५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाइल्डक्लिक

खेळ निसर्गाचा!
बिभास आमोणकर
पावसाळा सुरू झाला की सुरू होतो निसर्गाच्या कायापालटाचा अचाट खेळ. हीच वेळ असते हातात कॅमेरा घेऊन घराबाहेर पडण्याची आणि अद्भुत निसर्गवैभव टिपण्याची...

कृष्ण ढगांची दाटी झाली. विजांच्या लखलखाटात, गरजत बरसत पावसाचे आगमन झाले. तहानलेली जमीन कृतार्थ झाली आणि तिचा गर्भसुगंध आसमंतात दरवळू लागला. निसर्गातल्या या आनंद सोहळ्याचे अनोखे क्षण पकडण्यासाठी हाडाच्या, भटक्या फोटोग्राफर मंडळींनी कॅमेरे सरसावले. आकाशातला प्रकाशाचा खेळ, चकवा देणारी पण आसमंत उजळून टाकणारी वीज, मन मोहून टाकणाऱ्या इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण हे सारंच मागच्या महिन्यात टिपून झालं, आता..?
आता सुरू झाला आहे निसर्गाचा एक वेगळाच खेळ, त्यासाठी सज्ज व्हा आणि निघा घराबाहेर. अंगावर हिरवीगार चादर ओढून घेतलेल्या डोंगरदऱ्या आणि माळरानांकडे धाव घ्या! तिथेच सुरू होतोय निसर्गातील कायापालटाचा एक अद्भुत खेळ. वर्षभरात कधीच दृष्टीस पडणार नाहीत अशा अनेक घटना आता घडू लागतील आणि हे नवं स्वरूप कॅमेरात टिपणं म्हणजे काय आनंद असतो, हे एका फोटोग्राफरशिवाय कोण जाणतो! कारण तो क्षण टिपल्याने इतर लोकांनाही त्याचा आनंद वाटता येतो. मित्रांनो, थोडय़ा वेगळ्या सूक्ष्म नजरेने आजूबाजूला पाहा, अनेक विषय विखुरलेले नजरेस पडतील, या हिरव्या चादरीतच!
नव्याने अंकुरणाऱ्या वनस्पती, जीवसृष्टी यांमध्ये एक उत्साह संचारलेला दिसतो. अवाक् करणाऱ्या जैवविविधतेचा अथांग सागरच तुमच्या कॅमेऱ्यासाठी पसरलेला असतो. यातीलच एखादा विषय तुमचं लक्ष वेधून घेईल आणि मग सुरू होईल तुमच्यातल्या फोटोग्राफरचा आणि निसर्गाचा मन मुग्ध करून टाकणारा एक संवाद. कुणाला वनस्पती खुणावतील तर कुणाला छोटे छोटे जीव साद घालतील.
पावसाळा म्हणजे निसर्गातील प्रजोत्पादनाचा कालावधी. त्यामुळे निसर्गात सर्वत्र प्राणी-पक्ष्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये एक अनोखे नवचैतन्य विखुरलेलं असते. या मोसमात पाण्याचा सुकाळ असल्याने सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य असते. या हिरवळीत गवत, शेवाळ, लायकेन, मशरूम आणि फंगीची तर जत्राच भरलेली असते. हे सारं कॅमेऱ्यात टिपणं हाच तर खरा आनंद असतो.
गवताच्या कुरणातील वेगवेगळ्या रंगछटा एखादं असं काही अचाट कॉम्पोझिशन्स देऊन जातात की बस, भान हरपून पाहतच राहावं. झाडांवर, कातळ-दगडांवर वाढू लागलेल्या शेवाळात व लायकेनमध्ये निरनिराळे पॅटर्नस् तयार होतात. यातून हमखास चांगली फ्रेम मिळू शकते, पण थोडंसं कलात्मकदृष्टय़ा पाहावं लागेल. कारण हा विषय म्हणजे फोटेग्राफीतलं ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगच’ म्हणावं लागेल.
अळंबी म्हणजेच मशरूम आणि फंगाय ही तर निसर्गातील जादूच! अतिशय कमी काळ आयुष्य असलेली ही मशरूम्स काही तासांत उगवतात आणि लुप्तही होतात. यातील अनेक जाती-प्रकार व त्यांच्या रंगांमध्ये व आकारांमध्ये गमतीशीर विविधता आढळते (यातील काही प्रकार विषारीही असतात, हे लक्षात असू द्या). बहुतेक वेळा ही उगवतात तिथे प्रकाश फारच कमी असतो. हॅण्ड हेल्ड फोटोग्राफी करणे शक्य नसते. (Low Shutter Speed) अशा वेळी फ्लॅशचा वापर करावा. लाइट डिफ्युझड केल्यास उत्तम.

मागच्या लेखात पाऊस आणि वातावरणातील आद्र्रता याच्यावर मात कशी करायची हे आपण जाणून घेतलंच आहे. आता पावसाळ्यात तुमच्याकडे नेमकी कोणती सामग्री असावी हे पाहूया.
पॉइंट अ‍ॅण्ड शूट किंवा कॉम्पॅक्ट डिजिटल कॅमेरा असल्यास फारसा लवाजमा नसतोच पण जर एस. एल. आर. असेल तर मात्र थोडीफार माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे.
१) लेन्सेस: नॉर्मल, अल्ट्रावाइड, शॉर्ट झूम या बेसिक लेन्सेस अतिशय उपयुक्त ठरतात आणि एखादी मायक्रो असल्यास मजा काही औरच आहे. हे शक्य नसल्यास तोडगा म्हणून काही पर्याय आहेत. जसे, क्लोजअप लेन्सेस (फिल्टर्स), रिव्हर्सल िरग, कन्व्हर्टर. परंतु मायक्रोची सर मात्र यात नाही. फोकसिंग िरगच्या अभावी कॅमेरा मागे-पुढे करून फोकस जमवावा लागतो. डेप्थ ऑफ फिल्ड अतिशय कमी असते तसेच एक्स्पोजर ही कॉम्पन्सेट करावे लागते.
२) एखादा कॉम्पॅक्ट फ्लॅशबरोबर असणं उत्तम. कारणं छोटय़ा ऑब्जेक्टचे फोटो काढताना (क्लोजअप/ मायक्रो फोटोग्राफी) आणि खास करून प्रकाशाची तीव्रता कमी असताना हे एक जीवदान ठरू शकते. आज बाजारात विशिष्ट प्रकारचे िरग लाईट अथवा क्लोज अप लाईट उपलब्ध आहेत. परंतु हे तंत्र खूप महाग आहे. दुसरे महत्त्वाचे असे की िरग लाईट वापरताना ती िरग लेन्सभोवती बसवावी लागते. त्यामुळे लेन्सच्या दिशेनेच लाईट ऑब्जेक्टवर पडतो. परिणामी फोटो फ्लॅट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे तंत्र पूर्णपणे अवगत असेल तरच त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतात. त्याऐवजी सध्या अनेक फोटोग्राफर बाजारात उपलब्ध असणारे एलईडी लाईट वापरतात त्याचा वापर करू शकतात. क्लोजअप फोटोग्राफीमध्ये शक्यतो लाईट सोर्स एकाच कोनातून आणि एकाच दिशेने असावा अथवा नसíगक प्रकाश वापरावा. फ्लॅशमुळे श्ॉडो (सावली) निर्माण होते, अशा वेळी फ्लॅशची प्रखरता कमी करावयाची असल्यास फ्लॅशवर किंवा त्यापुढे तलम-पांढरा कपडा, गेटवे ट्रेसिंग किंवा तत्सम प्लास्टिक / पी. व्ही. सी. चा तुकडा धरल्यास हे साध्य करता येते पण लक्षात ठेवा की अशा वेळी तुम्हाला एक्स्पोजर वाढवावे लागेल. लाइट रिफ्लेक्ट केल्यास हलकासा ‘फिलर’ प्रकाश उलट दिशेने निर्माण करता येतो. त्यासाठी पांढरा, चंदेरी अथवा सोनेरी कार्ड पेपर/प्लास्टिकचा तुकडा सोबत ठेवावा.

या सर्व प्रकारांत निसर्गातील एखादा वेगळा घटक फ्रेममध्ये मिळवता आल्यास मूळ विषय आणखी खुलवता येतो, त्या फ्रेमला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. हे घटक म्हणजे त्या फ्रेममधील विषयांची पाश्र्वभूमी (Background), खडक, झाडाच्या खोडावरील साल, पालापाचोळा, त्यावरील पाण्याचे थेंब/तुषार, एखादा कीटक, मुंगी, अळी असे अनेक घटक आढळून येतील, तुमच्याकडे हवा तो मात्र पेशन्स. तुमची नजर कायम तीक्ष्ण आणि चाणाक्ष असायला हवी, तुम्हाला वेळ कमी पडेल पण विषय नाही!
अनेक छोटे छोटे जीव हाही एक अवाक् करून टाकणारा विषय आहे. कीटक, चतुर, िवचू, घोणे, गोगलगाय, जलचर जीव (खेकडे, िशपले, मासे, बेडूक मासे), बेडूक, साप, इत्यादी. विषय संपता संपायचे नाहीत. तुम्हीच ठरवा काय निवडायचे ते.. आणि झोकून द्या स्वत:ला कॅमेरासकट!
पावसाळ्यात सर्व सॅच्युरीज्, नॅशनल पार्क हे वनखात्यातर्फे बंद केले जातात. त्यामुळे मोठय़ा प्राण्यांची फोटोग्राफी करायला जणू सुट्टीच! पण याच तीन-चार महिन्यांच्या कालावधीत तुम्ही वरील विविध विषयांसाठी आपले फोटोग्राफीचे कौशल्य वापरू शकता. हळूहळू तुम्हाला त्यातील तांत्रिक बारकावे लक्षात येऊ लागतील. क्लोजअप् / मायक्रो फोटोग्राफी, निरनिराळी लाइट सिच्युएशन समजणे, फ्लॅशचा उपयोग व वापर नक्की कुठे आणि कसा करावा, अशा अनेक बाबींची समीकरणे सुटू लागतील आणि आपण निवडलेल्या विषयातील प्रावीण्य आणि समाधान मिळवून घेणे शक्य होऊ शकेल.

हा तुमचा प्रवास सुरू असताना कॅमेराची आणि स्वत:ची काळजी तुम्ही घ्याल यात शंकाच नाही पण एक अतिशय महत्त्वाच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हे गरजेचे आहे. निसर्गात वाइल्ड फोटोग्राफी करणाऱ्यांनी काही एथिक्सकडे लक्ष द्यावे आणि फिल्डमध्ये अतिशय काळजीपूर्वक वावर करावा. अनेकदा फोटो घेताना एखाद्या ऑब्जेक्टच्या जवळ जाताना, ‘अप्रोच’ करताना आपण पायाखाली नक्की काय तुडवतोय याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. कारण तिथेही काही सूक्ष्म जीव / वनस्पती असू शकतात. आपल्या फोटोग्राफीच्या हव्यासापायी निसर्गातील अशा छोटय़ाशा घटकांचा नाश होणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचा धसमुसळेपणा करू नये. ‘निसर्गात जे जसे दिसेल तसे कॅमेरात टिपावे’ त्यात कोणताही बदल-फेरफार करून एखादा ड्रॉमॅटिक शॉट मिळवण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. कारण तो फरक-बदल बहुतांश वेळी फोल जातो आणि ते दिसून येते. निसर्गाशी जेवढी जवळीक साधाल तेवढा तो तुमच्यासमोर एक एक रहस्य खुले करील आणि असे क्षण जेव्हा तुमच्यासमोर असतील तेव्हा आपण ते कॅमेरात टिपण्यात जो आनंद आणि समाधान असते ते मिळवाल.

response.lokprabha@expressindia.com