१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पर्यटन

‘फिल्म टुरिझम’चा नवा अध्याय
रेश्मा राईकवार
जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या या रामोजी फिल्मसिटीने बदलत्या काळानुसार ‘फिल्म टुरिझम’ला नवा अर्थ दिला आहे.

जगभरात ‘फिल्म टुरिझम’ची संकल्पना वेगाने फोफावते आहे. आपल्या देशातील निसर्गरम्य स्थळं, पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाची ठिकाणे याकडे पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘फिल्म टुरिझम’चा वापर होऊ लागला आहे. थोडक्यात सांगायचे तर विविध देशांतील प्रॉडक्शन हाऊसेसना आपल्या देशात चित्रीकरण करण्यासाठी बोलवायचे, त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सोयीसुविधा द्यायच्या त्याही आकर्षक दरात. चित्रपट पूर्ण झाला म्हणजे तुम्हाला जे दाखवायचंय ते रमणीय दृश्य पडद्यावर दिसतंच, लोकांमध्ये चर्चा होते आणि त्याच वेळी एका निर्मात्याकडून दुसऱ्या निर्मात्यापर्यंत या चित्रीकरण स्थळांची महती पोहोचलेली असते. त्यामुळे पर्यटन उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमीत कमी वेळात जगभर पोहोचण्यासाठी सिनेमाला पर्याय नाही, ही ‘फिल्म टुरिझम’ची प्रचलित संकल्पना आहे. पण, याहीपुढे जाऊन एक वेगळ्या अर्थाने ‘फिल्म टुरिझम’चा वापर केलाय तो रामोजी राव यांनी.
१७ वर्षांपूर्वी हैदराबाद शहरापासून तासभर अंतरावर उभ्या राहिलेल्या रामोजी फिल्मसिटीने काळाच्या ओघात पर्यटनाचे नवनवे आयाम शोधले आहेत. जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या या फिल्मसिटीने बदलत्या काळानुसार ‘फिल्म टुरिझम’ला नवा अर्थ दिला आहे. हैदराबादजवळ असलेल्या हयातनगरमध्ये १७८२ एकर परिसरात ‘रामोजी फि ल्मसिटी’ वसवण्यात आली आहे. एके काळी केवळ चित्रीकरणाची सुविधा देण्यासाठी म्हणून उभ्या राहिलेल्या फिल्मसिटीच्या विश्वात आजघडीला अम्युजमेंट पार्क, अ‍ॅडव्हेंचर्स पार्क, पंचतारांकित-सप्ततारांकित हॉटेल्स, चित्रीकरणासाठी उभं करण्यात आलेल्या गावखेडय़ापासून ते अमेरिकन शहरांपर्यंतची लोकेशन्स, मोठमोठे स्टुडिओ, छोटय़ा-मोठय़ा संकल्पनांवर उभे राहिलेले बगिचे, मोगल गार्डनपासून जयपूरच्या हवा महलपर्यंत विविध ठिकाणांच्या हुबेहूब प्रतिकृती अशा कितीतरी गोष्टी सामावल्या आहेत.
एकाच ठिकाणी भल्यामोठय़ा विस्तारलेल्या फिल्मसिटीचा व्याप सांभाळायचा आणि त्याचबरोबर हा जो बंगला दिसतो ना तो ‘चंद्रमुखी’ चित्रपटात रजनीकांतचं जे घर होतं ना ते हे किंवा ‘सूर्यवंशम’ चित्रपटात अमिताभ बच्चनची जी भलीमोठी हवेली होती ना त्या हवेलीत वावरताय तुम्ही.. असे म्हणत हीच फिल्मसिटी पर्यटकांच्या नजरेतून मनात शिरते, ही या फिल्मसिटीची मोठी खासियत आहे. ‘फिल्म टुरिझम’चा चपखल वापर या ठिकाणचे पर्यटन वाढवण्यासाठी करून घेण्यात आला आहे. अर्थात, याचे श्रेय रामोजी राव यांच्या द्रष्टेपणाला आहे, असे फिल्मसिटीचे उपाध्यक्ष ए. व्ही. राव यांचे म्हणणे आहे.
रामोजी राव स्वत: चित्रपट निर्माते होते. त्यांच्या उषाकिरण मूव्हीज बॅनरअंतर्गत जवळजवळ ऐंशी चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे एक चित्रपट पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी काय काय गोष्टी लागू शकतील याचे बारीकसारीक तपशील त्यांना माहिती होते. त्याचाच वापर फिल्मसिटीचा विकास करताना झाला आहे. म्हणून, तुम्हाला एक लक्षात येईल की रेल्वेच्या डब्यात चित्रीकरण करायचा असेल तर इथे रेल्वे आहे, हॉस्पिटलच्या सीनसाठी हॉस्पिटल, विमान, साधे पाठलागाचे दृश्य करण्यासाठी एकच एक लांबलचक रस्ता, रोमँटिक गाण्यासाठी वेगवेगळे बगिचे, एखादे गाव हवे असेल तर त्याचा सेटअप, शहराचा सेटअप आणि शिवाय, सोबतीला असलेले जंगलही अशी भरपूर ठिकाणं इथे उभारण्यात आली आहेत. त्यातही तुम्हाला स्टुडिओत चित्रीकरण करायचे असेल तर मोठमोठे स्टुडिओ इथे आहेत. चित्रीकरणानंतर त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनची सुविधाही याच फिल्मसिटीच्या एका छताखाली देण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपट निर्माता जेव्हा इथे येतो तेव्हा संपूर्ण चित्रपट तो इथे पूर्ण करू शकतो, याची खात्री त्याला आम्ही देतो, असे राव सांगतात.
सध्या फिल्मसिटीत छोटे-मोठे असे मिळून ४९ शूटिंग फ्लोअर्स आहेत. पण, तेच तेच सेट वापरल्यानंतर चित्रीकरणात एकसुरीपणा येण्याची शक्यता असते ही शंका ते खोडून काढतात. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला सेट्स उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला पाठलागाचे दृश्य करण्यासाठी रस्ता आम्ही उपलब्ध करून दिला आहे. त्या रस्त्यावर दिव्यांचे खांब आहेत आणखी काही गोष्टी आहेत. पण, हा रस्ता दिग्दर्शकाला ज्या पद्धतीने हवा आहे त्याचे तपशील आमच्या कलादिग्दर्शकांना द्यायचा अवकाश की तुम्हाला हवी तशी त्या रस्त्याची रचना करून दिली जाते. या सगळ्यासाठी आमचे विविध विभाग कार्यरत आहेत. तुम्हाला कळणारही नाही इतक्या सफाईने ते काम केले जाते, असे सांगतानाच उदाहरणादाखल ते ‘गोलमाल ३’ चित्रपटाचा किस्सा सांगतात. फिल्मसिटीत वेगवेगळ्या राइड्स उपलब्ध आहेत. तिथे चित्रीकरण सहज शक्य असतानाही गोलमाल ३ या चित्रपटासाठी फिल्मसिटीतील एका मोकळ्या जागेत थिएटरसह या राइड्स नव्याने उभ्या करण्यात आल्या होत्या. आगामी ‘क्रिश ३’ चित्रपटासाठीही महिनाभर इथे वेगळा सेट लावण्यात आला होता, अशी माहितीही ए. व्ही. राव यांनी दिली. अर्थात, चित्रीकरणाच्या याच जागा पर्यटकांसाठी मग फिल्मी दुनियेतील गोलमाल उलगडून दाखवणाऱ्या नवलाईच्या गोष्टींचे काम करतात. फिल्मसिटी हा जसा इथला पर्यटनाचा एक भाग आहे तसाच अम्युजमेंट पार्कसारख्या राइड्स, बच्चेकंपनीसाठी असलेले फंडुस्तान आणि तिथला जादूगाराचा महाल, जहाजाच्या पोटात वसवलेली व्हिडीओ गेमची दुनिया हे पर्यटकांना हवा असणारा नेहमीचा भागही आहे. पर्यटकांसाठी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी उपलब्ध करून देताना तारांबळही उडत नाही. कारण, यासाठी पर्यटकांमुळे चित्रीकरणात काही अडथळे येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतलेली असते, असे राव सांगतात. चित्रीकरणासाठी खरेतर फिल्मसिटीच्या आतला एक मोठा परिसर आम्ही उपलब्ध क रून दिला आहे आणि अगदी फिल्मसिटीच्या नेहमीच्या ठिकाणांवरही चित्रीकरण सुरू असले तरी पर्यटकांना सांभाळण्याची जबाबदारी आमचे गाइड्स आणि वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी पार पाडतात, असे त्यांनी सांगितले. सध्या फिल्मसिटीचा व्याप सांभाळण्यासाठी विविध विभागांत साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर फिल्मसिटीची रचना करण्यासाठी गुंतवणूकही तेवढीच मोठी करावी लागली आहे. पण, ही गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने उत्पन्नात कुठेही घट झालेली नाही. याचे कारण रामोजी राव यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनात दडलेले आहे, असे ते सांगतात. एक दा पर्यटनासाठी म्हणून विकास करायचा हे ठरवल्यावर उत्पन्नाचे स्रोत कुठले असतील, याचे पक्के गणित त्यांच्या मनात तयार होते. त्यानुसार, फिल्मसिटी असल्याने चित्रीकरणातून येणारे उत्पन्न आणि त्याच वेळी पर्यटनातून येणारे उत्पन्न अशा दोन आर्थिक बाजू आहेत. सध्या इथे चारशे ते पाचशे चित्रपटांचे चित्रीकरण के ले जाते. रोजच्या रोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही साडेतीन ते पाच हजारांच्या घरात आहेत. गेल्या १७ वर्षांत फिल्मसिटीने पर्यटनासाठी मिळवलेला नावलौकिक पाहता हे गणित आमच्यासाठी फारसे अवघड नाही, हेही ते विश्वासाने सांगतात. इथे येऊन गेलेल्या पर्यटकांनाही पुन्हा भेट दिल्यानंतर नवे काही दिसावे, यासाठी नियमित बदलही करण्यात येतात. त्यामुळे आता फुलपाखरांच्या विविध प्रजातींना एकत्र बघण्याची संधी देणारे ‘बटरफ्लाय पार्क’, ‘बोन्साय पार्क’ इथे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती राव देतात. त्याचबरोबर ‘भागवतम’ या नावाने महाभारतातील कृष्णशिष्टाईची कथा सांगणारे दोन भव्य आणि देखणे सेट्सही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. येत्या काळात मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या देशातील पुरातन आणि ऐतिहासिक मंदिरांच्या प्रतिकृतीही फिल्मसिटीत लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही ते सांगतात. ‘ईटीव्ही वाहिन्या ‘व्हायकॉम १८’ कंपनीला विकल्यानंतर त्या जबाबदारीतून काहीसे हलके झाल्यामुळे आपण फिल्मसिटीवरच लक्ष केंद्रित केले असल्याचे रामोजी राव सांगतात. एवढी मोठी फिल्मसिटी उभारणे हे एक स्वप्न होते. आजमितीला ते पूर्ण झाले आहे पण काळानुसार सातत्याने त्यात नवनवीन गोष्टी वाढत राहतील, असा विश्वास रामोजी राव व्यक्त करतात. सध्या उन्हाळी सुट्टय़ांचे महत्त्व लक्षात घेऊन ‘समर कार्निव्हल्स’चे आयोजन फिल्मसिटीत करण्यात आले आहे. कार्निव्हल्स ही संकल्पना मुळात परदेशी आहे. आपल्याकडे फक्त गोव्यात कार्निव्हल्स पाहायला मिळतात. त्यामुळे फिल्मसिटीत खास समर कार्निव्हल्सचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. समर कार्निव्हल्स, कार्निव्हल परेड आणि रात्रीच्या अंधारात दिव्यांनी झगमगून उठलेली रामोजी फिल्मसिटी तुम्ही पाहाच.. तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव मिळेल, असेही त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. आजचे चित्रपट मग ते टॉलीवूड असो, बॉलीवूड असो नाहीतर हॉलीवूड.. त्यांचे विषय आपल्याला पचनी पडणारे नाहीत, अशी कबुली देतानाच आपल्या मातीतले विषय चित्रपटातून वारंवार आले पाहिजेत, असे म्हणत ते आमीर खानच्या ‘तारें जमीन पर’, ‘लगान’ सारख्या चित्रपटांचे कौतुकही करतात.
मी पक्का भारतीय आहे. इथे फिल्मसिटीतही तुम्हाला भारतीय संस्कृतीचेच दर्शन घडेल, असे म्हणणाऱ्या रामोजी राव यांना हॉलीवूडला इथे बोलवण्यात स्वारस्य नाही. उलट आपली ‘रामोजी फिल्मसिटी’ हॉलीवूडलाही दखल घ्यायला लावेल, अशी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
response.lokprabha@expressindia.com