७ जून २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
फोटो गॅलरी

करिअर विशेष - कव्हर स्टोरी
पावले भविष्याची...
डॉ. चंद्रकांत चिंतामण वाकणकर पशुवैद्यक जगताचे प्रणेते
शुद्ध बीजापोटी...!
तुमची क्षमता, तुमचा कल
संधी प्रशासकीय सेवेतील
ग्रामीण युवकांसाठी उद्योगाची पेस
अवकाशाचा अभ्यास करायचाय?
मायक्रोबायोलॉजी की बायोटेक्नॉलॉजी?
पर्यावरणशास्त्रातील करिअरच्या संधी
चित्रपट क्षेत्रातील करिअर - एक उत्तम संधी
मुलांच्या करियरसाठी.. पालकांनीही शिकायला हवं...
तुम्हाला एचआर पर्सन व्हायचंय?
परकीय भाषा : छंद की करिअर?
प्रिंट्रिंग टेक्नॉलॉजीतील संधी
सरकार चालवण्याची शाळा...
मलेशियातील ‘माणुसकी’ विद्यापीठ
शालेय शिक्षणातली खान अ‍ॅकॅडमी!
कौशल्याने होत आहे रे...
‘आनंदा’चे झाड...!
वाटा करिअरच्या...

क्रीडा
स्त्री-मिती
आरोग्यम्

द्या टाळी...

शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
माझं शेतघर
झिरो अवर
संख्याशास्त्र
पर्यटन
सहप्रवासी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
स्वत:चा आतला आवाज ओळखा!
वयाच्या बेचाळिशीत असलेला आनंद थेट लडाखमध्ये पोहोचला होता. ४२ वर्षे कशी निघून गेली याचा विचार करायलाही त्याला आजवर वेळ मिळाला नव्हता.. पण मध्यंतरी ऑफिसमध्येच घडलेल्या एका प्रसंगानंतर मात्र त्याचे आजवर केवळ कामावरच केंद्रित झालेले सारे लक्ष उडून गेले होते. गरिबीतून वर येत एका बडय़ा सॉफ्टवेअर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत मारलेली मजल हे खरे तर खूप मोठे यश होते. त्याचे हे यश वर्तमानपत्रे, मासिके यांमधूनही प्रकाशित झाले होते. अनेक तरुणांसाठी तो ‘रोल मॉडेल ’ ठरला होता. आणि का नाही ठरणार? ज्या कुटुंबात दोन वेळचे जेवण पोटभर मिळणेही मुश्कील तिथून त्याच्या आयुष्याला सुरुवात झाली. ८५ साली तो दहावी झाला त्या वेळेस भविष्य संगणकात असणार हे स्पष्ट झाले होते. मग त्याने जबरदस्त अभ्यास करत शिष्यवृत्त्या मिळवल्या आणि त्या बळावर आपले स्वत:चे शिक्षण पूर्ण केले.

कव्हर स्टोरी
पावले भविष्याची...
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला यशाचा हमखास मार्ग सापडावा लागतो, पण आपण कोणत्या मार्गाने गेल्यानंतर यश हाती येईल, हे मात्र कधीच कुणी सांगू शकत नाही. शिवाय एखाद्या यशस्वी उद्योगामध्येही अपयशी ठरलेली माणसे असतातच की. एकूण काय, तर भविष्यात काय घडणार याचा अंदाज येणे तसे थोडे कठीणच. पण तरीही माणसे भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतातच आणि आपल्या आयुष्याच्या उमेदीच्या काळात करिअरची निवड करताना तर भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करावाच लागतो. प्रत्येक जण आपापल्या परीने हा प्रयत्न करत असतो. काही जण तर यातच माहीर असतात. त्यांना फ्युचरॉलॉजिस्ट असे म्हणतात म्हणजेच भविष्यवेत्ते (म्हणजे ज्योतिषी नव्हेत) गेल्या अनेक वर्षांमध्ये ही एक नवीन ज्ञानशाखाच निर्माण झाली आहे.

कव्हरस्टोरी
डॉ. चंद्रकांत चिंतामण वाकणकर पशुवैद्यक जगताचे प्रणेते
आयुष्यात अनेकदा करिअरच्या बाबतीत कोणतेही नियोजन केलेले नसते. कधी अपघाताने किंवा मग कधी गरज म्हणून एखादा विषय निवडला किंवा स्वीकारला जातो. मात्र नंतर आवड निर्माण होते आणि मूळ कल्पकतेची देणगी लाभलेली असेल तर अशी व्यक्ती मग कोणत्याही क्षेत्रात असली तरी ती केवळ यशस्वीच होत नाही तर इतरांसाठी आदर्श म्हणून पुढे येते. अशा मोजक्या व्यक्तींपैकी प्राणीतज्ज्ञांच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. चंद्रकांत चिंतामण वाकणकर. पशुवैद्यकांच्या क्षेत्रात डॉ. वाकणकर हे नाव अतिशय आदराने घेतले जाते. आज या क्षेत्रात प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या अनेक सर्जरी या भारतात प्रथम डॉ. वाकणकरांनी केल्या आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात त्यांचा हातखंडा आहे.


कव्हरस्टोरी
शुद्ध बीजापोटी...!
येणारा काळ म्हणजे पुढची शंभर वर्षे जगभरात ज्या क्षेत्राची सर्वाधिक चलती असणार आहे, ते क्षेत्र आहे जैव-तंत्रज्ञानाचे. या क्षेत्रामध्ये केवळ संधी नव्हे तर पैसाही असणार आहे. जगातील हे सर्वाधिक महत्त्वाचे क्षेत्र तर असणारच, पण भविष्यातील माणसाचे आर्थिक, सामाजिक आदी सर्व प्रकारच्या व्यवहारांवर जबरदस्त परिणाम करण्याची क्षमता असलेले क्षेत्र म्हणून जैव-तंत्रज्ञानाकडे पाहिले जाते. जैव-तंत्रज्ञानाच्या भविष्यवेधी क्षेत्रातील काही अनोख्या घटना व भविष्यातील संधींची चुणूक यांचा शोध घेता एक सुखद धक्काही मिळाला, एका मराठी माणसाने या क्षेत्रात जागतिक आघाडी घेतल्याचा!
जागतिक आघाडी घेण्यासारखे असे या व्यक्तीने केले तरी काय? या भूतलावर मनुष्य-प्राण्यांचा जन्म झाला त्याचे मूळ ठिकाण आफ्रिकेमध्ये आहे, असे मानले जाते. तिथूनच मग माणूस आणि प्राणीदेखील जगभरात पोहोचल्याचे सांगितले जाते. आताच्या जमान्याच्या बाबतीत बोलायचे तर आफ्रिका हा इतर जगाच्या तुलनेत मागास भाग मानला जातो, कारण तिथे आजही माणूस अशा अवस्थेत आहे की, तो आदिमच वाटावा. हीच नवी बाजारपेठ आहे, याची जाणीव त्यांना झाली.

कव्हरस्टोरी
अवकाशाचा अभ्यास करायचाय?
भारतात गेल्या दशकभरात अंतराळ विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राची मागणी प्रचंड वाढलेली दिसते. कधी काळी फक्त विज्ञान कथांमधून घडणारी अंतराळ सफर आता अनेकांच्या मनात उड्डाण घेताना दिसू लागली आहे, पण हे उड्डाण यशस्वी करायचे असेल तर या क्षेत्राचा पहिला मंत्र म्हणजे प्रचंड मेहनत करण्याची तयारी. हा उल्लेख सुरुवातीलाच करण्याचा उद्देश असा की, सध्या बरीच तरुण मंडळी अंतराळवीरांमुळे या क्षेत्राला मिळालेल्या ग्लॅमरला भुलून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतात. खरं तर आपणही यानात आरूढ होऊन आकाशात जाऊ असं स्वप्न पाहाणं फारसं प्रॅक्टिकल नाही आणि तेवढय़ापुरतं हे क्षेत्र सीमित नाही. त्यामुळे मुळात या विषयाची आवड, गणित आणि भौतिकशास्त्रातील उत्तम गती आणि रस असणाऱ्यांनीच या क्षेत्राकडे वळावं.

कव्हरस्टोरी
चित्रपट क्षेत्रातील करिअर - एक उत्तम संधी
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांना आज उपलब्ध होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना या चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते, परंतु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बहुतांश जण खूप धडपडत आपले मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे सुरुवातीला या क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींची आपण माहिती करून घेऊ या.


कव्हरस्टोरी
तुम्हाला एचआर पर्सन व्हायचंय?
मुलांनो लवकरच तुमचे दहावी व बारावीचे निकाल जाहीर होतील. आयुष्याला महत्त्वाचे वळण देणारे हे निकाल तुमच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतील. तुमच्यापकी अनेकांना डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावे असे वाटत असेल तर कोणाला वाणिज्य, कला, मानव संसाधन असे विषय खुणावत असतील. काही धडपडय़ा लोकांना स्वत:च उद्योजक बनून लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावासा वाटत असेल. क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्याकडे त्याविषयी पूर्ण व अचूक माहिती असणे म्हणजे यशाची पन्नास टक्के खात्री असण्यासारखे असते. आज आपण अधिक जाणून घेणार आहोत मानव संसाधन (एचआर) या आव्हानात्मक क्षेत्राबद्दल- त्यातील संधींबद्दल, करिअरबद्दल.
मानवी संबंध जिथे जिथे येतात तिथे तिथे खूप नाजूक व गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात व जर आपला संबंध उच्चशिक्षित व महत्त्वाकांक्षी लोकांबरोबर आला तर ते प्रश्न अजून टोकदार होतात. अशा वेळी उत्तम एच.आर. कौशल्य असणाऱ्या व्यक्तीमुळे सर्व प्रश्न सुरळीतपणे व सर्वाना रुचतील अशाप्रकारे सोडविले जाऊ शकतात.

भविष्य