१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संख्याशास्त्र

यश आणि संख्याशास्त्र
उल्हास गुप्ते

आपल्या अंतर्मनात एक मोठी संवेदना असते तिची कल्पना जगातल्या फार कमी लोकांना असते. जी माणसे आपल्या जीवनात यशस्वी होतात. निव्वळ यशस्वी नव्हे तर मानसिक स्तरावर यश प्राप्त करतात आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन जगतात. त्यांनाच या वैश्विक शक्तीचे भान चांगल्या प्रकारे ज्ञात होते आणि मग हीच मंडळी आपल्या अंतर्मनातील ऊर्जेचा उपयोग कसा करावा, हे जाणून घेऊन स्वत:चे अस्तित्व अधिक तेजोमय बनवतात.
जागातील यशस्वी माणसाच्या जन्मतारखा आणि त्यांची नावे यांच्यामध्ये एक विशिष्ट सकारात्मक स्पंदने आढळतात. ही स्पंदने आणि त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील ऊर्जा यांचा काहीसा निश्चित संबंध असावा, हे वैश्विक नाते त्या त्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून आणि नावाच्या स्पंदनातून सहज उमजू शकते आणि अगदी नेमकी हीच उकल संख्याशास्त्राच्या अभ्यासात आढळून येते आणि मग त्यांच्या यशाचे मोजमाप त्यांच्या जन्मतारखेवरून आणि नावावरून करू शकतो.
भाषा ही मुळाक्षरांनी तयार होते. जगातील प्रत्येक भाषेत मुळाक्षरे आहेत. अर्थात त्या मुळाक्षरांना स्वर आणि व्यंजनेही आहेत. स्वराचा उच्चार सहज निसर्गत:च अधिक शक्तिशाली असतो. व्यंजनांना स्वराच्या आधारे अक्षर प्रवास करावा लागतो, तेव्हाच भाषेतील उच्चाराला एक विशिष्ट माधुर्य प्राप्त होते.
शब्द आणि ध्वनी या दोहोंतून निर्माण होणाऱ्या स्पंदन लहरी संख्येच्या माध्यमातून प्रेरित होतात. संख्याशास्त्रात प्रत्येक अक्षराला एका विशिष्ट संख्येने संबोधले जाते. स्पंदन लहरी विभागात दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. एक पायथागोरस आणि दुसरी खाल्डियन पद्धती ही पद्धती खूपच पुरातन जरी असली तरी ती खूपच अचूक वाटते, असे मत जगविख्यात ज्योतिषी किरो यांचे आहे. तसेच जगविख्यात न्युमरॉलॉजिस्ट मॉन्ट्रज यांनीही आपल्या ‘न्यूमरॉलॉजी फॉर एव्हरीबडी’ या पुस्तकात या पद्धतीचा अवलंब केला आहे.
मूलांक, भाग्यांक आणि महिन्याचा येणारा शुभांक जर नावातील येणाऱ्या बेरजेच्या एकांकाचे मिश्रांक असतील तर अशा व्यक्ती आपल्या क्षेत्रात उत्तम यश प्राप्त करतात.
जन्मतारीख १, १०, १९ व २८ या तारखांमध्ये एक तारीख सोडली तर प्रत्येक तारखेतील अंकाबरोबर शून्याचा समावेश आहे. १० मध्ये शून्य आहे. १९ मध्ये १+९=१० यातही शून्य आहे. २८=२+८=१० यामध्येही शून्याचा समावेश आहे आणि जेव्हा जेव्हा १ च्या पुढे शून्य उभे राहते तेव्हा ते शून्य त्या अंकाच्या सद्गुणाची बऱ्याच प्रमाणात वाढ करते. विशेषत: या लोकांमधील प्रचंड आत्मविश्वासाचे हे शून्य एक प्रतीक ठरते.
यांच्या होणाऱ्या प्रगतीचा वेग कोणाच्याही लक्षात न येण्यासारखा असतो. अगदी ही माणसे एका वेगळ्याच गतीने पुढे सरकत असतात. शरीराने वावरताना याच्या कामाचा वेग जसा जलद असतो, त्याच्या कितीतरी पटीने ही माणसे मनाने पळत असतात. याचे विचारचक्र आणि यांची निर्णयक्षमता यांचे एक वेगळेच गणित जमलेले असते.
ही माणसे संशय, आळस, निरुत्साह अशा अवगुणांना मागे सारून पुढे जाऊ शकतात. यांचे बोलणे-वागणे खूपच कृतिशील असते. भविष्यकाळाच्या झोक्यात बसून झोके घेणे यांना बिलकूल आवडत नाही. आपल्या पुढील आयुष्यात कुठल्या सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्यायचे हे त्याच्या मनात ठरत जाते. एका लहानशा विचाराच्या धाग्यातून ते दुसरे टोक गाठून त्या विचाराचे स्वरूप व्यापक करू शकतात. म्हणूनच याची असामान्य आणि विशेष प्रतिभावान म्हणून तुलना केली जाते. आणि हे सर्व सकारात्मक घडत असताना यांच्या नावाच्या अंकाच्या बेरजेचा क्रमांक जर दहाच्या पटीत म्हणजे १९, २८, ३७, ५५ किंवा ६४ आला तर ही माणसे खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान ठरतात.
नाव आणि जन्मतारीख यांच्या सकारात्मक स्पंदनातून घडलेला हा माणूस यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच विशाल बनतो.
रोजच्या वाचनातून-विचारातून-चिंतनातून व अनेक जणांच्या भेटीतून ही माणसे स्वत:ला घडवत असतात. स्वत:चे जगण्याचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान तयार करीत असतात. विशेष म्हणजे या व्यक्ती अपयशाला फारशी किंमत देत नाहीत किंवा निराश होऊन गप्प बसत नाहीत. तर उलट तितक्याच जोमाने-आवेगाने पुढे सरकतात. अपयशाची कारणे शोधतात. त्यावर त्वरित उपाय करून त्यांना हवे असलेले यश सहजतेने मिळवतात.
सुनील गावस्कर या क्रिकेटवीराच्या जन्मतारखेचा विचार करू या. यांची जन्मतारीख १०-७-१९४९ आहे. या तारखेचा मूलांक १ येतो, तर भाग्यांक ४ येतो. यांच्या नावाची स्पंदने पाहू.
SUNIL GAVASKAR
३६५१३ ३१६१३२१२
१८+१९ = ३७ =१०
जन्मतारीख १० आणि नावाची स्पंदने ३७=१० आली. दोन्ही ठिकाणी शून्याचा प्रभाव दिसून येतो. यामुळे ही व्यक्ती क्रिकेट जगतात उत्तम खेळाडू म्हणून गाजली. क्रिकेट विश्वात फार सावधतेने स्वत:च्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून खेळताना उत्तम डावपेच आखून शांत व संयमाने बलाढय़ संघांना नामोहरम केले. स्वत:च विचार करण्याची कुवत, एक उत्तम कर्णधार म्हणून यांचा नावलौकिक कसा झाला हे त्यांच्या जन्मतारखेवरून व नावाच्या स्पंदनातून सहज लक्षात येते.
response.lokprabha@expressindia.com