५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

वर्णलोप - सवर्णतरलोप
सत्त्वशीला सामंत

वर्णलोपाचा आणखी एक मजेशीर प्रकार म्हणजे ‘सवर्णतरलोप’ (haplology). कधी कधी एका शब्दात दोन समान वर्णाची द्विरुक्ति होते आणि मग माणसं घाईघाईत बोलण्याच्या भरात त्यातला एक वर्णच गाळून टाकतात. इंग्रजी संज्ञेतील haplo- या ग्रीक उपसर्गाचा अर्थ same आणि single असा आहे, तर मराठी प्रतिशब्दातील ‘सवर्ण’ म्हणजे समान वर्ण आणि ‘- तर’ म्हणजे ‘एकतर’ (either) अर्थात् ‘त्यापैकी एक.’
‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ ही मराठीतील म्हण सर्वपरिचित आहे. पण अचानक एकदा मला या नकटीची शाब्दिक जन्मकथा कळली. काही निमित्ताने हिंदी शब्दकोश चाळत होते. मध्येच एके ठिकाणी मला ‘नककटा’ आणि पुढे ‘नकटा’ हे शब्द दिसले. तेव्हा असं लक्षात आलं की ‘नककटा’ या सामाजिक शब्दात ‘क’ वर्णाची सलग द्विरुक्ति झाल्यामुळे उच्चारणाच्या ओघात त्यातला एक ‘क’ गळून पडला.
एका पुस्तकात मला ‘नवरा’ या शब्दाची व्युत्पत्ति वाचायला मिळाली. ‘नववर’ या शब्दाचं सवर्णलोप पद्धतीने झालेलं संक्षिप्त रूप म्हणजे ‘नवरा’. मनात आलं, नाही तरी भारतीय समाजातील बहुतांश कुटुंबातील ‘नवरा’ हा कायमच ‘नववरा’सारखा वागत असतो. (अजून ‘नववधू’ची मात्र ‘नवधू’ झालेली नाही. तसं झालं तर मात्र ‘नवधू’ या शब्दाला वेगळीच छटा येईल. कारण येथील ‘नववधू’ ही दोन दिवसांपुरतीच ‘नववधू’ असते, त्यानंतर मात्र आयुष्याभराची ती ‘न-वधू’च बनते.)
हिंदीत ‘खरीद द ा र’चा ‘खरीद ा र’ होतो, तर मराठीत ‘अपर र ा त्र’ची ‘अपर ा त्र’ होते. पण एकदा मात्र अशी मजा झाली की, ‘आकाशवाणी’वरील एका जाहिरातीत निवेदिकेने ‘वेद न ा न ा शक गोळ्या’ याऐवजी चक्क ‘वेद न ा शक गोळ्या’ असा उच्चार केला. म्हणून हा प्रकार सर्वच बाबतीत सर्रास घडू देणं धोक्याचं असतं- विशेषत:, विशेषनामांच्या बाबतीत. ‘महाभारता’ त ‘खांडववनदाह’ म्हणून एक उपकथा आहे. त्याचा उच्चार करताना आपण जर एक ‘व’ गाळला तर त्या ऐतिहासिक वनाचं नावच विपरीत होईल.
हिमालयातील ‘मानस सरोवरा’च्या बाबतीत तोच धोका संभवतो, नव्हे हिंदीभाषक समाजाच्या बेफिकिरीमुळे या सांस्कृतिक नावाची अर्धीअधिक हानि झालेलीच आहे. यासंबंधी ‘वाल्मिकी रामायणा’त एक सुंदर कथा आहे. हिमालयातील एका (सध्याच्या तिबेट) प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष ओढवले, ऋषिमुनींना पूजेअर्चेसाठी पाणी मिळेना. म्हणून ते सर्वजण ब्रह्मदेवाकडे आपले शिष्टमंडळ घेऊन गेले व त्यांनी ब्रह्मदेवाची करुणा भाकली. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना संतुष्ट करण्यासाठी आपल्या मानसशक्तीच्या योगे हे सरोवर निर्मिले.
कैलासशिखरे राम मनसा निर्मितं परम्।
ब्रह्मणा नरशार्दूल तेनेदं मानसं सर:।। (बालकांड)

भले ही कपोलकल्पित दंतकथा असो वा नसो, पण तरीही अशा कथा या भारतीय समाजाच्या सांस्कृतिक संचिताचा अविभाज्य भाग आहेत व म्हणून आपण ‘मानस  स रोवर’ हे अर्थपूर्ण नाव टिकवावयास हवे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे?
भारतातील सर्व दाक्षिणात्य भाषांनी आपल्या शब्दकोशात, साहित्यात आणि दैनंदिन व्यवहारातही हा वारसा जाणीवपूर्वक जपला आहे. याउलट, उत्तर भारतातील हिंदीभाषक समाजाने मात्र हा वारसा विसरून, निव्वळ उच्चारसौकर्यापायी त्याचे चक्क ‘मानसरोवर’ करून टाकले. (हे हिंदीभाषी लोक आपल्या ‘तुलसी रामायणा’चा म्हणजे ‘रामचरितमानस’चाही वारसा विसरले. ‘रामचरितमानस’ ग्रंथाच्या प्रारंभी तुलसीदासाने ‘आपला ग्रंथ म्हणजे हे ‘मानस सरोवर’ असून त्यामध्ये निरनिराळे अध्याय हे त्या सरोवराचे घाट आहे, इ. वर्णने करून तेथे एक साङ्ग रूपक रचलेले आहे) याच हिंदीभाषकांनी जुन्या काळी नकाशे बनवणाऱ्या ब्रिटिश अंमलदारांची अज्ञानापोटी दिशाभूल केली आणि येथील स्थानिक जनतेने सांगितल्याप्रमाणे भारतीय नकाशात ‘मान स् ा रोवर’ हे विपर्यस्त नाव कायमचे प्रमाणित झाले.
हिंदीच्या साथीने उत्तर व पश्चिम भारतातील बहुतेक भाषामध्ये आता ‘मानसरोवर’ हेच नाव रूढ होऊन गेले. मराठीची स्थिती मात्र त्रिशंकूसारखी झाली आहे. गेल्या दोन शतकातील मराठी साहित्यात सर्व जुन्या साहित्यिकांनी ‘मानस सरोवर’ हे नाव अट्टाहासाने टिकवून ठेवले होते. पण आताची तरुण पत्रकारांची पिढी मात्र ‘कैलास-मान स् ा  यात्रा’ ऐवजी ‘कैलास-मान यात्रा’ असा शब्दप्रयोग करून मराठी समाजाचे अतोनात नुकसान करीत आहे.
(हा प्रवाह उलटा फिरवून तेथे ‘मानस सरोवर’ या योग्य नावाची पुन:प्रतिष्ठापना करवून घेण्यासाठी गेली दोन वर्षे मी प्रयत्नशील होते. पण ‘मानस सरोवर’ भारताच्या हद्दीबाहेर असून त्यावर चीनची अधिसत्ता असल्याने आपण यासंबंधी काही करू शकत नाही, असे कळवून भारत सरकारने माझी बोळवण केली व मला ‘रॉयल जिओग्राफिकल सोसायटी’चा रस्ता दाखवला. पण अजूनही मी जिद्द सोडलेली नाही व तो शेवटचा प्रयत्न मी करून पाहणार आहे. यापुढे निदान जनमानसात तरी ‘मानस सरोवर’ हे नाव अबाधित राहावे असा माझा प्रयास असून, सर्व नामवंत प्रवासी कंपन्यांचे मी प्रबोधन करीत आहे.)
आतापर्यंत मी ज्या संक्षेपांचा उल्लेख केला आहे ते सर्व भाषाप्रवाहाच्या नैसर्गिक ओघात घडलेले आहेत. परंतु, या तत्त्वाचा उपयोग करून, मी माझ्या ‘शब्दानंद’ कोशात काही पारिभाषिक शब्द घडवले आहेत. (उदा.- larynx + pharynx = laryngopharynx= कृक   +  क ं ठ =cursor (moving marker) = चल  +  ल क्षक = चलक्षक) ‘जागतिक  ी करण’ असा प्रदीर्घ शब्द वापरण्यापेक्षा त्याचे ‘जागतीकरण’ करण्यास हरकत नाही. (कारण, मूळ शब्द ‘जगत्’ अथवा ‘जगती’ असून त्यावरून, ‘जागतिक’ या अर्थाने ‘जागत’ हाही शब्द सिद्ध होऊ शकतो.)
इंग्रजी भाषेत तर या प्रकाराची विपुल उदाहरणं आहेत. anis_e + s_eed ही दोन पदं मिळून aniseed हा शब्द तयार झाला. इंग्रजीत ‘विद्या किंवा शास्त्र’ या अर्थाने - logy हा एक प्रत्यय आहे. त्याच्या मागील पदात अंती जर ‘l' वर्ण असेल तर बहुतेक वेळा तो लोप पावतो- उदा.- mineral + logy Þ mineralogy, symbol+logy - symbology B. idolatry हा शब्दही तसाच घडलेला आहे. याच धर्तीवर lectur_e_r_+ ship = lectureship वा dei + ism=deism असे शब्द निर्माण झाले.
याच तत्त्वाचा थोडा विस्तार म्हणजे जेव्हा दोन पदांमध्ये एखाद्या वर्णसमूहाची (syllable) दिरुक्ति होते तेव्हा अशा संक्षिप्त शब्दांचा प्रयोग केला जातो. ‘लैंगिक शोषण’ या अर्थाने sex=exploitation ही पदे एकत्र आल्यावर त्यांचा संयोग करून sexploitation असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.
भाषक समूहांचा संक्षेपाच्या दिशेने चालणारा हा खटाटोप पाहता, उद्या खुद्द haplology चंहि ‘khaplogy' असं संक्षिप्त रूपांतर झालं तर नवल वाटू नये!
response.lokprabha@expressindia.com