायचे ठरविले. आपल्या साहित्यसेवेचा श्रीगणेशा करण्यापूर्वी १९३२ साली त्यांनी प्रथमच शांतिनिकेतनला जाऊन रवींद्रनाथ टागोरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची पहिली कादंबरी ‘चताली घुरनी’ प्रसिद्ध झाली ती त्याच वर्षी! १९४० साली त्यांनी बागबाजार भागात एक घर घेतलं आणि त्यांचं कुटुंब कलकत्याला आणलं. पुढच्याच वर्षी ते बारानगरला शिफ्ट झाले.
साहित्य चळवळीला प्रोत्साहन
ताराशंकरांनी केवळ कथा-कादंबऱ्या लिहिल्याच नाही, तर बंगाली लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. अनेक ठिकाणी त्यांनी लेखकांचे संघ स्थापन करून राज्य पातळीवरील तसेच अखिल भारतीय पातळीवरील बंगाली साहित्य संमेलन घडवून आणले. बंगाली लोकांना वाचनाची गोडी लावली ती त्यांच्या या साहित्य चळवळींनीच. १९४२ साली ते बिरभूम जिल्हा साहित्य संघ आणि अ‍ॅण्टी फॅसिस्ट रायटर्स अ‍ॅण्ड आर्टस्टि असोसिएशन बंगालचे अध्यक्ष झाले. १९४४ साली कानपूर येथे राहणाऱ्या अनिवासी बंगाली लोकांनी यांच्या अध्यक्षतेखाली बंगाली साहित्य परिषदेचे संमेलन आयोजित केले होते. १९४७ साली त्यांनी कलकत्ता येथे प्रबासी बंग साहित्य संमेलन आयोजित केले. त्यानंतर मुंबईत झालेल्या रौप्यमहोत्सवी प्रबासी बंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. याच वर्षी त्यांना कलकत्ता विद्यापीठातर्फे ‘शरद स्मृतिचिन्ह’ प्रदान करण्यात आले. दरम्यान, त्यांचं कलकत्याच्या वेगवेगळय़ा भागात भाडय़ाच्या घरात राहणं चालू होतं. १९४८ साली ते कलकत्त्यातील ताला पार्क भागात स्वत:च्या घरात राहायला आले.
लोकप्रतिनिधी
१९५२ साली त्यांची बंगाल विधानसभेत आमदार म्हणून निवड झाली. दोन वर्षांनी त्यांनी त्यांच्या मातोश्रींकडून दीक्षा घेतली. १९५५ साली ‘आरोग्यनिकेतन’ या कादंबरीसाठी प. बंगाल सरकारने त्यांचा ‘रवींद्र पुरस्कार’ देऊन गौरव केला, तर पुढच्या वर्षी त्यांना याच कादंबरीसाठी ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला. १९५७ साली चीन सरकारच्या आमंत्रणावरून ते चीनला गेले. तर पुढच्याच वर्षी ते आफ्रो-एशियन रायटर्स असोसिएशनच्या प्रिपरेटरी कमिटीच्या वतीने सोव्हियत युनियनला गेले. त्यानंतर भारतीय साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून ताश्कंदला गेले. १९५९ साली कलकत्ता विद्यापीठाने त्यांना ‘जगत्तरीणी सुवर्ण पदक’ दिलं. त्याच वर्षी मद्रासला भरलेल्या अखिल भारतीय साहित्यिकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९६० साली ते प. बंगाल विधानसभेतून निवृत्त झाले, पण त्याच वर्षी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना लोकसभेत खासदार म्हणून नियुक्त केले.
मान-सन्मान
१९६२ साली त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, पण त्याच वर्षी त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला. आपलं मन रमविण्यासाठी त्यांनी पेंटिंग व लाकडी खेळणी बनवायला सुरुवात केली.
१९६३ साली त्यांना सिसिर कुमार पुरस्कार मिळाला. १९६६ साली ते लोकसभेतून निवृत्त झाले. त्याच वर्षी नागपूर येथील बंगाली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
१९६६ साली त्यांना ‘गणदेवता’ या कादंबरीसाठी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गावातल्या अंधश्रद्धा अन् रूढी दूर करण्यासाठी एक शाळामास्तर कसे प्रयत्न करतो ते या कादंबरीत विस्ताराने सांगितले आहे. या कादंबरीवर आधारित ‘गणदेवता’ याच नावाचा बंगाली चित्रपटही आला होता.
१९६८ साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर कलकत्ता आणि जाधवपूर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर देऊन त्यांचा बहुमान केला.
१९६९ साली साहित्य अकादमीची फेलोशिप त्यांना मिळाली आणि त्याच वर्षी त्यांनी वंगीय साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. १९७१ साली विश्वभारती विद्यापीठात त्यांनी नृपेंद्रचंद्र यांच्या स्मरणार्थ तर कलकत्ता विद्यापीठात डी. एल. रॉय यांच्या स्मरणार्थ व्याख्यानं दिली. १४ सप्टेंबर १९७१ रोजी कलकत्ता येथील घरात त्यांचे देहावसान झाले.
वास्तववादी लेखन
ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या पत्नीचे नाव उमाशशीदेवी होतं. त्यांना सनतकुमार, सरितकुमार, गंगा आणि बानी ही मुलं होती.
ताराशंकर बंदोपाध्याय हे वास्तववादी लेखक होते. अनेक कोनांतून ते जगाकडे पाहायला शिकले. जमिनीतून वर येऊन फुलणारं फुल त्यांनी अनुभवलं, ज्याला त्यांच्या बिरभूमच्या मातीचा गंध होता. जे कधी कुणी लिहिलं नाही ते लिहिण्याचं धाडस त्यांनी केलं. जे पाहिलं, अनुभवलं तेच त्यांनी लिहिलं. त्यांच्या सर्व कथा आणि कादंबऱ्या आशय आणि घटनासंपन्न आहेत. संवेदनाशील विचारांची रेलचेल त्यात असते. त्यांच्या कादंबऱ्या दीर्घ असत. अगणित पात्र त्यात वावरतात. अगदी उच्चभ्रू जमीनदारांपासून तर तळागाळातील मजुरांपर्यत. स्त्री-पुरुषांतील नात्यांचे अन् संबंधांचे असंख्य प्रयोग त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसून येतात. अशा संबंधातील अनतिकता त्यांनी कधी दडवली नाही. स्त्री-पुरुषांमधील नाती समाजातील रूढी आणि कायद्याच्या बंधनांना जुमानत नाहीत. त्यांची ‘राधा’ ही कादंबरी याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
ताराशंकरांनी अनेक विषय आपल्या कादंबऱ्यांतून मांडले आहेत. ‘गन्ना बेगम’ या ऐतिहासिक कादंबरीत त्यांनी पारंपरिक मूल्यांची नोंद घेतली आहे. त्यांनी बंगाली जीवनाचे विविध पलू आपल्या कादंबऱ्यांतून चित्रित केले आहेत. तसेच सामाजिक व राजकीय घटनांचा वेधही अत्यंत संवेदनाशीलतेने घेतला आहे.
ताराशंकर हे बंगाली साहित्यातील पहिले प्रादेशिक कादंबरीकार होते. त्यांच्या कादंबरीतला प्रदेश प. बंगालमधील बिरभूमपुरताचा मर्यादित होता. युद्धांनी ग्रासलेल्या कालखंडाचं वर्णन त्यांच्या कादंबरीतून दिसून येतं. त्यांच्या सर्व गाजलेल्या कादंबऱ्या उदा. धात्र्रादेवता, कािलदी, पंचग्राम, गणदेवता, काबी, आरोग्यनिकेतन, जलसाघर, रासकली, हन्सुलिबकर, उपकथा आदींमधून त्यांच्या लिखाणाची सर्व वैशिष्टय़े व्यक्त होतात. युद्धाच्या काळातच त्यांच्या बहुतेक कथा व कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या बहुतेक कथा बंगश्री आणि प्रबासी या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या ‘जलसाघर’ या साहित्यकृतीवर सत्यजित राय यांनी याच नावाचा चित्रपट काढला आहे. जुनी मूल्यं नष्ट होऊन त्याची जागा व्यावसायिकता कशी घेते हे या कादंबरीत लेखकाने वर्णन केले आहे. सत्यजित राय यांनी या कादंबरीवर चित्रपट काढून ती अजरामर केली आहे.
ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या साहित्यनिर्मितीकडे पाहिल्यावर आश्चर्यचकित झाल्यावाचून राहवत नाही. उण्यापुऱ्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविण्याच्या तोडीची १४० पुस्तकं लिहिलीत. यात ६५ कादंबऱ्या, ५३ लघुकथा संग्रह, १२ नाटकं, ४ निबंध संग्रह, ४ आत्मचरित्रात्मक ग्रंथ, २ प्रवासवर्णनं आणि १ कवितासंग्रह यांचा समावेश आहे. तोळामासा शरीरप्रकृतीमुळे आणि चळवळीतील सहभागामुळे आपल्याला कॉलेजचं शिक्षण पूर्ण करता आले नाही याची त्यांना नेहमीच खंत वाटायची. परंतु बंगाली साहित्यात त्यांनी आणलेली जागृती आणि देश-विदेशातील सततचा प्रवास यातूनही त्यांनी ही जी अजोड ग्रंथसंपदा निर्मिली त्याला खरोखरच तोड नाही.

ताराशंकर बंदोपाध्याय यांची कारकीर्द
पुरस्कार
रबींद्र पुरस्कार (१९५५)
साहित्य अकादमी अवॉर्ड (१९५६)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९६६)
पद्मश्री (१९६२)
पद्मभूषण (१९६९)
कलकत्ता विद्यापीठाकडून शरद स्मृती पुरस्कार व जगत्तारिणी सुवर्णपदक

प्रकाशित साहित्य :
कविता संग्रह :
त्रिपत्र (१९२६)
कादंबऱ्या :
चताली घुरनी (१९३२)
पाषाणपुरी (१९३३)
नीलकंठ (१९३३)
राईकमल (१९३५)
द इटर्नल लोटस (इंग्रजी, १९४५)
प्रेम ओ प्रयोजोन (१९३६)
आगुन (१९३८)
धात्रिदेबता (१९३९)
कािलदी (१९४०)
गणदेबता (१९४३)
पंचग्राम (१९४४)
मनवन्तर (१९४४)
कवि (१९४४)
बिन्गशो शताब्दि (१९४५)
सांदिपन पाठशाला (१९४६)
झार ओ झारपत्ता (१९४६)
अभिजन (१९४६)
छोटोदेर सांदिपन पाठशाला (१९४८)
पदचिन्ह (१९५०)
उत्तरायण (१९५०)
हानसुली बानकर उपकथा (१९५१)
तमस तपस्या (१९५२)
नागिणी कन्यार काहिनी (१९५२)
आरोग्य निकेतन (१९५३)
चाम्पादनगर बोऊ (१९५४)
पंचपुत्तली (१९५६)
बिछारक (१९५७)
सप्तपदी (१९५८)
बिपाशा (१९५९)
राधा (१९५९)
मनुष्येर मोन (१९५९)
डाक हरकरा (१९५९)
महाश्व्ोता (१९६१)
योगोभ्रष्ट (१९६१)
ना (१९६१)
नागरिक (१९६१)
निशिपद्मा (१९६२)
यातिभंग (१९६२)
कन्ना (१९६२)
कालबशाखी (१९६3)
इकती चारूई पाखी ओ कालो मेये (१९६३)
जंगलघर (१९६४)
मंजरी ओपेरा (१९६४)
संकेत (१९६४)
भुबनपुरेर हाट (१९६४)
बसंतराग (१९६४)
स्वर्गो-मरतो (१९६५)
बिचित्र (१९६५)
गन्ना बेगम (१९६५)
आरण्यबहनी (१९६६)
हिरापन्ना (१९६५)
महानगरी (१९६६)
गुरूदक्षिणा (१९६६)
शुकसरी कथा (१९६७)
शक्कर बाई (१९६७)
मोनि बोउदी (१९६९)
छायापथ (१९६९)
कालरात्री (१९७०)
रूपसी बिहंगिनी (१९७०)
अभिनेत्री (१९७०)
फरियाद (१९७१)
शताब्दिर मृत्यु (१९७१)
कििष्कध्या कंदो (मुलांची कादंबरी १९७२)
जनपद
किर्तीहातेर करछा

लघुकथा संग्रह
छालानामोयी (१९३७)
जलसाघर (१९३८)
रासकली (१९३९)
तीन शून्यो (१९४२)
प्रतिध्वनी (१९४3)
बेदेनि (१९४३)
दिल्ली का लड्ड (१९४३)
जादूकरनी (१९४४)
स्थलपद्म (१९४४)
तेरोशोपन्चास (१९४४)
प्रसादमाला (१९४५)
तमाशा (१९६३)
चिन्मयी (१९६४)
नारी रहस्यमयी (१९६७)
पंचकन्या (१९६७)
जया (१९६८)
उन्नीश शो एक्कात्तोर (१९७१)

नाटकं
कािलदी (१९४२)
दुईपुरुष (१९४३)
पाथेर डाक (१९४३)
व्दिपांतर (१९४५)
युगब्लिब (१९५१)
कवि (१९५७)
कालरात्री (१९५७)
संघात (१९६२)
आरोग्य निकेतन (१९६८)
फार्स
चकमकी (१९४५)

स्मृति
आमार कालेर कथा (१९५१)
बिचित्र स्मृतिकहाणी (१९५3)
आमार साहित्य जीबन खंड १ व २
साहित्येर सत्य (१९६१)
रबींद्रनाथ ओ बंग्लार पल्ली (१९७१)
प्रवासवर्णन
मॉस्को ते कोयेक दिन (१९५९)
भारतब
response.lokprabha@expressindia.com