१० मे २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
कागदी महासत्तेसमोर चिनी घोडे!
अलीकडेच गुढीपाडवा साजरा झाला. पारंपरिक गुढीपाडवा म्हणजे अगदी पूर्वी प्रत्येक घराघरावर गुढी उभारली जायची. शिवाय सकाळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर कडुनिंबांच्या कडू पण कोवळ्या पानांचा रसही चाखावा लागायचा. आताचे पालकही आपल्या घरातील लहान मुलांना तो कडू पाला देत नाहीत. आणि मुलेही तो कोवळा कडुिनबाचा पाला काही चाखत नाहीत. त्यामुळे कडुनिंबाचे फारसे काही औषधी उपयोग पुढच्या किमान शहरी पिढीला तरी कितपत माहिती असतील, याविषयी तशी शंकाच आहे. पण खरे तर कडुनिंब म्हणजे बहुगुणी औषधी वनस्पतीच. शेतकऱ्याच्या दृष्टीने तर कडुनिंब हवाच म्हणून अनेकदा शेताच्या बांध्यावर तो पाहायला मिळतो. पण आपल्याकडे पारंपरिक ज्ञान आता हातातून निसटत चालले आहे. म्हणून मध्यंतरी नीम फाऊंडेशन या संस्थेने कडुनिंबाच्या विविध प्रकारच्या औषधी वापरावर वैज्ञानिक संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रस्तुत किस्सा हा सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आहे. नीम फाऊंडेशनने महाराष्ट्रात खूप चांगले काम सुरू केले होते. त्या वेळेस अचानक एके दिवशी एका चिनी व्यक्तीचे ई-मेल संबंधित संस्थेला आले आणि त्यांनी कडुनिंबांच्या संदर्भातील सर्व काम पाहण्यास येण्याचा त्यांचा मनसुबा सांगितला.

कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
ही फँटसी म्हणा किंवा मिथककथा म्हणा..
बँकेत नोकरी करत करतच ‘शिवा ट्रायालॉजी’च्या तीन कादंबऱ्या लिहिणारे अमिश त्रिपाठींचं वय अवघं अडतीस वर्षांचं. त्यांनी लिहिलेल्या मिथकं मांडणाऱ्या तिन्ही इंग्रजी कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरल्या. एवढंच नाही, आता त्यांच्या आगामी कादंबऱ्यांसाठी त्यांचा प्रकाशकांबरोबर करार झालाय आणि त्यांच्या येऊ घातलेल्या कादंबऱ्यांसाठी प्रकाशकांनी त्यांना तब्बल पाच कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स दिलाय. ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा भारतीय प्रकाशन क्षेत्रातल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींना आश्चर्य वाटलं, तर काहींना धक्काच बसला. वेस्टलँड या भारतीय प्रकाशन संस्थेने एखाद्या भारतीय लेखकाला दिलेला हा आजवरचा सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स आहे. कुणाला वाटेल की वेस्टलँडने हा धोका पत्करलाय किंवा जुगार खेळलाय.. पण हा अजिबात जुगार नाही. कारण अमिश त्रिपाठींच्या ‘ओथ ऑफ वायुपुत्रा’ या मायथॉलॉजिकल फँटसी म्हणजेच पुराणकालीन मिथक मांडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच्या एका दिवसातच पाच लाख प्रती विकल्या गेल्या. त्यामुळे त्रिपाठींकडे मायथो फँटसी सुपरस्टारह्ण म्हणूनच पाहिलं जात आहे. त्यांना दिलेली ही भलीमोठी अ‍ॅडव्हान्सची रक्कमही प्रकाशन क्षेत्रात मायथॉलॉजी आणि फँटसीवरची पुस्तकं हे कसं नवं चलनी नाणं आहे, याचंच निदर्शक आहे. त्रिपाठींच्या ‘दी इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या पहिल्या पुस्तकाचे हक्क करण जोहर यांनी विकत घेतले आहेत.

कव्हरस्टोरी
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
‘शिवा ट्रायॉलॉजी’ला एवढं यश मिळण्याची अपेक्षा होती का?
- बिल्कुल नाही. खरं तर मी असं काही लिहीन आणि ते छापून आल्यावर इतकं प्रसिद्ध होईल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मुळात आपण एखादं पुस्तक लिहू, हेदेखील माझ्या गावी नव्हतं. कारण शाळेत असताना मी एक साधी गोष्टही कधी लिहिली नव्हती. माझ्या पिढीतल्या अभ्यासू मुलांचा ओढा सायन्स, इंजिनीअिरग, एमबीए या क्षेत्रांकडे असायचा. म्हणून मी पण सायन्सला प्रवेश घेतला. नंतर एमबीए केलं. पण लेखक बनण्याचा विचारसुद्धा कधी केला नव्हता. म्हणूनच ‘शिवा ट्रायॉलॉजी’ आणि त्याला मिळालेलं यश माझ्यासाठी स्वप्नवत आहे.
पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
- आठ-दहा वर्षांपूर्वी मी कुटुंबीयांसोबत टीव्हीवर पौराणिक मालिका बघत बसलो होतो. त्या वेळी एक रंजक बाब आमच्या लक्षात आली. आपल्याकडे देवांना सुर आणि दानवांना असुर म्हणून ओळखलं जातं. पण प्राचीन पíशयन जमातींमध्ये देवांना अहुरा आणि राक्षसांना दइवा असं संबोधलं जातं. या मुद्दय़ावरून आमच्यात चर्चा सुरू झाली की, प्राचीन काळात पíशयन आणि भारतीय एकमेकांसमोर उभे ठाकले असते तर काय झालं असतं? दोघांनीही एकमेकांना दुष्ट ठरवलं असतं. कारण एकाचे देव दुसऱ्यासाठी दानव आणि दुसऱ्याचे दानव एकासाठी देव होते.


दखल
चित्र-शिल्पकारांच्या ‘कोशा’त..!

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एका मंत्र्यांनी भाषण केले होते, त्याची सुरुवात तर त्यांनी जोरदार केली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला चित्र-शिल्पकलेची फार मोठी, उत्तम आणि उज्ज्वल परंपरा आहे. त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. अजिंठा-वेरुळ, रविवर्मा, हुसेनऽऽ’’.. आणि मग त्यांना पुढचे नावच आठवेना. ते शेकडय़ांच्या संख्येत देणार असलेली उदाहरणे या चार नावांतच संपली. काही थोडे अपवाद वगळता महाराष्ट्रातील कलारसिकांचीच नव्हे तर कलावंतांचीही हीच अवस्था आहे. मग सर्वसामान्य माणसाबद्दल बोलायलाच नको. ही परिस्थिती निर्माण व्हायला आपणच कारणीभूत आहोत. आधुनिक काळात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या देशात बंगाल स्कूल व बॉम्बे स्कूल या दोन कलापरंपरा बहरास आल्या. त्यातली बंगाल स्कूलची कलापरंपरा तेथील कलावंत, कलासमीक्षक, कलाविषयक कार्य करणाऱ्या संस्था व शासन या सर्वानीच पद्धतशीर प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. पण महाराष्ट्रातील कलावंत व बॉम्बे स्कूलची कलापरंपरा मात्र गुणवत्ता असूनही आपल्या कूपमंडूक वृत्तीमुळे व खेकडा संस्कृतीमुळे काहीशी दुर्लक्षित व अज्ञातच राहिली आहे. शिवाय महाराष्ट्रात दृश्यकला या विषयावर फारसे लेखन आणि दस्तावेजीकरण किंवा डॉक्युमेन्टेशन झाले नाही. शिवाय मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, महाराष्ट्रातल्या कलावंतांचा कलाकृतीचं म्युझियमही नाही. थोडक्यात आपला महाराष्ट्र इतर बाबतीत कितीही प्रगतिशील असला तरी दृश्यकलेच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत मागासलेलाच आहे.

पर्यटन
‘फिल्म टुरिझम’चा नवा अध्याय

जगभरात ‘फिल्म टुरिझम’ची संकल्पना वेगाने फोफावते आहे. आपल्या देशातील निसर्गरम्य स्थळं, पर्यटनदृष्टय़ा महत्त्वाची ठिकाणे याकडे पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘फिल्म टुरिझम’चा वापर होऊ लागला आहे. थोडक्यात सांगायचे तर विविध देशांतील प्रॉडक्शन हाऊसेसना आपल्या देशात चित्रीकरण करण्यासाठी बोलवायचे, त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे सोयीसुविधा द्यायच्या त्याही आकर्षक दरात. चित्रपट पूर्ण झाला म्हणजे तुम्हाला जे दाखवायचंय ते रमणीय दृश्य पडद्यावर दिसतंच, लोकांमध्ये चर्चा होते आणि त्याच वेळी एका निर्मात्याकडून दुसऱ्या निर्मात्यापर्यंत या चित्रीकरण स्थळांची महती पोहोचलेली असते. त्यामुळे पर्यटन उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कमीत कमी वेळात जगभर पोहोचण्यासाठी सिनेमाला पर्याय नाही, ही ‘फिल्म टुरिझम’ची प्रचलित संकल्पना आहे. पण, याहीपुढे जाऊन एक वेगळ्या अर्थाने ‘फिल्म टुरिझम’चा वापर केलाय तो रामोजी राव यांनी. १७ वर्षांपूर्वी हैदराबाद शहरापासून तासभर अंतरावर उभ्या राहिलेल्या रामोजी फिल्मसिटीने काळाच्या ओघात पर्यटनाचे नवनवे आयाम शोधले आहेत. जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी असा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या या फिल्मसिटीने बदलत्या काळानुसार ‘फिल्म टुरिझम’ला नवा अर्थ दिला आहे.

मनोरंजन
..आणि पुरंदर सापडला

भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर र्वष होत असल्याच्या निमित्ताने चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला, त्याचं नाव बॉम्बे टॉकिज. बॉम्बे टॉकिज तीन मे रोजी प्रदर्शित होत आहे. आणि हा सिनेमा काढणारे हे चार दिग्दर्शक आहेत अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर आणि करण जोहर. या चौघांनी आपापल्या कथा मांडत बॉम्बे टॉकिज हा सिनेमा तयार केला आहे. बॉलिवूडमधल्या दिग्गज कलाकारांनी त्यात भूमिका केल्या आहेत.
अनुराग कश्यप यांनी बॉम्बे टॉकिजमध्ये उत्तर भारतातून मुंबईत नशीब आजमवायला आलेल्या एका माणसाची गोष्ट सांगितली आहे. तर करण जोहरने एका सुखी जोडप्याची एका घटनेनंतर बदललेल्या आयुष्याची गोष्ट सांगितली आहे. झोया अख्तरच्या गोष्टीत एका सिनेस्टारमुळे झपाटलेला एक लहान मुलगा आहे तर दिबाकर बॅनर्जी यांच्या सिनेमात सिनेस्टार होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे. दिबाकरच्या या गोष्टीरूपी सिनेमाचं नाव आहे स्टार. सत्यजित राय यांच्या पटोल बाबू फिल्म स्टारह्ण या लघुपटाशी साधम्र्य असलेली ही कथा आहे. सिनेमात स्टार बनू पाहणाऱ्या या माणसाचं नाव आहे पुरंदर. तो मराठी आहे. त्याला सिनेमात अभिनय करण्याचं अतोनात वेड आहे. पण तशी संधी काही त्याला मिळत नाही. त्याचा त्याच्या आयुष्यावर, त्याच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम होतो. अभिनयाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तो एक आगळंवेगळं माध्यम निवडतो. ते त्याच्या मुलीला गोष्टी सांगण्याचं.


मुलाखत
सिनेसृष्टीला अभिवादन करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य! - झोया अख्तर

तुला खरं तर ‘किस्मत टॉकिज’ हा सिनेमा बनवायचा होता. आणि आत्ता तू भारतीय सिनेमाच्या शंभरीच्या निमित्ताने ‘बॉम्बे टॉकिज’ बनवलास. हे थोडं विचित्र वाटत नाही का?
हो, किती विचित्र आहे हे! माझ्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचं वय किती, तर अवघं दोन सिनेमांचं (‘लक बाय चॅन्स’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’). असं असताना शंभर वर्षांच्या भारतीय सिनेसृष्टीला अभिवादन करण्याची संधी मला मिळाली, हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. या चित्रपटात मला अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, करण जोहर या तिघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी या तिघांपेक्षा लहान असूनही त्यांच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करीत आहे. हे चांगलं वाटतं.
हा चित्रपट कशाविषयी आहे?
मला आठवतंय बारा वर्षांपूर्वी मला ही कथा सुचली होती. शॉर्ट फिल्मसाठी. रिमा (कागती) आणि मी आम्ही दोघींनी मिळून ही कथा लिहिली होती. ही एका लहान मुलाची गोष्ट होती. हा मुलगा हेलन यांच्या गाण्यावर नाचायचा.‘ झूम झूम डार्लिग’ असं या शॉट फिल्मचं शीर्षक होतं.

भविष्य