२८ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी

नि:शब्द तार
एक तार तुटलेली...
अद्भुतातून अडगळीकडे
ऋण तारेचं...
अनुभव
योगदान

क्रीडा

सेकंड इनिंग
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
कवितेचं पान
युवा
शब्दरंग
पाठलाग
नावीन्य
सिनेमा
वाचक-लेखक
पुस्तकाचे पान

लग्नाची वेगळी गोष्ट
पंचकन्यांचा योग
सबमिट

निसर्ग
माझं शेतघर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हेलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
पवारांचा धक्का राष्ट्रवादीलाच!
केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणजे राजकारणातील एक माहीर गडी. सलग ४५-४६ वर्षे राजकारण करणे आणि ते करताना सतत केंद्रस्थानी राहणे हे सोपे काम नाही. त्यातही सलग १४ वेळा निवडणुका लढवून दर खेपेस निवडून येणे हाही एक वेगळा विक्रमच ठरावा. एकाच वेळेस राज्याच्या आणि त्याच वेळेस राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. म्हटले तर सर्वच पक्षांत अगदी विरोधकांतही त्यांचे चांगले मित्रच आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पवार यांच्यावर अनेकदा कडवट टीका केली. पण पाठीत वार करणाऱ्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा म्हणून पवारांची स्तुतीही के ली. पवार यांच्या या कौशल्यामुळेच त्यांच्याबद्दल अनेक कथा, दंतकथा, वाक्प्रचार प्रचलित आहेत.

नि:शब्द तार
एक तार तुटलेली...
कोंढाणा किल्ला सर केल्यावर शिवरायांच्या मावळ्यांनी गवताच्या गंजी पेटवल्या. महाराजांनी राजगडावरून त्या ज्वाळा पहिल्या. ती खूण होती, सांकेतिक भाषा होती कोंढाणा सर केल्याची. आजच्या सारखे वेगवान तंत्रज्ञान तेव्हा विकसित झाले नव्हते. त्या काळात कमीतकमी वेळात ठरावीक अंतरावरील व्यक्तीस केवळ काही खुणांच्या आधारे माहिती मिळावी यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था तयार केल्या जात असत. मानवाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर जगाच्या पाठीवर संदेशवहनासाठी अशा हजारो क्लृप्त्या, सांकेतिक खुणा, भाषा, लिप्या वापरल्या गेल्याचे दिसून येते. तर आज तंत्रज्ञानाच्या आधारे आपण अनेक सांकेतिक भाषांच्या आधारे संदेशांची देवाणघेवाण करत असतो. टेलीकम्युनिकेशनमध्ये तर आपण क्रांतीच केली.

नि:शब्द तार
अद्भुतातून अडगळीकडे
अभूतपूर्व वेगाने धावणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे चमत्काराचे अप्रूपच आता संपले असले तरी अगदी अलीकडच्या भूतकाळापर्यंत विज्ञानाच्या असंख्य चमत्कारांनी माणसाला भारावून टाकले होते. जग जवळ येण्याच्या अनेक शतकांपूर्वीच सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे एकमेकाशी संपर्क साधण्याची गरज भासू लागली तरीही वेगाच्या गणितात कितीही गुणाकार केले तरी भौतिक संपर्काला असलेले काळाचे अंतर क्षणात कापणे अजूनही सोपे झालेले नाही. मग आभासी संपर्काच्या संशोधनावर भर सुरू झाला आणि दोन शतकांपूर्वीच्या एका प्रयोगाने अशा संपर्काची पहिली नोंद केली. तारायंत्र जन्माला आले! मानवी संपर्कयंत्रणेच्या क्रांतीचे ते पहिले पाऊल अगदी दोन दशकांपूर्वीपर्यंत प्रत्येक मन आणि अवघे जीवन व्यापून राहिले. आनंदाच्या आणि दु:खाच्या असंख्य क्षणांचा पहिला साक्षीदार ठरणाऱ्या या तारायंत्राचे घराघराशी नाते जडून गेले.


नि:शब्द तार
ऋण तारेचं...
भारतीय पोस्ट खातं १५ जुलपासून तारसेवा बंद करणार हे वाचलं आणि मला धक्काच बसला. धक्का, सेवा बंद होणार म्हणून बसला नव्हता, तर ती सेवा अद्याप चालू आहे या माहितीमुळे बसला होता! दळणवळणाच्या सध्याच्या धूमधडाक्यात ‘तार’ आपलं अस्तित्व टिकवून आहे याची मला कल्पनाच नव्हती. ती बातमी प्रसिद्ध झाल्यावर, तारसेवेविषयी वेगवेगळ्या ठिकाणी जी माहिती छापून आली, त्यातल्या एका माहितीने आणखी एक धक्का दिला- आजही देशभरात दररोज सुमारे पाच हजार तारा पाठविल्या जातात. त्यातल्या ६५% हिस्सा सरकारी तारांचा असला, तरी २५% हिस्सा जनतेने पाठविलेल्या तारांचा आहे.

अनुभव
तिने अनुभवला ‘अनसेफ इंडिया’
मार्च १६.. फेसबुकवर फिलिपाइन्सच्या ३४ वर्षीय अ‍ॅलेह टेबोक्लेऑनचं स्टेटस होतं, ‘आणखी चार दिवसांनी मी भारतात असेन. २-३ दिवस माझा मुक्काम कोलकात्यात असणार आहे. तिथे हे दोन-तीन दिवस काय काय करता येईल.. प्लीज सुचवा.’
तिच्या या स्टेटसवर कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. काही जणांनी तिला काय काय बघता येईल हे सुचवलं तर काही जणांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तेवढे लोक वगळता अनेकांनी तिला भारतात वावरताना कमालीची सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. त्यात काय काय सूचना होत्या. बाहेर फिरताना हातपाय उघडे राहतील असे कपडे घालू नकोस. रात्री अजिबात बाहेर पडू नकोस, कुठेही एकटी जाऊ नकोस वगैरे वगैरे. त्याच्या एकच दिवस अगोदर मध्य प्रदेशात आपल्या पतीसह सायकलिंग टूरवर निघालेल्या एका स्विस महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याचा संदर्भही अनेकांनी दिला होता.

योगदान
व्रतस्थ
समाजातील तळागाळाच्या लोकांसाठी शासनाच्या कागदोपत्री अनेक योजना असतात पण हा समाज या योजनांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने बरेचदा त्या फाइलमध्येच राहातात. अशा लाभार्थी योजनांचा फायदा तळकोकणातील अज्ञानी, उपेक्षित बांधवांना मिळावा म्हणून ज्यांनी जिवाचं रान केलं, त्या डॉक्टरांचं म्हणजेच ‘डॉ. महेंद्र गुजर’ यांचं आयुष्य अनेकदा नतमस्तक व्हावं असंच. डॉ. गुजर ना त्यांच्या ओळखीचे ना तिथल्या मातीचे. असा हा डॉक्टर शिक्षण संपल्यावर एक विशिष्ट ध्येय उराशी बाळगून मुंबईहून थेट कोकणात आला. तिथल्या मातीत रुजला आणि गेली ४० र्वष तिथल्या गोरगरिबांना आधाराचा हात देत राहिला, राहिलाय.
सेवेचा वारसा डॉक्टरांना आपल्या आईवडिलांकडून मिळाला, वडील सेवादलाचे कार्यकर्ते, तर आईचा स्वातंत्र्य लढय़ात सहभाग. ‘तेल नाही, वात नाही. आधाराचा हात नाही, त्यांच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव’ ही घराची शिकवण.


युवा
तिचा कान्स प्रवास...
‘७२५’ या कान्स फेस्टिव्हलमध्ये निवडल्या गेलेल्या तुझ्या लघुपटाबद्दल काय सांगशील?
अभिनय शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला ‘७२५’ हा लघुपट बनवायचा होता. ती दिग्दर्शनासाठी संबंधित व्यक्तींनी तिला माझे नाव सुचवले. त्यांनी या आधीची माझी कामे बघितली होती. मीही ते काम स्वीकारले. ‘७२५’ ही गोष्ट एका निष्पाप मुलीची आहे जी सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ती स्वत:ची या जाळ्यातून कशी सोडवणूक करते हा या लघुपटाचा विषय आहे. माझी निर्मात्याबरोबरची व लेखकाबरोबरची पहिली भेट तब्बल दोन-तीन तास चालली. नंतरही आम्ही खूपदा चर्चा केली. एक वेळ अशी आली की जेव्हा सगळे शब्द माझ्या डोळ्यांसमोर चित्ररूपात दिसायला लागले. त्याच वेळी मला कळले की आता शूटिंग चालू करायला हरकत नाही. दरम्यान, आम्हाला हवे तसे कलाकर व तंत्रज्ञदेखील मिळाले.

भविष्य