Lokprabha.com
१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भविष्य
दि. ३ ते ९ मे २०१३
 

मेष तुमच्याच राशीत सूर्यग्रहण होणार आहे. हत्तीला पकडण्याकरिता गवत आच्छादले जाते आणि त्याच्या मोहाने तो खड्डय़ात पडतो. तुमचे ग्रहमान अगदी असेच आहे. सर्व स्तरांवर सावधानता बाळगा. व्यापार-उद्योगात महत्त्वाचे निर्णय काही आठवडे पुढे लांबवणे चांगले. दरम्यानच्या काळात बाजारातील चढउतार आणि इतर गोष्टींचा अभ्यास करावा. नोकरीमध्ये घाईघाईने काम करताना तुमच्या हातून चूक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी हुज्जत घालू नका. घरामध्ये सरळ आणि साधा वाटणारा प्रश्न उगीचच गुंतागुंतीचा होईल. प्रकृतीकडे लक्ष ठेवा.
.......................................................

वृषभ सूर्यग्रहण व्ययस्थानात होणार आहे. ग्रहमान जरी तुमच्या विरोधात असले तरी तुमचा आशावाद टिकून ठेवायला उपयोगी पडेल. सुख-दु:खाचा वाटा समसमान राहील. व्यवसाय- धंद्यात अतिसाहस आणि बेकायदेशीर काम करू नका. त्याचप्रमाणे नवीन करार अजून काही आठवडे टाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचना विसरणार नाही याची दक्षता घ्या. नाहीतर त्यांना तोंडसुख घ्यायची संधी मिळेल. घरामधल्या व्यक्तींच्या कल्पना चांगल्या असतील. पण त्या खर्चिक असल्यामुळे तुमच्या मनात आकडेमोड चालू होईल. शुभकार्य किंवा लांबच्या प्रवासाची नांदी होईल.
......................................................

मिथुन लाभस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. गेल्या काही महिन्यांत अडथळे असूनही तुम्ही चांगले काम केलेत. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली. आता मात्र तुमच्या खिशावर ताण येणार आहे. व्यवसाय-उद्योगातील नवीन करार किंवा मोठे व्यवहार शक्यतो या आठवडय़ात टाळा. कारखानदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी फायद्या-तोटय़ाचे गणित नीट समजून घ्यावे. नोकरीमध्ये एखाद्या निमित्ताने सहकाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा यातील फरक लक्षात येईल. घरगुती प्रश्नामध्ये नातेवाईकांकडून टोमणे ऐकायला मिळतील. सध्या शांत राहा. तरुणांनी मनावर संयम ठेवावा.
.......................................................

कर्क राशीच्या दशमस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. ग्रहमान तुम्हाला थोडेसे कोडय़ात टाकणारे आहे. तुमच्या प्रगतीला हितशत्रूंच्या कारवायांमुळे किंवा तुमच्याच चुकीच्या निर्णयामुळे गालबोट लागण्याची शक्यता आहे. तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापार-उद्योगात तुमच्या मर्यादेत राहून काम करा. कामामध्ये गुप्तता राखा. नोकरीमध्ये घाईगडबडीत काही चुका झाल्या असतील तर त्या वरिष्ठांच्या निदर्शनाला येतील. तुमचे सहकारी त्याचे भांडवल करतील. अधिकारांचा वापर जपून करा. घरामधल्या लहान मुलांच्या व ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी वाटेल.
.......................................................

सिंह राशीच्या भाग्यस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. लांबून पाहणाऱ्या व्यक्तीला तुमचे सर्वकाही चांगले आणि उत्तम दिसेल. परंतु अंतरीच्या कळा मात्र तुम्हालाच जाणवतील. ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल त्यात गती येईल. पण इतरांवर सोपवलेली कामे रेंगाळल्यामुळे तुम्ही नाराज रहाल. व्यापार-उद्योगात संबंधित व्यक्तींनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे तुमचे बेत काही आठवडे लांबण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचे विचार सहकाऱ्याजवळ व्यक्त करू नका. कारण ते गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्यापासून चार हात लांब राहा.
.......................................................

कन्या राशीच्या अष्टमस्थानात सूर्यग्रहण होणार आहे. परावलंबी असणे ही गोष्ट कोणालाच आवडत नाही. पण प्रकृती आणि इतर कारणांमुळे तुम्हाला कामाचे वेळापत्रक मागेपुढे करावे लागेल. व्यवसाय-धंद्यात तुमची उमेद वाढवणारे ग्रहमान तुम्हाला लाभणार आहे. परंतु कायदा किंवा इतर कारणांमुळे थांबणे भाग पडेल. नवीन करार करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा शिरसावंद्य माना. जे काम कराल ते बिनचूक असू द्या. घरामध्ये स्वत:चे स्वास्थ्य आणि वयोवृद्ध व्यक्तींची प्रकृती याकडे लक्ष द्यावे लागेल. काही अनपेक्षित प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
.......................................................

तूळ सूर्यग्रहण राशीच्या सप्तमस्थानामध्ये होणार आहे. सभोवतालच्या परिस्थितीनुरूप तुम्हाला तुमचे धोरण सतत बदलावे लागेल. व्यापार-उद्योगात एका मोठय़ा संक्रमणाच्या वळणावर तुम्ही येऊन पोहोचलेले असाल. अनेक वर्षे जी भागीदारी किंवा मैत्री करार चालू होते ती पुढे चालू ठेवण्याबाबत विचार करावा लागेल. परदेश व्यवहारात सावधता बाळगा. नोकरीत वरिष्ठांशी, सहकाऱ्याशी वादविवाद करू नका. घरात जोडीदाराच्या स्वास्थ्यामुळे, वागण्यामुळे थोडी चिंता वाटेल. घरगुती समारंभातील मानपान, भावभावना यात प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका.
.......................................................

वृश्चिक सूर्यग्रहण राशीच्या षष्ठस्थानात होणार आहे. एकंदरीत ग्रह तुम्हाला असा इशारा देत आहेत की दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला. व्यापार-उद्योगातील स्पर्धा तीव्र होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा पवित्रा सावध ठेवावा लागेल. अनपेक्षित कारणांमुळे पैसे खर्च होण्याची शक्यता गृहीत धरून हातात रोख रक्कम ठेवा. नोकरीत तुमचे हितशत्रू तुमची चूक मुद्दाम वरिष्ठांच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून तुमच्याविषयी त्यांचे मन कलुषित व्हावे. तुम्ही तुमच्या कर्तव्यात चोख राहा. घरामधल्या व्यक्तींची मोट बांधणे कठीण होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या.
.......................................................

धनू राशीच्या पंचमस्थानामध्ये सूर्यग्रहण होणार आहे. विचारांपेक्षा काहीतरी कृती केल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. हा तुमचा स्वभाव तुम्हाला मोहात टाकणारा आहे. जे काम करायचे आहे त्याविषयी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यापार-उद्योग व कारखानदारीमध्ये एखादा मोठा हात मारावासा वाटेल. हा निर्णय म्हणजे एकप्रकारची सट्टेबाजी असेल. नोकरीमध्ये तुम्ही जे काम करता आहात ते जरी नेहमीचे असले तरी ते तपासून पाहा. मगच ते वरिष्ठांसमोर ठेवा. सहकाऱ्यांच्या शब्दाने चिथावून जाऊ नका. घरामधल्या एखाद्या व्यक्तीविषयी काळजी वाटेल. महत्त्वाचे निर्णय लांबवावेत.
.......................................................

मकर सूर्यग्रहण राशीच्या चतुर्थस्थानात होणार आहे. काही बदल असे असतात की जेथे परिस्थितीनुसारच आपला पवित्रा ठरवणे भाग पडते. व्यापार-उद्योगामध्ये महत्त्वाच्या कामासंबंधी शक्यतो बोलणी करूनका. फक्त मसुदा तयार करा. शक्यतो करार करू नका. नाहीतर नंतर त्यातून अनपेक्षित प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. व्यावसायिक किंवा व्यक्तिगत कारणाकरता वास्तू खरेदी करताना त्यातील अटी आणि नियम काळजीपूर्वक अभ्यासा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या परवानगीशिवाय महत्त्वाचे निर्णय निश्चित करूनका. घरामधल्या व्यक्तीचे विचार आणि खर्चिक बेत तुमच्या तत्त्वात बसणार नाहीत.
.......................................................

कुंभ सूर्यग्रहण राशीच्या तृतीयस्थानात होणार आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाईने घेत नाही. त्यावरून तुम्हाला टीकाही ऐकायला लागते. पण तुमचे हे नेहमीचे धोरण तुम्हाला उपयोगी पडेल. व्यवसाय-उद्योगातील महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सही करताना त्याचा आशय नीट समजून घ्या. नोकरीत फुशारक्या मारल्यात तर त्या अंगलट येतील. वरिष्ठांशी नम्रतेने वागा. घरात तुम्ही केलेल्या कामाला श्रेय न मिळाल्यामुळे वाईट वाटेल. भावंडांविषयी थोडी काळजी राहील. वाहन चालवताना, मशीनवर काम करताना व प्रवास करताना बेसावध राहू नका.
.......................................................

मीन सप्ताहाच्या मध्यामधे सूर्यग्रहण राशीच्या धनस्थानात होईल. स्वप्न आणि सत्य हे वेगळे असते याची जाणीव करून देणारे हे ग्रहमान आहे. व्यवसाय-उद्योगामध्ये एखादा चांगला व्यवहार करून मोठा हात मारावा असे वाटेल. पण त्यातून दिशाभूल होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे न विसरता पालन करा. तसेच अधिकारांचा वापर जपून करा. सांसारिक जीवनात छोटय़ा-मोठय़ा कारणामुळे तणाव राहील. नवीन जागा किंवा वाहन खरेदी, विवाह ठरवणे असे निर्णय तीन-चार आठवडे लांबवा.
.......................................................

विजय केळकर Email : response.lokprabha@expressindia.com