५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

युवा्

टेकव्हिजनची दूरदृष्टी..!
इरावती बारसोडे
टेकव्हिजन ही काही तरुण, अंध मुलांनी चालवलेली सॉफ्टवेअर कंपनी आहे. अंध मुलं कॉम्प्युटर कसा वापरतील, सॉफ्टवेअर कसं विकसित करतील, या प्रश्नाला या मुलांचं उत्तर आहे, अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा...

अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, असे म्हणत पुण्यातील निवांत अंध मुक्त विकासालया'तील दृष्टिहीन तरुण स्वत:च्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक वेगळ्याच प्रकाशवाटेने चालत आहेत.
अपंग मुले अठरा वर्षांची झाली की तीही इतरांप्रमाणेच कायद्याने सज्ञान होतात. त्यांना स्वत:चे जीवन स्वत: जगण्याची मुभा दिली जाते. काही या संधीचे सोने करतात, काहींना घरच्यांकडून पाठबळ मिळते तर काहींना आयुष्यात कोणीतरी सारथी मिळतो. पण प्रत्येक जण इतका सुदैवी असतोच असे नाही. अशा तरु णांना जगण्यासाठी प्रेरणा देण्याचे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याचे आणि अखेर त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून आयुष्याचा अर्थ समजावून सांगण्याचे काम गेली सतरा वर्षे मीरा बडवे आणि आनंद बडवे हे दाम्पत्य कोणत्याही फळाची अपेक्षा न करता 'निवांत'च्या माध्यमातून करीत आहे. ते या मुलांचे मार्गदर्शक, मित्र आणि आई-वडीलही आहेत.
'निवांत'चे अंध तरु ण डोळसांच्या बरोबरीने विविध क्षेत्रांमध्ये आपला जम बसवू पाहत आहेत. नृत्य, चित्रकला, योगासने, ज्युडो, बुद्धिबळ, मलखांब, स्केटिंग आणि चॉकलेट मेकिंग यांसारख्या अनेक विविध क्षेत्रांमध्ये पारंगत तर झाली आहेतच पण आपले स्थानही निर्माण केले आहे. हे तरुण अनेक पुस्तके ब्रेलमध्ये छापून इतर संस्थांना, शाळांना देतात. चॉकलेट मेकिंगसारख्या उद्योगांमधून पैसे कमवून स्वत:चे शिक्षण पूर्ण करीत आहेत. अनेक जण उच्चशिक्षित आहेत. मीराताई सांगत होत्या, डोळ्यांना प्रकाशाचा एक किरणही न दिसणाऱ्या पण इतक्या उंचीवर पोचलेल्या तरु णांकडे बघून मला खरंच खूप अभिमान वाटतो. डोळस लोकही तोंडात बोटे घालतील अशी त्यांची गुणवत्ता आहे. एके काळी माझे विद्यार्थी असलेली मुले आता माझे सहकारी झाले आहेत.
असेच स्वत:चे स्थान निर्माण करू पाहणारे 'निवांत'चेच काही तरु ण चक्क सॉफ्टवेअर डेव्हलपिंगही करतात. तेही स्वत:च्या कंपनीमार्फत. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:च्या कंपनीमध्ये काम करायला कोणालाही आवडेल. म्हणूनच त्यांनी 'टेकव्हिजन' नावाची स्वत:ची एक सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीच सुरू केली.
'टेकव्हिजन'च्या जन्माची कथा जरा वेगळीच आहे. ही कंपनी काहीशा योगायोगाने सुरू झाली. साधारण तीन वर्षांपूर्वी सिलिकॉन व्हॅली येथील कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे एक गृहस्थ 'निवांत'ला भेट द्यायला आले होते. त्यांना ही मुले संगणकावर काहीतरी काम करताना दिसली. त्यांना ते पाहून आश्चर्य वाटले आणि कौतुकही वाटले. मग त्यांनी दिलेल्या पहिल्या प्रोजेक्टमधून टेकव्हिजनचा जन्म झाला. सुरुवातीला पाच जणांनी मिळून आनंद बडवेंच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी सुरू केली. आता सिद्धांत चोथे, नितीन बवारे, संघपाल भोवटे, विशाल पवळे, राधिका येवले, ज्ञानेश्वर नेरकर, राहुल नलगे आणि रूपाली कदम असे एकूण आठ योद्धे टेकव्हिजनची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळतात. यामधील कोणी एमसीएम, कोणी एमसीएस, कोणी बीए तर कोणी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एमएससी केले आहे. आनंद बडवे हे त्यांचे गुरू आणि मार्गदर्शक आहेत. टेकव्हिजनचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सिद्धांत चोथेने पुण्याच्याच आयएमसीसी महाविद्यालयातून एमसीए पूर्ण केले. कॅम्पस इंटरव्हय़ूमध्ये त्याची निवड झाली. काही महिने त्याने त्या कंपनीमध्ये कामही केले पण कालांतराने त्याची पावले आपसूक 'निवांत'कडे वळली. राहुलने एचएसबीसीबरोबर अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंगमध्ये काम केले आहे. विकास वाघमारे या आणखी एका तरु णाला बेंगलोरला हार्डवेअर ट्रेनिंगसाठी पाठवले आहे. कमाल म्हणजे यांच्यापैकी प्रत्येकाला दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळेल. पण कोणालाही दुसरीकडे जायची इच्छा कधी झालीच नाही आणि तशी वेळही त्यांच्यावर आली नाही. आता कंपनी सुमारे ४० टक्के नफा मिळवते आहे. यातूनच सगळ्यांचे पगार निघतात. पण आत्ता कुठे स्वप्नपूर्ती होते आहे, पानगळ संपून पालवी फुटते आहे.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या शब्दात सांगायचे झाले तर ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप पुढे जायचे आहे. त्याला विचारले, कंपनीची जाहिरात का नाही करीत? तर म्हणाला, आम्हाला जाहिरात करण्याची गरज नाही. आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो. आमचे कामाच्या दर्जाकडे लक्ष असते. तो कायम राखला तर आपोआप कामे मिळतील.
'टेकव्हिजन'मध्ये सध्या प्रामुख्याने तीन प्रकारची कामे चालतात. जोश सॉफ्टवेअर आणि बोर्डवॉकटेक अशा दोन कंपन्यांसाठी सॉफ्टेवेअर डेव्हलपिंगचे काम केले जाते. निवांतच्या आणि कंपनीच्या संकेतस्थळाचे काम केले जाते. निवांतह्णची इंटरनेट जगताशी संबंधित इतर कामेही या ठिकाणी केली जातात. आणखी एका संकेतस्थळाचे कामही सुरू आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंग केले जाते. डोळस व्यक्तींना संगणकावर काम करताना मॉनिटर दिसतो. दर्शविण्यासाठी माऊसचा वापर करता येतो. पण अंधांना संगणकावर काम करताना या प्रकारच्या कोणत्याच सुविधा उपलब्ध नसतात. त्यांना केवळ की-बोर्ड आणि व्हॉइस कमांड्सवर म्हणजेच आवाजावर अवलंबून राहावे लागते. एखाद्या संकेतस्थळाच्या व्हॉइस कमांड्सबरोबर आहेत की नाहीत किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर संकेतस्थळ अंधांना वापरण्याजोगे आहे किंवा नाही हे तपासले जाते. यालाच अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंग म्हणतात. सध्याच्या संगणकाच्या युगात सर्वच संकेतस्थळे अंधांना वापरता येण्यासारखी असणे आवश्यक आहे आणि त्यावर काम करणे गरजेचे आहे.
'टेकव्हिजन'ने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार आहे. जगामध्ये ज्या अनेक प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस वापरल्या जातात त्यामध्ये रुबी ही भाषासुद्धा आहे. ही भाषा वापरणाऱ्यांची एक संघटना आहे. या रु बी कम्युनिटीची पुण्यामध्ये परिषद आहे. 'टेकव्हिजन'च्या तरु णांना या परिषदेमध्ये बोलण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेमार्फत अ‍ॅक्सेसिबिलिटी टेस्टिंगबाबत जागृती करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि त्याचे काम अशा जोमाने सुरू आहे की त्यांना साधं बोलायलादेखील वेळ नाही. आपल्यासारख्यांना संगणक शिकवायचा, त्यांना जगाच्या संपर्कात आणायचे, असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी 'brails.org' या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाद्वारे अंधांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. याव्यतिरिक्त टेकव्हिजनमध्ये चौथ्या जनरेशनची लँग्वेज शिकायला डोळस इंटर्नस् येतात.
कोणतीही दृष्टिहीन व्यक्ती संगणकावर काम करताना जॉब अ‍ॅक्सेस विथ स्पीच (जॉज) या सॉफ्टवेअरचा उपयोग करते. यामध्ये की-बोर्डवर जे टाइप केले जाते ते पुन्हा आपल्याला ऐकू येते. उदाहरणार्थ जर hello असा शब्द टाइप केला तर प्रत्येक अक्षर टाइप केले की ते लगेच ऐकू येते. एच टाइप केला की एच हे अक्षर ऐकू येते. स्मॉल आणि कॅपिटल लेटर टाइप करताना आवाजाच्या पट्टीतही फरक पडतो. यामुळेच अंधांना संगणकावर काम करणे सोपे जाते. की-बोर्डचा वापर करून सूचना दिल्या जातात आणि व्हॉइस कमांड्स म्हणजेच आवाजाच्या माध्यमातून त्याबरोबर दिल्या गेल्या आहेत किंवा नाही हे कळते. याच पद्धतीने 'टेकव्हिजन'मध्ये काम चालते.
एक दिवस निवांतह्णची मुलं मीराताईंना सांगत आली, की आता अंधांनाही एम.एस.सी.आय.टी.ची परीक्षा देता येते. तेव्हा मीराताईंनी या मुलांना संगणक साक्षर करायचे ठरवले. मग क्रांती घोडके यांनी मुलांना की-बोर्ड शिकवायला सुरु वात केली. मुलं की-बोर्ड शिकली आणि मग त्यातून सुरू झाले एम.एस.सी.आय.टी.चे वर्ग! त्यानंतर कोणाकडून तरी संगणक मिळाला. पण दुर्दैवाने तो बंद पडला. घडतात त्या गोष्टी चांगल्यासाठी घडतात असे म्हणतात ना, त्याप्रमाणे बंद पडलेला संगणकही मुलांना फायद्याचाच ठरला. यामुळे संपूर्ण संगणक खोलून तो रिबूट कसा करायचा हे मुलं शिकली. निवांतह्णच्या हितचिंतक असणाऱ्या वर्षां सदावर्ते यांनी मुलांना संगणक दुरु स्तीचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे संगणक बिघडला तर दुरु स्त करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहायची गरजच पडली नाही. त्यानंतर सी लँग्वेज, ओरॅकलही शिकवले. संगीता देवकर आणि उमेश केसकरांच्या मदतीने राणी लक्ष्मीबाई इन्स्टिटय़ूटमधून संगणकशास्त्राचे शिक्षण घेतले.
संगणक साक्षर असणे ही आता काळाची गरज आहे आणि त्याला अंध व्यक्तीही अपवाद नाही. पदवी मिळवणारी पहिली अंध, कर्णबधिर हेलन केलर म्हणते, आशावाद हा आपल्या यशस्वीपणामागचा विश्वास असतो. आशा आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. तिचे हे वाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निवांतह्णने अंधांच्या संगणक साक्षरतेसाठी आणखी एक पाऊल उचलले. ते म्हणजे इनसाइटह्ण हे प्रशिक्षण केंद्र. इनसाइटह्णमध्ये प्रशिक्षणासाठी आठ पायऱ्यांचा अभ्यासक्रमच आखला आहे. प्रशिक्षणाची सुरुवात झीरो लेव्हलपासून होते. या पायरीमध्ये इंग्रजी शिकवले जाते. इंग्रजीचे ज्ञान असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. इंग्रजी आले की मग त्यानंतर ऐकण्याचा सराव करून घेतला जातो. हा सराव झाल्यानंतरच की-बोर्ड शिकवला जातो. इनसाइटह्णमध्ये सध्या २० ते ३० मुले प्रशिक्षण घेत आहेत. इनसाइटह्णमध्ये प्रशिक्षण घेऊन संगणक साक्षर झालेल्या मुलांना इतर क्षेत्रातही संधी उपलब्ध होऊ शकते. आता अनेक जण प्रेरणा घेऊन संगणक शिकतात व स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात.
दृष्टिहीन असूनही जगाला अधिक सुंदर बनवण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या, गगनाला गवसणी घालायला निघालेल्या निवांतह्णच्या सर्वच शिलेदारांना सलाम.
response.lokprabha@expressindia.com