Lokprabha.com
१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. ७ ते १३ जून २०१३
 

मेष धाडसी निर्णय घ्यायला तुम्ही कधी डगमगत नाही. तुमच्या या गुणाचा तुम्हाला फायदा मिळेल. परंतु काही माणसे तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पूर्वतयारी कराल. कारखानदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा संकल्प करतील. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. त्यानिमित्ताने टेबल किंवा कामाची जागा बदलण्याचे संकेत मिळतील. जुनी प्रॉपर्टी वगरे विकून त्याऐवजी नवीन गुंतवणूक करावीशी वाटेल. तरुणांनी विवाहाच्या निर्णयात घाई करू नये.
.......................................................

वृषभ प्रगतीचा ध्यास तुम्हाला लागला असल्यामुळे एकलव्याप्रमाणे तुमची स्थिती असेल. या मार्गामध्ये काहीजण तुम्हाला साथ देतील, तर काहीजण सोडून जातील. पण तुम्हाला या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसेल. व्यवसाय धंद्यात पूर्वी केलेले काम चांगली वसुली करून देईल. त्यामुळे स्वतच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी नवीन व्यावसायिक जागा खरेदी करावीशी वाटेल. आíथकमान उंचावेल. नोकरीमध्ये इतरांपेक्षा जास्त चांगली संधी किंवा सुविधाकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये मोठय़ा खरेदीचे बेत पार पडतील. ज्येष्ठांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रसंग साजरा होईल.
......................................................

मिथुन तुमच्यातील नवीन ऊर्मीचा सर्व आघाडय़ांवर तुम्हाला उपयोग होईल. समयसूचकता हे तुमच्या राशीला लाभलेले वरदान आहे. त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. व्यवसाय उद्योगात नवीन पद्धतीचे काम सुरू होण्याची नांदी होईल. पशाची जरी अजूनही तंगी असली तरी हितचिंतक किंवा आíथक संस्थेतून आश्वासन मिळाल्यामुळे तुम्ही उत्तेजित व्हाल. नोकरीमध्ये तुम्हाला आवडणारे काम मिळेल. ह्य कामात तुम्ही तुमचे कौशल्य, नियोजनक्षमता पणाला लावाल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी थोडासा दुरावा निर्माण होईल. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. घराची डागडुजी कराल.
.......................................................

कर्क एकीकडे नवीन योजना आणि इच्छाआकांक्षा तुम्हाला आकर्षति करतील तर दुसरीकडे नित्य व्यवहाराकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष द्यावे लागेल. सर्व कामे एकटय़ाने हाताळण्याचा अट्टहास न ठेवता योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड करा. त्यांच्यावर सतत देखरेख असू द्या. व्यवसाय उद्योगात सध्या जरी पशाची चिंता नसली तरी बाजारातील घडणाऱ्या घडामोडींमुळे किंवा स्पर्धकांच्या हालचालींमुळे एक प्रकारची असुरक्षितता वाटेल. तुमचा पवित्रा सावध ठेवा. नोकरीमध्ये कर्तव्यात केलेली कसूर किंवा झालेली चूक वरिष्ठांना आवडणार नाही. घरगुती गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागेल.
.......................................................

सिंह काही व्यक्ती किंवा वातावरण आपल्यापासून जेव्हा लांब जाते तेव्हा मनामध्ये भविष्यविषयी किंवा प्रगतीविषयी एक अनामिक भीती असते. पण नंतर ज्या घटना घडतात, त्यावरून जे घडते ते चांगल्यासाठीच असा निष्कर्ष आपण काढतो. तुम्हाला असाच अनुभव येण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी धाडस करायचे तुम्ही ठरवाल. अपेक्षित व्यक्तींकडून नाही, पण इतर मार्गाने अचानक मदत मिळाल्यामुळे हायसे वाटेल. नोकरीमध्ये लाभदायक स्थळी किंवा जागी नेमणूक होण्याची शक्यता आहे. घरामध्ये प्रिय व्यक्तींची अनुपस्थिती असल्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल.
.......................................................

कन्या सर्व ग्रहमान तुम्हाला चांगले असल्यामुळे तुमचे इरादे बुलंद असतील. तुम्ही स्वयंसिद्ध व्हाल. शनी नेपच्युन त्रिकोण तुमच्यातील कल्पनाशक्तीला वाव देईल. मंगळ हर्षल केंद्रामध्ये कर्तव्यामध्ये कसूर न करता तुम्ही जीवनाचाही भरपूर आस्वाद घ्याल. तुमच्यामध्ये धाडस निर्माण होईल. व्यवसाय उद्योगामधे जनसंपर्क प्रसिद्धीवगरे माध्यमातून स्वतचे वेगळेपण सिद्ध कराल. उलाढाल हळूहळू वाढेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाला महत्त्व आल्यामुळे तुमची बडदास्त ठेवली जाईल. घरामध्ये तुमचा सल्ला व निर्णय याचा इतरांना आधार वाटेल.
.......................................................

तूळ तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीसंबंधी काही चिंता असतील तर त्या हळूहळू कमी होतील. काही हितसंबंध अचानक तुटतात त्या वेळेला आपल्याला एक प्रकारची रुखरुख लागते की, आता पुढे काय वाढून ठेवले आहे. पण त्यातूनच काहीतरी चांगले निर्माण होते. या आशेवर माणूस जगत राहतो अशी आशा ठेवायला हरकत नाही. व्यवसाय उद्योगात नवीन पद्धतीचे काम हाती घ्यावेसे वाटेल. त्या दृष्टीने नवे हितसंबंध जोडले जातील. नोकरीमध्ये बदल हवा असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करा. नित्यक्रमामध्ये चूक होऊ देऊ नका. घरामध्ये मंगलकार्याची नांदी होईल.
.......................................................

वृश्चिक अष्टमस्थानातील ग्रहांचे आधिक्य वाढल्यामुळे वातावरणातील प्रतिकूलता तुम्हाला प्रकर्षांने जाणवेल. नेमके अशाच वेळेला सभोवताली असणाऱ्या व्यक्तींची नातीगोती किंवा इतर समीकरणे बदलतात असे लक्षात येईल. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वयंभू बनणे चांगले. व्यापार उद्योगातील हातातील काम न सोडता उत्पन्नाचा नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. नोकरीत सहकारी आणि वरिष्ठ यांच्या दुटप्पी वागण्याचा अनुभव येईल. तुम्ही केलेले काम बिनचूक असल्याची खात्री करा. घरामध्ये सर्वाशी जुळवून घेता घेता मधूनच तुमचा तोल जाण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे लक्ष ठेवा.
.......................................................

धनू मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा उत्साहाचे वारे संचारू लागेल. नवीन कल्पनांना चालना मिळण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती दृष्टिक्षेपात येईल. व्यापार उद्योगात स्पध्रेत टिकून राहण्यासाठी आणि गिऱ्हाईकांना आकर्षति करण्यासाठी जाहिरातीचे वेगळे तंत्र अमलात आणाल. नोकरीमध्ये आधी स्वार्थ आणि नंतर परमार्थ असे धोरण ठेवलेत तर तुमचाच फायदा होईल. हितशत्रूंवर मात करण्याची संधी मिळेल. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवाल. त्यासाठी जास्त पसे खर्च कराल. तरुणांवर नियंत्रण ठेवणे जड जाईल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल.
.......................................................

मकर सभोवतालची परिस्थिती जेव्हा बदलत असते, त्या वेळेला तुम्ही एकदम सावध होता. थांबा, पाहा आणि पुढे जा असा दृष्टिकोन ठेवून स्वतला सावरता. या तुमच्या गुणाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. व्यापार-उद्योगामध्ये हातातील पशाचा काटकसरीने वापर करा. कारण काही अनपेक्षित कारणांकरिता तुम्हाला त्याची गरज पडेल. कामाचा वेग थोडासा कमी होईल. नोकरदार व्यक्तींनी अनेक गोष्टी हाताळण्यापेक्षा एका वेळी एक काम हातात घेतले तर कामाचा दर्जा चांगला राहील. घरामध्ये डागडुजी, मुलांचे करिअर आणि एखाद्या सदस्याच्या स्वास्थ्याकरिता वेळ आणि पसे हातात ठेवा.
.......................................................

कुंभ तुम्ही अधिक सक्रिय बनाल. जेव्हा एखादे काम कठीण असते त्या वेळेला तुम्ही गांगरून जात नाही. उलट त्या प्रश्नावर तुमची बुद्धी पणाला लावून काहीतरी चांगला मार्ग शोधून काढता. या तुमच्या स्वभावाला तातडीने होणाऱ्या कृतीचीही जोड मिळणार आहे. त्यामुळे तुमचे ईप्सित साध्य होईल. व्यवसाय धंद्यामध्ये गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरता थोडीशी खर्चीक पण प्रतिस्पध्र्यापेक्षा वेगळी योजना अमलात आणाल. पूर्वी गमावलेली एखादी ऑर्डर अचानक मिळून जाईल. नोकरीत इतरांना न जमलेले काम तुम्ही पूर्ण करून दाखवाल. विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील.
.......................................................

मीन तुमची इच्छा असो वा नसो, दैनंदिन कामांबरोबर तुम्हाला घरातील न चुकवता येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्यावे लागेल. अर्थातच त्यामुळे व्यापार आणि उद्योगामध्ये हाताखालच्या व्यक्तींवरती नेहमीपेक्षा जास्त अवलंबून राहावे लागेल. परंतु महत्त्वाचे निर्णय स्वतच घ्या आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख करा. नोकरीमध्ये आजचे काम उद्यावर टाकण्याकडे कल राहील. एखादा जुना साथीदार तुमच्यापासून लांब जाईल. विद्यार्थ्यांना करिअरसाठी कुटुंबापासून लांब राहावे लागेल.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com