२६ एप्रिल २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी
सहप्रवासी

आंबा विशेष
‘आहे मनोहर तरी..’
आंब्याचे अर्थकारण
आंबा पुनरुज्जीवनाच्या दिशेने
सरकारी परवान्यांमधून वाट कशी काढायची?
सरकारही हवे आंबाधार्जिणे
निर्यातीसाठी उत्पादकांचा उत्साह वाढतोय..!
कॅनिंगला गरज मार्केटिंगची
आंबा उत्पादकाला प्राधान्य द्या!
आंबा उद्योग दलालांच्या चाटय़ात..!
समृद्धीचं झाड..
आयुर्वेद आणि आंबा
आंब्याच्या रेसिपी

एकपानी
संवाद
शब्दरंग

आरोग्यम्

वाचक-लेखक
विज्ञान तंत्रज्ञान
स्त्री-मिती
द्या टाळी..
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाइल्डक्लिक
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
व्होट बँकेचे इमले!
गुढीपाडवा आला, नव्या वर्षांची उत्साहाने सुरुवातही झाली. आंब्याची तोरणे दरवाजाला लागली आणि आता तर रामनवमीही आली. पण नव्या वर्षांचे हे नवे नऊ दिवस संपत आले तरी राजकारण्यांच्या प्रांगणात मात्र अद्याप शिमगाच सुरू आहे. अगदी खरे सांगायचे तर गेली काही वर्षे राजकारणातला शिमगा तसा वर्षभर सुरू असतो. कधी निमित्त असतात, नितीन गडकरी, कधी अजित पवार तर कधी गेला जमाना दिग्विजय सिंग. आणि गुढी उभारली जाते ती इरसाल शब्द, विशेषणे आणि तुलनांची. पट्टीच्या लेखकालाही वाटावे की, आपण कल्पकतेत कमी पडतोय, अशा भन्नाट कल्पना एकेकाने कामी लावलेल्या. त्यातही एकच एक कारण असेल तर ते राजकारण कसले? त्याला अनेक कारणे कधी अकारण येऊन जोडली जातात तर कधी सकारण. हे सारे समजून घ्यायचे तर सामान्य माणसाची भंबेरीच उडेल, अशी एकूण स्थिती. अगदी अलीकडच्या घटनाक्रमाबद्दल बोलायचे तर याला सुरुवात झाली ती मुंब्रा-शीळफाटय़ावर लकी कपांउंडमधील आठ मजली इमारतीच्या कोसळण्याने. सुमारे ७३ जणांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आणि मग दुसऱ्या दिवशी डोळे खाड्कन उघडल्याप्रमाणे अचानक प्रशासनाला जाग आली आणि मग अनधिकृत वसाहती, इमारती यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली.

आंबा विशेष
‘आहे मनोहर तरी..’

निसर्गरमणीय कोकणात पिकणारा हापूस आंबा हे उन्हाळ्याच्या मोसमात इथे येणाऱ्याचं खास आकर्षण असतं. उत्तम गर आणि मधुर चव हे या फळाचं वैशिष्टय़. तसं पाहिलं तर कोकणात हापूसव्यतिरिक्त पायरी, केशर, सिंधू, रत्ना, राजापुरी, तोतापुरी इत्यादी जातींचे आंबेही चाखायला मिळतात. त्याचबरोबर हापूसचा प्रसार होण्यापूर्वी रायवळ आंब्याच्या विविध स्थानिक जाती लोकप्रिय होत्या. लहान फळ पण वेगवेगळ्या प्रकारचा स्वाद, हे या जातींचं खास वैशिष्टय़. पण सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या झाडांवर भेट किंवा खुंटी कलम करण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर हे तंत्र आणखी विकसित होऊन पत्र्याच्या डब्यांमध्ये कलमं बांधली जाऊ लागली आणि आंब्याच्या इतर जाती मागे पडत गेल्या. अल्फान्सो नावाच्या एका पोर्तुगीजानं आणलेलं हे झाड कोकणच्या लाल मातीत, खडकाळ जमिनीत आणि खाऱ्या हवेवर जोमाने बहरू लागलं, या प्रदेशाच्या निसर्गाचं अविभाज्य घटक ठरलं. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादन मोहिमेला खऱ्या अर्थाने चालना देण्यात आली. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला.

आंबा विशेष
आंब्याचे अर्थकारण
फळांचा राजा म्हणून ऐटीत मिरवणारा कोकणातला हापूस आंबा गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे. तसे पाहिले तर महागाईच्या फे ऱ्याने भाज्या, अन्नधान्यापासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंना केव्हाच आपल्या कवेत घेतले आहे. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या सर्वच प्रमुख फळांनाही महागाईचा हा ज्वर चढला आहे. त्यामुळे आंब्यासारखा फळांचा राजा स्वस्त कसा होईल, हा मुळात प्रश्न आहेच. आंबा काही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोडत नाही. मग तो स्वस्त व्हावा ही अपेक्षा तरी कशासाठी? तरीही आपल्या अवीट अशा गोडीमुळे वर्षांनुवर्षे आबालवृद्धांना भुरळ पाडणारा हा फळांचा राजा वर्षांतून एकदा तरी मनसोक्त आणि तोही तुलनेने स्वस्त दरात चाखता यावा, अशी भाबडी आशा सगळेच बाळगून असतात. आंबा स्वस्त होईल म्हणून अगदी मे महिन्याच्या अखेपर्यंत वाट पाहतात, पण आंबा काही स्वस्त होत नाही आणि सर्वसामान्यांच्या पदरी हापूसचा हंगाम संपेपर्यंत निराशाच पडते. मोहर चांगला असो वा वाईट आंब्याचे दर चढेच राहतात. त्यामुळे वर्षांला एखादी तरी पेटी घरात यावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आंबा केव्हाच ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरू लागला आहे.


आंबा विशेष
आंबा पुनरुज्जीवनाच्या दिशेने
कोकणात आंबा लागवड झाली खरी, पण अर्थात फक्त हापूसचीच. येथील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या लागवडीला पोषक ठरत होता. शास्त्रज्ञांनीच त्यावर शिक्कामोर्तब केलेले. मग काय, जागा मिळेल तिकडे हापूस लागला. या जिल्ह्य़ातील जांभा दगड आणि समुद्राची खारी हवा या आंब्याला मानवत होती. त्यामुळे जांभा कातळावर अक्षरश: सुरुंग स्फोटाने लोकांनी खड्डे मारले आणि हापूसच्या बागा फुलवल्या. एकाच फळाच्या वाणाची अशा रीतीने मोठय़ा प्रमाणात लागवड होणं, हे संपूर्ण देशासाठी अप्रूप होतं. पण ही मोनोक्रॉप संस्कृती आज बूमरँगसारखी घातक ठरते आहे. आजमितीला कोकणातील एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आलं आहे. पण यातील निम्मी झाडं आता फक्त सावली देण्यासाठीच उभी आहेत. येथे गेल्या पाच वर्षांत आंबा उत्पादनाचे आकडे वेगाने खाली आले आहेत. आजोबांनी लावलेल्या झाडापासून आता नातवांना आंबा पाहायलाही मिळत नाही. बदलत्या हवामानाला अतिशय हळवा ठरणारा हा आंबा आता धोक्याची घंटा देऊ लागला आहे.

आंबा विशेष
सरकारही हवे आंबाधार्जिणे
देवगडचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. हापूस आंबा म्हटल्यावर देवगडचा हापूस असेच ग्राहकाच्या तोंडून शब्द येतात. पण हा हापूस आंबा बदलते हवामान व सरकारची निराशजनक स्थितीतून जात आहे. माझे आजोबा कै. मोरेश्वर जनार्दन गोगटे यांनी सन १९२५मध्ये हापूस आंबा उत्पादनास सुरुवात केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी हापूस आंबा भविष्यात शेतकऱ्यांना तारणहार ठरेल असे त्याकाळी म्हटले होते. त्यांनी त्याकाळात आंबा लागवड व उत्पादनात वाढ व्हावी म्हणून प्रयत्न केले. त्यांनी आंबा झाड भेट देऊन लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. आजोबांची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून माझ्या वडिलांनी शेतकऱ्याच्या बागात आंबा लागवडीचे क्षेत्र वाढविले. वाहतूक यंत्रणा व ग्रेडिंगसाठी योगदान दिले. आमचे कुटुंबीय सुमारे ९० वर्षे उत्पादनात आघाडीवर आहे. त्या काळापासून आजही रिटन पॅकिंगची सोय (ट्रंक-लाकडी खोके) आजही सुरू आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मी, माधव भांडारी, सुधीर जोशी यांच्यासह अन्य मान्यवरांना बरोबर घेऊन स्थापना केल्यास २५ वर्षे उलटली.

आंबा विशेष
निर्यातीसाठी उत्पादकांचा उत्साह वाढतोय..!
परदेशात आंब्याला असलेली मागणी आणि त्याला मिळणारा भाव लक्षात घेऊन आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे काम पणन महामंडळ सन २००७ पासून करीत असून आता या प्रयत्नांना चांगले यश येऊ लागले आहे. एकतर शेतकऱ्यांमध्ये निर्यातीबाबत जाणीव आणि जागृती दोन्ही होत आहे आणि क्रमाक्रमाने निर्यात वाढत आहे. निर्यातदारांऐवजी काही आंबा बागायतदारांनी थेट निर्यातही सुरू केली आहे. यामुळे आंब्याला मिळणाऱ्या दराचा पूर्ण फायदा उत्पादकाला मिळत आहे. पणन महामंडळामुळे दलालाचा अडथळा मोठय़ा प्रमाणावर दूर झाला आहे. पणन महामंडळाची गेल्या ५ वर्षांतील महत्त्वाची कामगिरी ठरली व बागायतदारांमध्ये निर्यात करावी ही वृत्ती वाढीस लागली आणि निर्यातक्षम आंबा उत्पादित करण्याकडे बागायतदारांचा कल वाढू लागला आहे. रत्नागिरी येथील कार्यालयात निर्यातदारांसाठी निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. ग्रेडिंग लाइन, कोल्ड स्टोअरेज, रायपिलग चेंबर आणि प्रि-कुलिंग युनिट अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत. आंबा निर्यात समुद्रमार्गे करावयाची असेल तर प्रि-कुलिंग युनिट उपयोगी पडते. सध्या रत्नागिरीतून समुद्रमार्गे आंबा निर्यात होत नाही, मात्र लवकरच त्याचा आरंभ होईल. समुद्रमार्गे आखातात आंबा निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी पणन मंडळ मोठी भूमिका बजावू इच्छिते.


आंबा स्पेशल
कॅनिंगला गरज मार्केटिंगची
आपल्याकडे आंबा खाण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत. कापून खाणे, चोखून खाणे, आमरस ओरपणे, तर त्याही पुढे जाऊन आंबा पोळी, आंबा वडी या स्वरूपात खाणे. पण गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाने यात आणखीन एका प्रकाराची भर पडली आहे. आंब्याचा रस काढून त्यावर प्रक्रिया करून तो हवाबंद डब्यात साठवून मग वर्षभरात आपल्याला आवडेल तेव्हा खाणे. पण तुलनेने हे जरा कमीच आढळते. आम्ही ताजाच आंबा खातो अशी बढाई मारणाऱ्यांसाठी तर या प्रकारात काहीच दम नाही, ती चव नाही. पण तरीदेखील गेल्या काही वर्षांत या व्यवसायाने कोकणात चांगलीच पकड घेतली आहे. पण जसे कोकणातील आंब्याने जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे तसा कोकणातील मँगो पल्पने आपले नाव अजून गाजवले नाही. या अनुषंगाने जेव्हा ३५ वर्षांपासून या उद्योगात कार्यरत असणारे दादा केळकर यामागची कारणमीमांसा स्पष्ट करतात तेव्हा लक्षात येते की, या व्यवसायाला खरी गरज आहे ती मार्केटिंगची. बाकी सारे कोकणात आहे पण नेमके कोकण येथेच मागे पडतो आहे. दादा सांगतात, ७६ साली आम्ही जेव्हा कॅनिंगच्या व्यवसायात उतरलो तेव्हा अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक या व्यवसायात होते. दुसरे म्हणजे आम्ही जेव्हा सर्वेक्षण केले तेव्हा आम्हाला प्रतिसाद मिळाला तो ज्यूस सेंटर, हॉटेल यांच्याकडूनच.

भविष्य