१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

महत्त्व उपनोंदींचे
प्रदीप महाडिक

‘साहेब, शेतकऱ्याला कुठं वेळ आहे? दिस उजाडला का चालला बैल घेऊन आणि कमरेला कोयता अडकवून, मग दिस मावळला का आला घरा. सांज झाल्यावर आंग धुतलं की जरा वेळ बसला, भाकरी खाल्ली की घोंगडीवर कलंडला. अहो, त्याच्यावरच प्वॉट आहे. शेती पिकली तर खाणार..’ असेच वर्षांनुवर्षे रहाटगाडगे चालतेय हे मात्र खरे आहे. निसर्गाच्या बदलावरच त्याचे आयुष्य असते. साहजिकच त्यांना तसेच जीवन जगावे लागते. खेडय़ापाडय़ांतील शेतकरी, अशिक्षित ग्रामस्थ व बायाबापडय़ादेखील शेतीच्या कामात विलक्षण व्यवहारचतुर असतात. त्यांना शेतीच्या कागदपत्राबद्दल समजत नसले तरी येणाऱ्या पावसाचे अंदाज बरोबर समजतात. त्यामुळे जमिनीबद्दल आपल्याला बरेच काही समजते या समजुतीने ते म्हणतात, या सरकारी बाबूंस्नी आमची जमीन परस्पर विकली कशी? म्हणजे सरकारी कशी झाली? कित्येक र्वष आम्ही कसतोय. अशाच विषयावर सध्या तलाठी कार्यालयात संवाद ऐकावयास मिळतात, कारण बरीच वर्षे मुंबईत राहिल्याने आपली जमीन कुठे आहे हेही काही लोकांना माहीत नसते. मुंबईत किंवा कुठेही राहिले तरी मध्येमध्ये आपल्या जमिनीवर जाऊन यावे, उतारे काढावे, शेतकरी जागृत आहे हे दाखवून द्यावे, कारण शासकीय कर्मचाऱ्यांकडून कळत-नकळत (काही आर्थिक व्यवहारांनी) चुका होत असतात. मात्र त्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक ग्रामस्थाने आणि कामानिमित्त मुंबईला गेलेल्या नवीन पिढीने लक्षात ठेवले पाहिजे. आपली कागदपत्रे (उतारे) अचूक ठेवणे हे प्रत्येक खातेदाराचे कर्तव्य आहे.
भूमापन अधिकार अभिलेख अद्ययावत ठेवण्यासाठी उपनोंद वह्य़ांची म्हणजे नमुना नं. ६ अ, ६ ब, ६ क (वारसनोंद), ६ ड ची (नवा पोटहिस्सा) मदत होते, पण नोंदवहीत बदल बघण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर पोटहिस्से कसे पडले आहेत हे पाहावे म्हणजे स्थळ पाहणी करून काढलेल्या कच्च्या नकाशावरून पुढील पोटहिस्से मोजणीचे काम सोपे जाते. मोजणी कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शक ठरते. जमीनवाटपामुळे झालेले पोटहिस्से नेमके दाखविता येतात, शिवाय पोटहिश्शाचे विलीनीकरण, भूसंपादन, मळई जमीन निर्माण झाल्याने तसेच नदीपात्र व ओढे-नाले यामुळे धूप होऊन जमीन कमी झाल्यामुळे, बिनशेतीमुळे जमिनीत बदल होतात. नवीन पोटहिश्शाच्या विलीनीकरणामुळे जे फेरबदल झालेत त्याची नोंद या उपनोंदवह्य़ात ठेवावयास पाहिजे. यामुळे जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे वर्षअखेरीस मोजणीची कामे किती आहेत ते या उपनोंदवहीमुळे सोपे जाते. हक्क नोंदीबाबत जे अहवाल तालुका नं. ६ मध्ये वर्षांच्या अखेरीस तहसीलदारांना एकत्रित करावयाचे असतात, त्या वेळी उपनोंदवह्य़ा खूप उपयोगी पडतात. तपासणी अधिकारी या चारही उपनोंदवह्य़ा अद्ययावत ठेवतात किंवा नाही हेदेखील तहसीलदारांना कळते.
अभिलेख किंवा सातबारा नोंदवही एकदा सुरू झाल्यानंतर सतत १० वर्षांपर्यंत चालू राहते. त्यानंतर सातबाराची लेखणी नवीन पुस्तकांत करणे गरजेचे असते. त्याला ‘अभिलेखाचे पुनर्लेखन’ असे म्हणतात. मात्र काही परिस्थितीत पुढील नोंदी होत नसतात. अशा वेळी शेतक ऱ्याला योग्य अधिकाऱ्यांचे आदेश घेऊन १० वर्षांपेक्षा कमी मुदतीतही सातबाराचे पुनर्लेखन करता येते. या वेळी जुन्या अधिकार अभिलेखातील नोंदीही अद्ययावत करता येतात. नव्याने केलेला अधिकार अभिलेख नव्याने लिहून झाल्यावर ते तपासणीचे काम ‘मंडळ अधिकारी’ (सर्कल ऑफिसर) करतात. तात्पुरत्या स्वरूपात पेन्सिलीने लिहिलेली फेरफार नोंद प्रमाणित करेपर्यंत तशीच ठेवण्यात येते. नंतर अंतिमरीत्या मंजूर (प्रमाणित) झाल्यानंतर शाईने अभिलेख लिहिला जातो. प्रत्येक नोंदवही वेगवेगळी असते ती खालीलप्रमाणे..
* गावांतील सर्व बिनशेती जमिनीची माहिती गाव नमुना नंबर २ या नोंदवहीत असते.
* दुमाला जमिनीची म्हणजेच देवस्थानासाठी असलेल्या जमिनीची नोंद गाव नमुना नंबर ३ मध्ये असते.
* गावातील जमिनीचा महसूल वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती गाव नमुना नंबर ४ मध्ये असते.
* एखाद्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, गावांचा महसूल, जिल्हा परिषद कर, शिक्षण कर या सर्वाची माहिती पाहिजे असल्यास गाव नमुना नंबर ५ ची नोंदवही उघडल्यावर मिळते.
* जमिनीचे सर्व फेरफार व्यवहार, खरेदी-विक्रीचे व्यवहार, वारस तारीख, खरेदी रक्कम व संबंधित माहितीचा तपशील हक्क संपादनाचे पत्रक फेरफार नोंदवहीत म्हणजे गाव नमुना नंबर ६ मध्ये बघावयास मिळेल.
* एखाद्या वारसाने किंवा हितसंबंधिताने फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्याचा निर्णय याबाबतची माहिती ६ अ या नोंदवहीत वाचावयास मिळते.
* एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास या मयत वारसाच्या नोंदीची माहिती गाव नमुना नंबर ६ क मध्ये मिळते.
* एकत्र कुटुंबात असलेल्या जमिनीची वाटणी झालेली असल्यास अशा जमिनीचे पोटहिस्से वाटणी किंवा एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन झाले असल्यास त्याची माहिती ६ ड या नोंदवहीत असते.
* गाव नमुना नंबर ७ मध्ये या नोंदवहीत जमीनमालकाचे नाव, क्षेत्र, गट नंबर, सव्‍‌र्हे नंबर, हिस्सा नंबर, पोटखराबा, आकार याची माहिती शेतीच्या स्थानिक नावासहित असते.
* कूळ वहिवाटीची माहिती, कुळाचे नाव, आकारलेला कर, खंड याबाबतची माहिती गाव नमुना नंबर ७ अ (म्हणजे सातबारा उतारा) या नोंदवहीत असते. यासाठी सातबारा किती महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवावे
response.lokprabha@expressindia.com