५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

मुलाचे तिरळे डोळे?
संध्या रवींद्र देशपांडे
मुलीचे वडील आहात ना, काही वेळा गांधीजींच्या तीन बंदरांसारखे करावे लागेल. उद्या आपली खरी सत्त्वपरीक्षा आहे. हे लोक मूळचे यवतमाळचे. त्यामुळे मी म्हणतो, उद्या हजारच्या वर लोक नक्कीच येणार. त्यात संध्या समाजप्रिय. तिचे मित्रमैत्रिणी. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा.

जीवनात लग्न एकदाच होते, म्हणून ते धूमधडाक्यात व्हायला हवे. बॅण्डबाजा तर हवाच; कदाचित म्हणून लग्न म्हटले की गडबड-गोंधळ, रुसवे-फुगवे, शब्दांचे फटकारे आलेच. हे सर्व मी ऐकले होते, पण जेव्हा माझे लग्न ठरायची वेळ आली तेव्हा खरेच ते मी अनुभवले. लग्न ठरताना काही प्रसंगांतून विनोद कसा निर्माण होतो व तो विनोद आयुष्यात सतत आठवण करून देतो हा अनुभव ‘वधुपरीक्षा’ असताना आला. माझ्या मैत्रिणीला ह्य़ांनी चक्क नाकारले. तिने मोठय़ा मनाने मग ह्य़ांचे स्थळ आईला सांगितले. सांगताना मात्र सगळी छान माहिती दिली. पण जाता जाता म्हणाली, ‘मावशी, मुलाचे डोळे व्यवस्थित बघा. मला नाही, पण माझ्या वहिनीला त्यांचा एक डोळा तिरळा वाटला. ही शंका वहिनींनी बोलून दाखवली, पण घरातील बाकी कोणालाच तसे काही वाटले नाही.’ मग काय, आमच्या मातुश्रीने पत्रव्यवहार केला. मनात नसतानाही पत्रिका जमली. पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मुलगा मुंबईत, मी यवतमाळला शिकत होते. तोपर्यंत भाऊ, बहीण मस्त चिडवत होते. आता तिरळा म्हटले की कुठे बघणार, हेच लक्षात येत नाही. मी तर दाखवायलाच तयार नव्हते. माझ्या बहिणीकडे पाहण्याचा कार्यक्रम ठरला. जिजाजी डॉक्टर. ते मला म्हणाले, ‘तू माझ्यावर विश्वास ठेव. डॉक्टर या दृष्टीने मी त्याच्या डोळ्याकडे पाहीन. आम्हाला तर लगेच कळते. मग मुलाकडचे आले की मुलगा कुठे बसेल, मी व ताई त्याच्यासमोर थोडे दूर अंतरावर बसायचे. मग व्यवस्थित बघता येईल. झाले. सारी योजना तयार. दुसऱ्या दिवशी बाबा व अरविंददादा मुलाला मुद्दाम बघायला काही कारण काढून गेले. घरी आले ते एकदम खूश होऊन. आधीच धुवाधार पावसाने मी घरबसल्याच गारठले होते. त्यात हे दोघे म्हणत होते मुलगा स्मार्ट आहे. डोळे तर खूपच छान, पाणीदार आहेत. ‘आता कुठलीही कटकट न करता उद्या तयार हो’ बाबांचा सल्ला. नेमके माझे मामा व मावशी त्याच दिवशी आले. इतकी गडबड झाली की कोणाशी नीट बोलू शकले नाही. मी तर खरेच मनातून घाबरले होते. ताईजवळ खूप रडली. पण मोठय़ांसमोर काय चालणार? पाहण्याचा दिवस उगवला. हे आपल्याच भावाला व वहिनीला घेऊन आले. ते आत येण्याच्या आतच जिथे ह्य़ांना बसवणार होते तेथे मामा आरामात बसला. हे माझ्या साइडच्या कोचवर बसले. मला ह्य़ांना बघता येईना. हे मला डोळे तिरके करून मधून मधून बघत होते. इथेच घोटाळा झाला. एकतर यांच्या आई-वडिलांकडून पसंती आलीच होती. तो एक बघण्याचा कार्यक्रम यवतमाळला झालेला. ह्य़ांनी मस्त तिरका कटाक्ष टाकत मला पाहिले व दुपारीच ह्य़ांच्याकडून होकार आला. पण आधी आमच्याकडे ह्यांच्या डोळ्यावरच चर्चा. ताई म्हणाली, मला तर खरेच तो थोडा तिरळा वाटला. मी पण म्हटले, सारखी तिरकीच नजर मला दिसली. शेवटी मुला-मुलीला नीट बघून आपण निर्णय घेऊ हा ठराव पास झाला. मग आम्ही दोघी शांत झालो. बिच्चारे ताईचे मिस्टर. त्यांनी शंभर वेळा सांगितले तरी आम्ही विश्वास ठेवला नाही. मग एका हॉटेलमध्ये संध्याकाळी परत बोलावले. आम्ही तिघे गेलो व चांगले दटावून जिजाजी म्हणाले, आता व्यवस्थित बघा त्याचे डोळे. अगदी आँखो आँखो में होने दो.. ताईवरपण रागावले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. ह्य़ांचे डोळे खरेच पाणीदार, टपोरे होते. ताई म्हणाली, संध्या, अगं उगाच आपण बायका नाही त्या गोष्टी मनात ठेवतो व त्याच नजरेने बघतो. कदाचित त्या वेळी आपली नजरच फिरली असेल. लग्न ठरल्यावर ह्य़ांना सर्व चिडवत होते. तू डोळा फिरवतो म्हणून ही मुलगी नाहीच म्हणत होती. आता लग्न झाल्यावर खरेच तू डोळा फिरवायची प्रॅक्टिस कर. मी तुला शिकवीन. मी डॉक्टर असूनसुद्धा माझ्यावर यांचा विश्वास नाही. भयंकर डोके खाल्ले रे बाबा! शेवटी सांगणारी एक स्त्री व ऐकणाऱ्या पण स्त्रिया. संशयाचे भूत या स्त्रियांमध्येच असते हे खरे. मग हसतखेळत बैठक पार पडली. लग्न ठरले.
माझे लग्न ठरले. बाबांच्या खिशात त्या वेळी फक्त शंभर रुपये होते. साखरपुडा घरच्या घरी झाला. त्या वेळी मुलीकडच्यांनी सर्व खर्च करायचा असतो. अनेक अडीअडचणी आल्या. बाबांना लवकर लोन मिळेना. प्रत्येक गोष्टीत मनस्ताप होत होता. त्यात ह्य़ांनी सांगितले, ‘लग्नात मी धार्मिक विधीच्या वेळी अजिबात सोवळे नेसणार नाही. नाही म्हणजे नाही.’ खूप समजूत घातली तरी ऐकेनात. लग्नाची वेळ येईपर्यंत आई-बाबांची खरेच खूप धावपळ झाली. मी तर रडरड रडली. कारण ३-४ दिवस आधी लोनचा चेक आला. लग्नाची तयारी आईने कशी केली तिचे तिलाच माहीत.
लग्न ठरवताना दोघांचे मिळून ५००-६०० लोक येणार असे गृहीत धरले होते. तशी तयारी केली. पूर्वी तर सर्व तयारी घरीच करावी लागे, पण आमची फौज मस्त तयार होती. सगळे पाहुणे जमले. सीमंतीची तयारी झाली. पण वरात येण्याचे चिन्ह दिसेना. त्यात दोन दिवस पाणी येणार नाही म्हणून बाबांच्या नोकराने निरोप दिला. बाबा डोक्याला हात लावून बसले. आता काय करायचे? माझा मामा खूपच हुशार व तल्लख होता. तो म्हणाला, ‘‘बघतो.. काहीतरी मार्ग काढू.. अनेक लग्नांचे मी नेहमी हे वेळेवरचे प्रश्न सोडवतो. काही काळजी करू नका.’’ नागपूरहून निघालेली ह्य़ांची बस शेवटी ७-७.३० ला आली. सगळ्यांचे स्वागत हसतमुखाने केले. उशीर तर भरपूर होणार होता. कार्यक्रम तर ठरल्याप्रमाणे झालाच पाहिजे. आई-बाबा शिस्तप्रिय ना. मुलाकडचे तयार होऊन खाली येत नाही तर सीमंतीची सुरुवात झाली व मामाने गोड बोलून सांगितले, ‘‘तुम्ही खूप थकला असाल म्हणून सीमंती चालू असली तरी तुमच्याकडच्या लोकांनी गरमागरम जेवणाचा आस्वाद घ्यावा व जवळ ‘अष्टविनायक’ हा अतिशय चांगला सिनेमा आहे. त्याची काही तिकिटे आम्ही आधीच बुक केलीत, ज्यांना जायचे असेल त्यांनी जरूर जावे अन् हो, उद्या पाणी येणार नाही. आम्ही पाण्याची सोय जरूर करू, पण निदान मुलाच्या आई-वडिलांनी व मुलाने तरी सर्वप्रथम आंघोळ करून यावे. आम्ही इकडे या तिघांना तयार करतो. कारण लग्न वेळेवर लागले पाहिजे. शब्दांची जादू काय असते याचा अनुभव मी त्या वेळी घेतला. पिक्चरची आयडिया खूप नामी ठरली. ह्य़ांच्याकडचे अर्धे लोक खरेच मस्त जेवून सिनेमाला गेले. बाबांना हे काही कळेना. कारण अचानक मामाची ही घोषणा त्यांनी ऐकली होती. तेव्हा मामा म्हणाला, ‘अहो, कार्यालय लहान अन् आजच इतक्या लोकांना बोलावले. श्यामराव, सर्व बसणार तरी कुठे? तरुणांना आवडणाराच सिनेमा, तेव्हा लढवले डोके. म्हणून तर सीमंतीपूजन वेळेत झाले. नाहीतर मानपान, पाय धुणे हाच कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालला असता. मुलीचे वडील आहात ना, काही वेळा गांधीजींच्या तीन बंदरांसारखे करावे लागेल. उद्या आपली खरी सत्त्वपरीक्षा आहे. हे लोक मूळचे यवतमाळचे. त्यामुळे मी म्हणतो, उद्या हजारच्या वर लोक नक्कीच येणार. त्यात संध्या समाजप्रिय. तिचे मित्रमैत्रिणी. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा. आपल्या पाहुण्यांकडे पाहिले पाहिजे, अन् दुसऱ्या दिवशी खरेच लग्नाचा हॉल गच्च भरलेला. नुसती रेटारेटी. त्यात सुलग्नाच्या वेळी तर काही विचारू नका. माझ्या काही कॉलेज मित्रांनी मनात असलेला राग सुलग्नाच्या वेळी काढला. विदर्भात नवरा व नवरीचे डोके एकमेकांवर जोरात आपटतात. ती वेळ माझ्या कॉलेज मित्रांनी मस्त साधली. हे तर जाम चिडलेले. शेवटी ब्राह्मणाला दया आली. त्यांनी लवकर धार्मिक विधीसाठी बोलावले. पाणी नसल्याने भरपूर गोंधळ झाला होता. पण करणार काय? अशा वेळी आपण हतबल असतो. नंतर पाण्याची सोय झाली. जेवणाची वेळ झाली. वेळेवर पंक्ती बसत होत्या. तृप्त होऊन उठत होत्या. पण इतके लोक आले की सगळे वाढून वाढून थकून गेले. तिकडे जेवण संपण्याची वेळ आली. आचारी व दुसऱ्या मामाने द्रौपदीच्या थाळीसारखे काम केले. देव जाणे पण पंक्ती त्याने व्यवस्थित पार पडल्या. शेवटी विहिणींची पंगत ५ वाजता बसली. मला मैत्रिणी म्हणत होत्या.. अगं आता रडण्यात वेळ अजिबात घालवू नको. शेवटी सासरी जायचे आहे. बघ ना मुलाकडच्यांनी किती लोक आणले. वाढून वाढून कंबरेचे बारा वाजले. आता तुमच्या जेवणानंतर आम्ही जेऊ. म्हणून लवकर जेवणाची कृपा करा. नाव घेताना खूप वेळ घेऊ नको व भावपण खाऊ नको. लवकर आटोपले पाहिजे. खास शरद मामाचा निरोप आहे. रडता रडता डोळ्यात हसू आले. दुसरा मामा हळूच कानाजवळ आला व म्हणाला, ‘मठ्ठय़ाची चव बघ. मला कळेनाच. कारण ताकाऐवजी ताकाचे पाणी पिते की काय असे वाटले? मग आईकडून कळले, ‘अगं ५००-६०० लोकांचा आकडा सांगितला, आले १०००-१२००, मग काय मठ्ठय़ात पाणी टाकूनच पुरवावे लागले. नाइलाज आहे. आता पुढच्या मुलीचे लग्न रजिस्टर करीन. खूपच वैतागली होती. मग माझी बोळवण केली. त्याच्यानंतर आमच्याकडच्या लोकांनी शांतपणे वरण-भात-भाजी-पोळी खाऊन समाधान मानले. अजूनही लग्नाचा विषय निघाला की संध्याचे लग्न कसे ठरले. पाऊस कसा पडला. मुंबईचा जावई असूनही किती गडबडगोंधळ झाला. मुलाकडच्यांची गैरसोय पाण्यामुळे झाली व इतके पाहुणे माझ्या मामांनी कसे हाताळले, तेही अतिशय हुशारीने. कधीतरी मी माझ्या नवऱ्याला म्हणते, पण तुम्ही मुंबईच्या लोकांना तर गडबड-गोंधळ आवडत नाही, मग लग्नात किती तारांबळ उडवली. आधीच आम्हाला थोडी कल्पना द्यायची ना. यांचे उत्तर ठरलेले. लग्न माझे होते, पण पाहुणे जास्त दादांचे. त्यांना विचार. व इतके करूनसुद्धा तुझ्या बाबांच्या पायजम्याला एक सुरकुतीही पडली नाही. बसले होते लग्नातसुद्धा जजच्या थाटात. तुझे मामा होते म्हणून निभावले अन् तुझ्या मित्रमैत्रिणी त्यांनी तर पार माझे डोके फोडले. आता मी माझ्या मुलाचे लग्न अजिबात विदर्भात करणार नाही. नुसताच घोळ करता.. असे आमचे लग्न गडबड-गोंधळात पार पडले. तू-तू, मी-मी न होता बॅण्डबाजा झकास वाजला.
response.lokprabha@expressindia.com