२४ मे २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
दखल
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी
वाघांच्या जंगलात, माणसांचा धुमाकूळ
हव्यास वाघ बघण्याचा!
श्रद्धांजली
आगामी
स्मृती
दुष्काळ
क्रीडा
स्त्री-मिती
युवा
आरोग्यम्
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
मनोरंजन
लग्नाची वेगळी गोष्ट
वाचक-लेखक
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
लक्ष्मणरेषेच्या आत-बाहेर!
पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या गुरुमारा राष्ट्रीय उद्यानामध्ये जाण्याचा योग अगदी अलीकडेच आला. हे राष्ट्रीय उद्यान भारतीय गेंडा, रानगवा आणि हत्ती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. उद्यानात शिरण्याच्या आधीपासून सफारीसाठी आलेल्या प्रत्येकाचीच गाइडकडे मागणी होती, प्राणी दिसलेच पाहिजेत. खासकरून गेंडा आणि रानगवा किमानपक्षी दिसलेच पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटत होते. अशी अपेक्षा असण्यात आणि वाटण्यात काहीच गैर नाही, पण त्यासाठी जंगलाचे नियम पाळण्याची मात्र बहुतांश कोणाचीच तयारी दिसत नव्हती. सहलीला आल्यासारखे वातावरण होते. जंगलात जायचे तर जंगलवाचन करायला हवे. प्राणी हा जंगलाचा अविभाज्य घटक आहे, पण फक्त प्राणी म्हणजे जंगल नव्हे. ज्या प्रकारच्या जंगलात त्या प्राण्यांचा अधिवास आहे, ते जंगल, तेथील भौगोलिकता समजून घेणे हे प्राणी पाहण्यापेक्षाही अधिक रसपूर्ण असते. भौगोलिकता आणि हवामान यांच्या वैशिष्टय़पूर्णतेमुळेच जंगलांचे वेगळेपण ठरत असते.

कव्हरस्टोरी
वाघांच्या जंगलात, माणसांचा धुमाकूळ
‘‘आमच्या बरोबर या आणि हमखास वाघ पाहा.’’
‘‘वाघ नाही दिसला तर, निम्मे पसे परत.’’
‘‘आमच्या पर्यटकांना वाघ पाहण्यात हमखास यश.’’
‘‘लावता पज, आम्ही वाघ दाखवणारच!’’
अशा स्वरूपाचे फलक अथवा जाहिराती भविष्यात आपल्या वाचनात आल्या तर फार काही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण गेल्या दहा वर्षांत ज्या पद्धतीने वन्यजीव पर्यटनाचा पायंडा आपल्याकडे पडला आहे आणि तो ज्या पद्धतीने ठोकून ठोकून आणखीन मजबूत करत आहोत ते पाहता अशा जाहिरातांचे दिवस फार काही दूर नाहीत. आज देशात जेवढे लोक वन्यजीव पर्यटनाचे आपले दुकान मांडून बसले आहेत, अशांपकी कोणालाही जाऊन विचारले की, वाघ दिसणार का? तर ते छातीठोकपणे हो म्हणूनच म्हणून सांगतात. परत मागच्या ट्रिपचे दाखलेदेखील देतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या जाहिरातीत वन्यजीव म्हणून जे काही ठळकपणे मांडलेले असते त्यात फक्त वाघांचाच समावेश असतो.

कव्हरस्टोरी
हव्यास वाघ बघण्याचा!
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांनी पट्टेदार वाघाला अक्षरश: घेरून ठेवल्याची छायाचित्रे पर्यावरण जगताला प्रचंड अस्वस्थ करणारी आहेत. भौतिक सुखांसाठी सिमेंटच्या वसाहती उभारताना हिरव्यागार जंगलांवर घाव घालणारा ‘माणूस’ नावाचा प्राणी आता स्वत:च्या क्षणभराच्या विरंगुळ्यासाठी जंगलात राहणाऱ्या मूक वन्यजीवांच्या दैनंदिन जीवनातही हस्तक्षेप करू लागला आहे. खरे तर वन पर्यटन हा एक आनंद देणारा प्रसंग आणि जंगल वाचनातून स्वत:चे विश्व आणखी परिपक्व करणारी अतुलनीय अनुभूती आहे. परंतु, वन पर्यटनाला आता माणसाच्या हैदोसाचे काळेकुट्ट ग्रहण लागले असून जंगलातील प्राण्यांच्या आयुष्याची कोणतीही चिंता माणसांना नसल्याचे एकेका प्रसंगातून स्पष्टपणे ध्वनित होऊ लागले आहे. जंगलात वावरताना काही नियम आणि शर्ती पाळणे अनिवार्य आहे, परंतु या शर्ती आणि नियमांना बेफिकीर माणसाच्या लेखी कोणतीही किंमत नसल्याचेच हे द्योतक आहे. राज्याराज्यांचे वन खाते या हैदोसापुढे आता अक्षरश: हतबल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.


श्रद्धांजली
शब्दांच्या क्षेत्रातल्या धर्मयोद्धय़ा!
सत्त्वशीला सामंत यांनी लिहिलेला ‘शब्दानंद’ हा त्रभाषिक शब्दकोश पुढय़ात घेऊन बसले आहे. इंग्रजीतल्या ‘क्रूसेडर’ या शब्दाला पर्याय शोधते आहे. आजच का बरं आठवण झाली या शब्दाची? बरोबर, सत्त्वशीलावरच लेख लिहायचा आहे आणि सत्त्वशीला म्हटलं की डोळ्यांसमोर ‘क्रूसेडर’ ही अक्षरं उमटतात. क्रूसेडरला पर्याय आहे ‘धर्मयोद्धा’ या शब्दाचा. खरोखरच तशी होती ती.
आपल्या ६८ वर्षांच्या आयुष्यातली निम्म्याहून अधिक र्वष तिनं मराठी भाषेच्या शुद्धलेखनासाठी, तिच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी निरनिराळ्या चळवळी उभारण्यात वेचली. मराठी भाषेविषयीची तिची आस्था ही निव्वळ मातृभाषा म्हणून आली नव्हती तर संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश यांच्या डोळस अभ्यासातून आली होती. किंबहुना ‘अभ्यासेन वर्तते’ हाच तिच्या जीवनाचा पाया होता. हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास हेच तिचं जीवनसूत्र होतं. ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात सध्या चालू असलेल्या ‘शब्दरंग’ या सदरातही तिच्या या सखोल अभ्यासाचंच प्रतििबब पडलेलं दिसतं. मराठी भाषेच्या सौष्ठवाबद्दल, डौलदारपणाबद्दल तिच्या मनात प्रेम होतं तसंच तिच्या शुद्धलेखनाबद्दल तिच्या मनात एक तीव्र कळकळ होती.

आगामी
संमेलन जादूगारांचे...
ऱ्हाम ऱ्हीम ऱ्हुम असे कुठले तरी मंत्र पुटपुटत जादूगार तुमच्यासमोरची नाणी गायब करतो.
काचेच्या पेटीत बसवलेली तरुणी अर्धी कापतो आणि पुन्हा तशीच्या तशी उभी करतो.
बघणारे आश्चर्यचकित होत असतानाच कुणाला तरी हवेत तरंगवून दाखवतो.
एखाद्या बाबा-बुवाच्या वरताण हवेतून एखादी वस्तू काढून दाखवतो..
त्याचे हे जादूचे प्रयोग बघणारी सहा-सात वर्षांची मुलं असोत की सत्तरीचे वयोवृद्ध. जादूचे खेळ पाहताना सगळेच जण देहभान विसरतात. त्या जादूगाराने नेमकं काय केलं असेल याचा विचार करत दिङ्मूढ होऊन जातात. जादूगाराची ती अदाकारी, त्याची सफाई, मनुष्यस्वभावाचा अभ्यास, हातचलाखी या सगळ्याची पातळी जेवढी जास्त तितकी पाहणारा खिळून राहण्याचं प्रमाण जास्त.
अशा या जादूला काय म्हणायचं? निव्वळ हातचलाखी? की निव्वळ सफाईदारपणा? की कला?

मनोरंजन
‘रज्जो’ येते आहे...
पहाटे पाच वाजता लेखक विश्वास पाटील ‘टॉवरवाडी’ या आदिवासी पाडय़ात आले आणि संपूर्ण गावात जणू चैतन्य सळसळले. त्या पाडय़ातील घर आणि घर सज्ज झाले होते. जणू काही गावात लग्न किंवा मोठा समारंभ असावा. कारणदेखील तसेच होते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनदेखील अमेरिकेतील सुप्रसिद्ध ग्रॅन कॅनियनच्या जातकुळीतील उंचच उंच पहाड रायगड जिल्ह्य़ात आहेत, याची पुरेशी कल्पना ना रायगडवासीयांना आहे, ना मुंबईकरांना. ते आकाशाशी स्पर्धा करणारे उंच पहाड, तेथील सुळके प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची भव्यता आणि सौंदर्य लक्षातच येणार नाही. ‘रज्जो’चा विषय पक्का झाल्यानंतर विश्वास पाटील देशातील आघाडीचे कॅमेरामन बिनोद प्रधान यांना या आदिवासी गावात घेऊन गेले असता हे प्रतिभावान छायालेखकदेखील या परिसराच्या प्रेमात पडले.

दखल
निरक्षर लेखक...
दर्शन सिंग हे पंजाबमधल्या पक्का गावातील एक सामान्य शेतकरी. एखाद्या शेतकऱ्याचं जीवनमान जसं असावं तसंच त्यांचंही आहे. सकाळी उठणे, घरातील कामं उरकणे आणि शेतात जाणे. शेतामध्ये काम करणे, संध्याकाळी मित्रांसोबत गप्पागोष्टी करणे. एकूण सरळमार्गी जीवन. पण दर्शन सिंग केवळ शेतकरी नाहीत, ते एक लेखक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत २९ पुस्तकं लिहिली आहेत. पण ते पूर्णपणे निरक्षर आहेत. त्यांच्याकडील सरकारी कागदपत्रांवर त्यांचा अंगठा दिसतो. ते सही करू शकत नाहीत. असं असतानासुद्धा त्यांनी तब्बल २९ पुस्तकं लिहिली आहेत. आपल्या निरक्षरपणाविषयी त्यांना खंत आहेच, पण त्यांनी त्यावर मार्ग शोधून काढला आहे.
त्याबद्दल ते सांगतात, ‘‘माझ्या पत्नीलादेखील लिहिता-वाचता येत नव्हते, पण ती माझ्या मुलींकडून लिहायला आणि वाचायला शिकली. माझ्या वडिलांनी आणि पत्नीने मला शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मी शिकू शकलो नाही. लिहायला-वाचायला शिकणं राहूनच गेलं.’’

 

भविष्य