१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सहप्रवासी

जे जे उत्तम.. ते ते आपल्यासम
सुरेश कुळकर्णी, इंदूर, मध्य प्रदेश

मी इंदूर, मध्य प्रदेशमध्ये राहतो. ‘लोकप्रभा’ हे साप्ताहिक मी मार्च १९७८ पासून नियमित वाचत आहे. कित्येकदा अंक न मिळाल्यास किंवा उशिरा मिळाल्यास जुना अंक नवीन अंकाच्या ताकदीने वाचत असे. कारण यात असलेले लेख हे पचवण्यास आठवडा कधीच पुरत नसे. चांगल्या साहित्याचे व्यसन लावण्यात ‘लोकप्रभा’ अग्रणी असे म्हणणे वावगे ठरू नये. कारण जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते ते ‘लोकप्रभा’ द्यावयाचीच नव्हे हे तिचे ब्रीद आजतागायत तसेच आहे. म्हणूनच ‘लोकप्रभा’ स्वरूप बदलले पण निकष, कडकपणे पाळले गेले.
मी माझ्या क्षमतेनुसार ‘लोकप्रभा’बद्दल लिहिण्याचे धाडस करीत आहे. ‘लोकप्रभा’ लोकप्रिय आहे, स्पष्टवक्ता आहे पण त्यातील विषय हे महाराष्ट्रापुरते मर्यादित वाटतात. इतरही राज्यांत किंबहुना आपल्या देशात जिथे जिथे मराठीच्या पाऊलखुणा पसरल्या आहेत, तेथील माहिती ‘लोकप्रभा’ने दिली आहे. ‘लोकप्रभा’ अटकेपार जाण्यासाठी दूरस्थ, देशस्थ मराठी लोकांना प्राधान्य, (त्या राज्यातील मराठी संकल्पना, रूढी, परंपरा) देणे हे गरजेचे वाटते, त्याने ‘लोकप्रभा’ची वाटचाल अमर्यादित आणि सुखरूप होईल. कारण महाराष्ट्राबाहेर मराठी लोकांनी, प्रत्येक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहेच आणि पुढेही करतील.
आपण अंधारात जेव्हा नितळ आकाशाकडे पाहतो तेव्हा प्रथम अंधारच दिसतो, निरखून पाहिले की एखादा तारा चमकताना दिसतो. हळूहळू त्या ताऱ्याच्या आसपास अनेक तारकांचे मंडळ आणि मग असंख्य तारकांनी भरलेले आकाश दिसते. त्यात मग आपण सप्तर्षी, ध्रुवतारा आणि शुक्रतारा याचा शोध घेऊ लागतो. हे लिहिण्याचे कारण हेच की आपण सचिन तेंडुलकरवर विशेषांक काढला. अगदी स्तुत्य काम केले परंतु सचिनने पदार्पण करण्यापूर्वी क्रिकेट विश्वात एकनाथ सोलकर, फारूख इंजिनीयर, पॉली उम्रीगर, सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ आणि अजित वाडेकर असे कितीतरी तारे होते. सचिनच्या अंकात त्यांचा फक्त उल्लेख होता.
‘लोकप्रभा’वर तर्कपूर्ण, अभ्यासपूर्ण लिहिण्यासाठी नकळत का होईना पण वर्ष १९७८ पासून सरासरी दृष्टीने ५६६ अंक (प्रत्येक वर्षांत कधी ५०, ५१, ५२ अंक) वाचण्यात आले, निश्चित रूपात ‘लोकप्रभा’ ने मराठी साहित्याची थोर परंपरा जपली, विविधता आणली. प्रत्येक वर्षांत गणेश अंक, महिला दिन विशेषांक, आदिशक्ती अंक, नववर्ष अंक, पाडवा विशेषांक, समर्थ रामदास, स्वामी समर्थ, दत्त गुरू, महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल अंक, पर्यटन अंक, वैद्यक या विषयावर अंक, खवैयांसाठी रुचकर पदार्थ युक्तअंक, विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर विविध अंक ज्यात राज, उद्धव, काका-पुतण्या इत्यादींवर केलेले लिखाण, याचबरोबर विविध विषयांवर लिहिलेले आणि अभ्यासाच्या दृष्टीने वाचनीय अंक होते. वेगळय़ा जगातील मत्री, शतायु ग्रंथालयांची महाराष्ट्रीय परंपरा, तोतला ते पोपट, मंदी नव्हे संधी, छाया (गौतम राजाध्यक्ष), धुमसतंय बेळगाव, पृथ्वीला घाम फुटलाय, हाक आभाळाची (सुनीता विल्यमवर), अरेरे वाघ, गोदातीरी, सिंहस्थ पर्वणी बडेजावाकडून न्यूनगंडाकडे इत्यादी अंक विशेष भावले. कारण प्रत्येक अंकात विश्लेषण अतिशय ओघवती भाषेत आणि मनाला पटेल असे होते. ‘लोकप्रभा’तील लेखकांचे विवेचन म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठाच म्हणावी लागेल. या लेखकांसाठी मानाचा मुजरा
‘लोकप्रभा’ने ‘घडय़ाळ’, ‘पंजा’, ‘इंजिन’, ‘धनुष्यबाण’, ‘हत्ती’ यांची वेळप्रसंगी भंबेरी उडवण्यासही मागे-पुढे पाहिले नाही. ‘लोकप्रभा’ने राज्यकर्त्यांवर कोरडे ओढले. पण लवासा, पाटबंधारे, आदर्श घोटाळा, तेलगी घोटाळा, शिक्षण संस्था आणि सहकारी साखर कारखाने इत्यादींवर आपली ‘पनी नजर’ कधी काळी इनायत झाली नाही, ‘फक्त रस्ते अडवा पसे जिरवा’ (१०.०८.२०१२) सोडून. कदाचित हे सर्व घोटाळे माननीय न्यायालयात विचाराधीन असतील म्हणूनही आपण दुर्लक्ष केले असावे.
मुंबईची जीवनरेखा आहे ‘लोकल’. लाखो प्रवाशांचे लोंढे रेटता रेटता ती किती थकली, त्यातल्या प्रवाशांची हलाखी, हातचलाखी, तिकीट खिडक्या किती कमी, सुलभ सुविधा किती अपुऱ्या, शेडविहीन, पंख्याविना फलाट, पाणी नाही, होणाऱ्या अपघातात मेडिकल सुविधा स्टेशनवर नाहीत, मेगा ब्लॉक असला तर वैकल्पिक व्यवस्था नाही, सीव्हीएम आणि एटीव्हीएम नाहीत, चालक-वाहक यांना संरक्षण नाही याकडे ‘लोकप्रभा’ने दुर्लक्ष केले. मात्र मिठी नदीला आलेल्या पुरावर काढलेला अंक (२६ सप्टेंबर २००८) ‘वैरीण झाली नदी’ अगदी पटकन डोळय़ांसमोर येतो.
‘लोकप्रभा’ ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. जिथे जिथे मराठी भाषा आहे तिथे तिथे ‘लोकप्रभा’चा दरवळ आहे, असे म्हणणे रास्त होईल. आता तर ‘लोकप्रभा’ एका क्लिकवर उपलब्ध असून तिच्या बाबतीत ‘‘जे जे उत्तम ते ते आपल्या सम’’ असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
response.lokprabha@expressindia.com

‘लोकप्रभा’च्या चाळीस वर्षांच्या वाटचालीत तुम्हीही मोलाची साथ दिली आहे. ‘लोकप्रभा’वर तुमचा असलेला लोभ, अपेक्षा, प्रतिक्रिया स्वरूपात ई-मेल किंवा पत्राद्वारे लिहून कळवा. पाकिटावर ‘सोबत चाळीस वर्षांची’ हे लिहायला विसरू नका.