५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

स्त्री-मिती

स्त्रियांच्या कपडय़ांमागची संस्कृती!
वंदना खरे
नुकतेच अलीगढमध्ये एका मुलीने जीनची पँट घातली म्हणून झालेल्या मारहाणीत तिच्या आईचा मृत्यू झाला. आपल्याकडेच नाही तर जगभरात सगळीकडेच स्त्रियांनी कुठले कपडे घालावेत, कुठले घालू नयेत यावर सतत वादविवाद होताना दिसत आहेत. का होत असेल असं?

महिनाभरापूर्वी दुकानांबाहेरच्या पुतळ्यांवर येऊ घातलेल्या बंदीविषयी लिहिताना मी म्हणाले होते की, बाईच्या आकाराच्या बाहुलीला दुकनदारांनी कुठले कपडे चढवावेत याबद्दल ठराव पास केला जाणे ही वरवर पाहता वाटते तितकी निरागस, निरुपद्रवी खेळी नाही.. एक सजग नागरिक म्हणून तर त्याकडे मुळीच दुर्लक्ष करता कामा नये! कारण आज जे बाहुल्यांच्या कपडय़ांवर र्निबध आणतायत, उद्या कदाचित हाडामांसाच्या जित्याजागत्या बायकांनी कोणते कपडे घालावेत याचेही नियम बनवतील! दुर्दैवाने माझी ही भीती फारच लवकर प्रत्यक्षात उतरली आहे..
नुकतीच अलिगढमध्ये ज्वालाजीपूरम कॉलनीत घडलेली ही घटना आहे.. या वस्तीत राहणारी वीस वर्षांची मुलगी गुंजन- कॉलेजला जाताना जीन्स घालत असे. या मुलीने जीन्स घातल्यामुळे वस्तीचे वातावरण दूषित होते आहे, अशी वॉìनग तिच्या आईवडिलांना शेजाऱ्यांकडून दिली जात होती, पण तिच्या आईवडिलांनी या धमक्यांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या मुलीला सोयीस्कर वाटणारे कपडे घालायची मुभा दिली. त्याचीच शिक्षा म्हणून एक दिवस त्यांच्या घरावर लाठय़ाकाठय़ा आणि बंदुकांसहित हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये गुंजनच्या आईला बंदुकीच्या दस्त्याने इतके बदडले की तिचा जीव गेला! गुंजन आणि तिचे वडीलदेखील जबर जखमी झाले आणि सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. हा हल्ला करण्यात गुंजनची शेजारीण फुलवती हिने पुढाकार घेतला होता असे दिसून आले आहे. सध्या या फुलवतीला तिच्या दहा सहकाऱ्यांसोबत अटक करण्यात आली आहे.
एखाद्या बाईनेच मुलीच्या पोशाखावर नियंत्रण आणण्यात इतका हिरिरीने िहसक पुढाकार घ्यावा याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यानिमित्ताने आता पुन्हा एकदा बायकाच बायकांच्या शत्रू असतात का, वगरे नेहमीच्या शिळ्या कढीला ऊत येईल! किंवा अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन कुणी असेही म्हणेल की, जर मुलींनी जीन्स घातल्यावर सामाजिक वातावरण प्रदूषित होत असेल तर मग मुलग्यांनाही जीन्स घालायला किंवा अगदी विजारी घालायलाच बंदी का आणू नये? मुलींनी सलवार-खमीस नाही तर साडय़ा नेसायच्या असतील तर मुलग्यांनाही लुंग्या किंवा धोतर नेसायची सक्ती करावी का? विशिष्ट कपडय़ांमुळे बलात्कार होत नाहीत; हे स्त्रीवादी मंडळी ओरडून ओरडून अनेकदा सांगत असतात, तरीही कुठल्या ना कुठल्या कारणाचे निमित्त काढून किंवा अगदी कारणाशिवाय पुन:पुन्हा जगभरात सतत बायकांच्या कपडय़ांवर र्निबध का लादले जात असतील?
कुठेही एखाद्या बाईवर लंगिक छळाची घटना घडली की सगळ्यात आधी चौकशी होते तिच्या कपडय़ांची, पण जिथे लंगिक छळाच्या शक्यतेचा काही अर्थाअर्थी संबंध नसेल अशा बाबतीतही बायकांच्या कपडय़ांवर ताशेरे ओढले जातातच.. कधी सानिया मिर्झावर तिने खेळताना घातलेल्या तोकडय़ा स्कर्टबद्दल शेरेबाजी होते; तर कधी मराठवाडय़ातल्या छोटय़ा शहरांमध्ये मुलींनी स्कार्फने चेहरा झाकू नये यासाठी मोठाली बॅनर्स लावली जातात, तालिबानी लोक मुस्लीम महिलांनी ‘चादर’ घेतली पाहिजे म्हणून सक्ती करतात. त्याच्या उलट पॅरिससारख्या शहरात मुस्लीम महिलांना बुरखा वापरायला कायद्याने बंदी केली जाते; हरियाणातले गुज्जर लोक आपल्या जातीतल्या मुलींनी जीन्स घालू नये असा नियम करतात. अगदी कॅनडामधला पोलीस अधिकारीदेखील तिथल्या महिलांना बलात्कार टाळण्यासाठी ‘अनतिक’ बाईसारखे- ‘स्लटसारखे’- कपडे घालू नका, असे आवाहन करतो. त्याच्या या शेरेबाजीवर प्रतिक्रिया म्हणून जगभर ‘स्लट वॉक’ची मोहीम उघडण्यात आली होती! त्यालाही आता बराच काळ उलटून गेला, पण अजूनही बायकांनी घालण्याचे कपडे हा विषय पुन:पुन्हा चच्रेचे आणि र्निबधाचेही कारण ठरतच असतो.
कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कपडे एकतर्फीपणाने बाद करण्याचे निर्णय बायकांऐवजी दुसरेच कुणी तरी घेत असते. त्याबद्दल परस्पर नियम बनवून टाकले जात असतात आणि लादलेही जात असतात.. पण हे असले सगळे र्निबध फक्त खरोखरच फक्त कोणी, कुठे, कधी, कुठले कपडे घालावेत यापुरते असतात, की त्यामागे दुसरेच कसले तरी जास्त मोठे राजकारण दडलेले असते?
या संदर्भात मला मुंबईच्या एका वस्तीत घडलेली घटना आठवते! देशाच्या विविध भागांतून पोटासाठी मुंबईत आलेल्या कष्टकरी आणि निम्न मध्यमवर्गाच्या लोकांची वस्ती असली तरी इथे मोठय़ा प्रमाणावर मुस्लीम लोकदेखील राहतात. त्यामुळे सगळ्याच जमातींमध्ये आजूबाजूच्या शीख, िहदू, मुस्लम आणि नवबौद्ध लोकांच्या संदर्भात ‘आपल्या मुलीं’वर लक्ष ठेवण्याची या वस्तीत पद्धत पडलेली आहे. इथल्या मुस्लीम मुलीही इतर सगळ्या जाती-धर्माच्या मुलींमध्ये मिसळतात, एकत्र शाळा-कॉलेजांना जातात. अर्थातच त्यांनाही वस्तीतल्या इतर सर्व जणींसारखेच कपडे घालावेसे वाटतात, फॅशन कराविशी वाटते; पण इथल्या मुस्लीम मुलींना कपाळावर रंगीबेरंगी टिकल्या लावायला मनाई आहे आणि मुख्य म्हणजे कॉलेजातल्या मुलींचा जो आवडता पोषाख असतो तो म्हणजे -‘जीन्स आणि टी-शर्ट’- तोदेखील घालायला मनाई आहे!
अनेक वर्षांपासून अनेक मुलींनी निमूटपणाने हे र्निबध पाळलेले आहेत.. पण एकदा काही बंडखोर काटर्य़ाच्या डोक्यात हे नियम तोडायचे खूळ शिरले. त्या सगळ्या जणी एका संस्थेच्या संपर्कात आल्या होत्या. तिथल्या कार्यक्रमांमध्ये बोलली जाणारी हक्कांची- अधिकारांची भाषा ऐकून ऐकून त्यांनीही आपल्या स्वत:च्या आयुष्यात एक छोटीशी क्रांती घडवून आणायचे ठरवले! त्या सगळ्या जणींनी आपापल्या मत्रिणींकडून मस्तपकी जीन्स आणि टी-शर्टस मिळवले. एक दिवस सगळ्या जणी संस्थेच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडताना नेहमीसारख्याच सलवार-खमीस घालून निघाल्या, पण लोकल ट्रेनमध्ये शिरल्याशिरल्या सगळ्यांनी बुरखे आणि सलवार खमीस उतरवून टाकले आणि आतमध्ये घातलेल्या टाइट जीन्स आणि टी-शर्टसनी मोकळा श्वास घेतला! या नव्या कपडय़ांमध्ये त्यांचे त्यांनाही कात टाकून नवेपण मिळाल्यासारखे वाटत होते. मजेत हसत-गात संस्थेचा कार्यक्रम पार पाडून पुन्हा एकदा आपल्या बंदिस्त वास्तवाला सामोरे जायला निघणार तेवढय़ात त्याच कार्यक्रमाला आलेल्या त्यांच्या वस्तीतल्या मुलांनी त्यांच्याशी दमदाटी सुरू केली. त्या पोरींचा आगाऊपणा त्यांच्याच वयाच्या मुलांना अजिबात खपलेला नव्हता. त्या मुलींच्या आईवडिलांच्या कानावर हा प्रकार घालायचे त्यांनी ठरवले होते आणि त्यांना अद्दल घडवली जाणार होती! संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा त्या मुलांचा एकच हेका होता की - मुलींच्या अशा वागण्यामुळे मुस्लीम समाजाची प्रतिमा वस्तीमध्ये खराब होईल; कारण.. ‘आज त्या जीन्स घालताहेत- उद्या दारू पितील, परवा पबमध्ये नाचायला जातील आणि नंतर कोण जाणे धर्माबाहेरच्या एखाद्या मुलासोबत पळून जातील!’ थोडक्यात, मुलींनी ठरावीक पोशाख घालणे याचा संबंध त्यांच्या एकूणच स्व-तंत्रपणे वागण्याशी जोडलेला होता.
आपल्या वस्तीतली आपल्या जमातीमधली मुलगी केवळ कोणते कपडे घालते याकडेच नव्हे तर ती कशी चालते, कोणाशी बोलते, किती वेळा बोलते, कोणत्या कारणासाठी कुठे जाते, किती वाजता, कोणासोबत आणि कधी परत येते या सगळ्याकडे प्रत्येक जमातीतले लोक बारकाईने लक्ष ठेवून असतात. मुलींच्या वेषभूषेवर घातलेल्या मर्यादा खरं तर, एकूणच ‘बाई’ म्हणून जगताना त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या मर्यादांचे एक छोटेसे दृश्यरूप असतात! त्यांची वागणूक, त्यांचे विचार, त्यांची मते, त्यांच्या भावना, त्या व्यक्त करायची पद्धत या सगळ्यावर समाजाला जे नियंत्रण ठेवायचे असते, त्या मोठय़ा नियंत्रणाचा हा एक छोटासा भाग असतो. म्हणून तर; बायकांनी वरवर छोटय़ा भासणाऱ्या अशा अलिखित नियमांचा भंग करणे म्हणजे समाजाने घालून दिलेल्या ‘बाईपणाच्या’ चौकटीलाच धक्का लागण्याची शक्यता असते. जर या चौकटींना लहानसहान कारणांनी असे धक्के बसायला लागले तर त्यांच्या माध्यमातून ज्यांना समाजावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यांच्या सत्तेलाच एक प्रकारे हादरे दिले जात असतात.
अशा नियंत्रणाच्या आडून विशिष्ट कुटुंबाचा, वस्तीचा, जातीचा, धर्माचा किंवा अगदी देशाचाही मान-सन्मान (खरे तर दुराभिमान) याबद्दलचे राजकारण काम करीत असते! म्हणून त्या त्या जाती-धर्माची सांस्कृतिक अस्मिताच अशा वेळी पणाला लावली जात असते. एखाद्या जमातीतल्या बाईच्या जातीवर त्या जमातीच्या म्होरक्यांचे किती नियंत्रण आहे त्यावर त्या जमातीचे इतर समाजाशी असलेले नातेसंबंध आणि सत्तासंबंधसुद्धा अवलंबून असतात. एखाद्या मुलीने ‘जीन्स’ घातल्यामुळे तिच्या आईला ठार मारले जाणे हा फक्त त्या एकाच मुलीला नव्हे तर तिच्यासारखे बंड करायची इच्छा मनात आणणाऱ्या प्रत्येक मुलीला जरब बसवण्यासाठी वापरला जाणारा सांस्कृतिक दहशतवाद आहे; पण अशा दहशतवादाला विरोध करायचा असेल तर तो केवळ बुरखा, जीन्स किंवा स्कर्टपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही.
जसजशा दिवसेंदिवस बायका शिक्षण, नोकरीसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे स्वत:साठी जास्त मोकळीक कमावू लागल्या आहेत; तसतशा त्यांच्या आकांक्षा वाढत जाणारच आहेत! त्यांच्यावरची समाजाच्या नियंत्रणाची पकड ढिली होत चालल्याच्या जाणिवेमुळे त्यांच्यावर असे िहसक हल्लेदेखील वाढत जाणार आहेत. त्याच वेळी, व्यापारीकरणाचा दुसरा एक सापळा त्यांच्या भावनांचे, आकांक्षांचे आणि इच्छांचे वस्तूकरण करायला जबडा उघडून बसलेला आहे! आकर्षक कपडय़ांचे आणि सौंदर्यप्रसाधनांचे वेगवेगळे ब्रँड्स स्त्रियांना सुंदर असणे म्हणजे काय त्याबद्दलच्या नव्या व्याख्यांच्या साच्यांमध्ये अडकवायला टपलेले आहेत. मल्लिका शेरावतसारख्या अनेक खुळचट सुंदऱ्या आपले शरीर उघडे टाकणे हाच आपला स्त्री-वादी हक्क असल्याचे ठासून सांगत आहेत. त्वचेचा रंग उजळ करणाऱ्या नवनव्या ब्रँडचा सुळसुळाट आणि काजळ, लिपस्टिकसारख्या प्रसाधनांच्या अवाच्या सव्वा किमती पाहिल्या आणि त्यांना मिळत चाललेला जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा पाहिला की भीतीच वाटते! छोटय़ा परिघातल्या जमातीपुरत्या असलेल्या एका प्रकारच्या दडपशाहीकडून आपण मोठय़ा पातळीवरच्या मार्केटप्रणीत दडपशाहीला बळी पडायच्या मार्गावर चाललो आहोत की काय?
response.lokprabha@expressindia.com