३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

बुम्बाट बित्तं

अशीही गाणी..

प्रतिनिधी

त्या दिवशी ट्रेनमध्ये चिकनी चमेली चांगलं की, शीला की जवानी या गाण्यावरून काही कॉलेजच्या मुलींमध्ये वाद सुरू होता. त्यातल्याच एकीला कोलावरी डी हे गाणं ब्लूटुथने हवं होतं. वादाचे मुद्दे अनेक होते. खासकरून चिकनी चांगलं की शीला चांगलं? पण या दोन्ही गाण्यांना जन्म देणारी म्हणजे या दोन्ही गाण्यांची कोरिओग्राफर ही एकच आहे हे लग्गेचच तिथे उत्तर मिळालं. तो वाद तिथे तात्पुरता मिटला. पण आपल्या चमेलीने गाण्यातून पुन्हा एकदा नवीन शब्दांची ओळख करून दिली. आता हा पौवा म्हणजे काय? हा वादाचा मुद्दा आला. पौवा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर दारूला काहीजण पौवा असं म्हणतात.. हुश्श हुश्श..
ट्रेनमध्ये चढल्यावर बसायला जागा मिळते का हे शोधण्यापेक्षा आता ज्ञानात किती भर पडते याचाच शोध घ्यायला हवा. कोलावरी आणि चिकनी चमेली हा फिवर फारच पसरलाय. ज्याच्या त्याच्या तोंडी या गाण्यांची चर्चा सुरू आहे. वर्तमानपत्रात या गाण्यांविषयी रकानेच्या रकाने छापून येताहेत.. जणू काही साथीचा आजार पसरलाय. ज्याच्या त्याच्या तोंडी व्हाय धिस कोलावरी डी आणि आई चिकनी चमेली हेच गाणं आहे. त्यातून वेळ मिळाला तर आपलं एकांतात गुणगुणायला उलालाला हे भरीस भर. डिस्कोथेक आणि पब्समध्ये तर या आजारांनी ग्रासलेली अनेक तरुण मंडळी दिसतील.
आता तुम्ही म्हणाल, ही गाणी गाजायला काय माझा नवीन पोपट हा हे गाणंही गाजलं होतं.. कोंबडीही गाजलं.. मग ही गाणी गाजली म्हणून काय झालं.. खरं आहे तुमचं म्हणणं. प्रत्येक गाण्याचं एक आयुष्य असतं.. तसंच याही गाण्यांना ते लाभेल. आता आपली शीलाच बघा ना कुठे कोपऱ्यात जाऊन पडलीय हे कुणालाच कळलं नाही. बरं यात मुख्य म्हणजे शीलाच्या गाण्यावर नाचणारीच आता चमेली म्हणून आपल्या मनात ठसलीय. अशा चमेली शीला येतच राहणार. कोलावरी गाजतंय याचं कारण कुणी म्हणतंय की रजनीकांतच्या जावयाने गायलंय मग ते गाजणारच.. त्यात विशेष ते काय.. पहिलं एमटीव्हीवर लागणारं टॅग्लिंश गाणं म्हणून हे गाणं मान मिळवतंय. अहो पण तो धनुष कसला गातोय, जणू काही दारू पिऊन आलेला माणूस बरळतो तसा..
response.lokprabha@expressindia.com