१९ एप्रिल २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
गगनभरारी
आयटी ते बीटी व्हाया चाळिशी!
माझ्या उद्योगांची चाळिशी
लोकप्रभा- ४०
सहप्रवासी
माझी चाळिशी
फोटो गॅलरी

आरोग्य
चाळिशी गाठल्यावर काय खाल?
कोणत्याही वयात तुमचा फिटनेस तुमच्या हातात!
मँझधार में नैया
प्रेम, सेक्स आणि चाळिशी
चाळिशीतले डोळे
चाळिशीत हसा खळखळून

चाळिशीचा फंडा

कायदा

कोष भेदताना
डोंगरातला माणूस झाला व्यवस्थापन गुरू
भेंडीने भेदले दारिद्रय़ाचे दुष्टचक्र!
प्रवास
लोकप्रभा- ४०
पाहिलेच पाहिजेत असे ४० मराठी सिनेमे
वाचलीच पाहिजेत अशी ४० पुस्तकं
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
आत्ता कुठं आयुष्य सुरू झालंय!
परीक्षा संपली, सुट्टी सुरू झाली आणि मोरू मोकळा झाला. म्हणजे आधी काही त्याच्या पायात कुणी बेडय़ा ठोकलेल्या नव्हत्या. पण आधी तो अभ्यासाच्या निमित्ताने तरी घरी दिसायचा, पण आता तर त्याचा पाय घरात ठरत नव्हता. वर्ष- दीड वर्षांपूर्वीच चाळिशी ओलांडलेला त्याचा बाप आणि आई मात्र त्याच्या भविष्याच्या चिंतेने पोखरून निघत होते. आता एसवायबीएस्सीला असलेला मोरू नंतर नेमके काय करणार आहे, हा त्यांना प्रश्नच होता. आई घरकाम करता करता पापड, लोणच्याचा घरगुती उद्योग करायची. मोरूच्या वडिलांची पिठाची गिरणी होती. ते दिवसभर गिरणीत असायचे. त्यामुळे चेहरा आणि केस नेहमीच पांढरे. मुलाला शिक्षणासाठी पैसे कमी पडू द्यायचे नाहीत एवढे मात्र त्या दोघांनीही पक्केठरवले होते. पण हा बेटा नेमके काय करणार, याची मात्र त्यांना सुतरामही कल्पना येत नव्हती. पूर्वी म्हणजे अगदी गेल्या वर्षांपर्यंत सुट्टीच्या काळात त्यांना त्याची मदत व्हायची. पण यंदाची सुट्टी मात्र अशीच चालली होती. मोरूच्या त्या दिनचर्येने अस्वस्थ झालेल्या बापाने आज मात्र मोरूला झापायचे ठरवले आणि मग रात्री तो त्याच्यावर बरसला.. आईने मधे पडण्याचा प्रयत्न केला, पण बापाने तिचे काही एक ऐकले नाही.

सहप्रवासी
ब्रँड ‘लोकप्रभा’चे ग्रँड अ‍ॅम्बॅसिडर
वाचकांचे अनेक प्रकार असतात. काही जे दिसेल ते नुसते वाचत सुटतात, तर काही स्वत:ला हवे त्याच विषयाचे फक्त वाचतात आणि स्वत:च्या ज्ञानात भर घालतात. काही स्वत: वाचतात, वाचलेले एकत्र करतात आणि त्यात स्वत:ची भर घालून लोकांसाठी वाचायला आणखीन काहीतरी लिहितात. असे अनेक प्रकार असले तर एक वाचकप्रकार मात्र या सर्वाच्या पलीकडला असतो. किंबहुना हा प्रकार काहीसा दुर्मीळच असतो म्हणा ना.. हा वाचक स्वत: तर वाचतोच, पण आपल्या वाचनात दुसऱ्यांच्या आवडीचे, अभ्यासाचे विषय आले तर हे वाचनीय साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. हा वाचक तर असतोच, पण प्रसारकदेखील असतो. ठाण्याचे श्रीकृष्ण ऊर्फ नाना पारनाईक त्यापकीच एक. विशेष म्हणजे नानांचे हे वेगळेपणे जोडले गेलेय ते ‘लोकप्रभा’शी. जगाला संदर्भ साहित्य देण्याचे नानांचे हे काम एकदोन नाही तर तब्बल ३९ वष्रे अव्याहतपणे सुरू आहे. गेली ३९ वष्रे ‘लोकप्रभा’तील एकूण एक लिखाण ते लोकांपर्यंत पोहोचवत आले आहेत. नाना तसे छांदिष्टच. म्हणजे त्यांच्या छंदावर लिहायचे म्हटले एक स्वतंत्र लेखच करावा लागेल. पण नानांच्या या छंदाला वळण होते.

गगनभरारी
आयटी ते बीटी व्हाया चाळिशी!
पार्ले टिळक विद्यालयाचा विद्यार्थी असलेला एक लहान मुलगा ८०च्या दशकात दर रविवारी त्याच्या वडिलांसोबत विमानतळापर्यंत फिरायला जायचा. परतीच्या मार्गावर उसाचा रसवाला दिसला की, वडिलांचा हात हळूच दाबायचा आणि सांगायचा.. तहान लागलीय. उसाचा रसही नेहमी परवडावा, अशी काही स्थिती नव्हती. पाल्र्यातील साधे मध्यवर्गीय घर होते त्यांचे. हॉटेलमध्ये जाणे म्हणजे तर परमसुखच वाटावे, अशी स्थिती होती. आज मात्र त्या मुलाचे जवळपास सर्व जग फिरून पालथे झाले आहे. आयुष्यात ज्या ज्या वेळी एक स्वत:चा म्हणून सुरक्षित असा परिघ तयार झाला, त्या त्या वेळी त्या मुलाने तो भेदून वेगळे काही तरी करून दाखवले. एरवी तरुणपणी असा धोका पत्करणारे अनेक जण असतात पण आयुष्याच्या चाळिशीत जेव्हा सुरक्षितता सर्वाधिक महत्त्वाची वाटते त्याही वेळेस त्या परिपक्व व्यक्तिमत्त्वाने तो सुरक्षित परिघ यशस्वीरीत्या भेदला आणि खरं आयुष्य तर चाळिशीतच सुरू होते. अर्थात ‘लाइफ स्टार्टस् अ‍ॅट फॉर्टी’, हेच यशस्वीरीत्या दाखवून दिले. पाल्र्यातील तो लहान मुलगा म्हणजेच आताचे आघाडीचे यशस्वी उद्योजक दीपक घैसास.


आरोग्य
चाळिशी गाठल्यावर काय खाल?
दिवसेंदिवस मानवी जीवन खूपच वेगवान, धावपळीचे होत चालले आहे. एक काळ शहरी व ग्रामीण, जीवनात खूप वेग नव्हता; ‘वाघ मागे लागल्यासारखी’ धावपळ नव्हती; रात्रपाळी हा रोजचा जीवनमंत्र नव्हता; जेवण बहुधा घरचेच असे; पण आता सगळ्यांचीच जीवनशैली बदललेली आहे. आत्ताच्या ‘फास्ट’ युगात मानवी जीवनाचे सहा टप्पे करता येतील. पाच वर्षांपर्यंतचे शिशुजीवन, पंधरा-सोळा वर्षांपर्यंतचे बाल व नवतरुणाचे जीवन, अठरा ते पस्तीस-चाळिशीपर्यंत ऐन तरुणाईचा काळ, चाळीस ते साठपर्यंत तारुण्य व जबाबदारी असा सुंदर मिलाप असणारा; आयुष्यात काहीतरी निश्चित घडविण्याचा काळ; साठीनंतर ऐंशीपर्यंत ‘फ्रुटफुल’ आयुष्य जगण्याचा निवृत्तिकाळ व त्यानंतरचे नव्वदी-शंभरीपर्यंतचे ‘बोनस लाइफ’ यातील सर्वात महत्त्वाच्या चाळिशीनंतरच्या तरुणाईच्या निरंतर आरोग्याकरिता आहार, विहार व व्यायाम कसा असावा हे पुढील लेखात आपण पाहत आहोत. आपला व्यवसाय व नोकरीधंदा चालू असताना वय वर्षे चाळीस-पंचेचाळीसपर्यंतचा काल हा ऐन तारुण्याचा, कर्तृत्वाचा, हिमतीचा, आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करण्याचा, भविष्याबद्दल फिकीर न करता एका विशेष मस्तीत पौरुषत्वाने संपूर्ण जीवन, पुरेपूर रस घेऊन जगण्याचा काळ आहे. हा काल पित्ताचा काळ आहे, ऊर्जेची गरज असणारा व ऊर्जा खर्च करण्याचा काळ आहे.

आरोग्य
कोणत्याही वयात तुमचा फिटनेस तुमच्या हातात!
ग्रोइंग इन एज इज इनएव्हिटेबल
ग्रोइंग ओल्ड इज ऑप्शनल
कुठलीही नवीन गोष्ट, कला आत्मसात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. व्यायाम सुरू करण्यासाठीदेखील वयाची अट नाही. अगदी वयाच्या साठाव्या वर्षीदेखील तुम्ही व्यायाम सुरू करू शकता. एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवू शकता.
व्यायाम म्हणजे खरं तर बॅक टू बेसिक्स.
माणूस जंगलात राहायचा तेव्हा त्याला मनुष्यप्राणी म्हणायचे, म्हणजे इतर प्राण्यांसारखंच त्याला अन्नासाठी आणि इतर प्राण्यांपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अंगमेहनत करावी लागायची. पुढे माणसांनी शेतीचा शोध लावला, माणूस टोळ्यांनी राहायला लागला तेव्हादेखील शेतीची कामे करण्यासाठी अंगमेहनत होतीच. नंतर माणसाने चाकाचा आणि वाफेच्या शक्तीचा शोध लावला. औद्योगिक क्रांती झाली. या काळातदेखील माणसाला शारीरिक काम करायला लागायचे.

आरोग्य
मँझधार में नैया
‘‘अगं माले, चाळिशी चाळिशी म्हणतात ती झाली आपली! काय साधलं ग आपण? अजून आपलं नाच ग घुमाच चालू आहे!’’
कित्येक वर्षांंनी अचानक भेटलेल्या वर्गमैत्रिणीला मंदा म्हणाली. त्यावर माली फक्त मंदसं हसली.
माली हुशार होती. शाळा-कॉलेजात असताना तिचे लेख-कविता मासिकांतून छापून येत. ती मराठी साहित्याचा अभ्यास करून बीए झाल्याबरोबर वडिलांनी तिला बोहल्यावर उभी केली. नवरा माधव मालीला साजेसा, अतिशय बुद्धिमान आणि होतकरू. तो लहान वयातच मोठय़ा हुद्दय़ावर चढला. कामानिमित्त त्याला सतत परगावीच नव्हे तर परदेशीसुद्धा जावं लागे. संसाराची सारी धुरा मालीलाच सांभाळावी लागे. समंजस मालीने संसाराचीच ‘करियर’ केली; पाककृतींतल्या ‘साहित्या’वर समाधान मानलं; सासू-सासऱ्यांची सेवा केली; मुलांचा अभ्यास करून घेतला. मालीच्या चाळिशीच्या सुमाराला माधव इतक्या मोठय़ा पदावर पोचला की बापडय़ाला कामातून तिच्यासाठी उसंत मिळेनाशी झाली. मुलं शाळेतल्या वरच्या वर्गाच्या, कॉलेजच्या अभ्यासात स्थिरावली.


आरोग्य
प्रेम, सेक्स आणि चाळिशी
‘अत्यंत निर्लज्ज नातं असतं हे नवरा-बायकोचं. भांड भांड भांडून पुन्हा थोडय़ा वेळाने एकत्र झोपतात. स्लिपिंग विथ द एनिमी. छी:!’ समोरच्या चाळिशीच्या स्त्रीने ज्या संतापाने हे उद्गार काढले ते ऐकून मी अवाक् झालो. संताप मी समजू शकतो पण एवढा तिरस्कार! एका नवरा-बायकोच्या भांडणात वैतागून नवरा म्हणाला, ‘‘मी मोठी चूक केली की तुला नीट न बघताच लग्नाला हो म्हटलं.’’ त्यावर बायकोही चिडून बोलली, ‘‘माझी िहमत तर बघ, मी तर तुला बघूनही हो म्हटलं! ही तर माझी केवढी मोठी घोडचूक झाली!’’ पती-पत्नी नातं हे मॅनमेड, मानवनिर्मित. त्यात कितीतरी अपेक्षा ठेवून आपल्या समाजात लोक जगत असतात! सर्व अपेक्षा काळाच्या ओघात कधी वाहून जातात हे त्यांना लक्षातही येत नाही. सध्या तर त्यातून आत्मसन्मानाच्या जागृतीचा काळ. व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काचा काळ. म्हणूनच जोडीदाराकडून जेव्हा अपेक्षापूर्ती होत नाही तेव्हा असा संताप होणे स्वाभाविक आहे. पण त्याच्या जोडीला जी तिरस्काराची भावना प्रामुख्याने लक्षात येत होती त्यातून त्या व्यक्तीला लग्नाच्या नात्याचा खरा अर्थ लक्षात आलेला नव्हता हेच खरे.

भविष्य