२१ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
आत्महत्या ठरतेय ‘बिग किलर’
‘नि:शब्द’ नैराश्य!

सिक्षण
उपक्रम
वाद

दखल

क्रीडा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
द्या टाळी...
कवितेचं पान
सिनेमा
पुस्तकाचे पान
शब्दरंग
एकपानी
झीरो अवर

लग्नाची वेगळी गोष्ट
हे प्रतिज्ञोत्तर आइका!
आनंदाचे डोही...

भन्नाट
माझं शेतघर
वाचक-लेखक
संख्याशास्त्र
चित्रकथी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
अवास्तव!
सुमारे तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धाच्या निमित्ताने झालेल्या गैरव्यवहारांचे प्रकरण उघडकीस आले. दुसरीकडे सर्वत्र पाय पसरत चाललेल्या भ्रष्टाचाराने हैराण झालेल्या नागरिकांना अण्णा हजारे यांच्यामध्ये एक परिवर्तनाची लाट दिसू लागली होती. फेसबुकादी सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून एरवी दूर राहिलेली तरुणाई राजकारणातील प्रवेशाच्या उंबरठय़ावरच येऊन उभी राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला या देशात क्षमा नाही, असे सामान्य माणसाला प्रथमच वाटू लागले होते. पंतप्रधानांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले जावे, अशी मागणी झाली आणि रेटा वाढू लागला. अनेकांनी त्याचे वर्णन ‘आणखी एका नव्या क्रांतीच्या दिशेने’ असे केले.

कव्हर स्टोरी
आत्महत्या ठरतेय ‘बिग किलर’
फिल्म अभिनेत्री मॉडेल जिया खान हिच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा ग्लॅमर, प्रसिद्धी, स्पर्धा, यश, पैसा, आणि या साऱ्या बरोबर येणारे नराश्य हे मुद्दे पुन्हा एकदा चíचले जात आहेत. एखाद्या अभिनेत्रीची आत्महत्या होते म्हणून कदाचित सारेच समाज घटक या गोष्टीचा विचार करू लागले असे साधारण चित्र उभे राहते. पण हे आजच अचानक उभे राहिलेले भयचित्र आहे का?
जागतिक पातळीवर विचार केल्यावर जाणवणारे वास्तव आणखीन भयंकर असे आहे, ते जागतिक आरोग्य संघटनेने तेरा वर्षांपूर्वीच दाखवून दिले आहे. १९९९चा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल म्हणतो की, पुढील वर्षांत जगातील सुमारे दहा लाख लोक दरवर्षी आत्महत्येने मृत्युमुखी पडतील आणि त्यापेक्षा दहा ते वीस पट लोक आत्महत्येचा प्रयत्न करणारे असतील. म्हणजेच प्रत्येक ४० सेकंदाला आत्महत्येमुळे एक मृत्यू आणि प्रत्येक तीन सेकंदाला आत्महत्येचा एक प्रयत्न.

कव्हरस्टोरी
‘नि:शब्द’ नैराश्य!
अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारसमोर कमालीच्या आत्मविश्वासाने वावरलेली ती जेमतेम विशीतली काळीसावळी, तरतरीत जिया खान.. विषयही वेगळा. एकमेकांकडे आकर्षिले गेलेले ते दोघं. साठीतला प्रौढ, यशस्वी फोटोग्राफर आणि जिच्या आयुष्याची जेमतेम सुरुवात होते आहे अशी ती नवथर तरुणी.. जिया खान. इंग्लंडमधून आलेली जिया हे राम गोपाल वर्माचं तेव्हाचं नवं फाइंड.. पहिलाच सिनमा बिग बीबरोबर मिळाल्यामुळे जियावर कौतुकाचा वर्षांव झाला. बॉलीवूडला पुढच्या काही वर्षांसाठी आणखी एक नवी हिरॉईन मिळाली होती. इंग्लंडमधूनच आलेल्या, धड हिंदी बोलता येत नसलेल्या कतरिना कैफची कारकीर्द त्याच काळात उभी राहात होती. त्यामुळे त्यात जियाची भर पडायला काहीच हरकत नव्हती.
ही २००८ मधली गोष्ट.


सिक्षण
मिळून सारे, बदलूया शिक्षणव्यवस्था
क्षेत्राचे स्वरूप झपाटय़ाने बदलत आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत केवळ भौतिक सुविधा, प्रशिक्षित शिक्षकांची उपलब्धता, शिक्षकांची उदासीनता आणि वेतन इत्यादीचा विचार होत होता. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या जोशात साक्षरता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत असे आपण समजू लागलो. २००९चा शिक्षण हक्क कायदा ६ ते १४ वयातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क देतोच, पण कलम ७ आणि कलम ८ खाली हे शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे असा कायदेशीर हक्क पण बालकांना देतो. ही शिक्षण क्षेत्रातील मोठी क्रांतीच म्हणावी लागेल.
आनंददायी जीवन शिक्षणाबरोबरच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात ज्ञान संरचनावाद ही संकल्पनापण नव्यानेच मांडली आहे. आराखडय़ात प्रतिपादन केलेली ज्ञान संरचनावाद ही पाश्चात्त्य कल्पना आहे म्हणून तिची हेटाळणी आज काही शिक्षणतज्ज्ञ करीत आहेत. खरी तशी परिस्थिती नाही आहे.

उपक्रम
शिक्षण हक्क कायद्याची शाळा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा देशभरात २०१० पासून राबविण्यात आला. त्याला यंदा तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या तीन वर्षांत या कायद्यामुळे काय काय घडले याचा आढावा घेण्याआधी थोडे भूतकाळात जाऊ. या अगोदरही शिक्षणविषयक सुधारणांसाठी आपल्या देशात प्रयत्न झाले. मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याच्या कल्पनेचे जनकत्व महात्मा फुले यांच्याकडेच जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १८८२ साली शैक्षणिक सुधारणांसाठी इंग्रज सरकारने हंटर कमिशन नेमले होते. त्या वेळी या कमिशनसमोर आपले विचार मांडताना महात्मा फुले यांनी देशातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले पाहिजे तरच या देशातील लोकांचे भले होईल असे म्हटले होते. मात्र इंग्रजांनी ही मागणी मान्य केली नाही. मात्र फुलेंचाच शैक्षणिक वारसा, शिक्षणाची दूरदृष्टी असलेल्या शाहू महाराज यांनी पुढे चालवला. त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक बदल मोठय़ा प्रमाणात घडवून आणले.

वाद
लहान मुलांचे लैंगिक शोषण सदोष कलमांचं काय करायचं?
हल्लीच्या काळात लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात आपल्या समाजात चर्चा होऊ लागली आहे. बालकांबाबतच्या लैंगिक गुन्ह्य़ांविषयीचा कायदा - प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट (पोक्सो) २०१२ बनविला. तो नोव्हेंबर २०१२ मध्ये अमलात आला आहे. मात्र या कायद्यात काही त्रुटी आहेत. आपल्या देशातली सामाजिक परिस्थिती लक्षात न घेताच त्यात काही तरतुदी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे या कायद्याची व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. पण त्याआधी त्याची पाश्र्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.
निठारी हत्याकांडाच्या पाश्र्वभूमीवर बालकांविरोधातील सर्व प्रकारच्या गुन्ह्य़ांसंदर्भात -ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन अ‍ॅक्ट (ओएसी) या व्यापक कायद्याची निर्मितीप्रक्रिया सुरू होती. पण मध्येच या प्रक्रियेला काट देऊन केंद्र शासनाने केवळ बालकांबाबतच्या लैंगिक गुन्ह्य़ांविषयीचा कायदा - प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट (पोक्सो) २०१२ बनविला. तो नोव्हेंबर २०१२ मध्ये अमलात आला.


दखल
स्पेशल मुलांसाठी देवदूत
मानवी संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला, तसं तसं माणसाचं आयुष्य बदलत गेलं. प्राण्यांच्या बाबतीत तसं झालं नाही. पण प्राणी आणि माणूस यांचं एकमेकांशी असलेलं साहचर्य मात्र विकसित होत गेलं आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासूनच्या माणूस आणि कुत्रा, घोडा, हत्ती अशा प्राण्यांच्या मैत्रीच्या गोष्टी आपण ऐकत असतो. खरं तर प्राण्यांच्या मैत्रीबरोबरच त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचा माणसाने आपलं जगणं सुकर करण्यासाठी उपयोग करून घेतला आहे. कुत्र्याचा सावधपणा, स्वामीनिष्ठा, घोडय़ाचा वेग, मांजरीचं उंदरांना नष्ट करणं, हत्तींची प्रचंड काम करण्याची ताकद, गाढवाची सातत्याने काम करण्याची क्षमता या गोष्टी माणसासाठी उपयोगाच्या ठरल्या आहेत.
माणसाला होणाऱ्या प्राण्यांच्या या उपयोगात आणखी एक भर पडली आहे, ती वेगवेगळ्या उपचारांदरम्यान थेरपिस्ट म्हणून होणाऱ्या मदतीची. होय.. पुण्यात-ठाण्यात काम करणाऱ्या ‘अ‍ॅनिमल एंजल्स’ या संस्थेच
को-थेरपिस्ट आहेत, कुत्रा, मांजर, ससा हे प्राणी. एवढंच नाही तर मासेदेखील या संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर
को-थेरपिस्ट म्हणून काम करतात.

भविष्य