५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सहप्रवासी

‘आर्थिक लाभ मिळवून देणारे साप्ताहिक’
वामन कृष्णाजी कुलकर्णी, मिरज

मिरजेतील ‘कित्तूर’ नावाच्या पेपर विक्रेत्याने ‘लोकसत्ता’ बरोबर ‘लोकप्रभा’ घरात टाकला ही घटना सुमारे वीस वर्षांपूर्वीची. अंक वाचून काढला. विविध विषय-निवडीने अंक भावला. तसा मी मराठी भाषेचा पट्टीचा वाचक. शेवटच्या पानावर नजर स्थिरावली. त्यात शब्दकोडे आले होते व एका नामवंत कंपनीने ते सहप्रायोजित केले होते. कोडे हा माझा वीक पॉइंट. कोडे सोडवले. पाठवले व बक्षीसही मिळाले. उत्साह वाढला. इतरत्रही मी कोडय़ावर बक्षिसे मिळवली आहेत. अ‍ॅड (अ)ि या बहुराष्ट्रीय पेन कंपनीबरोबर ‘लोकप्रभा’चा सहभाग होता. मला अशाच एका शब्दकोडय़ात बक्षीस लागले. १०० रु. पासून १० रु. पर्यंतच्या ‘पेन्स’चा बॉक्स मला बक्षीस आला. आणखी उत्साह दुणावला.
नंतर - सियाराम सूटिंग - ‘लोकप्रभा’ जोडी जमली. त्यात पहिला आलो. सफारीसाठी चार मीटर सूटिंग कापड मला बक्षीस म्हणून या शब्दकोडय़ाने मिळवून दिले. पुढे काही वर्षे मी त्यांचा हा ड्रेस घालून आनंदाने सांगत मिरवत होतो.
त्यानंतर एका गणपती उत्सवानिमित्त ‘लोकप्रभा’ने संधी दिली. मी एक वेगळा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता करत होतो. तोच मुद्दा पकडून स्पर्धेत भाग घेतला. आणि चक्क मी ‘पहिला’ आलो. बक्षीस होते, रुपये ‘तीन हजार’. मला कमालीचा उत्साह आला. मी तसे संपादकांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यानंतरही मी शब्दकोडी सोडवत गेलो. ‘लोकप्रभा’शी पत्रव्यवहारही होत होता. मी हा उपक्रम केवळ बक्षिसासाठी राबवत नव्हतो. पण शब्दकोडी मग ती कितीही जटील अवघड असतील तरी मी नाद सोडला नाही. अनेक कोडी सोडवण्याची व सहभाग घेण्याची माझी प्रवृत्ती ‘लोकप्रभा’मुळे वाढीस लागली. त्यानंतर मी एक- एक वर्षांचे अंक एकत्र करू लागलो. एखाद्या मुंज, लग्न, वाढदिवस अशा प्रसंगी अगर वाचनप्रभा वाढती राहावी या उद्देशाने ‘लोकप्रभा’चे अंक बाइंडिंग करून परिचितांना भेट आहेर या स्वरूपात दिले. ही माझी सवय फार मनस्वी समाधान देऊन गेली. ‘लोकप्रभा’मधील विशेष लेख मी वाचून दाखवून वाहवा मिळवली. हे शब्दातीत आहे. कोणत्याही रकमेत हा आनंद मोजता येणार नाही. ‘कित्तूर’ नामक त्या विक्रेत्याने न कळत टाकलेल्या ‘लोकप्रभा’मुळे मला एक अपूर्व समाधान मिळाले. त्यामुळेच माझी लेखनकला ही लेखनसीमा न होता आजही भरारी घेत आहे. मी आता ‘सत्तरी’पूर्ण केली असली तरी लिखाण करण्याचा देठ अजूनही हिरवाच आहे.
उत्तमोत्तम विचारधारा जोडणारा ‘लोकप्रभा’ ४० वर्षांचा झाला. त्याची घोडदौड सुवर्ण महोत्सवाकडे वेगाने होत आहे. आता ही वीस वर्षांची ओळख अशीच वाढत राहो आणि म्हणूनच ‘लोकप्रभा’स मनस्वी हार्दिक ‘शुभेच्छा’. नमस्कार!

‘लोकप्रभा’ने ओळख दिली
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर

मी ‘लोकप्रभा’चा अगदी सुरुवातीपासूनचा वाचक आहे. माझ्या शेजारी सी. एम. मिश्रा नावाचे प्राध्यापक राहत असत. सुरुवातीला ते औरंगाबाद किंवा जालन्याहून ‘लोकप्रभा’चा अंग आणत असत. विविध ताज्या घडामोडींची माहिती, जागतिक पातळीवरील घटनांची इत्थंभूत माहिती मला या अंकातून मिळू लागली. मी साधारणत: १९८० पासून विविध विषयांवरील माझ्या प्रतिक्रिया ‘लोकप्रभा’ला गत ३५ वर्षांपासून पाठवीत आहे. ‘लोकप्रभा’ने या ३५ वर्षांपर्यंत माझ्या प्रतिक्रियांची पत्रे छापलेली आहेत. त्यामुळे मी राज्यात देशात व परदेशातही ओळखला जाऊ लागलो. अलीकडच्या पाच-दहा वर्षांत ‘लोकप्रभा’ इंटरनेटवर आल्यामुळे माझी मुलं व माझे विद्यार्थी इंग्लंड अमेरिकेत वाचू लागले आणि मला कळवू लागले आहेत.
मध्यंतरी ‘लोकप्रभा’मध्ये चारोळ्या प्रकारच्या कविता (चार, आठ ओळी) खूप प्रसिद्ध, लोकप्रिय झाल्या. दर आठवडय़ाला माझ्या चारोळ्या चित्रासह प्रकाशित होत असत व मला पत्रे व फोन येत असत. आजही माझी पत्रे, माझ्या प्रतिक्रिया ‘लोकप्रभा’मधून प्रसिद्ध होतात. ‘लोकप्रभा’तील माझ्या लिखाणामुळे आज मी महाराष्ट्रातच नव्हे जर देश-विदेशात नावारूपाने ओळखला जात आहे. माझी आज ३० पुस्तके विविध विषयांवरील प्रकाशित झालेली आहेत. ती लोकप्रभाच्या सान्निध्यात आल्यानेच. लोकप्रभा एक दर्जेदार, विश्वसनीय साप्ताहिक आहे. लोकांच्या पहिल्या पसंतीचे साप्ताहिक आहे. ‘लोकप्रभा’ची लोकप्रियता अशीच उत्तरोत्तर वाढत राहो व माझा सहवासही अखेपर्यंत राहो अशी अपेक्षा!
response.lokprabha@expressindia.com

‘लोकप्रभा’च्या चाळीस वर्षांच्या वाटचालीत तुम्हीही मोलाची साथ दिली आहे. ‘लोकप्रभा’वर तुमचा असलेला लोभ, अपेक्षा, प्रतिक्रिया स्वरूपात ई-मेल किंवा पत्राद्वारे लिहून कळवा. पाकिटावर ‘सोबत चाळीस वर्षांची’ हे लिहायला विसरू नका.