३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

दबंगवाणी

झाकाझाकी

डोईवर होती
तिच्या ‘लाल’ बत्ती
जागोजागी ‘हत्ती’
उभारले

हत्तीचाच तिला
किती बघा लळा
स्वतचा पुतळा
हत्ती शेजी

‘कुमारी’ची ‘माया’
एवढी अफाट
चाले थाटमाट
रात्रंदिन

‘उत्तर प्रदेश’
जरी नाव त्याचे
माहेर ‘प्रश्नां’चे
आहे तेथे

आता बघा कसा
आला योगायोग
म्हणाला आयोग
झाका सारे

भव्य दिव्य सारे
पुतळे झाकले
कापड टाकले
करोडोंचे

निर्जीव पुतळा
खुदुखुदु हसे
म्हणे असे कसे
वेडे सारे

उघडे नागडे
किती तरी जीव
त्यांची नाही कीव
कुणालाच

गरिबीने ज्यांचे
अंग नांगरले
नाही पांघरले
त्यांचेवरी

पुतळ्याचे बोल
ऐकी कोण कुठे
पाझर ना फुटे
दगडांना

सखा म्हणे मज
समजेना काही
कशी लोकशाही
राबविती
अ‍ॅड. अनंत खेळकर, अकोला