३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेशताब्दी

धूल का फूल
अरुण पुराणिक

‘धूल का फूल’मध्ये महेश सोईस्करपणे आपले पाप नीतिमत्तेच्या नावाखाली विसरून गेलेला असतो तर दुसरीकडे मीना मजबूर असते. सभ्य समाजाने बहिष्कृत केलेल्या त्या मासूम जिवाला (सुशीलकुमारला) क्षणोक्षणी अपमान, अवहेलना सहन करीत जगावे लागते.

‘प्रेम’ हा फक्त दोन प्रेमी जिवांचा व्यक्तिगत प्रश्न असला तरी बेजबाबदार प्रेमसंबंध व त्यातून निर्माण होणारी अनौरस संततीची समस्या, त्या संततीचे पालन, मिळणारे संस्कार यांसारखे अनेक प्रश्न समाजाला भेडसावत असतात. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ ही कथा पं. मुखराम शर्माची होती तर निर्देशन यश चोप्राजींनी केले होते. कथानक, साहीरच्या गीताने व एन. दत्तांच्या संगीताने फुलत जाते. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात, महेश कपूर (राजेंद्रकुमार) व मीना (माला सिन्हा) यांच्या प्रीतीला अंकुर फुटतो.
‘जरा सोच लो, दिल लगाने से पहले,
कि खोना भी पडम्ता है पाने से पहले
इजमजत तो ले लो जमाने से पहले,
कि तुम हुस्न को पूजना चाहते हो’’
प्रेमाच्या खेळात, मुली या मुलांपेक्षा थोडय़ा अधिक सावध, धोरणी व समजुतदार असतात. साहीरच्या या प्रसंगानुरूप गीतात, या स्त्रीसुलभ भावनांचे दर्शन तसेच, पुढे घडणाऱ्या घटनांची बीजे खुबीने पेरलेली दिसतात. एन. दत्ताचे हे गाणे पिलू रागावर आधारित, गाणे ऐकताना संगीतकार विनोदच्या ‘अनमोल रतन’ चित्रपटातील लताने गायिलेल्या, ‘दर्द मिला है तेरी प्यार की निशानी ओ देनेवाले तेरी मेहेरबानी हाये..’ या बेहतरीन गाण्याची प्रकर्षांने आठवण येते.

एके काळी लाहोरमध्ये विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोिवदाने एकत्र राहात होते. फाळणीनंतर तिथे फक्त एकच धर्म शिल्लक राहिला होता. माणुसकी नष्ट झाली होती. अत्यंत निराश होऊन व्यथित मनाने साहीर भारतात परत आले होते.

तर,
आ ऽऽ हा ऊ हूं ला ला ला ला ला
धडम्कने लगे दिल के तारों की दुनिया,
जो तुम मुस्कुरा दो
ये बोझल घटायें बरसती हुई,
ये बेचन रूहें तरसती हुई
ये सांसो के शोले निकलते हुए,
बदन आंच खाकर पिघलते हुए
एन. दत्ताच्या या पाश्चिमात्य शैलीच्या, गोड सुरावटीवर त्या प्रेमी जिवांच्या धुंद प्रणयाराधनाला रंग चढतो. त्या बेहोशीत, कुंवारी मीना महेशच्या मुलाची आई बनते. शामळू महेश बापाच्या दबावामुळे, श्रीमंत बापाच्या कन्येशी, नंदाशी लग्न करतो. कुमारीमाता मीना समाजाला घाबरून त्या अपत्याचा त्याग करते. अल्लड, अवखळ प्रेयसीचे आता जबाबदार मातेमध्ये रूपांतर झालेले असते. मीनाची एका कुमारीमातेची मानसिक व्यथा, मनाला सतत बोचणारी अपराधीपणाची भावना साहीरने आपल्या गीतातून मांडली आहे.
‘तू मेरे प्यार का फूल है कि
मेरी भूल है कुछ कह नहीं सकती
पर किसी का किया तू भरे ये सह नहीं सकती’
मीनाचे ते अनौरस मूल गरीब दयाळू अब्दुल चाचाकडे वाढते. त्या बेवारस मुलाचा पूर्वेतिहास माहीत नसल्यामुळे अब्दुल चाचा (मनमोहन कृष्ण) मानवतावादी संस्कार त्याच्यावर करतो. इथे चोप्रांना निर्देशन करताना त्यांचे पूर्वानुभव उपयोगी पडतात. फाळणीचे, जातीय दंग्याचे दाहक चटके चोप्रांसारखे साहीरनेही अनुभवले होते. त्यांची आई फाळणीनंतर लुधियानाहून पाकिस्तानात स्थायिक झाली होती. तिच्या शोधार्थ साहीर पाकिस्तानात वणवण भटकले होते. एके काळी लाहोरमध्ये विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोिवदाने एकत्र राहात होते. फाळणीनंतर तिथे फक्त एकच धर्म शिल्लक राहिला होता. माणुसकी नष्ट झाली होती. अत्यंत निराश होऊन व्यथित मनाने साहीर भारतात परत आले होते. अब्दुल चाचाची व्यक्तिरेखा रंगविताना, राष्ट्रीय एकात्मतेचे फार सुंदर विचार त्यांनी आपल्या गीतातून मांडले आहेत.
‘मालिक ने हर इंसान को इंसान बनाया,
हमने उसे िहदू या मुसलमान बनाया
कुदरत ने जो बख्शी थी एक ही धरती,
हमने कहीं भारत कहीं इरान बनाया
जो तोडम् दे हर बंद वो तूफान बनेगा,
इंसान की औलाद है इंसान बनेगा.’
‘धूल का फूल’मध्ये मनमोहन कृष्ण, अब्दुल चाचाची भूमिका अक्षरश: जगला आहे. एकीकडे महेश सोईस्करपणे आपले पाप नीतिमत्तेच्या नावाखाली विसरून गेलेला असतो तर दुसरीकडे मीना मजबूर असते. सभ्य समाजाने बहिष्कृत केलेल्या त्या मासूम जिवाला (सुशीलकुमारला) क्षणोक्षणी अपमान, अवहेलना सहन करीत जगावे लागते. नाइलाजाने शेवटी तो वाईट संगतीला लागतो व चोर बनून त्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या कोर्टात आरोपी बनून उभे राहावे लागते. मीनाला विशाल अंत:करणाने पत्नी म्हणून स्वीकारणारा वकील (अशोककुमार) संपूर्ण ताकदीनिशी त्याच्या मागे उभा राहतो. कोर्टातील नाटय़पूर्ण प्रसंगात, समाजातील खरे प्रतिष्ठित गुन्हेगार कोण आहेत ते सिनेदर्शकांना प्रभावीपणे दाखविले जाते.

आपल्या सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रेमिकेला, स्वत:च्या स्वार्थासाठी झिडकारून, बापाच्या दबावाखाली नंदाशी विवाह करतो व प्रेयसीला वाऱ्यावर सोडून देतो. प्रेक्षकांची सहानुभूती त्याला मिळत नाही. राजकुमारला ही भूमिका विशेष आवडली नाही. तो कथालेखक पं. मुखराम शर्माकडे जाऊन कथेमध्ये बदल करण्याची मागणी करू लागला. चोप्राजी मूळ कथेमध्ये तसूभरही बदल करायला तयार झाले नाहीत.

या चित्रपटाच्या यशामुळे अनेक कलाकारांचे नशीब फळफळले. बी. आर. चोप्राजींचे सर्वात लहान बंधू यशजींना पहिल्याच प्रयत्नात निर्देशक म्हणून मोठी प्रतिष्ठा लाभली. मनमोहन कृष्ण यांना सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. माला सिन्हा टॉपची हिरॉइन झाली. एक होतकरू नवोदित गायक म्हणून स्वत: रफींनी, महेंद्र कपूरची चोप्रांकडे शिफारस केली होती. या चित्रपटानंतर एक गुणी गायक म्हणून त्याचे सर्वत्र नाव झाले. बी. आरजींचे धाकटे बंधू धरम चोप्रा, आपल्या भावाबरोबर ‘अफसाना’पासून साहाय्यक कॅमेरामन म्हणून काम करीत होते. ‘धूल का फूल’ हा त्यांचा स्वतंत्रपणे, सिनेमॅटोग्राफर म्हणून निर्देशित केलेला प्रथम चित्रपट होता. क्रेनवरून त्यांनी अनेक प्रसंगांचे सुंदर चित्रण केले होते. विशेषत: महेशच्या (राजेंद्रकुमारच्या) लग्नाच्या वरातीचे शॉट, कट टू कट संकलित केलेली दृश्ये, त्यांच्या ‘हाय अँगल शॉट’च्या तंत्राची जाणकारांनी प्रशंसा केली. या संबंधात चोप्रांनी सुंदर किस्सा सांगितला. ‘धूल का फूल’चे चित्रण चालू होते. एकांत समयी महेशच्या (राजेंद्रकुमार) सान्निध्यात, मीना (माला सिन्हा) पावसात भिजून ओली चिंब होते. महेशच्या स्पर्शाने उत्तेजित होऊन ती त्याला आवेगाने बिलगते. त्या अत्युच्च सुखाच्या क्षणी नायिका मीना आपले सर्वस्व महेशला बहाल करते. असा तो प्रसंग होता. धरम चोप्रांनी आपल्या तंत्रानी तो शृंगारिक प्रसंग चित्रित केला. सेन्सॉरने त्या दृश्याला आक्षेप घेतला व तो सीन बदलायला सांगितला. चोप्रांनी ते मान्य करून तो सीन परत घेतला. या वेळी त्यांनी नायक व नायिकेच्या कमरेच्या फक्त वरच्या भागाचे अत्यंत कलात्मकतेने चित्रण करून ते दृश्य सेन्सॉरकडे तपासणीसाठी पाठविले. सेन्सॉरचे सदस्य म्हणाले, ‘चोप्राजी, आपण इतके हुशार असाल याची आम्हाला कल्पना नव्हती. या दृश्यात माला सिन्हा इतकी कामोत्तेजक दिसते की, पुढची कल्पना कोणीही करू शकतो. यापेक्षा तुम्ही चित्रित केलेले पहिले प्रसंगच बरे होते असे वाटते. तुम्ही तेच प्रसंग ठेवा.’
अभिनेता राजकुमार फिल्मी दुनियेत येण्याआधी अंधेरीला पोलीस इन्स्पेक्टर होता. धरम चोप्रा अंधेरीलाच एमअ‍ॅण्डटी स्टुडिओत कॅमेरामन होते. राजकुमार तिथे येत असल्याने त्यांची ओळख झाली व पुढे तिचे दोस्तीत रूपांतर झाले. राजकुमारला चित्रपटांचे खूप आकर्षण होते. बरेच दिवस तो ‘सिनेमात एखादा रोल द्या’ म्हणून चोप्रांच्या मागे लागला होता. त्याच दरम्यान राजकुमारला ‘मदर इंडिया’ चांगला चालल्यामुळे चोप्रांनी त्याला ‘धूल का फूल’मध्ये महेशची भूमिका केली. महेशची भूमिका मुळातच नकारात्मक आहे. तो आपल्या सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रेमिकेला, स्वत:च्या स्वार्थासाठी झिडकारून, बापाच्या दबावाखाली नंदाशी विवाह करतो व प्रेयसीला वाऱ्यावर सोडून देतो. प्रेक्षकांची सहानुभूती त्याला मिळत नाही. राजकुमारला ही भूमिका विशेष आवडली नाही. तो कथालेखक पं. मुखराम शर्माकडे जाऊन कथेमध्ये बदल करण्याची मागणी करू लागला. चोप्राजी मूळ कथेमध्ये तसूभरही बदल करायला तयार झाले नाहीत. त्यानंतर राजकुमारने श्रेयनामावलीत आपले नाव प्रथम व ठळकरित्या झळकले पाहिजे असा हट्ट धरला. मुळातच हा नायिकाप्रधान चित्रपट आहे व माला सिन्हा ही बी. आर. फिल्म्सची जुनी नायिका असल्याने तिलाच श्रेयनामावलीत मुख्य स्थान देण्यात येईल, असे चोप्रांनी त्याला ठणकावून सांगितले. पुढे यश चोप्रासारखा नवा डायरेक्टर व धरम चोप्रासारखा नवा सिनेमॅटोग्राफर मला नको. स्वत: बी.आर. यांनीच हा डायरेक्ट करावा असा विचित्र हट्ट धरून बसला. शेवटी एक दिवस कंटाळून चोप्रांनी राजकुमारलाच यातून काढून टाकून सरळ राजेंद्रकुमारला नायकाची भूमिका दिली.
याच ‘धूल का फूल’ने रौप्यमहोत्सव साजरा केला. राजेंद्रकुमारचे सर्वत्र नाव झाले. त्यामुळे ‘कानून’मध्येही राजेंद्रकुमारलाच संधी मिळाली. आपण चांगली चालून आलेली सुवर्णसंधी गमाविली याचे राजकुमारला मनस्वी दु:ख झाले. सर्व दुराग्रह सोडून तो बी. आर. चोप्राकडे परत आला.
response.lokprabha@expressindia.com