१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मनोरंजन

..आणि पुरंदर सापडला
दीप्ती नागपाल-डिसोझा

बॉम्बे टॉकिज सिनेमातल्या चार कथानकांपैकी एक कथानक दिबाकर बॅनर्जीं यांच आहे. त्यात पुरंदर नावाच्या मराठी माणसाची भूमिका साकारत आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. ही पुरंदरची व्यक्तिरेखा ज्याच्यावर बेतली आहे तो मराठी माणूस बॅनर्जी यांना कुठे सापडला? आणि कसा?

भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर र्वष होत असल्याच्या निमित्ताने चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला, त्याचं नाव बॉम्बे टॉकिज. बॉम्बे टॉकिज तीन मे रोजी प्रदर्शित होत आहे. आणि हा सिनेमा काढणारे हे चार दिग्दर्शक आहेत अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर. या चौघांनी आपापल्या कथा मांडत बॉम्बे टॉकिज हा सिनेमा तयार केला आहे. बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनी त्यात भूमिका केल्या आहेत. .
अनुराग कश्यप यांनी बॉम्बे टॉकिजमध्ये उत्तर भारतातून मुंबईत नशीब आजमवायला आलेल्या एका माणसाची गोष्ट सांगितली आहे. तर करण जोहरने एका सुखी जोडप्याची एका घटनेनंतर बदललेल्या आयुष्याची गोष्ट सांगितली आहे. झोया अख्तरच्या गोष्टीत एका सिनेस्टारमुळे झपाटलेला एक लहान मुलगा आहे तर दिबाकर बॅनर्जी यांच्या सिनेमात सिनेस्टार होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे.
दिबाकरच्या या गोष्टीरूपी सिनेमाचं नाव आहे स्टार. सत्यजित राय यांच्या पटोल बाबू फिल्म स्टारह्ण या लघुपटाशी साधम्र्य असलेली ही कथा आहे. सिनेमात स्टार बनू पाहणाऱ्या या माणसाचं नाव आहे पुरंदर. तो मराठी आहे. त्याला सिनेमात अभिनय करण्याचं अतोनात वेड आहे. पण तशी संधी काही त्याला मिळत नाही. त्याचा त्याच्या आयुष्यावर, त्याच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो. अभिनयाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो एक आगळंवेगळं माध्यम निवडतो. ते त्याच्या मुलीला गोष्टी सांगण्याचं.
दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी आपल्या या कथेच्या शूटिंगसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शबानी हसनवालिया आणि समरीन फरक्वी यांची निवड केली तेव्हा या दोघींसमोर मुख्य काम होतं, पुरंदरच्या व्यक्तिरेखेशी साधम्र्य असेल अशी व्यक्ती शोधण्याचं. अर्थात हे खूपच मोठं आव्हान होतं, शबानी हसनवालिया सांगते.
शबानी आणि समरीन दोघी मूळच्या दिल्लीच्या. त्यांनी लघुपट बनवले आहेत. हिट अँड रन फिल्म्स् या बॅनरखाली त्या दोघी काम करतात. पुरंदरशी साधम्र्य असेल अशी व्यक्ती शोधण्यासाठी त्यांनी मुंबई पालथी घातली. मुंबईतल्या वेगवेगळ्या नाटकमंडळींच्या भेटी घेतल्या. सिनेमावेडय़ांना भेटल्या. अगदी मुंबईच्या चाळींमध्ये फिरून लोकांना भेटल्या. पण काहीही उपयोग झाला नाही. त्याबरोबरच इतर कामं सुरू होती. पुरंदर मुंबईतल्या एका चाळीतल्या खोलीत राहतो असं दाखवायचं होतं. त्यासाठी लालबागला एका चाळीतील एका खोलीचं लोकेशन नक्की करणं सुरु होतं आणि तिथेच त्यांना त्यांचा पुरंदर भेटला. त्याबद्दल समरीन सांगते, तो त्या खोलीत उभा होता. त्या खोलीचा मालक होता तो. त्यानं अशोक करंगुटकर अशी स्वत:ची ओळख करून दिली. शिवाय आपण इंटिरियर डिझायनर असल्याचंही सांगितलं. पण तेवढय़ात त्याची आई आत आली आणि त्याचा फुगा फुटला. तो इंटिरियर डिझायनर असल्याचं सांगत असला तरी तो कसा बेकार आहे, कामधंदा करत नाही, यावरून त्याची आई बडबड करत होती.
खरं तर अशोक सगळंच खोटं सांगत नव्हता. तसा तो घरदुरुस्तीची, फिटिंगची लहानसहान कामं करायचा. त्यामुळे त्याला वाटायचं की आपल्याकडे इंटिरियर डिझायनरचं कौशल्य आहे. पण त्याचं हे असं बिंग फुटलं त्या क्षणी आम्हाला जाणवलं की आम्हाला आमचा पुरंदर सापडला आहे.
आपल्या या सिनेमांसाठी दिबाकर बॅनर्जी यांनी शबनी हसनवालीया आणि समरीन फरक्वी या दोघींची निवड केली कारण त्यांच्याकडे माहितीपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता. त्यांच्या अनुभवाचा, कौशल्याचा आपल्याला उपोयग होईल याची दिबाकर बॅनर्जी यांना खात्री होती. हा सिनेमा पडद्यावर यायचा आहे. त्यामुळे तो कसा झाला आहे, हे माहीत नाही. पण दिबाकर बॅनर्जी यांची स्वत:ची खास ओळख आहे. ती त्यांच्या सिनेमांमुळे निर्माण झाली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, मांडणी याबाबत ते जे प्रयोग करतात त्यामुळे त्यांचे सिनेमे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. लव्ह, सेक्स अँड धोका हा त्यांचा सिनेमा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. एकमेकांमध्ये गुंफल्या गेलेल्या तीन वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यासाठी दिबाकर बॅनर्जी यांनी वेगवेगळे कॅमेरे वापरले. त्यात अगदी स्पाय कॅमेऱ्यापासून मोबाइल कॅमेऱ्यापर्यंत कॅमेरे होते.
बॉम्बे टॉकिज या प्रकल्पातील चार सिनेमांपैकी आपला ‘स्टार’ हा सिनेमा तयार करण्यासाठी दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रयोगांपेक्षा माहितीप्रधानतेवर जास्त भर दिला. हे शबानी आणि समरीन दोघींना जाणवत होतं. लघुपट निर्मिती करत असल्यामुळे त्या दोघींनाही हीच शैली परिचित होती. कारण लघुपट बनवताना तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करता, संशोधन करता आणि त्यातून एखादी गोष्ट तुमच्या हाताला लागते. म्हणूनच आपल्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिबाकर बॅनर्जी यांनी शबानी आणि सिमरनची निवड केली होती. लघुपट निर्मिती या क्षेत्रातील त्या दोघींच्या कौशल्याची बॉम्बे टॉकिज या आपल्या प्रकल्पासाठी चांगली मदत होईल याची दिबाकर बॅनर्जी यांना खात्री वाटत होती.
अशोक करंगुटकरमध्ये पुरंदर सापडल्यानंतर शबानी आणि सिमरनने सतत त्याच्या बरोबर वावरायला सुरुवात केली. तो कसा वावरतो, कसा वागतो, पुरंदरच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेला मराठीपणा त्यांना अशोकच्या देहबोलीतून शोधायचा होता. अशोकच्या वागण्या बोलण्यातून त्यांच्या सिनेमातला पुरंदर कसा वागेलबोलेल हे त्यांना ठरवायचं होतं. पुरंदरच्या व्यक्तिरेखेसाठी दिबाकर बॅनर्जी नवाजुद्दीन सिद्दीकीचा विचार करत होते. गँग्ज ऑफ वासेपूरमुळे सध्या नवजुद्दीन सिद्दीकीचे नाव सर्वतोमुखी आहेच. पण त्यापेक्षाही पुरंदर अभिनेता बनण्यासाठी जो संघर्ष करतो, त्याचं नवाजुद्दीनच्या अभिनेता म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी त्याआधी दहा- बारा वर्षे सुरु असलेल्या संघर्षांशी साधम्र्य आहे असं दिबाकर बॅनर्जी यांना वाटत होतं. या दोन सहाय्यक दिग्दर्शक मुलींनी अशोक करंगुटकरचं करून आणलेलं शूटिंग पाहिल्यावर दिबाकर यांनी पुरंदरच्या व्यक्तिरेखेत काही लहानसहान बदल सुचवले. थोडक्यात सांगायचं तर आता पुरंदर हा करंगुटकर आणि सिद्दीकी या दोघांचं मिश्रण आहे.
पुरंदर कसा असेल, कसा दिसेल, कसा उठेल-बसेल-बोलेल याचा शोध संपला असला तरी समरीन आणि शबानीची संशोधनाची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दिबाकर बॅनर्जीनाही या मुलींकडून जास्तीतजास्त संशोधन अपेक्षित होतेच. त्यामुळे या दोघींनी उत्तर प्रदेश गाठले. तिथे नवाजुद्दीनच्या बुधना या गावात त्या गेल्या. त्यांच्याकडे अशोकचं फुटेज होतंच आता त्यांनी नवाजुद्दीनलाही बरोबर नेलं आणि पुरंदरची व्य्क्तिरेखा डोळ्यासमोर ठेवून त्याचं शूटिंग केलं. त्या दोघांमध्ये बरीच साम्यस्थळं होती आणि तरीही ते खूप वेगळे होते. सगळ्यात मुख्य फरक म्हणजे स्वत:ला इंटिरियर डिझायनर समजणाऱ्या अशोकने आपलं वास्तव मान्य केलं आहे तर नवाजुद्दीनने कितीही अडचणी आल्या तरी आशावाद कधीही सोडला नाही.
दिबाकर यांचा सिनेमा आता लौकरच पडद्यावर येईल, पण त्यामागची पाश्र्वभूमी अशी आहे.
(इंडियन एक्सप्रेस, मधून साभार)
response.lokprabha@expressindia.com