३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

अरुणाज रेसिपीज

कोबीचं काय करायचं?
अरुणा पवार

‘एकाच भाजीच्या अनेक पाककृती’ हे माझ्या ‘अरुणाज रेसिपीज’चं सूत्र आहे. माझ्या गाठी असलेल्या अनुभवांना प्रयोगशीलतेची जोड देऊन नावीन्यपूर्ण, आगळ्यावेगळ्या चवीच्या, फटाफट तयार होणाऱ्या व शक्यतो कमीत कमी साहित्य वापरून केलेल्या पाककृती या सदरात देणार आहे.

कोबीची भाजी - प्रकार १
साहित्य -
१. कोबी - २ मध्यम
२. चणाडाळ - १/२ कप
३. तेल - २ टी-स्पून
४. मोहरी - १/२ टी-स्पून
५. िहग - चिमूटभर
६. हळद - १ टी-स्पून
७. कांदा - १ छोटा (बारीक चिरलेला)
८. हिरव्या मिरच्या - ३-४ (कापलेल्या)
९. नारळ - पाववाटी (खवलेला)
१०. चवीनुसार मीठ
कृती - १. चणाडाळ २ कप पाण्यात तासभर भिजत घालावी. २. कढईत तेल तापवून मोहरी घालावी. ती तडतडल्यावर िहग, हळद, कांदा, हिरव्या मिरच्या फोडणीत घालून चांगले परतून घ्यावे. ३. त्यात चिरलेला कोबी, धुऊन ठेवलेली चणाडाळ घालून मोठय़ा गॅसवर नीट परतून घ्यावे. ४. भाजीत मीठ घालून झाकण ठेवावे व झाकणावर पाणी ठेवावे. ५. एक वाफ येऊ द्यावी. ६. झाकण काढून मंद आचेवर भाजी शिजवावी. अधून-मधून परतून घ्यावी. ७. भाजीमधले पाणी पूर्ण सुकू द्यावे. नंतर खवलेला नारळ घालून गॅसवर बंद करावा.

कोबीची पचडी
साहित्य -
१. कोबी - पाव किलो
२. नारळ आर्धा वाटी (खवलेला)
३. तेल - २ टेबल-स्पून
४. हिरव्या मिरच्या - २ बारीक चिरलेल्या
५. िलबरस - अर्धा चमचा
६. दाण्याचे कूट - २ टेबल-स्पून
७. कोिथबीर - मूठभर
८. फोडणीसाठी - मोहरी, हिंग, कडीपत्ता
९. मीठ चवीनुसार
कृती - १. कोबी पातळ बारीक चिरावा किंवा जाड किसणीवर किसावा. २. चिरलेला कोबी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, सर्व एकत्र करावे. त्यात िलबाचा रस, कोिथबीर, दाण्याचे कूट, खोबरे, मीठ घालून अलगद कालवावे. ३. वरून तेलाची मोहरी, हिंग, कडीपत्ताची फोडणी घालावी.

कोबीची भाजी - प्रकार २
(कोबी चणाडाळ लाल मसाल्याची भाजी) - २
साहित्य -
१. कोबी - १ मध्यम
२. चणाडाळ - १/४ कप
३. तेल - २ टेबल-स्पून
४. मोहरी - १ टी-स्पून
५. मालवणी मसाला - २ टी-स्पून किंवा तिखट
६. कांदा -खोबऱ्याचे वाटण - २ टी-स्पून
७. मीठ - चवीनुसार
८. कांदा - १ छोटा
९. िहग - चिमूटभर
कृती - १. कोबी बारीक चिरून, धुऊन चाळणीत निथळत ठेवावा. २. एक तास अगोदर भिजवलेली चणाडाळ धुऊन घ्यावी. ३. तेल तापवून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा परतावा. ४. फोडणीवर धुतलेली चणाडाळ, कोबी, त्यावर २ चमचे मालवणी मसाला घालून चांगले परतून घ्यावे. ५. झाकण ठेवून वर पाणी ठेवावे. ६. एक वाफ आल्यानंतर मीठ, कांदा - खोबऱ्याचे वाटण लावून भाजी मंद आचेवर शिजवावी. ७. झाकण काढून पाण्याचा एक हबका द्यावा. एक वाफ येऊ द्यावी. ८. भाजीत पाणी ठेवू नये. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. ९. कोबी चणाडाळ मऊ शिजली की भाजी उतरावी.

कोबीची भाजी - प्रकार ३
कोबीची झटपट भाजी
साहित्य -
१. कोबी - १/४ किलो
२. हिरव्या मिरच्या ५-६ वाटलेल्या
३. मीठ - चवीनुसार
४. साखर - चवीनुसार
५. ओले खोबरे - ३ टी-स्पून
६. कोिथबीर (आवडीनुसार) बारीक चिरलेली पाव वाटी
७. मोहरी - १/२ चमचा
८. िहग - चिमूटभर
९. हळद- १/४ चमचा
१०. तेल - दीड टी-स्पून
कृती - १. चांगला हिरवा व घट्ट असा कोबी बघून घ्यावा. तो बारीक व उभा चिरून घ्यावा. २. एका मोठय़ा पातेल्यात कोबी (चिरलेला) पाण्यात बुडेल इतके पाणी ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात बारीक चिरून धुतलेला कोबी टाकावा. ३. २-४ मिनिटांतच पातेले खालती उतरवावे व अर्धवट शिजलेला कोबी एका चाळणीत निथळत ठेवावा. ४. िहग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी करावी. ५. फोडणीत शिजलेला कोबी घालावा, नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या, मीठ व साखर घालून उलथण्याने हलवावे. अगोदर थोडी शिजवून घेतल्याने ही भाजी झटपट होते.
response.lokprabha@expressindia.com