१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

अग्निसाक्ष
कृष्णा धर्म

‘‘आपण शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या साक्षीनं लग्न करायचं, काय?’’
‘‘लग्न?’’ कृत्तिकेच्या भुवया उंचावल्या.
‘‘अगं, असं किती दिवस नुसतं भेटत राहायचं आपण? आता एकत्र राहायचं कायमचंच..’’
रमेशकडून आलेल्या विवाहाच्या प्रस्तावाने कृत्तिकेची कळी खुलली नाही. ती खुर्चीत मौन बसून होती. रमेशची दृष्टी तिच्या गंभीर चेहऱ्यावर खिळली होती. ‘लग्न’, ‘संसार’, ‘मुलं’ हे शब्द तिच्या जीवनकोशात नव्हतेच मुळी. एका उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या कुटुंबाला आपल्या परीने सावरण्याचा प्रयत्न करणारी कुटुंबप्रमुख होती ती! कर्तव्याची जाण ठेवून आजन्म अविवाहित राहण्याचा मनोमनी निर्धार केला होता तिने! अपघातात जखमी झाल्याने गलितगात्र झालेले मातापिता आणि मंगला, माधवी या दोघी धाकटय़ा बहिणी! हेच तिचे कुटुंब होते. त्यांच्यासह आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी ती घरीच कोचिंग क्लास घेत होती. ती स्वत: दहावीचे इंग्लिश, गणित, संस्कृत आणि बारावी ते पदवी (कला-वाणिज्य दोन्ही)च्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय शिकवीत होती. अडगाव या तालुक्याच्या गावी तिच्या कोचिंग क्लासबद्दल सर्वानाच माहिती होती. जवळपासच्या खेडय़ांतूनही विद्यार्थी यायचे. क्लास चांगला चालत होता. जाहिरात न होताही. दारावर पाटी नव्हती कोंचिंग क्लासची! सर्व विद्यार्थ्यांचा, बोर्ड आणि युनिव्हर्सिटी परीक्षामध्ये निकाल उत्कृष्ट असायचा दरवर्षी! ती सगळी तयारी करून घ्यायची विद्यार्थ्यांकडून, नाममात्र शुल्क घेऊन!
कृत्तिका जोशी, भावी पिढीची जडणघडण करणारी शिल्पकार खऱ्या अर्थाने होती. तिच्याबद्दल अडगावात आदराची भावना होती. ती आदर्श अध्यापिका होती, पालकांच्या दृष्टीने! समाजात तिची श्रेष्ठ प्रतिमा होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे बिरुद तिला सर्वार्थाने शोभत होते, उच्चवर्णीय कृत्तिका स्वभावाने मनमिळावू होती. विद्यार्थ्यांना तिच्याबद्दल आपुलकी वाटत होती. ती केवळ अध्यापिका नव्हती तर विदुषी लेखिका होती. मराठीच नव्हे तर हिन्दी भाषेतूनही तिने विपुल लेखन केले होते. अजूनही लेखन प्रवास सुरूच होता.
अनन्तपूरनिवासी रमेश देशमुख जवळच्याच एका खेडय़ातील जि.प. प्राथमिक विद्यालयात अध्यापक होता. घर म्हणजे चांगला ऐसपैस वाडा होता. गोठय़ात गाईगुरे होती. स्वत:च्या मालकीची शेती होती. त्याची विधवा आई एक दक्ष गृहिणी आणि शेतीची योग्य देखभाल करणारी कारभारीण होती. दादा सरपंच होते. वहिनी गृहकृत्यदक्ष! दादांना सहा अपत्ये आणि रमेशला दोन होती. मात्र ते एकत्र कुटुंब आता नव्हते. अध्यापिका असलेली रमेशची पत्नी आपल्या दोन जाणत्या अपत्यांसह माहेरी होती. त्यांचे गृहस्थजीवन विस्कटले होते. प्रकरण कोर्टात सुरू होते. रमेश तारखेवर कोर्टात उपस्थित राहायचा. सधन माळी परिवारातील रमेशच्या वाटय़ाला एकाकी जीवन आलेले होते. सकाळी शाळा आटोपून घरी आल्यावर त्याला दिवसभराचा भरपूर वेळ खायला उठायचा. त्याने कविता करण्याचा छंद जोपासला होता. त्याच्या कविता विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होत असल्या तरी वाचकप्रिय झालेल्या नव्हत्या. दुबरेध आणि खडबडीत असायच्या! परंतु तो स्वत:ला प्रथितयश कवी समजायचा, कविसंमेलनात हजेरी लावायचा. त्याच्या कविता गेय नसल्याने श्रोत्यांचा फारसा चांगला प्रतिसाद लाभत नसे.
एवढेच काय, कृत्तिका आणि रमेश दोघेही साहित्यिक अन् अध्यापक होते. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मात्र फार मोठी तफावत होती. आणि गुणवत्तेच्या बाबतीतही! कृत्तिका रमेशपेक्षा उजवी होती. स्वतंत्र असल्याने त्यांच्या विवाहाला कुणाकडून आडकाठी येण्याचा प्रश्नच नव्हता. रमेश घटस्फोटित नव्हता अन् कृत्तिका अजून कर्तव्याने बांधलेली होती. बहीण मंगला दोन मुलांची माता झाली असली तरी माधवीचा विवाह व्हायचा होता. तिच्यासाठी वरसंशोधन करणे अवघड होते. ती व्याधीग्रस्त होती अन् व्याधी काही शारीरिक स्वरूपाची नव्हती. तिच्या देहात ‘रक्तकुंडलिनी’ नामक अघोर शक्ती प्रविष्ट झाली असल्याने डॉक्टरी उपचार थकले होते. साहजिकच देवसामर्थ्यांची आठवण झाली. अनन्तपूरला दत्त संप्रदायाचा मठ होता. तिथे असे रुग्ण अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त होतात, हे तिच्या कानी आले होते. कृत्तिकेचा अशा थोतांडावर विश्वास नव्हता म्हणून तिने रमेशकडे चौकशी केली. त्याच्या सांगण्यावरून ती मठाधिपतींना भेटली. माधवीबद्दल सर्व सांगितले. तेव्हा त्यांनी ‘वारी’ करायला सांगितले. कृत्तिका माधवीसह ‘वारी’ करू लागली. तिथे रमेश भेटायचा. कधी ती त्याच्याकडे जायची. आताही ती माधवी गाढ झोपल्याने रमेशकडे आली होती. आधी त्यांची थोडीशी साहित्याबाबत चर्चा झाली आणि मग रमेशने तिच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तिला तो अनपेक्षित होता. त्यांचा परस्पर परिचय होऊन अवघे सहा महिने झाले होते. तीस किमी अंतर पार करून पत्र येत-जात होती. प्रत्यक्ष भेटी मात्र फार कमी व्हायच्या. घटस्फोटित नसतांना रमेशने लग्नासंबंधी का विचारले, कृत्तिकेला उलगडा झाला नाही. ती खुर्चीतून उठली न् खोलीबाहेर पडली तेव्हा, ‘मी तुझी संमती गृहीत धरलीय’ हे रमेशचे शब्द तिच्या कानी आले, ती चपापली. पण मागे वळून न पाहता सरळ मठात गेली.

रमेशची व्यसने, त्याचे गुंड मित्र, युवतींची शिकार करण्याची पद्धत, सगळे सविस्तर सांगितले तिला आणि रमेशने तिच्याबद्दल मनात सूडबुद्धी बाळगलीय, लग्नानंतर मी तिच्यावर सर्व बाबतीत दडपण आणून तिला लिहू देणार नाही असे तो मद्यधुन्द अवस्थेत बोलला होता.

माधवी व्याधीमुक्त झाल्यामुळे कृत्तिका अनन्तपुरात येईनाशी झाली. रमेश तडफडत होता. वृत्तपत्रांतून प्रकाशित होणारे तिचे साहित्य वाचून त्याचा जळफळाट व्हायचा. मात्र तिला अभिनंदनाचे पत्र लिहायला विसरत नसे. त्याचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या सर्वच प्रती कपाटात जाऊन बसल्या होत्या. काही सप्रेम भेट दिल्या गेल्या. कृत्तिकेचे प्रकाशित साहित्य लोकमानसाला भावत होते. त्यावर चर्चा व्हायची अन् प्रशंसाही! तिने त्याच्या कविता संग्रहावर तुटक प्रतिक्रिया पत्रातून व्यक्त केल्याने तर तो फारच कातावला होता. त्याला वाटायचे, सरळ तिच्या घरी जाऊन तिला शेगावला न्यावे. मात्र तेवढे धैर्य त्याच्याठायी नव्हते, तो पत्राद्वारे वारंवार लग्नासंबंधी विचारणा करायचा. पण कृत्तिका माधवीसाठी वरसंशोधन करीत होती!
‘‘कृत्तिका माझ्या गळ्यात पडतेय. मी काय करू?’’ एक दिवस रमेश आपले मित्र असलेल्या मठाधिपतींना म्हणाला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. अडगावच्या त्यांच्या शिष्याकडून त्यांना कृत्तिकेबाबत माहिती मिळाली होती. ती मठात यायची त्या वेळी ते तिच्याशी बोलायचे. तिचे त्यागमय जीवन, शालीन वागणे आणि रमेशच्या सांगण्याचा मेळ बसत नव्हता. रमेशने कृत्तिकेचे एके काळी शेजारी राहणारे काका असलेल्या आपल्या साहित्यिक मित्रालाही हेच सांगितले. त्यांच्याकडून त्याला तिच्या विविध कलासंपन्नतेबाबत माहिती मिळाली होती. जेव्हा तिची एका प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेली लेखमाला त्याने वाचली होती. ‘ती कुठेही न शिकता उत्तम गायिका, नृत्यांगना अभियनसंपन्न कलावती आहे. वक्तृत्वाचीही देण तिला लाभलीय’ असे काकांनी सांगितले, त्या वेळी तिला भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि रमेशने तिची लेखमाला आवडल्याचे अभिनंदन पत्र लिहिले होते. तिच्याकडून आभाराचे पत्र आले होते. त्यानंतर अनन्तपूरला संपन्न झालेल्या कविसंमेलनात कृत्तिकेने गायिलेल्या तिच्या कवितांना रसिकांकडून भरभरून प्रशंसेचा प्रतिसाद मिळाला होता. हीच पहिली भेट रमेशची कृत्तिकेशी. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला होता. काकांना हे सगळे आता आठवले. कृत्तिका अशी गळ्यात पडणारी नाहीय हे त्याचे ठाम मत होते. मात्र ते बोलून दाखवले नाही त्यांनी! एव्हाना कृत्तिका रमेशशी विवाहबद्ध होणार आहे ही वार्ता तिच्याशी आणि मठाशी संबंधित सर्वांपर्यंत पोहोचली. दोन-चार वर्षांत लेकीच्या लग्नाचे कर्तव्य असणारा बाप रमेश, स्वत:च बाशिंग बांधायला सिद्ध असलेला पाहून काहींना हसू आले. आपल्या दैनिक जीवनात व्यस्त असलेल्या कृत्तिकेला मात्र याबाबत काहीच माहीत नव्हते. तिच्या गावातही ही वार्ता प्रसृत झाली होती. ज्यांना कृत्तिकेबाबत माहिती होती त्यांनी विश्वास ठेवला नाही. असा अंगाने फाटका, उंचीने बुटका कृष्णवर्णी रमेश, सावळ्या पण देखण्या कृत्तिकेला पती म्हणून मुळीच शोभत नाहीय, असे काही जणांनी बोलूनही दाखविले होते.
‘‘माधवी माझी मेव्हणी आहे, मी तिच्यासाठी स्थळ शोधतोय. तू काळजी करू नकोस. आई-बाबा आता घरात हिंडू-फिरू लागलेत तेव्हा तुझी चिंता कमी झालीय आता माझा- माझ्या भावनांचा विचार कर. लग्नाला विलंब होतोय. मी अधीर झालोय.’’ रमेशचे पत्र वाचून कृत्तिकेला हसू आले. ‘किती जणी असतील अशा, ज्यांना लग्नाचे आमिष दाखवतोय.’ कृत्तिका मनोमनी म्हणाली. काकाकडून तिला रमेशबद्दल माहिती मिळाली होती. ‘गळ्यात पडतेय’ हा तिच्याबाबत केलेला शब्दप्रयोग तिच्या निष्कलंक जीवनाबाबत माहिती असलेल्या काकांना खूपच खटकला होता. त्यामुळे ती जेव्हा अनन्तपूरला आली बऱ्याच अवधीनंतर, तेव्हा त्यांनी रमेशची व्यसने, त्याचे गुंड मित्र, युवतींची शिकार करण्याची पद्धत, सगळे सविस्तर सांगितले तिला आणि रमेशने तिच्याबद्दल मनात सूडबुद्धी बाळगलीय, लग्नानंतर मी तिच्यावर सर्व बाबतीत दडपण आणून तिला लिहू देणार नाही असे तो मद्यधुन्द अवस्थेत बोलला होता, हेही सांगितले.
‘‘काका, लग्न म्हणजे पोरखेळ वाटतोय त्याला. शेगावला गजानन महाराजांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हायचे म्हणतोय, हे काही लग्न आहे? कुणी अन्य साक्षीदार नकोत? अग्निसाक्ष विवाह व्हायला हवा ना! मला मुळी इच्छाच नाहीय लग्न करण्याची. रीतसर घटस्फोट झाला नाही अन् म्हणे लग्न करू.’’ कृत्तिकेच्या डोक्यात रमेशशी विवाहबद्ध होण्याचे खूळ नाही हे पाहून काकांना हायसे वाटले.
कृत्तिकेकडून विवाह प्रस्तावाला मान्यता मिळत नव्हती. तिकडे कोर्टातही बायकोकडून खूप मानहानी सहन करावी लागत होती. रमेश वैतागला होता. कृत्तिकेशी विवाहबद्ध होत असल्याची वार्ता त्याच्या बायकोच्या कानी पोहोचली होती. तशी त्याची अन्य लफडीही तिला समजली होती अन् ती कोर्टासमोर मांडत होती. रमेशच्या रंगेल जीवनाची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. त्याच्या कुटुंबीयांना हे असह्य़ होत होते.
‘‘नमस्कार ताई’’, एक दिवस एक अनोळखी गृहस्थ कृत्तिकेकडे आले. रविवार असल्याने ती नुकतीच बाजारातून भाजी घेऊन आली होती. ‘‘भाचीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायला आलोय.’’ ‘‘आपला परिचय?’’ कृत्तिकेने शांतपणे विचारले. ‘‘मी रमेश देशमुखचा भावसासरा. रमेशची कन्या सविता हिचा विवाह आहे येत्या ७ तारखेला. तुम्ही अवश्य यायचे. नाही म्हणू नका. ही घ्या पत्रिका.’’ ‘‘लग्न तुमच्याकडून होतेय का?’’ पत्रिका घेत कृत्तिका म्हणाली, ‘‘बसा हं, मी खडीसाखर आणतेय.’’ ‘‘होय. मीच ठरवलेय लग्न सविताचे, काय करणार, तुम्ही सगळे जाणताच. पण आनंद वाटतोय, रमेशराव स्वत: कन्यादान करायला तयार झालेत हे सांगताना. मी कमलला म्हणजे माझ्या बहिणीला सांगितले- आता उगीच ताणून धरू नको. समेट घडवायचाय. लवकरच तडजोड होईल, कोर्टामार्फत. आमच्या बिरादरीतला आहे नवरा मुलगा. त्याला सगळे माहीत आहे.’’
‘‘हं. घ्या खडीसाखर, तोंड गोड करा. माझ्याकडेही गोड बातमी आहे दादा, माझ्या धाकटय़ा बहिणीचे- माधवीचे लग्न ठरलेय. मुहूर्त काढायचाय. साखरपुडा झालाय. पुढल्या महिन्यात होईल लग्न, पत्रिका पाठवीनच. हो.. तुमचा पत्ता द्या.. हं. हा पेन अ्न कागद.’’
‘‘नाही, तुम्ही सविताच्या लग्नाला या, म्हणजे आमचा पत्ता मिळून जाईल. तुमच्याकडल्या लग्नाला आम्ही सगळेच येऊ बरे का.’’ खडीसाखर घेत दादा उठले. कृत्तिका मोकळेपणाने प्रसन्नपणे हसली.
response.lokprabha@expressindia.com