१७ मे २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
n जॉय
चला, जंगल फिरायला...
सुट्टीतला उद्योग
टून्देशातून सुटका
गोष्ट एका डाँकीची!
पोगो...
मिकी, लाल परी आणि चिऊ
वर्गाचा लीडर
अतरंगी रे!
नातं...
एक होता मर्यादारमण...
झंप्याचे सैनिक
बिनकागदाचा नकाशा
कविता
खेळूया शब्दांशी...
करूया चंमतग..गम्माडी गम्मत
सुट्टी लागली... आता काय करू आणि काय नको...?
फोटो गॅलरी
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
आनंद लुटा, बहावा, वाहव्वा!
‘टेम्पल रन’चा ऑनलाइन गेम खेळून सिद्धार्थला कंटाळा येत होता. आताच कंटाळा आला तर अख्खी सुट्टी कशी काढायची? आई- बाबा पुस्तकं वाचण्यासाठी सारखे त्याच्या मागे असायचे आणि त्याला काही पुस्तकं फारशी आवडत नव्हती. आजोबा मात्र त्याला जे हवं ते करू द्यायचे आणि म्हणून तेच त्याला सर्वात जास्त आवडायचे. म्हणून त्याने आजोबांनाच सांगून टाकलं, की खरं तर त्याला गेम्स सगळ्यात जास्त आवडतात पण आता त्यांचाही कंटाळा आलाय.. आजोबा मी काय करू सुट्टीत, या त्याच्या प्रश्नावर आजोबा फक्त हसले. म्हणाले, ‘तुला फोटो काढायला आवडतात ना? बाबांचा डिजिटल कॅमेरा चार्जिगला लाव, सकाळीच जायचंय बाहेर आपल्याला. मी तुला कंटाळा न येणारी गोष्ट दाखवणार आहे !’
सकाळी उठल्यावर आजोबा त्याला जवळच्याच बगिच्यामध्ये घेऊन गेले. आणि पिवळ्या फुलांनी लगडलेलं एक झाड दाखवलं. ते म्हणाले, चार मिनिटं फक्त या फुलांकडंच पाहायचं.. त्यानंतर त्यांनी डिजिटल कॅमेरा हाती देऊन त्या फुलांचे फोटो सिद्धार्थकडून काढून घेतले.

n जॉय
चला, जंगल फिरायला...
‘झालं तर मग, आपण नक्की जायचं!’ गणूदादाचे हे शब्द कानी पडले आणि मग मुलांनी एकच गलका केला. खरं तर सुट्टीत रोज नवीन काय करायचं, हा तमाम आयांना पडलेला प्रश्न होता. खेळही रोजचे झाले होते. रोज सायंकाळी मुलं येऊन कुठंतरी फिरायला जाण्याची मागणी करायची. आता गावही तेच आणि बाजूला असलेले जंगलही तेच. त्यात रोज रोज वेगळं काय असणार? त्यामुळे गावी आली की, मग वाडीतल्या सर्व घरांमधली सगळी लहान मुलं एकत्र यायची आणि दिवसभर खेळ खेळायची. या सर्व मुलांमध्ये गणूदादा मात्र कधीच दिसायचा नाही. गेल्याच वर्षी दहावी होऊन तो कॉलेजमध्ये गेला. आता त्याला गावातून जिल्ह्य़ाच्या ठिकाणी कॉलेजला जावं लागतं. वाडीतल्या दोन-चार जणांनी विचारलं त्याला, ‘मुंबईला येणार का?’, तर तो गाव आणि जंगल दोन्ही सोडायला तयार नव्हता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जंगलात फिरायचा. गेल्या वर्षांपासून तर त्याच्या हाती कुणीतरी एक छान कॅमेरा दिला होता.

n जॉय
सुट्टीतला उद्योग
प्रिय मित्र बोक्या,
माझ्या आजीच्या सांगण्यावरून मी तुला हे पत्र लिहीत आहे. मी तिला सांगायचा प्रयत्न केला की हल्ली कोणी पत्रबित्र लिहीत नाही. फोन करतात, ईमेल करतात, एस.एम.एस. पाठवतात, वॉट्सअ‍ॅपवर चॅट करतात. लॅपटॉप वगैरे हाताशी असताना, हातात पेनबिन धरून कागदावर पत्र कसले लिहायचे? पण ती म्हणाली, पत्रलेखनाची एक चांगली प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुट्टीचा सदुपयोग कर आणि निदान चार मित्र-मैत्रिणींना पत्र पाठव. त्यांनाही उत्तर लिहायला सांग. पत्र लिहिण्यातला आणि वाचण्यातला आनंद काय असतो, हे तुझ्या मित्रांनाही कळेल. लिहायची सवय लागेल, मनातले विचार कागदावर उतरवता येतील. हातात कागद (किंवा पोस्टकार्ड) धरून आपल्याला आलेले पत्र वाचताना काय वाटते याचा एक अनुभव घ्या तुम्ही सगळेच. पत्रमित्र व्हा. तुझा मित्र बोक्या अधूनमधून पत्र लिहीत असतो असे त्याची आजी सांगत होती. मग तू का लिहीत नाहीस?
ही माझी आजी सुट्टीत बेळगावहून आली आहे. बेळगावला ती दर रविवारी कानडी तरुण-तरुणींना फुकट मराठी शिकवते. तिच्या सांगण्यावरून रोज अर्धा तास तरी या पत्रलेखनाला द्यावा असे ठरवत आहे. तू माझा पत्रमित्र होशील ना?


n जॉय
टून्देशातून सुटका

।। १ ।।
लांबूनच स्कूलबस येताना दिसली, तशी बिट्टची मम्मी सरसावली. तिनं बिट्टला हाक मारली. पण बिट्टचं तिच्याकडं लक्षच नव्हतं. बाजूलाच सोसायटीचे वॉचमन अंकल एक कार धूत होते. बिट्टचं सगळं ध्यान त्या कारच्या अंघोळीकडंच होतं. वॉचमन अंकल कारच्या बॉनेटवर बादलीतलं पाणी असं सप्पकन मारायचे. सगळं पाणी तिच्या नाकात, तोंडात, कानात, डोळ्यांत जायचं. मग त्या पाण्याचा मस्त फेसफेस व्हायचा. त्यांचे फुगे बनायचे. फटकन् फुटायचे. एक फुगा तर केवढा मोठा झाला होता. टेनिसच्या बॉलएवढा. बिट्टला जाम मज्जा वाटली. त्याच्या मनात आलं, समजा हा फेसाचा फुगा ड्रायरनं सुकवला, तर त्याचा कडककडक टेनिस बॉल बनेल?
‘‘बिट्टऽऽऽ, जायचंय ना शाळेत?..’’ मम्मी ओरडली.
आपली मम्मी म्हणजे डिट्टो विद्या बालनच! पण ती चिडली की तिचे डोळे कसे टीचरसारखे दिसतात! ते डोळे पाहून बिट्ट एकदमच शहाणा झाला. त्याने मम्मीच्या हातातली बॅग घेतली. ती एकशे दहा किलोची बॅग त्याने पाठीवर लटकवली. एकदा कारच्या अंघोळीकडं पाहून घेतलं. मम्मीला बाय केलं आणि तो स्कूलबसमध्ये चढला.

n जॉय
गोष्ट एका डाँकीची!

आटपाटनगरहून बजबजपूरकडे जाणारी वाट भैरवगड डोंगराला वळसा घालून जाते. आटपाटनगरमधील घरे आणि रस्त्यासाठी लागणारी माती याच डोंगरातून काढली जाते. डोंगरापासून आटपाटनगपर्यंत हे अवजड सामान वाहून आणण्याचे काम वर्षांनुवर्षे गाढवं करतात. दोन वेळ खायला मिळण्याच्या हमीवर गाढवांचा कुणी पूर्वज फार फार वर्षांपूर्वी आटपाटनगरमध्ये आला आणि माणसांसमवेत राहू लागला. माणसं जे पुढय़ात टाकतील ते गुमान खाऊन सांगतील ते काम करू लागला. माणसं पाठीवर टाकतील ती ओझी वाहू लागला.
छोटय़ा डाँकीला त्याच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांच्या कळपाचा हा इतिहास सांगितला, तेव्हापासून त्यांच्या मनात बजबजपूरविषयी कुतूहल निर्माण झाले होते. कधी संधी मिळाली तर बजबजपूरमध्ये जाण्याचा निश्चय त्याने मनातल्या मनात करून टाकला होता.

n जॉय
पोगो...

एके दिवशी खूप पाऊस पडत होता.
घरात बसून पिंकीला अगदीच कंटाळा आला होता.
दादाबरोबर सापशिडी खेळून झाली. पाऊस पडतच होता.
पत्त्यांचा बंगला बांधून झाला.
पाऊस पडतच होता.
थोडा वेळ टीव्हीवर कार्टूनपण बघून झालं. तरीपण पाऊस पडतच होता.
आता काय करावं बरं..?
िपकी विचारात पडली.
बाहेर खेळायला पण जाता येत नव्हतं. पाऊस अगदीच जोरात पडत होता.
‘‘आई, कंटाळा आलाय.’’
‘‘आबा, मला कंटाळा आला.’’ तिने घरातल्यांच्यामागे भुणभूण सुरू केली.


n जॉय
मिकी, लाल परी आणि चिऊ

एक होती मिकी. एकदा तिला मोठ्ठा कंटाळा आला. आई-बाबा गेले होते ऑफिसला. आजी झोपलेली. मिकीने टॉम अँड जेरी बघितलं. टॉमने आणलेलं आइस्क्रीम जेरीने पळवलं. आणि सगळं खाऊन टाकलं. मग मिकीलाही आइस्क्रीमची भूक लागली. तिने फ्रिज उघडला. तिचा हातच पोचेना. मग तिला लागली कोल्ड्रिंकची तहान. पण त्या बाटलीचं झाकणच निघेना. मग आता काय करायचं.. एक दोन तीन चार.. मिकीने सोफ्यावर उभं राहून उडय़ा मारल्या. एक उडी मारली की बुदुक.. दुसरी उडी मारली की बुदुक.. तिसरी उडी मारली की बुदुक.. झालं.. आता काय करायचं..
तिकडे आईची लाल लाल ओढणी होती. मिकीने ती घेतली. साडीसारखी गुंडाळली.
आता ती झाली आई.. आणि नानू टेडी झाला मिकी..
मग तिने मिकी झालेल्या नानूला सांगितलं.
मिकी.. पुरे झालं खेळणं. शाळेत चला.. वाटेत आइस्क्रीमची भूक लागली म्हणायचं नाही.. शाळेत रडायचं नाही. दंगा केलास तर मी लालपरीची गोष्ट सांगणार नाही..

भविष्य