५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एकपानी

मुकुट साईंचा
माधवी घारपुरे

मुलांच्या परीक्षा संपल्या की त्यांच्या आयांच्या परीक्षापण संपल्या असं म्हणायची आता वेळ आली आहे. १०वी, १२वीला परीक्षेला पोचवायला जाणं, आणायला जाणं, त्यांचं डाएट, एक ना दोन नाना तऱ्हा. आमच्या पिढीच्या, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा झाल्या तरी कुणाला पत्ता नसायचा. असो ‘कालाय तस्मै नम:’ हेच खरं! पण आजची पिढी आमच्या पिढीपेक्षा अधिक हुशार, विचार करणारी आणि आपली मतं स्पष्टपणे मांडणारी आहे, हे निश्चित. त्याचंच हे उदाहरण!
अन्वयची परीक्षा संपली. त्याच्या ग्रुपमुळेच आम्ही आया छान मैत्रिणी झालो. सगळ्या जणी परीक्षेनंतर चहासाठी ज्योत्स्नाच्या घरी जमलो. मुलांना पेपर्स चांगले गेल्याने आम्ही पण खूश होतो. आता कुठं तरी चेंज म्हणून दोन दिवस फक्त बायकांनीच ट्रीपला जायचं ठरवलं. बरोबर मुलंही नकोत आणि कुणाचे पतिराजही नकोत. ‘मोकळेपण अनुभवूया’ असं ठरलं.
जायचं तर प्रायव्हेट गाडी करायची आणि जायचं. महाबळेश्वरला गर्दी असते, माथेरानला फारच चालावं लागतं, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, शेगाव सगळी नावं घेता घेता शेवटी दोन दिवस शिर्डीला जायचं नक्की केलं. कारण अजून साईबाबांची शिर्डी आम्ही कोणीच पाहिली नव्हती. सगळं सोडून शिर्डी काय आठवली अशी टीकाही झाली, पण आम्हाला घर सोडून दोन दिवस बाहेर पडायचं होतं हे खरं कारण.
ठरवा-ठरवीला आमच्याच घरी सगळ्या जमल्या. गाडी कोणती करायची यावर आधी तासभर चर्चा झाली. शेवटी ‘तवेरा’ ए.सी. कार करायचं नक्की झालं. मेघा म्हणाली, ‘‘एकदा बीएमडब्ल्यू बघितली पाहिजे.’’ त्यावर सरलानं मत मांडलं, ‘‘अगं आपल्याला बसायला ए.सी. कार तरी मिळताहेत. आपल्या आई-वडिलांनी तर घाम पुसत कायम लाल डब्यानंच प्रवास केला. आहे त्यात आनंद माना गं.’’
‘‘तो आनंद आहेच गं! पण बघ, श्रीमंताकडे कशी श्रीमंती जाते. परवा एका उद्योगपतीने म्हणे आपल्या नातीला का मुलीला आठ कोटींची गाडी बक्षीस म्हणून दिली. काय नशीब आहे?’’ इति मेघा. त्यावर पुन्हा सरलाने आपली नापसंती दर्शवली.
‘‘मेघा इतक्या लहान वयात सगळ्या आयत्या गोष्टी दाराशी आल्यावर ही मुलं उद्या हात-पाय हलवतील का? यांना कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ ऐकायची सवय राहील का? काहींच्या पायात चालताना चप्पलही नाहीत हे सत्य त्यांना कळणार नाही म्हणूनच ही मुलं पुढं बेजबाबदार होतात.’’
सरलाच्या बोलण्यात तथ्य होतं. तो विचार तिथेच सोडून दिला आणि आमची मीटिंग आवरली. निघता निघताच प्रत्येकीला वाटलं की, साईबाबांना १४ किलो सोन्याची छत्री परवा एका भक्तानं करून दिली आणि असाच काही किलोचा मुकुट. तो आपल्याला पाहायला मिळेल का? किती लकाकत असेल तो? आताच आमच्या नजरेसमोर ते सोनं लख्खकन प्रकाशून गेलं.
देवासाठी इतकं करायलाही तयारी हवी. दानत हवी. हे आणि अशा प्रकारचं आमचं बोलणं चाललं असताना अन्वय कॉम्प्युटरवर काही तरी बघत होता. त्याचं इकडं लक्ष नसावंसं वाटलं, पण तो चटकन उठून आला आणि तावातावानं म्हणाला, ‘‘मघापासून तुमचं ऐकतोय आई. या लोकांचे गोडवे तुम्ही गाताय, पण ते लोक प्रॅक्टिकल आहेत असं मला नाही वाटत. गाडी सोळा कोटींची असो नाही तर एक कोटीची असो. एकीकडून दुसरीकडे पोचवायचं काम छान करते आणि काहीही हात-पाय न हलवता अशा गाडय़ा मिळाल्या तर उद्या चार कोटींच्या गाडीतही यांच्या बुटांना काटे टोचतील. ‘श्रमाची प्रतिष्ठा’ तोंडातून हे बोलणार आणि ‘प्रतिष्ठित श्रमांची’ कास धरणार..’’
ते जाऊ दे. मला राग आहे तो १४ किलो सोन्याच्या छत्रीचा, मुकुटाचा. त्याची किंमत पाहा २२०० रु. १ ग्रॅम, म्हणजे २२०००ला एक तोळा म्हणजे २२,००,०००/- रु. १ किलो. असे चौदा किलो म्हणजे ३,०८,००,०००/- रु. झाले. ते साईबाबा फकीर. त्यांना रोटी, कपडा, मकान (छत) एवढीच गरज असताना सोन्यानं का मढवताहेत? या लोकांनी उत्तम मार्क्‍स मिळालेल्या मुलांची इंजिनीअरिंगची, मेडिकलची प्रायव्हेट फी जर भरली, सुयोग्य मुलाला प्रत्येकी १५, १५ लाख दिले तर किती मुलांच्या आयुष्याचं सोनं होईल? पण ते पुण्य यांना नकोय. पेपरला फोटो हवाय. खऱ्या अर्थानं बाबांना, गाडगेबाबांना धन्य वाटेल. कमीत कमी दोन हजार मुलं शिकून नाव कमावतील. आज तो मुकुट, ते छत्र सांभाळायलाच कहार. जिवंत आत्म्याचे आशीर्वाद घेतले तर बाबा या लोकांना मनापासून स्वत:च्या जवळ स्थान देतील. दादाला बारावीला ९० टक्के मार्क्‍स मिळाले, पण गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश नाही. किती कष्टानं तुम्ही शिकवलं, पण पुढं मी शिकायचा म्हणून दादाला प्रतिवर्षी मेडिकलला दोन-अडीच लाख खर्च करणं तुम्हाला शक्य नव्हतं. तो बी.एस्सी.ला गेला..
अन्वय पोटतिडकीनं बोलत होता. त्याचा शब्द नं शब्द खरा होता. माझेही डोळे पाणावले आणि डोळ्यासमोर बाबांची सुवर्णमुकुट घातलेली मूर्ती आली, पण मूर्तीच्या डोळ्यात मात्र पाणी भरलंय असं वाटत होतं.
response.lokprabha@expressindia.com