३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रिकेटनामा

मालोचकांची धमाल!
अतुल कहाते

काही खेळाडूंच्या नावांमुळे समालोचकांना प्रचंड दहशत बसते. पाकिस्तानचा अफक अहमद हा त्यातलाच एक खेळाडू होता. त्याच्या नावाचा नीट उच्चार केला नाही तर त्यातून भलताच अर्थ निघेल याची ब्रिटिश समालोचकांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे १९६२ साली पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आलेला असताना सगळे समालोचक अफक अहमदचं नाव अगदी नीटपणे उच्चारण्यासाठी खूप सराव करत होते.

क्रिकेटच्या समालोचनाच्या वेळी घडलेल्या गमतीजमतींची काही कमतरताच नाही. रेक्स आलस्टन नावाच्या समालोचकाला बोलताना आपलं डोकं आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायची सवय होती. जिम स्वँटन नावाचा सहकारी एकदा त्याच्या डावीकडे बसलेला होता. तेव्हा आलस्टननं एका झेलाविषयीचं आपलं मत व्यक्त करताना ‘चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आहे असं मला वाटतं, त्याविषयी जिमला काय वाटतं हे आपण जाणून घेऊ’ असं विचारलं. पण आपल्या डावीकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे आलस्टननं तिकडे वळून पाहिलं तर त्याला स्वँटनची खुर्ची रिकामी दिसली. समोर टेबलावरच्या एका कागदावर ‘मी येतोच’ असं लिहिलं होतं. साहजिकच आपल्याला भूमातेनं गिळून टाकलं तर बरं असं आलस्टनला वाटलं असणार. याच आलस्टननं एकदा ‘फिशलॉक’ आणि ‘वॉशब्रुक’ या दोन खेळाडूंच्या नावांची गल्लत करून त्यांचं ‘वॉशलॉक’ आणि ‘फिशब्रुक’ असं बारसं केलं! तसंच ‘टोश्ॉक बॉिलग टू वॉशब्रुक’ म्हणायच्या ऐवजी तो एकदा ‘वोश्ॉक बॉिलग टू टॉशब्रुक’ म्हणाला!
काही खेळाडूंच्या नावांमुळे समालोचकांना प्रचंड दहशत बसते. पाकिस्तानचा अफक अहमद हा त्यातलाच एक खेळाडू होता. त्याच्या नावाचा नीट उच्चार केला नाही तर त्यातून भलताच अर्थ निघेल याची ब्रिटिश समालोचकांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे १९६२ साली पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आलेला असताना सगळे समालोचक अफक अहमदचं नाव अगदी नीटपणे उच्चारण्यासाठी खूप सराव करत होते. लॉर्डसवरच्या सामन्यासाठी अफक अहमद संघात नाही हे कळल्यावर सगळ्या समालोचकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण रेक्स आलस्टनला मुद्दाम त्रास देण्यासाठी ब्रायन जॉन्स्टन हा त्याचा सहसमालोचक ‘अफक.. अफक.. अफक..’ असं म्हणाला. ते आलस्टनच्या डोक्यात बसलं. दुपारी जावेद बर्की या पाकिस्तानच्या कर्णधारानं गोलंदाजीत बदल करायचं ठरवलं आणि एका नव्या गोलंदाजाच्या हातात चेंडू दिला. अफक अहमदला त्या सामन्यासाठी संघात स्थान नसल्यामुळे त्यानं गोलंदाजी टाकायचा प्रश्नच नव्हता. पण तेव्हा समालोचन करणाऱ्या आलस्टनच्या डोक्यात अफकचं नाव पक्कं बसलं होतं. त्यामुळे चुकून त्यानं ‘वुई आर नाऊ गोइंग टू सी अफक टू नाइट अ‍ॅट द नर्सरी एंड’ असं म्हणून टाकलं!
जिम स्वँटनचा आधी उल्लेख झालेलाच आहे. हा स्वँटन इतका घमेंडखोर होता की ‘तो आपल्या ड्रायव्हरबरोबर एका गाडीतून जाणारसुद्धा नाही’ असं विनोदानं म्हटलं जायचं! याहून गंमतशीर असा रचलेला विनोद म्हणजे स्वँटन त्याच्या पत्नीबरोबर मधुचंद्र साजरा करायला गेलेला असताना स्वँटनच्या पायाचा स्पर्श तिच्या पायाला होतो. तेव्हा स्वँटनचा पाय भलताच गार असल्यामुळे दचकून ती त्याला ‘देवा, तुझे पाय किती गार आहेत रे?’ असं म्हणते. त्यावर स्वँटन महाराज तिला ‘आपण बेडवर असताना तू मला जिम म्हणू शकतेस’ असं उत्तर देतो!

अ‍ॅलन मॅगिल्व्हरी हा इंग्लंडमध्ये आलेला असताना त्याची गंमत करायची लहर ब्रायन जॉन्स्टनला आली. मॅगिल्व्हरी समालोचन कक्षात आलेला असताना जॉन्स्टननं त्याला समोर असलेला चॉकलेट केक खायची खूण केली. मॅगिल्व्हरीनं केकचा आस्वाद घ्यायला सुरुवात केल्याबरोबर जॉन्स्टननं त्याला मुद्दामच तेव्हा घडलेल्या एका प्रसंगाबद्दलचं मत विचारलं.

या स्वँटनला दिवसाचा खेळ संपला की श्रोत्यांचा निरोप घेण्यापूर्वी समालोचन कक्षामधून समोर दिसणाऱ्या धावफलकावरचा तपशील सांगायची सवय होती. नॉटिंघमच्या ट्रेंटब्रिज मदानावर नव्यानंच विजेवर चालणारा धावफलक बसवण्यात आला होता. नेहमीच्या सवयीनं स्वँटननं दिवसाचा खेळ संपल्यावर श्रोत्यांना ‘तुमचा निरोप घेण्यापूर्वी मी एकदा धावसंख्या सांगतो’ असं म्हणून समोरच्या धावफलकावरचा तपशील वाचण्यासाठी तिथे नजर फिरवली तर वीज गायब झाल्यामुळे धावफलकावर एक अक्षरसुद्धा नव्हतं! साहजिकच स्वँटनची प्रचंड त्रेधातिरपीट उडाली. शेवटी कुणीतरी कागदावर पटकन धावसंख्येचा तपशील लिहून दिला आणि स्वँटनची सुटका केली.
अ‍ॅलन मॅगिल्व्हरी हा ऑस्ट्रेलियन समालोचक इंग्लंडमध्ये आलेला असताना त्याची गंमत करायची लहर ब्रिटिश समालोचक ब्रायन जॉन्स्टनला आली. त्यामुळे मॅगिल्व्हरी समालोचन कक्षात आलेला असताना समालोचन करणाऱ्या जॉन्स्टननं त्याला समोर असलेल्या चॉकलेट केकचा एक मोठा तुकडा खायची खूण केली. आनंदानं या केकचा आस्वाद घ्यायला मॅगिल्व्हरीनं सुरुवात केल्याबरोबर जॉन्स्टननं त्याला मुद्दामच तेव्हा घडलेल्या एका प्रसंगाबद्दलचं मत विचारलं. यावर तोंडातल्या केकचा तुकडा तोडायचा प्रयत्न करताकरता बोलायचा प्रयत्न करणाऱ्या मॅगिल्व्हरीच्या तोंडातून चित्रविचित्र आवाज यायला लागले आणि समालोचन कक्षातून हास्याचे फवारे उडाले!
हा ब्रायन जॉन्स्टन अशा प्रकारे अनेकांना अडचणीत आणून त्यांची गंमत बघत असे. अर्थात हे सगळं अत्यंत मजेच्या भावनेनं सुरू असे. त्यात कुणाला मुद्दाम त्रास द्यायची भावना कधीच नसे. वेस्ट इंडिजचा जाणकार क्रिकेट समालोचक टोनी कोझियर याच्या संदर्भातला हा किस्सासुद्धा अगदी ऐकण्यासारखा आहे. १९६७-६८ साली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेला असताना त्रिनिदादमधल्या क्वीन्स पार्क ओव्हल मदानावरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळे खेळ थांबलेला असताना कोझियर काही काळासाठी समालोचन कक्षाबाहेर गेला. नंतर तो परत येताना दिसल्याचं बघून ब्रायन जॉन्स्टननं पटकन आपण समालोचन करीत असल्याचा आव आणला. खरं म्हणजे तेव्हा समालोचन थांबवण्यात आलं होतं. कोझियर समालोचन कक्षामध्ये परतताच जॉन्स्टननं ‘तर इंग्लंडच्या संघातल्या खेळाडूंची अगदी अचूक आणि अद्ययावत माहिती त्यांच्या आकडेवारीनिशी अशी आहे.. आता टोनी कोझियर समालोचन कक्षामध्ये परतलेला असल्यामुळे वेस्ट इंडियन खेळाडूंच्या संदर्भातली अशीच माहिती त्यानं आपल्या रसिक श्रोत्यांना द्यावी अशी मी त्याला विनंती करतो.. टोनी..’ असं म्हणून दुसरा मायक्रोफोन कोझियरच्या हातात दिला. अशा प्रकारे अचानक कोसळलेल्या संकटामुळे कोझियरला काय करावं हे समजेना. त्यानं मायक्रोफोन हातात घेऊन पटकन कुणीतरी ‘विस्डेन’ या क्रिकेटच्या बायबलची प्रत आपल्या हातात द्यावी अशा बऱ्याच खाणाखुणा केल्या. तसंच ‘ब्रायन, मी ही माहिती थोडय़ाच वेळात देतो.. तोपर्यंत मी खेळपट्टीच्या परिस्थितीबद्दल माहिती सांगू का?’ असं म्हटलं. त्यावर जॉन्स्टननं ‘नको टोनी, तू इथे नसताना आम्ही त्याच विषयावर बोललो आहोत.. त्यामुळे आता तू वेस्ट इंडियन खेळाडूंची माहितीच दे’ असं म्हणताच कोझियरचा चेहरा साफ पडला. त्यावर जॉन्स्टननं ‘टोनी, ठीक आहे.. ही माहिती तू देऊ शकत नसशील तर आपल्याला स्टुडिओमध्ये परतण्याशिवाय पर्याय नाही.. त्यामुळे श्रोत्यांनो, गुडबाय..’ असं म्हणून मायक्रोफोन बंद केला. काही काळ समालोचन कक्षामध्ये स्मशानशांतता पसरली. त्यानंतर जॉन्स्टनला हसू आवरेना आणि सगळा प्रकार लक्षात आल्यावर कोझियरही कित्येक मिनिटं हसतच राहिला!

भारतामध्ये महाराजकुमार ऑफ विझीयानगरम् ऊर्फ विझी याला समालोचन करण्याची भारी हौस होती. पण त्याचं क्रिकेटच्या बाबतीतलं प्रचंड अज्ञान आणि त्याचा भसाडा आवाज या दोन्ही गोष्टींमुळे श्रोते पार वैतागून जायचे.

हा जॉन्स्टन एकदा समालोचन करत असताना वेस्ट इंडिजचा मायकेल होिल्डग हा इंग्लंडच्या पीटर विलीला गोलंदाजी टाकत होता. त्यावर जॉन्स्टनचं भाष्य ‘द बॉलर्स होिल्डग द बॅट्समन्स विली’ असं होतं! यावर काही दिवसांनी एका ब्रिटिश मध्यवयीन स्त्रीचं जॉन्स्टनला पत्र आलं. त्यात तिनं आपल्याला जॉन्स्टन तसंच त्याचे सहकारी समालोचक यांचं समालोचन खूप आवडत असल्याचं लिहिलं होतं. पण त्याचबरोबर अनेक स्त्रिया आणि लहान मुलं आपलं समालोचन ऐकतात याचं भान या समालोचकांनी राखलं पाहिजे असंही तिनं या पत्रात म्हटलं होतं. अर्थातच जॉन्स्टनच्या वर उल्लेख केलेल्या विधानाचा भलताच अर्थ तिनं लावला होता!
असंच एकदा प्रचंड थंडी असताना लॉर्डस मदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला ‘प्रुडेंशियल कप’ स्पध्रेमधला सामना सुरू होता. त्या वेळी क्षेत्ररक्षण करणारे इंग्लिश खेळाडू प्रत्येक चेंडू टाकून झाल्यावर आपले हात चोळून, फुंकर मारून खिशात घालत होते. त्याचं वर्णन करणारा ख्रिस्तोफर मार्टनि-जेन्किन्स ‘यू कॅन सी हाऊ कोल्ड इट इज.. द इंग्लिश फिल्डर्स आर पुटिंग देयर हँड्स इन देयर पॉकेट्स बिट्वीन बॉल्स’ असं म्हणाला! अर्थातच षटकातल्या दोन चेंडूंच्या दरम्यानचं वर्णन त्याला करायचं होतं. पण त्यातूनही वेगळाच अर्थ निघाला!
फलंदाजी करत असताना फलंदाजाला कुठे चेंडू लागल्यावर सगळ्यात जास्त दुखतं हे आपल्याला माहीत असेलच. एका कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ग्लेन टर्नर फलंदाजी करीत असताना इंग्लंडच्या अ‍ॅलन वॉर्डचा एक चेंडू टर्नरच्या नको त्या भागाला जोरात लागला. कळवळून टर्नर खाली कोसळला. मग काही काळानं पाणी पिऊन वगरे टर्नर पुन्हा फलंदाजी करायला उभा ठाकला. या सगळ्या प्रसंगाचं वर्णन ब्रायन जॉन्स्टनला करायचं होतं. तो अगदी सहजच म्हणून गेला, ‘सो ही लूक्स ऑलराइट अगेन .. अ‍ॅलन वॉर्ड देन टू बॉल टू टर्नर .. वन बॉल लेफ्ट!’
भारतामध्ये महाराजकुमार ऑफ विझीयानगरम् ऊर्फ विझी याला समालोचन करण्याची भारी हौस होती. पण त्याचं क्रिकेटच्या बाबतीतलं प्रचंड अज्ञान आणि त्याचा भसाडा आवाज या दोन्ही गोष्टींमुळे श्रोते पार वैतागून जायचे. आपलं राजकीय वजन वापरून विझी समालोचन कक्षात ‘तज्ज्ञ’ म्हणून घुसायचाच. पण १९५५-५६ साली भारतीय क्रिकेट मंडळानं अगदी ठाम भूमिका घेऊन विझीला इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असताना समालोचन करायला मिळणार नाही असं ठरवलं. विझीला याची काळजी नव्हती. त्यानं सरळ या संघाचा आपल्या एका संघाविरुद्ध ३ दिवसांचा सामना भरवला आणि तिन्ही दिवस त्याचं समालोचन स्वत: केलं! पूर्वी शिरीष कणेकरांनी केलेल्या विझीच्या समालोचनाचं वर्णन अगदी बहारदार होतं. विझी म्हणे १५ मिनिटं धावसंख्या सांगायचा नाही. शिवाय ‘माय गॉड! ही इज आऊट .. नो, नॉट आऊट .. आय िथक आऊट .. रादर नॉट’ असे चढउतार विझीच्या समालोचनात असायचे. शिवाय ‘अंपायर नोज बेटर’ असंही तो म्हणायचा. विझीच्या समालोचनात ‘मेकिफ टू काँट्रक्टर’चं ‘काँट्रक्टर टू मेकिफ’ सहजपणे व्हायचं. अनेकदा ‘अ लव्हली शॉट, अँड इक्वली वेल फिल्डेड.. नो आय से इट वॉज अ‍ॅन इझी कॅच.. अ‍ॅबसोल्यूट सिटर.. अँड माय गॉड.. ही ड्रॉप्ड इट..’ असं सगळंही त्यात असे. म्हणजेच क्षणापूर्वीचा सुंदर फटका झेलात बदलला आणि ज्याला आपण चेंडू छान अडवला असं म्हणालो तो सोडलेला झेल होता याचं विझीला अजिबात सोयरसुतक नसे!
असंच एकदा लाला अमरनाथ हा माजी भारतीय क्रिकेटपटू तज्ज्ञ म्हणून समालोचक कक्षात बसलेला असताना एका ‘महान’ समालोचकानं फलंदाजानं चौकार मारल्याचं जाहीर केलं आणि हा फटका फारच सुंदर होता असं म्हणत त्याविषयी लालाजींचं मत विचारलं. तेव्हा लालाजीनं ‘इट वॉज अ व्हेरी रिस्टी शॉट’ म्हणजेच फलंदाजानं मनगटांचा सुंदर वापर करून मारलेला हा फटका असल्याचं सांगितलं. समालोचकाला वाटलं लालाजी ‘रिस्की’ म्हणजे धोकादायक फटका म्हणाले. त्यामुळे त्यानं आपली ‘चूक’ सुधारत ‘हो लालाजी, आत्ताच्या परिस्थितीत फलंदाजानं असा धोका पत्करायला नको होता’ असं विधान केलं. तेव्हा भडकलेल्या लालाजींनी त्या समालोचकाची तिथेच खरडपट्टी काढली!
टोनी ग्रेग या अलीकडच्या काळात प्रसिद्ध असलेल्या समालोचकाला अजय जडेजाचं नाव घेताना एकदा प्रचंड कष्ट पडले. त्यामुळे त-त-प-प करत ग्रेगनं उच्चारलेली वाक्यं अशी होती- And Jajeda is disappointed... Jadeja is ji..da..Illl come again, Jajeda... okay Jadeja looks downcast.
असे हे समालोचक आणि अशा त्यांच्या गमती!
response.lokprabha@expressindia.com