५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’ सवार लूँ... सवार लूँ...

सवार लूँ... सवार लूँ...
सुनील नांदगावकर

म्युझिक चॅनल्सवर आणि यूटय़ूबवर सध्या गाजतंय ते जुलैच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होऊ घातलेल्या ‘उडान’फेम लेखक-दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांच्या ‘लूटेरा’ सिनेमातील गाणं - ‘सवार लूँ.. सवार लूँ’. ‘उडान’सारखा ऑफ बीट सिनेमा केल्यानंतर ‘लूटेरा’सारख्या अस्सल बॉलीवूडपटामार्फत मोटवाने इंडस्ट्रीत पाय रोवू पाहत आहेत. दिग्दर्शनातील ठसा उमटविल्यानंतर ‘उडान’प्रमाणेच ‘लूटेरा’साठीही मोटवाने यांची गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार अमित त्रिवेदी यांच्याबरोबर चांगली जोडी जमली आहे. ‘लूटेरा’ हा चित्रपट ओ हेन्री यांच्या ‘द लास्ट लीफ’ या लघुकथेवर बेतलेला आहे. त्यामुळे जुना काळ मांडण्याचं आव्हान जसं दिग्दर्शकासमोर होतं तसंच त्याला साजेसं संगीत देण्याचं आव्हान संगीतकार अमित त्रिवेदी यांच्यासमोरही होतं. दिग्दर्शक-निर्मात्यांकडून संगीतकाराला वारंवार बजावलं जात होतं की, अरे बाबा, आपल्या ‘पीरिएड फिल्म’ मधून १९५० च्या काळातील गोष्ट पडद्यावर साकारली जाणार आहे. त्यामुळे संगीतसुद्धा तसंच हवं. वारंवार असा धोशा लावल्यामुळे संगीतकार आणि पर्यायाने गीतकारावरही चित्रपटाचं निर्मितीपूर्व काम सुरू झाल्यानंतर प्रचंड दबाव होता; पण या दबावामुळेच असेल कदाचित गीतकार-संगीतकार जोडीने अवीट गोडीचे अगदी थेट हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारं गाणं तयार केलं. यूटय़ूबवर सध्या हे गाणं खूप गाजतंय. आजच्या धकाधकीच्या जागतिकीकरणाच्या रेटय़ात माहिती तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या अनेक सोयीसुविधा असूनही निरागसता हरवल्याची जाणीव तरुणाईला होतेय. आपल्या सर्वाचेच भावविश्व हिंदी सिनेमात दाखविल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखा, वातावरण, संगीत यावरच पोसले गेल्यामुळे जुनी गाणी पाहताना-ऐकताना निरागसतेचा शोध घेण्याची ऊर्मी अधिक उफाळून येत असावी.
ढॅणढॅण सिनेसंगीताच्या मध्येच ‘सवार लूँ’सारखे गाणे ऐकायला-पाहायला मिळाल्याने तरुणाईला ‘रोमान्स’ची वेगळी लज्जत अनुभवायला मिळतेय. सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंग या जोडीची पहिल्यांदा अपघाताना भेट घडते आणि नंतर एकमेकांच्या नजरेतून प्रेम उमलू पाहतेय असा प्रसंग या गाण्यातून दाखविलाय. चिरतरुण अभिनेता देव आनंदच्या सिनेमांतील ‘पिक्चरायझेशन’प्रमाणे या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलेय किंवा कदाचित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या रोमॅण्टिक सिनेमांचीही आठवण होते.
सोनाक्षी सिन्हाने या गाण्यात आपले डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून उत्तम अभिनय केला आहे. जमीनदाराची मुलगी बागेत जातेय, रणवीर सिंग या गाण्यात बागेत चित्र काढताना दाखवलाय. सगळे वातावरणच रोमॅण्टिक करीत दिग्दर्शकाने गाणे ‘टिपिकल’ पद्धतीने चित्रित केले आहे. ‘ती’ आणि ‘तो’ एकमेकांबद्दल काय विचार करतात, नजरभेटीतून काय सांगू पाहतात, यातून एकमेकांचा अंदाज घेऊ पाहतात आणि तेव्हाच नायिका नव्हे गायिका मोनाली ठाकूर गातेय की ‘सवार लूँ’.. नटखटपणा, अल्लडपणा दाखवत नायिका म्हणतेय, ‘बदल रही है आज जिंदगी की चाल जरा’ म्हणत स्वत:च्याच मनाला समजावतेय ‘सवार लूँ’.
विशेष म्हणजे सुवर्णकाळातील संगीताचा नूर आज संगीत देताना हवा असल्याने गीतकारालाही ध्रुपद - मग एक कडवे - मग परत ध्रुपद - मग पुन्हा एक कडवे- आणि गाण्याचा शेवट ध्रुपदाने करण्याचे बंधन होते. या बंधनांमुळेच कदाचित हे सुमधुर गाणे तयार झाले असावे. त्यात पुन्हा संवादांच्या पेरणीतून गाण्याचा अर्थ रसिकांपर्यंत थेट पोहोचविण्याची क्लृप्तीही दिग्दर्शकाने केली आहे. हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला अधिक सुलभ करून कथानक सांगितले तर तो सिनेमा सहजपणे लोकप्रिय होतो हे व्यावसायिक धोरणही यामागे आहे हे मात्र विसरता कामा नये.

हवा के झोके आज मौसमों से रूठ गए
गुलों की शौखियाँ जो भवरें आ के लूट गए
बदल रही है आज जिंदगी की चाल जरा
इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा
सवार लूँ मैं सवार लूँ हाय सवार लूँ
- संवाद -
बदामें जी पुरानी सी नई सी धूप है
जो कल के खटखटा रहा जिसका रूप है
शरारतें करे जो ऐसे भुलते है जब
कैसे उसके नाम से मैं पुकार लूँ
सवार लूँ हाय सवार लूँ मैं सवार लूँ
response.lokprabha@expressindia.com