३१ मे २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
इंडियन प्रिमिअर लीग २०१३ घोडे बाजार - लालसेचा बाजार
रेसकोर्स द इनसाईड स्टोरी
फिक्सिंग इथले संपत नाही!
फिक्सिंगच्या इतिहासात...
फिक्सिंग : झटपट श्रीमंतीचा राजमार्ग

प्रासंगिक
आयडिया एक्स्चेंज
चर्चा

उपक्रम

सेकंड इनिंग
विज्ञान तंत्रज्ञान
भंकसगिरी
कवितेचं पान
शब्दरंग
नाटक
वाचक-लेखक
आरोग्यम्
पाठलाग
लग्नाची वेगळी गोष्ट
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाईल्डक्लिक
सहप्रवासी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
पैसा बोलता है...
शाळा- महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागण्यास आणि आयपीएलचा हंगाम सुरू होण्यास एकच गाठ पडते. अर्थात हा काही निव्वळ योगायोग नाही तर हे सारे ठरवून होते. कारण त्यामागचे अर्थशास्त्र पक्के आहे. ही आयपीएल एरवी इतर मोसमात खेळवली तर एवढा प्रतिसाद निश्चितच मिळणार नाही. भारतातील उन्हाळी सुट्ट्या प्रेक्षकवर्ग खेचून आणण्यास पोषक ठरतात. आयपीएलची सारी गणिते ही अर्थशास्रावर आधारलेली आहेत. अखेरीस तो एक व्यवसाय आहे, त्यामुळे साहजिकच त्यात नफा अधिकाधिक कसा वाढेल हे पाहिले जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयतर्फे आयपीएल हे एखाद्या कंपनीप्रमाणेच चालविले जाते. एखादा व्यवसाय कुणी व्यावसायिक पद्धतीने करत असेल तर त्यास हरकत घेण्याचे काहीच कारण नाही. पण आता आयपीएलमध्ये केवळ पसाच बोलतो आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती काही अचानक आणि अनपेक्षितपणे निर्माण झालेली नाही.

कव्हरस्टोरी
इंडियन प्रिमिअर लीग २०१३ घोडे बाजार - लालसेचा बाजार
आयपीएलला सुरुवात झाली त्या वेळेस रेसकोर्सवरच्या एका बुकीने प्रतिक्रिया व्यक्त केली होती, नवा आधुनिक घोडेबाजार सुरू झाला.. या प्रतिक्रियेनंतर त्याच्यावर टीकाही झाली आणि अनेकांनी त्याला वेडय़ात काढले. पण आज त्याच्या विधानाची सत्यता पटते आहे.
खरे तर रेसकोर्स कसा चालतो हे आपण व्यवस्थित समजून घेतले तर आपल्याला रेसकोर्स आणि आयपीएल यांची तुलना व्यवस्थित करताही येईल व त्यातील साम्यभेदही लक्षात येतील. रेसकोर्समध्ये लोकांनी बेटिंगसाठी लावलेले पसे दोन प्रमुख प्रकारांमध्ये मोडतात. टोट आणि बुकमेकर्स. यात बुकमेकर्समध्ये तुम्हाला जिंकण्याआधीच करासह असलेले पसे आधीच भरावे लागतात. म्हणजेच १०० रुपयांचे बेटिंग करण्यासाठी १३० रु. भरावे लागतात, तर टोटमध्ये बेटिंगसाठी लावलेले सर्व पसे एकत्र करून त्यातील सरकारी हिस्सा बाहेर काढला जातो आणि मग उरलेले पसे जिंकणाऱ्यांमध्ये वाटले जातात. आपला घोडा जिंकला किंवा हरला तरी घोडेमालकाला फारसा फरक पडत नाही. कारण तो त्याने शौक म्हणून किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून पाळलेला असतो.

कव्हरस्टोरी
रेसकोर्स द इनसाईड स्टोरी
महालक्ष्मी रेसकोर्सवर बेटिंग करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना खासकरून नवख्या व्यक्तीस दिलेल्या अशा या सूचना आहेत. याचा एक फलक रेसकोर्समध्येही बेटिंग काऊंटरजवळ लावण्यात आला आहे आणि आता सारे काही ऑनलाइन असल्याने रेसकोर्सचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या इंटरनेटवरील संकेतस्थळावरही ही माहिती ठळकपणे देण्यात आली आहे.
अगदी पहिल्यांदाच कुणी बेटिंग करण्यासाठी आले तर त्याने काय करावे आणि काय टाळावे, याची माहितीही स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. रेसकोर्सवर बेटिंगला कायदेशीर मान्यता असली तरी केवळ सज्ञान म्हणजेच वय वर्षे १८ पार केलेली व्यक्तीच इथे बेटिंग करू शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवाजी पार्क येथे स्मारक उभारणीस झालेल्या विरोधानंतर शिवसेनेचे लक्ष अलीकडेच गेले ते भाडेपट्टा संपत आलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सकडे. एरवी सामान्य माणसाच्या चर्चेत फारसा नसलेला हा रेसकोर्स अलीकडेच या नव्या प्रस्तावामुळे चर्चेत आला.


कव्हरस्टोरी
फिक्सिंग इथले संपत नाही!
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग वर्तुळाने क्रिकेट विश्वाला पुन्हा एकदा हादरा बसला. यापूर्वी फिक्सिंगचे प्रकार समोर आले नाहीत असे नाही, पण हे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत आणि त्यामध्येच बीसीसीआय आणि आयसीसी कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा सर्वापुढे आले आहे. क्रिकेटला लागलेली ही कीड, हा रोग कधी संपुष्टात येणार आहे की नाही, याचे उत्तर सध्यातरी कोणाकडेच नसेल. कारण त्या दृष्टीने पावले उचलली गेलेलीच नाहीत आणि ती उचलली जातील कशी? फिक्सिंगमध्ये कधीही मोठे मासे गळाशी लागलेले नाहीत आणि त्यांना पडकण्यासाठी प्रशासन आणि व्यवस्था पुरेशी आहे का? हा पुन्हा वादाचा विषय आहे.
राजस्थान रॉयल्सचे एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक करत फिक्सिंगची पाळेमुळे कायम असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही खेळाडूंना स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी अटक केल्यावर हे सारे प्रकार थांबले असतील, असे वाटत होते.

कव्हरस्टोरी
फिक्सिंगच्या इतिहासात...


हॅन्सी क्रोनिए- (७ एप्रिल २०००)-

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए व त्याच्या सहकाऱ्यांनी भारताविरुद्धचा एकदिवसीय सामना फिक्स केल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांकडून चौकशी. हर्षल गिब्ज, पीटर स्ट्रायडोम व निकी बोये यांनी लाच स्वीकारल्याची कबुली. क्रोनिए याने १० ते १५ हजार डॉलर्सची लाच घेतल्याची कबुली. त्यानंतर क्रोनिएची हकालपट्टी. २००२ मध्ये विमान अपघातात मृत्यू होईपर्यंत क्रोनिए अज्ञातवासात राहत होता.

कव्हरस्टोरी
फिक्सिंग : झटपट श्रीमंतीचा राजमार्ग
क्रिकेटमधील ‘मॅच फिक्सिंग’ ही बाब नवी नाही. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरू आहे. काही छुप्या पद्धतीने तर काही उघडपणे. संघातील खेळाडूंना फोडण्याची पद्धत गेल्या १०-१२ वर्षांपासून सुरू झाली आहे. त्याआधी काही खेळाडूंना बुकींनी आपल्या (व त्यांच्या) स्वार्थासाठी लालुच दाखविली नसेलच, असे ठामपणे सांगता येणार नाही. याचे कारण म्हणजे एखादा दिग्गज खेळाडू शून्यावर वाईट चेंडूवर बाद व्हायचा, तेव्हा असे अजिबात वाटायचे नाही की, फिक्सिंग असावे. परंतु आता एखादा संघ हरू लागला तर लगेचच क्रिकेट रसिकांमध्ये फिक्सिंगची चर्चा सुरू होते. याचे कारणही तसेच आहे. मॅच फिक्सिंगचा प्रकार घडलाच नाही, असे होत नाही.
भारतीय संघातील होतकरू वेगवान गोलंदाज श्रीशांत फिक्सिंग रॅकेटमध्ये अडकल्यानंतर अनेकांना धक्का बसला. आपला मित्र जिजू जनार्दन याच्यामुळे आपण अडकल्याचा दावा तो करीत असला तरी श्रीशांत दुधखुळा बच्चा मुळीच नाही. या अवैध धंद्यातून मिळणारे पैसे श्रीशांतने नाकारले का? रगेल श्रीशांतला आपले शौक पुरे करताना काहीच वाटले नाही का?


प्रासंगिक
एलबीटीचा तिढा
पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि पिंपरी या महापालिकांमध्ये १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू करण्यात आला आणि एलबीटीविरोधातील आंदोलनाने महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला. पाच मोठय़ा महापालिकांमध्ये एलबीटी लागू झालाच, शिवाय मुंबईत १ ऑक्टोबरपासून एलबीटी लागू होणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. त्यामुळे एलबीटीविरोधातील आंदोलनाची व्याप्ती या वेळी मोठी होती आणि त्यात व्यापाऱ्यांची आक्रमकताही प्रकर्षांने दिसत होती. अर्थात, आधी लाक्षणिक बंद, त्यानंतर बेमुदत बंद, धरणे, मोर्चे, बैठका, सभा, मेळावे आदी सर्व प्रकारे आंदोलने करूनही एलबीटीबाबत शासन ठाम राहिले आणि व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद शासनाने कोणावरही कारवाई न करता मुत्सद्दीपणाने बंद पाडला. एक मात्र निश्चित की, या नव्या कराच्या वादामुळे महापालिका आणि राज्यातील काही प्रमुख शहरे चांगलीच ढवळून निघाली.

भविष्य