१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
अकारण, ‘स’कारण व राजकारण
‘राजकारणात अकारण असे कधीच काही घडत नाही, जे घडते ते सकारणच असते. फक्त काही वेळेस त्यामागचे ते ‘स’कारण लोकांना कळायला आणि उमजायला वेळ लागतो किंवा विलंब होतो’
‘ज्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर पैसा आहे, तिथे राजकारण किंवा राजकीय नेतृत्व नाही, असे होणारच नाही’

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी!
बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज

देशातले उद्योगपती, उद्योगसमूह, बडे अभिनेते आदी अब्जाधीशांचा एक नवीन व्यवसाय. देशविदेशातल्या खेळाडूंना बोली लावून विकत घ्यायचे, त्यांना एका संघात घेऊन २०-ट्वेंटीचे सामने खेळवायला लावायचे. या नव्या खेळाचे नाव इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल. पहिल्या मोसमापासूनच विवादाबरोबर सुरू झालेला हा गर्भश्रीमंतांचा खेळ. आयपीएल म्हणजे प्रचंड पैसा आणि पैसाच. या पैशांच्या पावसात न्हाऊन निघतात ते संघमालक, खेळाडू आणि सामन्यांवर सट्टा लावून कोटय़धीश होणारे सट्टेबाज. यंदाची आयपीएल स्पर्धा गाजली ती मैदानाबाहेरच्या धक्कादायक नाटय़ाने. हे नाटय़ गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असून देशाच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स आणि वृत्तवाहिन्या याच आयपीएल संदर्भातील बातम्यांनी गाजत आहे. क्रिकेटमधील सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंग नवीन नाही, पण यंदा दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या स्पर्धेमुळे सट्टेबाजीची पाळेमुळे खणली जाऊ लागली. काय आहे ही सट्टेबाजी आणि काय होतं या सट्टेबाजीच्या विश्वात? जेवढं खोलवर जावं तेवढी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सट्टेबाजी, त्याने निर्माण केलेली मॅच-फिक्सिंग आणि त्या अनुषंगाने उलगडत गेलेल्या भेसूर वास्तवाचा हा आढावा.

कव्हरस्टोरी
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
नवी दिल्ली. गुरु वार, ९ मे २०१३.
दिल्लीतल्या पॉश लोधी कॉलनीतील पोलिसांच्या स्पेशल सेलचं काम नेहमीप्रमाणेच सुरू होतं. नेहमीप्रमाणे सकाळी इन्स्पेक्टर बद्रीश दत्त कार्यालयात आले. आपल्या टीममधील सहकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. चर्चा अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून चाललेल्या बडय़ा ऑपरेशनची होती. ५ मेचा जयपूरमधला पुणे वॉरियर्स आणि राजस्थान रॉयल्समधला सामना फिक्स होता, हे आता स्पष्टच झालं होतं. त्याच सामन्यादरम्यान एक बुकी आणि एक क्रिकेटपटू यांच्यात झालेलं दूरध्वनी संभाषण बद्रीश दत्त यांच्या टीमने मध्येच पकडलं होतं- इंटरसेप्ट केलं होतं. आता एफआयआर दाखल करणं आवश्यकच होतं. दत्त यांच्या सहकाऱ्यांचं मत तसंच पडलं. अखेर दुपारी बाराच्या सुमारास दत्त यांनी काही अज्ञात व्यक्तींविरु द्ध गुन्हा दाखल केला.
‘‘एप्रिल २०१३ च्या तिसऱ्या आठवडय़ात मिळालेल्या गुप्त खबरीनुसार, इंडियन प्रीमिअर लीगच्या सध्या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये एक प्रकारची फिक्सिंग होत आहे आणि त्यात अंडरवर्ल्डचे काही सदस्य सहभागी आहेत. दिल्लीतील काही अज्ञात दलालांचाही त्यात सक्रिय सहभाग आहे.


कव्हरस्टोरी
सट्टेबाजांचे खेळ
लाकडाला वाळवी लागली की ही वाळवी संपूर्ण लाकूड खाऊन टाकते, तद्वत क्रीडा क्षेत्रातही भ्रष्टाचाराची वाळवी ही त्या क्षेत्रास खाऊन टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. अलीकडेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत झालेल्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे पुन्हा क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती आणि पैसा कमाविण्यासाठी अवैध मार्गाचा उपयोग यामुळे क्रीडा क्षेत्राच्या प्रतिष्ठेस तडा पोहोचू लागला आहे.
सामन्याचा निकाल निश्चित करणे ही संकल्पना नवीन नाही. १८९६ मध्ये अथेन्स येथे आधुनिक ऑलिम्पिकची पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हाही काही खेळाडूंना विजयी करण्यासाठी अपप्रवृत्तींचा उपयोग करण्यात आल्याचे दिसून आले आहे. तेव्हापासून आजतागायत क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार हा वाढतच चालला आहे. केवळ क्रिकेट नव्हे तर फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंगमध्येही त्याचे लोण येऊ लागले आहे. कबड्डी व कुस्ती हे भारतीय खेळही त्यास अपवाद नाहीत.

प्रासंगिक
नक्षलवाद्यांचा गनिमी कावा केव्हा ओळखणार?
एरवी देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू नेहमी दिल्ली असते. गेल्या काही दिवसांपासून मात्र हा केंद्रबिंदू छत्तीसगडमधील अतिशय मागास अशा बस्तर भागात सरकला आहे. देशपातळीवरचे बहुतेक सारे नेते, प्रसारमाध्यमे सध्या बस्तरमध्ये गेल्या २५ मे रोजी घडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या नृशंस हत्याकांडावर बोलू लागले आहेत. कुणाला यात भयावह हिंसा दिसते आहे, तर कुणाला त्यामागे दडलेले राजकारण दिसते आहे. या घटनेवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, राजकीय कुरघोडी करण्यात काँग्रेस व भाजप या दोन पक्षांचे तमाम बडे नेते गुंतले आहेत. राज्यापासून केंद्रापर्यंतचे नेते एकमेकांच्या चुका, त्रुटी दाखवण्यात सध्या व्यस्त आहेत. आरोपांची राळ उठवणारी काँग्रेस देशात, तर भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेत आहे. या दोन्ही पक्षांना पुन्हा सत्तेत यायचे आहे. त्यासाठी हे सारे उद्योग सुरू झाले आहेत.

दस्तावेज
नानूमामा : चित्रपटांचा चालताबोलता इतिहास!
भारतीय चित्रपट व्यवसायाला २ मे २०१३ रोजी शंभर वर्षे पूर्ण होतील. दादासाहेब फाळके यांनी आपला पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ ३ मे १९१३ रोजी कारोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित केला. हा इतिहास चित्रपटप्रेमींना माहीत आहे. पण एखादा चित्रपटप्रेमी, साधारणपणे १९१४ पासून नियमितपणे मूकपट आणि बोलपट पाहत होता. त्याने आपल्या छंदाची पन्नाशी म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. जर हा चित्रपटप्रेमी पुढे जगलावाचला असता तर त्याने हीरक महोत्सवही साजरा केला असता. हा चित्रपटप्रेमी माणूस चित्रपटांचा चालताबोलता इतिहास होता. त्या चित्रपटप्रेमी गृहस्थाबद्दल लिहिण्याआधी मी शतश: नमस्कार करतो. या चित्रपटप्रेमी गृहस्थाचे माझ्यावर खूप ऋण आहे.


चित्रकथी
सचोटीचे शिल्प
चित्रकला आणि शिल्पकलेची असलेली ओढ स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून आठवीपर्यंतचे शिक्षण वेंगुल्र्याच्या शाळेत झालेल्या त्या विद्यार्थ्यांने शाळेबरोबरच घरही सोडले आणि थेट मुंबई गाठली. हाती होते केवळ २५ रुपये. ती २५ रुपयांची पुंजी तरी किती काळ पुरणार? मग मालंडकर ज्वेलर्सच्या समोर फुटपाथवरच रात्री अंग झोकून द्यायचे, पहाटे पाचला उठून सार्वजनिक नळावर अंघोळ उरकायची की त्या मुलाच्या दिवसाला सुरुवात व्हायची. मग सकाळी लोकांना चित्र काढून दे, कुणाला कॅलेंडरसाठी चित्र काढून दे, असे करीत हा मुलगा मोठा झाला. पण त्या वेळी म्हणजे १९४०च्या आसपास कुणालाच याची कल्पना नव्हती की, हाच तो शिल्पकार असणार आहे, ज्याच्या हातून एका मोठय़ा जागतिक दर्जाच्या शिल्पकृतीला पूर्णत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम होणार आहे, तेही जागतिक मान्यता मिळालेल्या शिल्पकृतीच्या संदर्भात! या मुलाचे नाव होते वासुदेव मांजरेकर. हेच मांजरेकर नंतर विख्यात शिल्पकार झाले आणि जेजे स्कूल ऑफ आर्टचे डीन अर्थात अधिष्ठाता असतानाच ते जागतिक दर्जाचे काम त्यांच्या हातून घडले!

भविष्य