५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’ सवार लूँ... सवार लूँ...

कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
मंदार करंजाळकर

एखाद्या गाजलेल्या नाटक किंवा कादंबरीवरून चित्रपट बनवणे ही गोष्ट काही मराठी चित्रसृष्टीसाठी नवीन नाही. यापूर्वीही अनेक कथा, कादंबऱ्या आणि नाटकांवर आधारित चित्रपट येऊन गेले. त्यापकी काही चित्रपट चांगले चालले, तर काहींना मात्र अपेक्षित यश मिळवता आले नाही. याच धर्तीवर ‘सत् ना गत’ हा राजू पास्रेकर दिग्दíशत चित्रपट लवकरच महाराष्ट्रभर प्रदíशत होतोय. प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट महिलांवरील अत्याचार, त्यामागची पुरुषी मानसिकता, भोगवादी प्रवृत्ती आणि स्वार्थी राजकारण यावर स्पष्ट भाष्य करतो . राजन खान यांच्या रोखठोक शैलीमुळे कादंबरी मुळातच वाचनीय आणि प्रभावी आहे, तरीही चित्रपटामध्ये मात्र हा विषय कसा हाताळला आहे ते पाहण्याची उत्सुकता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गावात एक भ्रष्ट पोलीस अधिकारी, पोलीस कोठडीमध्ये नामी नावाच्या दलित स्त्रीवर बलात्कार करतो आणि मग सुरू होतो स्वार्थ आणि हितसंबंधाचा अस्वस्थ करणारा खेळ असं याचं थोडक्यात कथानक. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत अरिवद जगताप यांनी.
अशा ज्वलंत प्रश्नावर चित्रपटाद्वारे भाष्य करणं खूपच धाडसाचं आहे आणि ते शिवधनुष्य राजू पास्रेकर आणि त्यांच्या टीमने कसं पेललंय हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राजू पास्रेकर यांच्या मते ‘मी गेली दहा वष्रे या कादंबरीवर चित्रपट बनवायचा प्रयत्न करतोय, पण अशा ज्वलंत विषयाला हात घालायला कुठलाही निर्माता धजावत नव्हता. बलात्कार आणि महिला अत्याचार म्हटलं की त्याचं चित्रपटातील चित्रण भडक होण्याची शक्यता असते आणि असा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकण्याचीही शक्यता असते. शिवाय अशा चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकण्यासही अडचण येऊ शकते. त्यामुळे असा विषय मांडण्यासाठी आवश्यक असणारी प्रामाणिक इच्छाशक्ती असणाऱ्या निर्मात्याची आम्हाला गरज होती. आम्ही निवडलेली कथा जरी ९० च्या दशकात लिहिलेली असली तरी ती समाजात कुठल्याही वेळेस घडणारी कथा आहे. आपल्या समाजाचे ते एक विदारक सत्यच आहे आणि त्यामुळेच ती कथा खऱ्या अर्थाने वैश्विक आहे.
या चित्रपटात महेश मांजरेकर, सयाजी िशदे आणि भरत जाधव असे दिग्गज कलाकार नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिका साकारत आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची ताकद नव्याने समजणार आहे. पाखी हेगडे ही मुळातली वसईची आणि सध्या भोजपुरी चित्रपटात काम करणारी आघाडीची नायिका, या चित्रपटात ‘नामी’च्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेमधून मराठीत पदार्पण करत आहे.
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रवीण कुवर यांच्या संगीताला शब्दबद्ध केलं आहे सचिन तेंडुलकरचे भाऊ नितीन तेंडुलकर यांनी. थीम सॉँग गायले आहे शंकर महादेवन यांनी. नुकतेच या चित्रपटांच्या गाण्यांच्या सीडीचं प्रकाशन सचिनच्या हस्ते पार पडलं. यानिमित्ताने एक वेगळा उपक्रमही राबवण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवणाऱ्या पाच स्त्रियांचा सचिनच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य प्रसिद्धी आणि चांगल्या वितरण व्यवस्थेची गरज असते. ‘देऊळ’, ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते देविशा फिल्म्सचे अभिजित घोलप हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्त्री प्रश्नावर आधारित एका सशक्त कथानकावरील हा चित्रपट आवडल्यामुळेच आपण या चित्रपटाशी जोडले गेलो, असं ते सांगतात. अशा पद्धतीचे सामाजिक आशय असलेले चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवले जाणं ही आजच्या काळाची गरज आहे, असं त्यांना वाटतं आणि त्यामुळेच मार्केटिंग, प्रसिद्धी आणि वितरण यामध्ये आपण कुठलीही कमतरता ठेवलेली नाही, असंही ते सांगतात. हा चित्रपट येत्या ५ जुलला सर्वत्र प्रदíशत होतोय.
response.lokprabha@expressindia.com