५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

फेसबुकवर जुळले सूर...
डॉ. रुपाली यादव
मी इकडे जे जे टाइप करत होते तेच सेम ते पण टाइप करत होते. जणू काही आमची वेव्ह लेंग्थ व फ्रीक्वेन्सी एकच होती. मी इकडे ‘हवं तर मी तुम्हाला माझ्या बाबांचा फोन नंबर देते’ असं लिहीत होते तर ते ‘मला तुझ्या बाबांचा फोन नंबर दे’ असं टाइप करत होते. सूर हळूहळू जुळत होते की पहिलेच जुळले होते...

लग्न हा सर्वाच्याच आयुष्यातला एक सुखद अनुभव. आमच्या आगळ्यावेगळ्या लग्नाच्या कथेतील मुख्य दोन पात्र म्हणजे सातारा जिल्ह्य़ातील पाटण तालुक्यातील २९ वर्षांचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अमोल यादव आणि मी मूळची नागपूरची, पण नोकरीनिमित्त भंडाऱ्याला राहात असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेली डॉ. रुपाली मोतीकर.
मी नागपूरची. आमचे छोटे कुटुंब. त्यात मी, माझी मोठी बहीण मिताली, आई व बाबा. आमचे मोठे कुटुंब म्हणजे माझे आजोबा (बाबांचे वडील), बाबांचे सहा भाऊ व त्यांचे कुटुंब व एक बहीण. मोठय़ा कुटुंबापकी काही नागपूरला, काही नाशिकला व आम्ही वध्रेला राहतो.
२००६ मध्ये मिताली ताई वकील आणि मी डॉक्टर झाले, ती माझ्यापेक्षा एक वर्षांने मोठी आहे. बाबांची सतत ट्रान्सफर होत असल्याने आम्ही नागपूरला आजोबांकडे राहिलो. २००६ ला बाबांची ट्रान्सफर वध्रेला असल्याने ताई वध्रेच्या कोर्टात जॉइन झाली व अजूनही तिची पॅ्रक्टिस सुरू आहे आणि मी छोटी-मोठी आरएमओशिप करून आता सरकारी नोकरीत भंडारा येथे काम करते.
२०१२ हे वर्ष. पदवी मिळून सहा वर्षे झालीत. ताई २९ व मी २८ वर्षांची आहे. कारण कुणालाच माहीत नाही पण का कुणास ठाऊक ताईचे लग्न जमले नव्हते. ताई मोठी असल्याने माझ्यासाठी स्थळ येण्याचा प्रश्नच नव्हता. दोघी नोकरी करत असल्याने लग्न झाले नाही म्हणून कुणी मनावर घेतले नाही. पण आई-बाबांना टेन्शन होतेच. दरम्यान दोन स्थळे मला बघून गेली पण ताईचे लग्न झाल्याशिवाय मला करायचे नव्हते आणि मुलगा डॉक्टर असावा अशी माझी अट होती.
माझ्या चुलत भावाने, सुशांतने मला फेसबुकचे अकाउंट उघडून दिले होते पण माझ्या मोबाइलवरून वापरता येत नव्हते. वध्रेला घरी नुकताच लॅपटॉप घेतलेला होता. एक दिवस सुशांतने फोनवर मॅट्रिमोनी साइटवर तुझे नाव रजिस्टर करू का असे विचारले. मी पण अगदी सहज हो म्हणून सांगितले. मग तो फोनवर रोज याची रीक्वेस्ट आलीय, त्याची आलीय असे सांगायचा. पण ताईच्या आधी करायचे नव्हते म्हणून मी त्याला रीस्पॉन्स नको देऊ असे सांगायची. काही दिवसांनी ते रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले. मीही त्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी मी स्मार्टफोन घेतला. त्यावर नेट अ‍ॅक्टिव केले. डिसेंबर २०११ च्या शेवटी शेवटी सुट्टय़ांमध्ये घरी गेले होते. ताई लॅपटॉपवर काम करत होती. नंतर मी लॅपटॉप घेऊन बसले व सहज सìफग करत होते तर ताईने भारत मॅट्रिमोनीचे पेज ओपन करून ठेवले होते. त्यावर क्लिक केले. माझी जुनी प्रोफाइल ओपन करून पाहिली तर रजिस्ट्रेशन फेल आले. पुन्हा नवीन प्रोफाइल ओपन केली. या वेळेस फोटो पण अपलोड केला. चौथ्या दिवशीच तीन जणांच्या रीक्वेस्ट आल्या होत्या. त्यात डॉ. अमोल यादव यांचीही रीक्वेस्ट होती पण मी रीस्पॉन्स दिला नाही. सुट्टी संपवून भंडाऱ्याला आले. चार-पाच दिवसांनी मोबाइलवरून मॅट्रिमोनी ओपन केली. मेसेज बॉक्समध्ये डॉ. अमोल यादव यांचा मेसेज आलेला होता, ‘आपल्या दोघांच्या प्रोफाइल सिमिलर आहेत तर तुम्हाला वाटत असेल तर एक्स्प्रेस युवर इंटरेस्ट’. ते मला कॉण्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीत होते. पण ना मी माझा फोन त्या प्रोफाइलमध्ये दिला होता ना मी मॅट्रिमोनी साइटची पेड मेंबर झाले होते. काही दिवसांनी मी हे बघणे सोडून दिले. मी थोडी अपसेट झाले होते कारण डॉ. अमोल यांची प्रोफाइल म्हणजे अगदी मनासारखी होती. शिवाय सेम प्रोफेशन. ते रसशास्त्रमध्ये एम.डी. होते. रसशास्त्र माझा आवडता विषय मला त्यात एमडी करायचे होते. फक्त दोघांमधले अंतर जास्त होते. ते सातारा जिल्ह्य़ाचे तर मी नागपूरची. शिवाय मी हेही ठरविले होते की ताईचे लग्न झाल्याशिवाय आपण करायचे नाही आणि एवढय़ा दूर काय जायचे असा विचार करून मी त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि मॅट्रिमोनी साइट ओपन करणे सोडून दिले.
रूमवर टीव्ही नसल्यामुळे माझा स्मार्टफोनच माझ्यासाठी टाइमपासचे साधन होते. मग काय रोज फेसबुकवर अपडेट्स बघायचे. असेच एक दिवस दुपारी एफ बी ओपन करून पाहिले तर एक फ्रेंड रीक्वेस्ट आलेली होती. ती होती, डॉ. अमोल यादव यांची. मी तर यांची प्रोफाइल मॅट्रिमोनी साइटवर पाहिली होती हे पण विसरले होते. इतर फ्रेंड रीक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केल्या होत्या तशीच यांचीही रीक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. त्यांनी एफबीवर मला शोधून काढले होते. आम्ही फेसबुक फ्रेंड झालो. त्याच दिवशी त्यांचा मेसेज आला- 'Hi Rupali, m Dr Amol Yadav fm Satara. i have seen ur profile on matrimony. i already experessed interest on matrimony site if u r interested too plz contact me my cell no is ........' मला काय उत्तर द्यावे हेच समजत नव्हते. मी पण त्यांना रीप्लाय केला की मी तीच मुलगी आहे आणि हे प्रकरण सुरू झाले.
यापूर्वीच कधीतरी मी बाबांना डॉ. अमोल यांची भारत मॅट्रिमोनी साइटवर रीक्वेस्ट आली आहे हे सांगितले होते. एकदा संध्याकाळी मी ऑनलाइन आले तर डॉ. अमोलही ऑनलाइन होते. हाय, हॅलो झालं. एफबीवर फोटो का टाकला नाही, असं त्यांनी विचारले. मी इकडे जे जे टाइप करत होते तेच सेम ते पण टाइप करत होते. जणू काही आमची वेव्ह लेंग्थ व फ्रीक्वेन्सी एकच होती. मी इकडे ‘हवं तर मी तुम्हाला माझ्या बाबांचा फोन नंबर देते’ असं लिहीत होते तर ते ‘मला तुझ्या बाबांचा फोन नंबर दे’ असं टाइप करत होते. सूर हळूहळू जुळत होते की पहिलेच जुळले होते.. मी त्यांना बाबांचा फोन नंबर दिला. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला की हे तर बाबांना फोन करू शकतात. मी चॅट ऑफ करून लगेच बाबांना फोन केला. बराच वेळ एंगेज. नंतर फोन लागल्यावर बाबा म्हणाले, डॉ. अमोल यांचा फोन आला होता. त्यांच्याशी व त्यांच्या वडिलांशी बोलणे झाले. बाबांशी बोलून मी परत ऑनलाइन आले ते ऑनलाइन होतेच. नंतर त्यांनी थोडय़ा वेळातच मला, ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ असे विचारले. मी त्यांना म्हणाले, ‘आपण आजच भेटत आहोत तेही समोरासमोर नाही. मी तुम्हाला ओळखतही नाही. तुम्ही मला बघितलेही नाही. माझे फोटो पाहिलेही नाही. फक्त एकच फोटो तोही मॅट्रिमोनीवर टाकला आणि हे काय लगेच लग्नाचं’. यावर ते म्हणाले, ‘आपण सेम प्रोफेशनचे आहोत. मला डॉक्टरच मुलगी हवी होती तू डॉक्टर आहेस. शिवाय आपण एकाच कास्टचे आहोत. मग अजून काय हवे आहे.’ मी मनात म्हटले यांना काय वेड लागले आहे पहिल्याच चॅटमध्ये मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणताहेत.
बाबांनी सर्वस्वी निर्णय माझ्यावर सोपविला होता. पण पहिल्याच भेटीत नव्हे पहिल्याच चॅटिंगमध्ये होकार देणे मला योग्य वाटले नाही. मी पाच दिवसांचा अवधी मागितला. मी त्यांची पूर्ण प्रोफाइल पुन:पुन्हा चेक केली. matrimony site वरची त्यांची सर्व माहिती बघितली. फेसबुकवरचे त्यांचे व त्यांच्या family चे फोटो बघितले. त्यांचे fb वरचे फ्रेंड्स, बाकीचे updates बघितले यावरून स्वभावाचा अंदाज आला होता. मग नाशिकला मोठय़ा बाबांकडे फोन केला. सचिन दादाला सर्व सांगितले दादाने लगेच log in होऊन त्यांचे fb वरचे account चेक केले. मोठय़ा आईनेही त्यांचे सर्व फोटो बघितले. मी दादाला विचारले, ‘मुलगा कसा वाटला?’ दादा म्हणाला, ‘ होकार द्यायला काहीच हरकत नाहीये.’ मोठय़ा आईला तर हे स्थळ फार आवडले होते. मी घरी सर्वाना सांगितले. ताईने पण काहीच हरकत नाही असे म्हटले. मी confuse झाले. इतक्या लांब जायचे म्हणजे....... मनात शंकेची पाल चुकचुकली.
तिसरा दिवस : त्याच नेहमीच्या वेळी log in झाले डॉ. अमोलही online होते chat ला सुरुवात..
डॉ. अमोल : तुला वाटत नाही का वय होत चालले आहे आता लग्न करायला पाहिजे.
मी : ताईचे लग्न होईपर्यत मी थांबू शकते.
डॉ. अमोल : कितीही दिवस?
मी : कितीही दिवस.
डॉ. अमोल : तू थांब. पण मी थांबू शकत नाही. मला तिशीच्या आत लग्न करायचे आहे. तू तुझं मत कळव म्हणजे आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे.
त्यांना बहुतेक आता माझा राग आला असावा.
मी : एवढी काय घाई आहे लग्नाची..
डॉ. अमोल : मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझे फोटो घरी सर्वाना आवडले.
रात्रभर विचार करत होते. मी गोंधळले होते. काहीच सुचत नव्हते.
चौथा दिवस : दुपारी ओपीडीतून आल्यावर जेवण केले आणि डॉ. अमोल यांना एसएमएस केला की मलाही तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे आणि माझा मोबाइल नंबर दिला. ते मला लगेच फोन करतील असे वाटले पण तसे झाले नाही. संध्याकाळी त्यांचा एसएमएस आला ‘Thanks god तू होकार दिलास.’ मी नेहमीच्या वेळी online आले तर ते offline होते. मला त्या रात्री नीट झोप लागली नाही.
पाचवा दिवस : मी सकाळी परत त्यांना एसएमएस केला, मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही मला सात वाजता फोन करा. संध्याकाळी त्यांचा फोन आला. मला काय बोलावे ते सुचले नाही. त्यांचा सौम्य आवाज ऐकून मी impress झाले. थोडा वेळ बोलून फोन ठेवला. जेवण आटोपून दोघेही फेसबुकवर आलो.
मी : काल online नव्हता?
डॉ. अमोल : काल कोल्हापूरला खरेदीला गेलो होतो त्यामुळे थकलो होतो. (संथ उत्तर. मी होकार दिल्याची कुठलीही excitement त्यांच्या बोलण्यातून जाणवत नव्हती.)
मी : मला वाटले माझा एसएमएस बघून तुम्ही मला फोन कराल.
डॉ. अमोल : मी तुला एसएमएस केला होता. मी देवाचे आभार मानतो की त्याने तुला हो म्हणण्याची सुबुद्धी दिली.
मी : तुम्ही मला प्रत्यक्षात बघितले नाही. बघितल्यावर तुम्ही मला नकार दिला तर..
डॉ. अमोल : (चिडून) मी तुला किती वेळा सांगितले की तू मला पसंत आहे. घरच्यांनाही तुझे फोटो आवडलेत.
मी : फोटोवरून अंदाज येत नाही.
डॉ. अमोल : परत तेच.
मी : ओके. तुम्ही कधी नागपूरला आला होतात का?
डॉ. अमोल : नाही आणि तू यापूर्वी कधी साताऱ्याला आली होतीस का?
मी : नाही.
डॉ. अमोल : then come permanantly.
झालं त्या दिवसापासून google map वर search करणे सुरू झाले. आमचे रोज फेसबुकवर बोलणे चालूच होते. अंतर फार जास्त असल्याने बाबांना चिंता वाटत होती. नागपूर ते सातारा एकच ट्रेन होती महाराष्ट्र एक्स्प्रेस. एक रात्र पूर्ण लागते पोहोचायला. अखेर बाबा अमितदादाला घेऊन त्यांच्या घरी जाऊन आले. बघण्याचा कार्यक्रम नाशिकला करण्याचे ठरले. मीपण सुट्टी घेऊन आईला घेऊन नाशिकला गेले. त्यांनी मी ज्या फोटोवर like केले होते व कमेंट दिली होती तोच शर्ट घातला होता. कांदापोह्य़ाचा कार्यक्रम आटोपला. मी सर्वाना आवडले होते.
आम्ही दोघांनी एकमेकांना केव्हाच पसंत केले होते. खाली मोठय़ांनी मग लगेच एगेंजमेंट करण्याचे ठरविले. मी बाबांना विचारले हे लगेच काय? बाबांनी मला समजाविले की अंतर जास्त असल्याने परत परत येणे होणार नाही मी तयार झाले. साक्षगंध पार पडले. लग्नाचा करार झाला. लग्न पुढल्याच महिन्यात २४ तारखेला अक्षय तृतीया या दिवशी नागपूरला घेण्याचा मुहूर्त निघाला. खूप लवकर निघाला होता मुहूर्त. कसे शक्य होणार होते कुणास ठाऊक. लग्न लागले. परत निघालो. साताऱ्याच्या घरी पोहोचलो. पुष्प वर्षांवात गृहप्रवेश झाला. देवदर्शन झाले. सत्यनारायण पूजा झाली. रिसेप्शन झाले. माझ्या सुट्टय़ा संपत आल्या होत्या. वर्धेला गेलो. सत्यनारायणाची पूजा झाली. मला भंडाऱ्याला ठेवून हे साताऱ्याला गेले.
अकेले हम.. अकेले तुम.. पण एकाच नात्यांनी बांधले गेलो आहोत. मी बदलीच्या प्रतीक्षेत आहे.
response.lokprabha@expressindia.com