१२ एप्रिल २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
पोलिसांनाच वाटतेय गरज क्लीन इमेजची! ’ ..गरज बदलण्याची! - डी. शिवानंदन
पोलीस झालेत राजकारण्यांचे मिंधे - वाय. सी. पवार
नेमणुकांचा व्यापार बंद होणे गरजेचे - वाय. पी. सिंग

दुष्काळ

क्रीडा

उपक्रम
मुलांनीच तयार केले, पक्षी पाणवठे
चोचीतल्या थेंबासाठी!
दखल
प्रासंगिक
आरोग्यम्
स्मरण
द्या टाळी..
कविता
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
युवा
भटकंती
झिरो अवर
माझं शेतघर
सिनेमा
एकपानी
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
लग्नाचं दिव्य
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
आधीच मरकड त्यात..
भारतातील दहशतवादी कृत्यांचा इतिहास कुणी लिहायला घेतला तर त्यात १२ मार्च १९९२ ही तारीख काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल कारण हाच तो दिवस होता की, ज्या दिवशी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला साखळी बॉम्बस्फोटांना सामोरे जावे लागले. संपूर्ण देशच नव्हे तर सारे जग त्या दिवशी दहशतवादाच्या या थैमानाने हादरून गेले होते. या स्फोटामागचा विदेशी हात माहीत होताच. पण सारे कारस्थान कसे रचले गेले, कुणी काय केले याचा मागमूस मात्र लागत नव्हता. मुंबई पोलिसांच्या सुदैवाने वरळीला एक बेवारस अवस्थेतील गाडी सापडली आणि मग त्या माध्यमातून पोलीस टायगर मेमनच्या घरापर्यंत पोहोचले. मग एक एक करीत अटकसत्र सुरू झाले आणि पोलीस समीर हिंगोरा आणि हनीफ कडावालापर्यंत पोहोचले.. त्यानंतरचा घटनाक्रम वेगात घडत गेला. अभिनेता संजय दत्त याने त्याच वेगात त्याच्या घरी असलेली एके-५६ गुप्तपणे नष्ट करण्यास सांगितले.युसूफ नळवाला याने केरसी बापू अदजानिया यांच्या फाऊंड्रीमध्ये ते काम पार पाडले. तोपर्यंत या बॉम्बस्फोटांशी असलेल्या संबंधांमध्ये संजय दत्तचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ लागले होते. त्याने तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजित सिंग सामरा यांना फोन करून आपण निर्दोष असल्याचे सांगितले आणि चौकशीसाठी सारे काही सोडून भारतात परतण्याची तयारीही दर्शवली.

कव्हरस्टोरी
पोलिसांनाच वाटतेय गरज क्लीन इमेजची!
आपले राजकारणी समाजाच्या ज्या वर्गातून निवडून आलेले असतात, त्याच वर्गातून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच अगदी अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त या पदावरील पोलीस दलातील अधिकारी आलेले असतात. (दहा वर्षांनंतर त्यांना आयपीएसमध्ये सामावून घेतले जाते.) हे दोघेही ज्या वर्गातून येतात तो वर्ग एकच असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच अनेक वर्षे ही सगळीच मंडळी एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात. त्यातूनच त्यांची एकमेकांविषयीची आत्मीयता निर्माण होते. मला असे अनेक आयपीएस अधिकारी माहीत आहेत, ज्यांनी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक किंवा उपायुक्त या पदांवरील अधिकाऱ्यांच्या अशा संबंधाचा वापर करत, आपली वैयक्तिक कामे करवून घेतली आहेत. पोलीस आणि राजकारणी यांच्या या जवळिकीतूनच एकमेकांचा योग्य तो मान न राखण्याची वृत्ती बळावते असे माझे निरीक्षण आहे. त्यामुळे मला याचे काहीच आश्चर्य वाटले नाही की वेगमर्यादा ओलांडणारा राजकारणी आणि पोलीस अधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा त्याची परिणती शिवीगाळ आणि हाणामारीत झाली. त्यांनी दोघांनीही आपली ही शिवीगाळ इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करत रेकॉर्डदेखील केली.

कव्हरस्टोरी
..गरज बदलण्याची! - डी. शिवानंदन
गेल्या काही महिन्यांत घडलेल्या विविध घटनांमध्ये पोलीस आणि राजकारणी मंडळी एकमेकांसमोर उभी ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अगदी खरे सांगायचे तर त्यात पोलिसांचे उभे ठाकणे कमी आणि त्यांना झालेली मारहाणच अधिक आहे. त्याची ठिकाणे मात्र बदलत गेली. कधी ते ठिकाण आझाद मैदान होते तर कधी विधी मंडळाचे आवार. मात्र या सर्व घडामोडींमध्ये विधी मंडळाच्या आवारातच पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना झालेली मारहाण हा अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रकार होता. आजवरच्या सर्व घटनांपेक्षा या घटनेचे गांभीर्य अंमळ अधिक आहे. ज्या विधी मंडळाच्या आवारात म्हणजे कायदे केले जातात, त्या सर्वोच्च सभागृहाचे आवार आहे. तिथेच अशा प्रकारची मारहाण होणे म्हणजे कायद्याला काळिमा फासणारा असाच तो प्रकार होता. शिवाय या घटनेला एक वेगळे महत्त्व असण्याचे आणखी एक कारण म्हणजे या निमित्ताने कायदे करणारे आणि त्याच्या रक्षणाची घटनादत्त जबाबदारी असणारे असे दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जनतेच्या दृष्टीने ही वाईट गोष्ट होती. या घटनेमधील दोन्ही संबंधितांसाठीही ती तेवढीच लज्जास्पद अशी बाब आहे.


कव्हरस्टोरी
पोलीस झालेत राजकारण्यांचे मिंधे - वाय. सी. पवार
क्षितिज ठाकूर आणि सचिन सूर्यवंशी प्रकरण घडल्यानंतर तेव्हापासून लोकप्रतिनिधी तसंच पोलीस यांच्यात संघर्ष आहे असं चित्र उभं केलं जात आहे. संबंधित घटनेत मर्यादाभंग झाला असेल, पण त्यावर विधानसभेत हक्कभंग दाखल केला होता. कायद्यानुसार कार्यवाही होत असताना मारहाण होणे हे निंदाजनक आहे. कायदे करणाऱ्यांकडून कायदा तोडला जातो हे चुकीचे आहे. डावा हात उजव्या हातावर वार करतोय हे आपण विसरलो आहोत. आपलेच दोन्ही हात एकमेकांवर का उगारले जात आहेत, याचा विचार केला गेला पाहिजे. ही परिस्थिती कशी निर्माण झाली, याचा विचार झाला पाहिजे. माझेच उदाहरण देतो. पोलीस दलात येण्यापूर्वी १९६९ साली मी तहसीलदार होतो. त्यावेळी मी बाजारपेठेत पॅडी पकडली होती. (पॅडी म्हणजे भात, त्या काळात अतिरीक्त भात विकण्यास बंदी होती). ज्याच्यावर कारवाई केली होती तो महसूल मंत्र्यांचा जवळचा. हे मंत्री खूप जहाल म्हणून ओळखले जात. त्यांच्या तेथील दौऱ्यामध्ये माझा समाचार घेण्यासाठी म्हणून मला बोलवण्यात आले. वरिष्ठ मला माघार घेण्यास सांगत होते. मी जे काही करायचे ते कायद्याने केले होते, तेव्हा मला या प्रकरणात माघार घेण्याची गरजच नव्हती. झाले वेगळेच.

कव्हरस्टोरी
नेमणुकांचा व्यापार बंद होणे गरजेचे - वाय. पी. सिंग
लोकप्रतिनिधी आणि पोलीस हा संघर्ष खूप जुना आहे. स्थानिक पातळीवर तर स्थानिक आमदार आणि पोलीस यांचा कायमच संबध येत असतो. कार्यकर्त्यांच्या खऱ्याखोट्या तक्रारी येत असतात. बेकायदेशीर धंद्यातून तर दोघानांही पसे मिळत असतात. स्थानिक आमदारांनादेखील अनेक बेकायदेशीर धंद्यात पोलिसांचे सहकार्य हवे असते. त्यामुळे प्रत्येक आमदाराला आपल्या सोयीचा अधिकारी लागतो. मग पैसे देउन कधी अधिकारी आपली नेमणूक करून घेतो, तर कधी आमदार आपले वजन वापरून आपल्याला हवा तशा अधिकाऱ्याची नेमणूक करून घेतो. यामध्ये देवघेवच असते. हे नाते लव्ह अँड हेट रिलेशनशिपसारखे असते. मग एखादे काम झाले नाही किंवा एखाद्या व्यवहारात पशाचे वाटप व्यवस्थित झाले नाही की मग या संबंधात ठिणग्या पडतात. आणि मग स्फोट होतो. जसा आता झाला. हे सारे काही एका दिवसात घडले नाही. हळू हळू ही परिस्थिती बिघडत गेली आहे. १९८० च्या आधी पोलीस आणि लोकप्रतिनिधी संबध बरे होते. भ्रष्ट्राचाराचे प्रमाण नव्हते असे नाही, पण त्याचे आताइतके उघड प्रमाण नव्हते. १९९० नंतर भ्रष्ट्राचाराचे प्रमाण प्रचंड वाढले. तोपर्यंत पोलिस दलाचा धाक होता.

दुष्काळ
पाण्यासाठी मुक्या जीवांनी जायचे कुठे?
पंचमहाभूतांपकी एक असणारे पाणी म्हणजे जीवन. पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माणच झाली ती मुळी पाण्याच्या उपलब्धतेमुळे! पण कदाचित सजीवांचा पृथ्वीवरचा वावर नियंत्रणात ठेवण्याचेही सूत्र या पाण्याच्या उपलब्धतेने आपल्या हाती ठेवल्याचे दिसते. पृथ्वीवर ९७.२० टक्के एवढे पाणी हे खारे असून समुद्रामध्ये आहे. तर केवळ २.०१ टक्के पाणी हे हिमनगांमध्ये एकवटले आहे. माणसाच्या वाटय़ाला उर्वरित अगदीच अत्यल्प म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी (०.००९ टक्के) पाणी हे तलाव, नद्या या जलस्रोतांच्या स्वरूपात वापरासाठी आहे. वापरासाठी उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या या कमतरतेमधूनच मग अगदी पुरातन काळापासून नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन व तलाव, विहिरी इत्यादी कृत्रिम जलस्रोतांची निर्मिती करण्याचे धोरण आपल्या पूर्वजांनी कवटाळल्याचे दिसते. रणांगण असो की कृषिव्यवस्था, किल्ले असोत की गावकूस, नसíगक व कृत्रिम जलस्रोत जपले गेले. छत्रपती शिवाजी राजे आज्ञापत्रात लिहितात -


ट्रॅव्हल फोटोग्राफी
केनिया-टांझानिया : प्राणी-पक्ष्यांचं नंदनवन
या भूतलावरची जंगलांची संख्या आणि आकार जसा कमी-कमी होत चालला आहे तशी प्राणी आणि पक्ष्यांची संख्याही रोडावत चाललीय. बंदिस्त जागेत प्राण्यांची रवानगी करण्यात आलीय आणि त्यांच्या हक्काच्या जागेत मानवाने अतिक्रमण केलंय. आपल्या देशात सर्वत्र दिसणारं हे दृश्य. प्राणी-पक्षी पाहण्यासाठी जंगलात जावं आणि हिरमुसलं होऊन परत यावं असं हल्ली सर्रास घडतं. पण आफ्रिका खंडातल्या केनिया आणि टांझानिया या देशात मात्र अगदी उलट आहे. या देशांमध्ये वन्यप्राणी अगदी सुखेनव वावरत असतात. काही वेळा गाडीत किंवा हॉटेलमध्ये बंद असलेली माणसं आणि आजूबाजूच्या परिसरात उघडय़ावर वावरणारे प्राणी अशी दृश्ये पाहायला मिळतात. प्राणी आणि पक्षी डोळे भरून पाहायचे असतील तर या आफ्रिकन देशात गेलंच पाहिजे. वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या केनियाच्या जंगलात प्रवेश करण्यासाठी आपण जेव्हा नरोबीच्या विमानतळावर उतरतो तेव्हा आपली उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली असते. विमानतळाच्या बाहेर पडून वाहनात बसल्यापासून अगदी पाचच मिनिटांत आपल्याला जिराफ दिसू लागतात आणि मग प्राणी आणि पक्ष्यांच्या दर्शनाचा हा सिलसिला सुरूच राहतो. हे नेत्रसुख घेण्यासाठीच तर आपण एवढय़ा लांबवर आलेलो असतो. क्षितिजापर्यंत पसरलेलं खुरटं गवत आणि त्यामुळेच लांबवर दिसणारा प्रदेश हे तिथलं खास वैशिष्टय़. मुख्यत: अँबोसेली नॅशनल पार्कमध्ये तर हे असंच दृश्य असतं. केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर असलेलं आफ्रिकेतील किलिमंजारो हे सर्वात उंच शिखरही त्याच भागात आहे. किलिमंजारोची लांबवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं हे अँबोसेलीचं प्रमुख आकर्षण आहे.

भविष्य