Lokprabha.com
५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. २८ जून ते ४ जुलै २०१३
 

मेष मनात आलेली गोष्ट ताबडतोब कृतीमध्ये उतरली पाहिजे अशी जिद्द निर्माण होईल. पण अतिसाहस करू नका. व्यापार-उद्योगात प्रगती करण्याचा तुम्हाला ध्यास लागेल. त्याव्यतिरिक्त इतर गोष्टी तुम्हाला सुचणार नाहीत. हे सर्व करत असताना योग्य व्यक्तीशी संगत ठेवणे गरजेचे आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये कमी बोला, जास्त काम करा. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. घरामध्ये डागडुजी किंवा इतर अत्यावश्यक दुरुस्त्या तुमचे लक्ष वेधवतील. नवीन वाहन खरेदीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांचा करिअर निवडीसंबंधी गोंधळ असेल.
.......................................................

वृषभ रुपयाभोवती फिरते दुनिया हे तुमचे विचार असतात आणि त्यानुसार तुम्ही कृती करता. या सगळ्यांचे फायदे-तोटे तुम्ही अनुभवणार आहात. व्यवसाय-धंद्यात नवीन योजनांकरता तुम्ही सिद्ध व्हाल. त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीमध्ये आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळे मिळणार या कल्पनेने तुम्ही फुगून जाल. ते तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसेल. नवीन वाहन, जागा खरेदीकरता प्रयत्न कराल. घरगुती आणि व्यक्तिगत जीवनात तुमच्या कलात्मकतेचा आणि रसिकतेचा अनुभव येईल. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये चांगला पर्याय मिळेल.
......................................................

मिथुन तुम्ही प्रचंड उत्साही दिसाल. कामही करायचे आणि संधी मिळाली की जीवनाचा आस्वादही घ्यायचा ही तुमची तमन्ना पूर्ण होईल. व्यवसाय-उद्योगात ज्या गोष्टी पैशाअभावी अडून राहिलेल्या होत्या त्या आता साकार करता येतील. त्याकरता किती आणि कसे पैसे खर्च करायचे याचे भान ठेवा. थोडा जास्त अवधी लागला तरी चालेल पण महत्त्वाच्या कामातील कायदेशीर व तांत्रिक बाजू सावधतेने हाताळा. नोकरीमध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यामधून रुबाब दिसेल. त्या नादात सहकारी आणि वरिष्ठ यांचा अवमान होऊ देऊ नका. घरामध्ये सर्व सदस्यांच्या गरजा आणि हट्ट पुरवाल.
.......................................................

कर्क सबसे बडा रुपय्या याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. परंतु त्यांनी डगमगून न जाता तुम्ही तुमचे काम अविरतपणे चालू ठेवाल. जे काम सहजगत्या पार पडत नाही त्या कामात तुम्ही एखादी युक्ती करून ते फत्ते कराल. सुरुवातच चांगली आहे म्हणून वेळ व आलेली संधी दवडू नका. व्यवसाय-उद्योगातील महत्त्वाची कामे स्वत:च हाताळा. जाहिरातीकरता पैसे खर्च करावे लागतील. नोकरीमध्ये तुमची अडचण सांगूनही वरिष्ठ त्यावर काहीच उपाय करू शकणार नाहीत. घरामध्ये डागडुजी, दुरुस्त्या, अचानक येणारे पाहुणे यामुळे खर्च हाताबाहेर जातील. विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल.
.......................................................

सिंह ग्रहांची स्थित्यंतरे तुम्हाला अनुकूल फळे देणारी आहेत. स्वभावत: तुम्ही दिलदार आहात, त्यामुळे स्वार्थी व्यक्ती तुमचा उपयोग करून घेतात. तुम्ही थोडेसे स्वार्थी बनलात तर त्याचा तुम्हाला बराच उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगात ज्या कामातून तुमचा नफा वाढणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक प्राप्ती वाढण्याचे संकेत मिळतील. नोकरीमध्ये ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ हा तुमचा कानमंत्र असू द्या. वेळ मिळाला तर सहकाऱ्यांना मदत करा. बदलीच्या कामांना प्राधान्य द्या. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर्च वाढतील. वातावरण आनंदी राहील.
.......................................................

कन्या तुमच्या आचार-विचारांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये एक वेगळा बदल घडवून आणण्याचे संकेत मिळतील. हे बदल तुमचा आत्मविश्वास वाढवणारेच असतील. घरगुती आणि पैशाच्या कामात जर काही कारणामुळे दिरंगाई झालेली असेल तर आता त्यात प्रगती होण्याची लक्षणे दिसू लागतील. फ़ायदा मिळण्यासाठी अजून काही आठवडे थांबावे लागेल. कधी न पाहायला मिळणारी तुमच्यातील स्वच्छंदीवृत्ती सभोवतालच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. व्यवसाय-उद्योगामध्ये आर्थिक फायदा वाढेल. नोकरीमध्ये हव्या असलेल्या सवलती मिळतील. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल.
.......................................................

तूळ ग्रह जणूकाही माणसाची परीक्षाच बघतात याचा अनुभव तुम्ही अलीकडल्या काळात घेतलेलाच आहे. आता तुम्हाला याचे चांगले रूप बघायला मिळेल. तुमचा प्रगतीचा वेग वाढेल. मधाभोवती जशा मधमाश्या घुटमळतात त्याप्रमाणे ज्यांचा तुमच्याकडून स्वार्थ साधला जाणार आहे त्या व्यक्ती तुम्हाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. व्यवसाय-उद्योगात नवीन पद्धतीचे काम सुरू करण्याचे बेत ठरतील. नोकरीत कामाबरोबर इतर सुखसुविधांचाही आनंद घेऊ शकाल. घरामधले वातावरण आनंदी व उत्साही असेल. तरुणांचे विवाहाचे प्रश्न सुटतील.
.......................................................

वृश्चिक सागरामध्ये जशा लाटा एकामागोमाग येत राहतात तसे एका अडचणीतून बाहेर पडून तुम्ही नि:श्वास टाकता तोच दुसरी अडचण पुढे हजर झाल्यामुळे थोडेसे गांगरून जाल. सभोवतालच्या व्यक्तींचा युक्तीने वापर केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नातून काहीतरी मार्ग काढता येईल. व्यवसाय-धंद्यात तुमची पैशाची कुचंबणा आणि हाताबाहेर जाणाऱ्या काही समस्यांमुळे धीर धरणे हा एकच मार्ग शिल्लक राहील. नोकरीमध्ये सत्तेपुढे शहाणपण नसते याची आठवण येईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. घरातील व्यक्ती तुमची अडचण समजून घेऊन तुम्हाला दिलासा देतील.
.......................................................

धनू तुमच्या सभोवतालच्या वातावरणामध्ये एकप्रकारची हलचल निर्माण होईल. ज्यामुळे तुम्ही सतर्क बनाल. ग्रहांची तुम्हाला भरपूर साथ आहे. तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचे तंत्र आत्मसात केलेत तर बरेच काही करू शकाल. ज्या प्रकरणामध्ये तुमचा काहीही दोष नसताना विलंब झाला होता त्यात रंग भरू लागेल. व्यवसाय-उद्योगात नवीन पद्धतीचा अवलंब करून उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढवण्याचा विचार मनात येईल. नोकरीतल्या कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. फारसा वेळ नसूनही जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्यक्तिगत व सांसारिक जीवनात आनंदाचे क्षण लुटाल.
.......................................................

मकर ग्रहमान परस्पर विरोधात असणारे आहे. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रामध्ये काही विचित्र अनुभव आल्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. ज्यांनी तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण केले होते त्यांना धडा शिकवायचा असे ठरवाल. त्याकरता वेळ आणि पैसे खर्च झाले तरी त्याची पर्वा तुम्ही करणार नाही. नोकरीमध्ये जे निर्णय वरिष्ठ विनाकारण लांबवत आहेत त्याची त्यांना आठवण करून द्याल. स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न कराल. नवीन नोकरीच्या कामामध्ये खात्री वाटणार नाही. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींशी तात्त्विक मतभेद होतील. तुम्ही तुमची बाजू त्यांना पटवून देण्याचा निश्चय कराल.
.......................................................

कुंभ ग्रहमान संमिश्र आहे. ज्या कामात तुम्ही स्वत: जातीने लक्ष घालाल त्यामध्ये चांगली प्रगती होईल. परंतु दुसरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तेथे उणीव जाणवू लागेल. तुमची अक्कलहुशारी वापरून तुम्हाला सर्व आघाडय़ांवर सतर्क राहणे आवश्यक आहे. व्यापार- उद्योगातील बाजारातील घडामोडींवर बारकाईने नजर ठेवलीत तर एखाद्या संधीचा फायदा उठवू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेनुसार वागलात तर कामात शॉर्टकट मिळेल. घरामध्ये काही प्रश्नांत लक्ष घालावे लागेल, ज्याकडे तुमचे पूर्वी दुर्लक्ष झाले होते. तरुणांनी अतिआत्मविश्वास टाळावा.
.......................................................

मीन शनीची तीव्रता आता वाढणार असल्यामुळे तुम्हाला तुमचा पवित्रा सावध ठेवणे आवश्यक आहे. सर्व ग्रहमान असे दर्शवते की तुम्हाला बदलत्या काळानुसार वागावे लागेल. व्यापार-उद्योगामध्ये बाजारातील परिस्थिती कशी आहे यावर सतत लक्ष ठेवा. कारखानदारांनी कामगारांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. नोकरीमध्ये तुम्हाला न विचारता वरिष्ठ एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर किंवा वेगळ्या स्थळी बदली करतील. घरामध्ये जागा बदलाविषयी निर्णय होईल. एकत्र कुटुंबातून विभक्त होण्याचा विचार मनात डोकावेल.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com