३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

आरोग्य

लसीकरण : अनिवार्य व ऐच्छिक
डॉ. अमोल अन्नदाते

एखाद्या जंतूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्या जंतूचा असा भाग शरीरात सोडायचा जो शरीराला इजा करणारा संसर्ग करणार नाही, पण त्या जंतूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करेल. यालाच लसीकरण असे म्हणतात.

पुरातन काळामध्ये शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरांनी एक शक्कल लढविली. शस्त्रक्रियेआधी रुग्णांना दुधाचे इंजेक्शन दिले. कृती अशास्त्रीय असली तरी हेतू चांगला होता. दुधाचे इंजेक्शन दिल्यावर शरीरात जो जंतुसंसर्ग निर्माण होईल, त्यामुळे इतर जंतूंपासून संरक्षण मिळेल हे तत्व या प्रयोगात डॉक्टरांनी अनुसरले. अर्थातच प्रयोग असफसल झाला, पण त्यातूनच लसीकरणाच्या संकल्पनेचा जन्म झाला. पुरातन काळापासून चालत आलेल्या व आजही अनेकजण मानतात ती शिवाम्बु चिकित्सापद्धत याच लसीकरणाच्या तत्त्वावर आधारलेली आहे. थोडक्यात एखाद्या जंतूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्या जंतूचा असा भाग शरीरात सोडायचा जो शरीराला इजा करणारा संसर्ग करणार नाही, पण त्या जंतुविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करेल. यालाच लसीकरण असे म्हणतात. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे खलनायकांच्या चमूत जाऊन त्यांच्या योजना जाणून घेणाऱ्या ‘डबल एजंट’ सारखेच कार्य लसी शरीरात करत असतात.
लसींचे वर्गीकरण अनिवार्य व ऐच्छिक असे करता येईल.

विटामिन ए - ९, १८, २४, ३०, ३६ महिने
गरोदर स्त्रियांसाठी - गरोदर असल्याचे कळल्या कळल्या - टी.टी. पहिला डोस.
एक महिन्यानंतर दुसरा डोस.
यापैकी कावीळ बी, मेंदुज्वर व एम.एम.आर. सोडून बाकी सर्व लसी शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत मिळतात. या तीन लसी काही जिल्ह्यंमध्येच शासकीय दवाखान्यांमध्येच मोफत मिळतात. त्या सर्व शासकीय कंेद्रावर मोफत मिळाव्या म्हणून शासनावर प्रसारमाध्यमे व न्यायालयीन लढय़ातून दबाब आणायला हवा.

एखाद्या जंतूच्या जंतुसंसर्गापासून बचाव करण्यासाठी त्या जंतूचा असा भाग शरीरात सोडायचा जो इन्फेक्शन म्हणजे शरीराला इजा करणारा संसर्ग करणार नाही, पण त्या जंतूविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करेल. यालाच लसीकरण असे म्हणतात.

ऐच्छिक लसी : ऐच्छिक लसींचे वर्गीकरण लहान मुलं, कुमारवयीन व मोठय़ांसाठी असे करता येईल.

लहान मुलांसाठी : याचेही वर्गीकरण तीन भागात करता येईल.
अ) आय.ए.पी. (इंडियन अ‍ॅकॅडॅमी ऑपस पेडियाट्रिक्स) ने निर्धारित केलेल्या लसी.
- टायफॉईड
- मेंदुज्वर
- कावीळ बी
- एम.एम.आर.
- इंजेक्टेबल (स्नायूंमध्ये दिली जाणारी) पोलिओ लस
- टी.डी. (धनुर्वात व कमी डोसचा घटसर्प)
- ह्य़ुमन पॅपिलोमा व्हायरस
ब) डॉक्टरांशी पालकांनी सविस्तर चर्चा करून देण्याच्या लसी
- न्युमोकोकल
- कावीळ ए.
- कांजण्या
- रोटाव्हायरस
क) विशेष परिस्थितीत द्यायच्या लसी
- रेबीज
- एन्फ्लुएन्झा
- न्यूमोकोकल २३
- जापनीज एनकॅपसलायटिस
- मेनिंगोकोकल

कुमारवयीन मुला-मुलींसाठी लसी
टी.टी. - १० व १६ वर्षांना
रुबेला - १३ वर्षांच्या सर्व मुलींना
टायफॉईड - २ डोस एक महिन्याचा अंतरात
कावीळ बी - आधी दिली नसल्यास
कांजण्या - आधी दिली नसल्यास किंवा लहानपणी कांजण्या झाल्या नसल्यास
मोठय़ांसाठी
- टायफॉईड
- कावीळ ए.
- कावीळ बी
- कांजण्या
- ुमन पॅपिलोमा व्हायरस
- जापनीज एनकॅपसलायटिस (दूषित प्रदेशांमध्ये)
- मेंनीगोकोकल (आर्मी, वायुदलातील जवांनासाठी)
- न्युमोकोकल
- यलो पसीवर (परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी)

लसीकरणाच्या वेळी घेण्याची काळजी :
- दर वेळी जाताना आपल्या आधीच्या लसी घेतलेले रेकॉर्ड डॉक्टरांकडे घेऊन जाते.
- लसींच्या दुसऱ्या व बुस्टर डोसची तारीख चुकवू नये. नाहीतर आधीच्या डोसचा काहीच उपयोग होत नाही.
- लस घेण्याआधी बाळाला दूध पाजावे किंवा काही खाऊ घालावे. उपाशीपोटी लस घेऊ नये.
- लस देताना त्वचेवरचे स्पिरिट वाळू द्यावे.
- लस दिल्यानंतर पुन्हा बाळाला पाजावे.
- लसीकरणाची जागा चोळू नये.
- लस घेण्याअगोदर त्यावरची एक्स्पायरी डेट तपासून पाहावी.
response.lokprabha@expressindia.com