१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मुलाखत

सिनेसृष्टीला अभिवादन करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य! - झोया अख्तर
हरनित सिंग

सिनेमाच्या शंभर वर्षांनिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीला अभिवादन करण्यासाठी चार दिग्दर्शक एकत्र येऊन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प करत आहेत तो म्हणजे ‘बॉम्बे टॉकिज’ हा सिनेमा. या सिनेमात चार दिग्दर्शकांनी चार कथा मांडल्या आहेत. त्यात एक दिग्दर्शक आहे, झोया अख्तर. या चित्रपटाविषयी तिच्याशी साधलेला संवाद.

तुला खरं तर ‘किस्मत टॉकिज’ हा सिनेमा बनवायचा होता. आणि आत्ता तू भारतीय सिनेमाच्या शंभरीच्या निमित्ताने ‘बॉम्बे टॉकिज’ बनवलास. हे थोडं विचित्र वाटत नाही का?
हो, किती विचित्र आहे हे! माझ्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचं वय किती, तर अवघं दोन सिनेमांचं (‘लक बाय चॅन्स’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’). असं असताना शंभर वर्षांच्या भारतीय सिनेसृष्टीला अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. या चित्रपटात मला अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, करण जोहर या तिघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी या तिघांपेक्षा लहान असूनही त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करीत आहे. हे चांगलं वाटतं.
हा चित्रपट कशाविषयी आहे?
मला आठवतंय बारा वर्षांपूर्वी मला ही कथा सुचली होती. शॉर्ट फिल्मसाठी. रिमा (कागती) आणि मी आम्ही दोघींनी मिळून ही कथा लिहिली होती. ही एका लहान मुलाची गोष्ट होती. हा मुलगा हेलन यांच्या गाण्यावर नाचायचा.‘ झूम झूम डार्लिग’ असं या शॉट फिल्मचं शीर्षक होतं. पण त्या वेळी शॉर्ट फिल्मला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असं लक्षात आल्यावर ती कथा बारगळली. जेव्हा ‘बॉम्बे टॉकिज’चा विषय माझ्यापर्यंत आला त्या वेळी पुन्हा मला या कथेची आठवण झाली आणि थोडे बदल करून आम्ही ती कथा घेतली. ही कथा काल्पनिक आहे. खुशी आणि नमन या दोन बाल कलाकारांबरोबर कॅटरिना कैफ या चित्रपटामध्ये आहे. माझ्या या तिसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दहा दिवस लागले. १.५ कोटी रुपये इतकं याचं अत्तापर्यंतचं बजेट आहे. हा चित्रपट म्हणजे चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना दिलेली मानवंदनाच आहे.
तीन मोठय़ा दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
माझ्या मते करण जोहर उत्तम व्यावसायिक सिनेमा बनवतो. त्याने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमे केले आहेत. त्याचा स्वत:चा असा एक मोठा प्रेक्षकवर्ग बनला आहे. तो चित्रपटाला ‘लार्जर दॅन लाइफ’ फील देतो. एखाद्या प्रसंगातील भावना उत्कटतेने मांडणं हे त्यांचं कौशल्य आहे. अनुरागच्या चित्रपटांबद्दल मी काय बोलणार? ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये त्याने जे काही केलं आहे, मी असे काही प्रयोग करण्याची कल्पनादेखील करू शकणार नाही. हा माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. तो अतिशय साधा आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक आहे. त्याला तुम्ही पाच कोटी रुपये द्या अथवा पाच रुपये द्या, तो त्याचं सर्वोत्तम देतो.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर विचार करायचा झाल्यास, तुझ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल काय सांगशील?
मी आत्तापर्यंत फक्त दोनच चित्रपट केलेत. या गोष्टीचा विचार मी माझ्या कारकीर्दीच्या शेवटी करेन.
एक दिग्दर्शक म्हणून तुला भावलेले चित्रपट कोणते?
खरं तर असे बरेच चित्रपट आहेत. पण मधुमती, प्यासा, शोले, शक्ती, जाने भी दो यार, मिर्च मसाला आणि शाम बेनेगल यांचा कलियुग हे सारे चित्रपट अनेक गोष्टी शिकवणारे आहेत.
आपल्याकडील चित्रपटातील कोणत्या गोष्टी बदलाव्यात असं वाटतं.
आपण चित्रपटातील गोष्टींचं विश्लेषण फार करतो. एवढं पाल्हाळ लावण्याचं काही कारण नाही. सिनेमा हे एक दृश्यमाध्यम आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडील सिनेमांमध्ये बऱ्याच ठिकाणी विनाकारण पाश्र्वसंगीताचा वापर केला जातो. पाश्र्वसंगीताचा जास्त वापर केल्याने सिनेमा ‘ड्रॅमॅटिक’ होईल असा एक सर्वसाधारण गैरसमज दिसतो. ज्या ठिकाणी विनोदी प्रसंग आहे तो प्रेक्षकांना समजतो. ते हसतात, तेथे ‘लाफ्टर ट्रॅक’ वापरून तो प्रसंग अधोरेखित करण्याची गरज काय?
ज्याप्रमाणे फरहान अख्तरने ‘डॉन’ पुन्हा नव्याने पडद्यावर आणला. असा कोणता चित्रपट तुला पडद्यावर आणायला आवडेल?
आता तरी माझा असा विचार नाही. अजून तरी याबद्दल मी विचार केलेला नाही.
दिग्दर्शनातला अवघड भाग कोणता वाटतो?
दिग्दर्शनासाठी तुम्ही फिट असणं गरजेचं असतं. कारण इथं वेळेचं बंधन असतं ते सिनेमा पूर्ण करण्याचं. रोजच्या कामासाठी नाही. रोज तुम्हाला दिवसभर काम करावं लागतं. अनेक माणसांना हाताळावं लागतं. आपल्याकडे सगळेच स्टार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला सांभाळून घ्यावं लागतं. माणसांना हाताळण्याचं कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
(‘इंडियन एक्स्प्रेस’मधून साभार)
response.lokprabha@expressindia.com