५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संख्याशास्त्र

तुमची मुले आणि संख्याशास्त्र-१
उल्हास गुप्ते

आई-वडील किंवा पालक नात्याने आपण आपल्या मुलांना समजून घेणे अतिशय जरुरीचे असते. कारण ही लहान मुले आपल्या आई-वडिलांच्या वागण्या-बोलण्याचे बारीक निरीक्षण करत असतात आणि नंतर तसे बोलणे वागण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात, आपल्या चांगले-वाईट वागण्याचे ते अनुकरण करीत असतात, जसे हळूहळू वय वाढत जाते तसे त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व घडत जाते.
लहान मुलांच्या एका गटाचे जर आपण बारकाईने निरीक्षण केले, तर त्यांच्यामधील सुप्त गुणांची जाणीव होऊ लागते. एखाद्या मुलांचा कल नेतृत्व करण्याकडे असतो, तर दुसरा मुलगा दिवसभर आपला वेळ मस्ती करण्यात घालवतो, तर तिसरा मुलगा अख्खा दिवस रडत बसतो. यांच्या या वागण्यातून यांचे स्वभावदर्शन होत असते.
खरं तर ही लहान मुले खूप मनमोकळी आणि निरागस असतात आणि नेमके याच वयात त्यांच्यावर बरे-वाईट संस्कार होत असतात व त्यातून यांची घडण होत असते आणि पुढे मोठे झाल्यावरही याच संस्काराचा अंश त्याच्या मनात रुजलेला असतो आणि त्यातूनच त्याचा स्वभाव तयार होतो. यासाठी आपल्या मुलांचे बालपण आपण जाणून घेणे खूप गरजेचे ठरते आणि ही जबाबदारी त्या मुलांच्या आई-वडिलांची असते. १ ते ९ मूलांक असलेल्या मुलांचे स्वभाव त्याची मानसिक स्थिती त्यांचे आई-वडिलांशी नाते कसे असते हे त्यांच्या जन्मतारखेच्या मूलांकावरून पाहू.
बालक अंक १
ज्यांची जन्मतारीख १, १०, १९ किंवा २८ असते. अशा मुलांचा नेतृत्व करण्याकडे जास्त कल असतो. ही मुले खूप उत्साही आणि निश्चयी असतात आणि त्यांच्या हालचालीवरून ते स्पष्टपणे जाणवत असते. तसेच लहान वयात या मुलांना चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव फार लवकर होत असते. यांच्यापाशी उत्तम आत्मविश्वास असतो. त्यामुळे ही मुले या वयातही स्वत:चे निर्णय स्वत:च घेऊ लागतात. एखाद्या कामात स्वत:ला झोकून द्यायचे आणि ते काम जिद्दीने पुरे करायचे हा यांचा नित्याचा कार्यक्रम असतो. कोणतेही निर्णय घेताना ते तर्कबुद्धीचा चांगला वापर करीत असतात. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेत नाहीत. यांच्यापाशी उत्तम इच्छाशक्ती असते आणि त्या इच्छाशक्तीचा वापर यांनी अभ्यास आणि आपल्या वैयक्तिक कामात, खेळात करावा.
विशेषत: यांच्या आई-वडिलांनी त्यांना आवडणाऱ्या चांगल्या गोष्टी करून द्याव्यात. त्यांना कशात आनंद वाटतो ते शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी कोणता छंद जोपासावा ते त्यांना ठरवू द्या. ते तुम्ही ठरवू नका. आपले आवडते विषय, खेळ मुलांवर लादू नका. त्यांनी हाती घेतलेल्या कामात त्यांना उत्तेजन द्या. आई-वडिलांचे मूलांक जर २, ४ किंवा ७ असतील घरचे वातावरण खूपच खेळीमेळीचे, आनंदी राहील. वरील मूलांकाची माणसे यांच्या जीवनात मित्र-मैत्रिणी म्हणून येतील आणि हा जिव्हाळा कायम स्वरूपात टिकेल.
बालक अंक २
ज्यांची जन्मतारीख २, ११, २० व २९ असते अशी मुले २ अंकाच्या प्रभावाखाली येतात. ही मुले नेतृत्व करीत नाहीत. पण त्यांच्या गटात समुदायात सर्वसाधारण माणसासारखी अनुयायी बनतात. ही मुले अतिशय भिडस्त, लाजाळू, मृदू, संवेदनशील असतात. पण तितकीच कल्पक असतात. यांच्या हळव्या स्वभावामुळे खूप वेळा यांचे मन दुखावले जात असते.
ही मुले प्रेमाची भुकेली असतात. सतत आईच्या मागे मागे फिरणे, हट्ट करणे आणि लहानसहान गोष्टीवरून रडत बसणे, हा यांचा लहानपणीचा कार्यक्रम असतो. पण हळूहळू मोठी होत असताना यांना मित्र-मैत्रिणीच्या घोळक्यात राहणे, गप्पा मारणे, खेळणे या गोष्टीत ही मुले आपलं मन रमवत असतात. अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीत वाचन, टीव्ही, संगीत यात वेळ घालवणे यांना मनापासून आवडत असते.
विशेषत: पालकांनी यांच्याशी वाद-विवाद करू नयेत, मोठय़ाने अंगावर ओरडू नये, त्यांना आपली दहशत वाटेत, भीती वाटेल असे वागू नये. त्यांना त्याच्या आवडीच्या विषयात रमू द्यावे, चुकीचे किंवा गैर वागत असतील तर समजुतीने समजूत द्या. विशेषत: भाषेच्या अभ्यासाची आवड असेल तर त्यांना भरपूर वाचन करू द्यात.
आई-वडिलांचे मूलांक १, ४, ६ किंवा ७ असतील तर घरातील वातावरण खूपच आनंदीदायक राहील, तसेच यांच्या मित्र-मैत्रिणीचा गोतावळाही वरील मूलांकाचा असतो.
बालक अंक ३
ज्यांची जन्मतारीख ३, १२, २१ व ३० आहे अशी मुले ३ मूलांकाच्या प्रभावाखाली येतात. मूलांक १ प्रमाणेच ही मुले महत्त्वाकांक्षी असतात. यांचा कल नेतृत्व करण्याकडे जास्त असतो. क्रिकेट, फुटबॉल कोणताही खेळ असो, त्यात संघप्रमुख म्हणून यांची निवड केली जाते, तर शाळेत वर्गातही वर्गप्रमुख म्हणून यांची निवड केली जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे अगदी लहान वयातच ही मुले आपले विचार न घाबरता धीटपणे मांडत असतात, तसेच ही मुले बोलण्याच्या ओघात समोरील व्यक्तीस आपलेसे करतात. अगदी उपजतपणे कोणत्याही परक्या व्यक्तीस हाक मारताना ‘अहो काका’, ‘अहो ताई-मावशी’ इतक्या आत्मीयतेने संबोधतील. त्यामुळे समाजात ही मुले लोकप्रिय होतात.
तीन अंकाचे बालक नेहमी हसतमुख आनंदी असते. विशेषत: पालकांनी त्यांना मिळून मिसळून राहण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्या कामात त्यांनी सतर्क राहण्यासाठी त्याच्याकडील आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि या गोष्टी करण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना प्रेक्षणीय स्थळे दाखवा, त्याच्याबरोबर प्रवास करा, त्यांना तेथील माहिती करून द्या, म्हणजे मोठेपणी सामाजिक जीवनात त्यांना जगणे खूप सोपे होईल.
यांच्या आई-वडिलांच्या जन्मतारखेचे मूलांक जर ३, ६ किंवा ९ असतील तर अशा मुलांना घरात सुखाचे दिवस लाभतील, तसेच वरील मूलांक असलेल्या मित्र-मैत्रिणी सहवासात येतील.
response.lokprabha@expressindia.com