१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक-लेखक

चांगला लेखक चांगला वाचक असतो, तसंच चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो. ‘लोकप्रभा’च्या वाचक-लेखकांसाठी हे नवे सदर.

जगबुडी झाली नाही?
सुमन श्रीराम फडके
नवीन वर्ष आले - तीन महिनेही उलटले. मग एकवीस डिसेंबरचे काय झाले? जगबुडी झाली नाही म्हणून तर २०१३ उगवले ना! अवघे जग आणि त्या जगामधले आपण सारे जीवजंतू अजून आहोत त्या स्थितीत आणि आहोत त्या भूभागावर आहोत. अक्रीतच आहे, पण कसे हुश्श वाटत आहे! जगबुडी म्हणजे विलय, ऱ्हास, नाश, होत्याचे नव्हते होणे!.. हा संकेतच ऊध्र्व लावणारा आहे. पण निवारलेय सारे.
खरं तर जगबुडीचा एक प्रादेशिक ट्रेलर आपण सर्वानी अनुभवलाय. २६ जुलैची आठवण प्रत्येकाच्या मनावर चरचरीत खूण उठवून गेलीय. त्सुनामी येतात कहर माजवून जातायत, धरणीकंप होतात, शहरे आणि गावेच्या गावे भूमीच्या पोटांत गुडूप होतात, त्याशिवाय वणवे पेटतात, ते जंगलेच्या जंगले पोटांत घेतात, हिरवाईची राखरांगोळी होते. त्यामुळे एक असहनीय धग आपल्याला जाळते आहे. ऋतूमान बदलते आहे. सर्वात अरिष्ट म्हणजे हिमालय वितळतो आहे. ओझोनचे थर नष्ट होतायत. जलप्रलयाची नांदी, जगण्याचे नाटक उपसंहाराशी नेण्याचे संकेत देते. म्हणजे घडू नये ते सर्व घडतंय. पण तरीही जगबुडी झाली नाही म्हणत आपण बिनधास्त आहोत.
मनुष्य आत्मश्लाघेत गुरफटत चाललाय. बुद्धी, संस्कृती, चालचलन यांचा ताळमेळ विस्कटलाय. आणि या सर्व स्थित्यंतरात माणूस मात्र जास्त रानटी, उन्मत्त अविवेकी, अतिरेकी आणि भ्रष्ट होत चाललाय. संयमाच्या लक्ष्मणरेषा तो पुसून टाकतोय. अवध्य मी- अजिंक्य मी अशा तोऱ्यात माणूस आज आहे. विकृतीचा धिंगाणा प्रतिदिन वाढतो आहे. असे एकतर्फी टोकावरचे चित्र रंगवताना चांगले, भद्र सगळे संपुष्टात आलंय का? बुद्धिवाद्यांची बुद्धी गंजलीय का, विज्ञानाने हात टेकलेत का - चांगलं रोप रुजूच शकणार नाही असं आहे का? ही सर्व सकारात्मक बाजूही आहे. पण सत्याचा- भलाईचा आवाज मवाळ आहे. चित्तवृत्ती एकाग्र करून ऐकला तरच तो ऐकू येतोय. आपल्यातल्या सद्वृत्तीला अंग चोरून आपण आपल्यातच कसे कोंडून ठेवले आहे. भीती आहे की त्याचा उच्चार केला, उद्गार काढला तर आपले सगळे जीणेच कालबाह्य़ तर ठरणार नाही ना - आपण एका अनिष्ट फेऱ्यात बेफाम वेगाने गरगरत आहोत.
चार वर्षांच्या मुलीवर सर्रास बलात्कार करतायत, चार भिंतीच्या आत आलो की पतीपत्नीचे ‘नातिचरामि’चे कोष्टक पाळणारी जोडपी आपण पाहतोय. त्याला एक सर्रासपण आलंय. बाहेरच्या विश्वात तू काहीही कर, मीही काहीही करीन या समंजस तडजोडीवर घरं तग धरून राहिलीत. कुटुंब व्यवस्थेत अनाठायी परिवर्तन होतंय. वाढत्या वयातल्या मुलांना स्त्री-पुरुष संबंधांबद्दल सगळं बटबटीतपणे पडद्यावर दाखवलं जात आहे. पाच वर्षांचा मुलगा ‘शीला की जवानी’ कसं ठसक्यात म्हणतो याचा गौरव मायपित्यांच्या मनात आहे.
तरुणाईचा वारू उधळला आहे. जरा बिनसले, खटकले की सटासटा मुस्कटांत मारणाऱ्यांचे आणि बंदुका कानाशी लावणाऱ्यांचे डेलीसोप संख्येत वाढत आहेत. रिमोट आपल्या हातात असतो हे तर कबूलच, पण मनोरंजन म्हणून असेच कार्यक्रम निर्माण करावेसे वाटणे ही मानसिकता विचारात टाकणारी आहे. नृत्याच्या आविष्कारात समर्थ गुरूकडून कला मिळाली असूनही बेभान होऊन नाचताना संयम आणि सभ्यतेचे संकेत डावलून पटुत्व सादर करण्याची ईर्षां मूळ धरते. कितीतरी मुली स्वत:हून अनाचाराचे ब्रीद पालन करतायत, मग कधीतरी भलत्याच अवस्थेत सापडण्याची वेळ आली की सामाजिक चर्चेचा विषय होतायत. चारपाच वर्षांच्या मुलाला किंवा मुलीला त्यांची नृत्यनिपुणता पारखून बेडरूमसीनच्या गाण्यावर आविष्कार करायला लावणारे बुजूर्ग गुरू खरंच संभ्रमात टाकतात. या कलाविष्काराला टाळ्यावर टाळ्या मिळतात. वन्समोअरच्या मागण्या होतायत, या मागची मानसिकता विचारात टाकणारी आहे. बालवयातल्या अनुभवांवर आधारित कलाविष्काराचे विषय गहाळ झालेत का?
धान्यात सप्रमाण खडे मिसळणारे कारखाने उघडले जातायत, दुधात गुपचूप डिर्टजड- वॉशिंग सोडा मिसळून ते दूध ब्रँडेड म्हणून विक्री करण्याच्या मखलाशा लढवल्या जाताहेत. रिकाम्या इंजेक्शनच्या पुंगळीत बनावट रसायन भरून त्याची जाहिरात अक्सर इलाज या मथळ्याखाली वापरली जाते. मुलांच्या पोषण आहारात किडे, अळ्या सापडताहेत, हवाबंद कोल्ं्रिडकमध्ये झुरळं तरंगताहेत, खुनी देशविदेशात उजळ माथ्याने फिरताहेत, दहा वेगवेगळ्या नावाने पासपोर्ट वितरित होताहेत, पैशासाठी अवयव विकले जाताहेत, ग्लोबल व्हायच्या संचारात शेजाऱ्याचं नावगाव विचारायचं राहून जातंय, विराट शक्तिप्रदर्शन म्हणून माणसांचे कळप जमवले जाताहेत. केवळ गर्दी म्हणजेच शक्ती अशी समीकरणं प्रस्थापित होतायत, चांगल्याची टिंगल होते, शूचितेवर शिंतोडे उडवले जाताहेत, स्वत्व भंगारात विकले जाते - तेरा वर्षांचा मुलगा थाडथाड गोळ्या झाडीत आपल्या वर्गमित्रांना संपवतोय, राजकारणी रंगसफेतीत मग्न आहेत. सत्तेच्या मलिद्यावर क्लिनचीट मिळवून माजुरडे होण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
इथे एक स्पष्ट करावेसे वाटते- वेचून वेचून फक्त वाईट, विकृत, नापाक, तिरपागडे दाखवण्याचा हा अट्टहास नाही. हे आजचे वास्तव चित्र आहे. चांगल्याचे अवकाश आकुंचन पावतेय आणि वाइटाची स्पेस भीती वाटेल इतकी व्यापक होतेय हा दैनंदिन प्रत्यय झालाय. या सगळ्या उलथापालथीत सामान्य माणसाला नेट लावून नेमके कुठचे टोक पकडावे हेच कळेनासे झालंय - समाजाचं खरं चित्र हे सामान्य माणसाला पुढे धरूनच रेखाटावं लागतं.
विज्ञाननिष्ठ युग म्हणून प्रतिष्ठा मिरवणाऱ्या सद्य काळाला, अत्रतत्र ऊत आलेल्या या विकृत आणि अर्निबध जीवनप्रणालीवर काबू मिळवताना दमछाक होते. या व्यवस्थेचा ग्राफ बदलायचा कसा या ज्वलंत तळमळीत प्रज्ञावंत, समाजधुरीण भेलकांडत आहेत. या अशा अवस्थेत आपण जिवंत आहोत आणि मिळेल त्या मार्गाने कराव्या लागणाऱ्या हव्या नकोशा तडजोडीने आणि स्वत:चा आवाज आतल्या आत कोंडून जिवंतपणाचे प्रमाणपत्र सांभाळीत आपण तग धरण्याची पराकाष्टा करीत आहोत.
आणि या निरुपायालाच आपण लेबल लावलंय - जगबुडी झालीच नाही?

संजय दत्त आणि त्याची शिक्षा
रवींद्र गुरव

सेलिब्रिटीज, लोकनेता, असामान्य व्यक्तिमत्त्व अशी विशेषणे लावून समाजात वावरणाऱ्या या लोकांना महत्त्व कोण देतात? तर सामान्य व्यक्ती! या सर्वाकडे हुशारी असते, मेहनत करण्याची तयारी असते. फरक फक्त एवढाच, की यांना संधी मिळाली; पण समाजात असे भरपूर लोक आहेत ज्यांना संधीच मिळत नाही. तेव्हा या सामान्य लोकांनी जर यांना महत्त्वच दिले नाही, तर यांना कोण विचारणार आहे! हे या लोकांना माहीतही आहे, पण ते सोयीस्करपणे विसरतात.
संजय दत्तने विना परवाना घरात एके ५६ रायफल ठेवली. ही किती खतरनाक वस्तू आहे याची त्याला पूर्ण माहिती होती. तरी पण माझ्या घरापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही अशा गोड समजापायी त्याने कसलाही विचार केला नाही; पण त्याचा गोड समज शेवटी कडू ठरला, जेव्हा त्याच्या घरी पोलीस पोहोचले. १९९३ साली झालेल्या बाँबस्फोटासंबंधी पकडले गेलेल्या अपराध्यांवर खटला चालला त्यामध्ये संजय दत्तही होता. सुप्रीम कोर्टाने या सर्व आरोपींना शिक्षा सुनावली, तेव्हा संजय दत्तला ६ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा त्याने याआधीच भोगली आहे, तर एक वर्षांची शिक्षा त्याला माफ करण्यात आली आणि साडेतीन वर्षांची शिक्षा भोगायची बाकी आहे. शिक्षा जाहीर झाल्याबरोबर बॉलीवूडमधील त्याच्या सहकाऱ्यांची आणि इतर शुभचिंतकांची बोंबाबोंब चालू झाली. तो निर्दोष आहे, त्याने मागच्या वीस वर्षांमध्ये खूप मनस्ताप भोगला आहे, त्याने समाजसेवा केली आहे, अशी कारणे देऊन त्याची शिक्षा माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली. तेव्हा ही कारणे त्याची शिक्षा माफ करण्यासाठी योग्य आहेत का?
त्याने मागच्या वीस वर्षांमध्ये खूप मनस्ताप भोगला आहे! तर मग या देशातील बहुसंख्य जनता जी न्यायापासून वंचित राहते त्यांचा या लोकांना विसर का पडतो? त्यांचा हे लोक विचार का करत नाहीत? त्याने समाजसेवा केली आहे, असेही हास्यास्पद कारण दिले जाते. म्हणजे समाजसेवा केल्यावर कसेही वागायचे लायसन्स मिळते का? पण प्रत्येक सेलिब्रिटीज, लोकनेता, असामान्य व्यक्तिमत्त्व काही ना काही समाजसेवा करतात. मग ती समाजसेवा म्हणजे एक थेर समजायचे का?
तेव्हा सेलिब्रिटींना मिळणाऱ्या सवलती सामान्यांना का मिळत नाहीत? त्यांची हे लोक पाठराखण का करत नाहीत? या सामान्य लोकांमुळेच यांना महत्त्व प्राप्त होते. सामान्य शेतकऱ्यांमुळेच आपल्या सर्वाना अन्नधान्य मिळते. सामान्य कामगारांमुळेच कारखाने चालतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळतो का? याचा कधी विचार करून यांच्यासाठी हे लोक कधी लढलेत का? मग या सर्वाना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय का?
शायनी आहुजाने आपल्या घरातील मोलकरणीवर बलात्कार केला तेव्हाही त्याच्या सहकाऱ्यांनी, हितचिंतकांनी आणि खुद्द त्याच्या पत्नीने त्याची पाठराखण केली होती. प्रथमदर्शनी पीडित महिलेचा काही दोष दिसत नव्हता. मनात आणले असते तर बक्कळ पैसे उकळून, जिवाच्या भीतीने किंवा इज्जत जाईल या भीतीने ती गप्प राहू शकली असती! पण तिने तक्रार केली म्हणजे तिच्या मनावर व शरीरावर बलात्कार झालाही असेल. एक स्त्री असूनही त्याच्या पत्नीला त्यांच्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या वेदना समजू नयेत? याहून मोठं दुर्दैव ते कोणते? दिल्लीत बलात्कार करणाऱ्या अपराध्यांना फाशी व्हावी, अशी यापैकी अनेकांनी मागणी केली. मग या शायनीला फाशी नाही, पण जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं कोणाला का वाटलं नाही? म्हणे त्याचे जीवन उद्ध्वस्त होईल! म्हणजे याचं जीवन तेवढं जीवन, पण सामान्यांच्या जीवनाला महत्त्व नाही? त्याला जी शिक्षा मिळायला हवी ती का नाही मिळाली?
तेव्हा एका वर्षांची शिक्षा माफ करून संजय दत्तला जेवढी शिथिलता दाखवायची तेवढी दाखवली, पण आता जी शिक्षा उरली आहे ती त्याला भोगायला लावली पाहिजे. नाही तर लोकांना चुकीचा संदेश जाईल. पण शिक्षा झाली तर अनेकांना धडा मिळेल. कायद्यासमोर सर्व समान असतात. याच्यावरून लोकांचा जो विश्वास उडत चाललाय, तो थोडा तरी शिल्लक राहील.

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक’ सदरासाठी असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभाह्ण, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email - response.lokprabha@expressindia.com