५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

वर्णाचा संयोग, वियोग व विभाग (वर्णाचे एकत्र कुटुंब)
सत्वशीला सामंत

सर्वसामान्यपणे भाषा बोलणाऱ्यांनी अधिकाधिक संक्षेप करून बोलणे म्हणजे दीर्घ शब्द छोटे करून बोलणे ही एकंदरीत सार्वत्रिक प्रवृत्ति दिसते. (अनेक माणसे पाल्हाळ लावून बोलतात तो भाग वेगळा) बऱ्याचदा हकारयुक्त वर्णाच्या बाबतीत हा प्रकार आढळतो.
‘बहर’ शब्दाची गंमत पहा. मुळात ‘बहार’ ह्य़ा फारसी शब्दाचा अर्थ ‘वसंत ऋतु’ असा आहे. ह्य़ा ऋतूत अनेक झाडे फुलांनी बहरून जातात आणि सर्वत्र आनंदाचं, खुशीचं वातावरण पसरत-
आयी है फस्ले बहा र, आह कोई क्या करे।
जब नये पहेलु में यार, आह कोई क्या करे।।
त्यामुळे फारसीमध्ये ‘बहार’ याला आनंद, खुशी, मौजमजा असाहि लाक्षणिक अर्थ आला आहे. मराठीने त्यात कसं परिवर्तन केलं ते पाहण्यासारखं आहे. मराठीने ‘बहार’ ऐवजी ‘बहर’ (पुं) हा शब्द स्वीकारला तेव्हा ‘फुलझाडांना बहर आला, पण फळझाडांना ‘बार’ येऊ लागला. नागपुरी लोक संत्र्यांचा पहिला ‘बार’, दुसरा ‘बार’ म्हणतात. तेव्हा तो बंदुकीचा ‘बार’ नसतो, तर तो ‘बहर’च असतो. मराठीने ‘रंगत, रस’ या अर्थाने ‘बहार’ हा स्त्रीलिंग शब्दही स्वीकारला आणि मग करमणुकीच्या कार्यक्रमात कलाकार ‘बहार’ आणू लागले, साहित्यात बहारदार ‘वर्णने येऊ लागली. मराठीने आणखी एक मजा केली काही शब्दांच्या बाबतीत तिने ‘ब’ आणि ‘ह’ यांचा संगम करून त्याचा ‘भ’ केला व मग माणसं तारुण्याच्या ‘भरात’ प्रणयक्रीडा करू लागली. बोरकरांच्या एका कवितेत तर ‘झाडे भरात आली’ येथवर सारं ठीक आहे. पण जेव्हा माणसं तारुण्याच्या वा संतापाच्या ‘भरा’त अविचारी कृत्य करू लागली तेव्हा ‘भर’ ह्य़ा शब्दाला ‘परमोत्कर्ष, कळस, चरमसीमा’ असा अर्थ प्राप्त झाला. इंग्रजीत त्याला .. म्हणतात. (‘बंदुकीत भरतात तो, बार अथवा ‘भ र  घालणे’ यांसारख्या शब्द प्रयोगांचं मूळ संस्कृत ‘भृ-भरण’ ह्य़ा क्रियापदात आहे, त्याचा ‘बहर’शी संबंध नाही.) याप्रमाणे दोन वर्णाचा संयोग होण्याची आणखीही काही उदाहरणे देता येतील ‘ब हा वा’ या झाडाला बोलीभाषेत ‘भा वाई’ असं दुसरं नाव आहे. ‘बहुली’ची ‘भावली’ होते, तर ‘महिष’चा‘म्हैसा’ होतो. डहाण्या वाघाचा ‘डाण्या’ वाघ झाला. हिंदी ‘गवाही (साक्ष) ची मराठीत ‘ग्वाही’ (निर्वाळा) झाली आणि अर्थातरही झालं. ‘बहुरूपी’चा ‘भो रपी’ झाला. ‘भो रप्याने सोंग पालटिले वरी।’ असं तुकाराम महाराज म्हणतात. ‘ब हु रूढ’ चे ‘भारूड’ झालं असावं अशी एक व्युत्पत्ती सांगितली जाते. हिंदीमध्ये ‘जब ही। तब ही’ चं ‘जभी । तभी ’ होतं, तर मराठीत ‘जा हले’चं कधी ‘झा ले’ ते आपल्या लक्षातच आलं नाही. मुळात ‘अप रू  प’ म्हणजे ‘विलक्षण’ असा अर्थ असून तो शब्द विशेषरूप आहे. पण पुढील लेखकांना एखाद्या गोष्टीचं ‘अपारूप’ म्हणजे नवल, कौतुक वाटू लागलं आणि त्या शब्दाचं नामात रूपांतर झालं. ‘पश्च ’ मधील जोडाक्षरातील दोन वर्ण एकरूप झाले आणि त्यापासून हिंदीत ‘पछतावा’ आणि ‘पीछे ’ हे (चिडिम्याँ चुग गयीं खेत, अब पछताये क्या होत है?) शब्द तयार झाले. पायात वहाण नसलेली ‘अनव हा णी’ माणसं हळूहळू ‘अनवा णी’ चाला लागली. संस्कृतमध्ये ‘जाया च पतिश्च’ म्हणजे ‘जा याप ति’ (पति-पत्नी) हे एकमेकांशी इतके समरस झाले की त्यांचा ‘जं पती’ (व मग पुढे ‘दंपती’) झाला. ‘व धावूरे’ ह्य़ा द्वंद्व समासाचीही तीच गति झाली- ती दोघे इतकी तादात्म्य पावली की त्यापासून ‘वो हरे’ हा शब्द तयार झाला, एवढेच नव्हे तर आजमितीला वाडवळ बोलीत ‘वो’ म्हणजे ‘बहू’ अथवा ‘वधू’ वा ‘सून’ असा अर्थ रूढ झालेला आहे. अशाच दोन वधूवरांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधून व ‘वागर्थाविव संपृक्तौ’ (वाणी आणि अर्थ याप्रमाणे अभिन्न) म्हणतात त्याप्रमाणे एकत्र घरोबा करून एकजीव व्हावं तसाच काहींसा दोन वर्णाचा हा संयोग होतो.
क्वचितप्रसंगी, एका शब्दातील हकारयुक्त वर्णाची दोन वर्णात फोड झालेली आढळते. म्हणजे एका एकात्म वर्णाच्या पोटातील दोन उपवर्णात फारकत होऊन त्यांचा एकमेकांशी वियोग होतो. जणू काही एका कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींनी एकाच घरात राहून वेगवेगळ्या खोल्यात वेगवेगळ्या चुली मांडाव्यात तसंच काहीसं इथे होतं. ‘इंडोनेशियाची भाषा’ या अर्थाने ‘ब हास इंडोनेसिया’ असा शब्दप्रयोग केला जातो. मूळ ‘भाषा’ या शब्दातील ‘भा’ ह्य़ा वर्णाचे विभाजन होऊन त्याचे ‘ब हा  (सा)’ अशा दोन वर्णात रूपांतर झाले. संस्कृत ‘भगिनी’ ची मराठी ‘ब ही ण’ होतानाही तोच प्रकार घडला. मराठीत तर व्यासपीठावरील भाषण प्रसंगीच ‘बंधुभ गिनींनो’ अशा औपचारिक संबोधनात ‘भ गिनी’ पुढे येते, पण घरगुती प्रसंगात मात्र ‘ओवाळिते भाऊराया, वेडय़ा ब  िह णीची वेडी रे माया’च कामी येते. संतमंडळीदेखील ‘माझी ब  ही ण चंद्रभागा, करितसे पापभंगा’ असं म्हणून ‘बहिणी’चाच धावा करतात. वैदर्भीय लोकांची एक लकब भीमाने जरासंधाला मारताना ज्याप्रमाणे त्याची दोन शकले करून, ती उलटसुलट बाजूंना फेकली त्याप्रमाणे ही माणसं ‘काढणे’, ‘वाढणे’ अशासारखी क्रियापदे उच्चारताना, प्रथम ‘ढ’ची फोड करून त्यातील ‘ड’ आणि ‘ह’ या वर्णाची उलटापालट करतात नि मग ‘काहा डणे’, ‘वाहा  डणे’ असे उच्चार करतात.
अशा प्रकारे एकाचे दोन वा अधिक वर्ण झाले तरी ते सर्व एकाच शब्दघराच्या छताखाली गुण्यागोविंदाने नांदतात. म्हटलं तर एकत्र कुटुंब, म्हटलं तर विभक्त आहे. की नाही गंमत!
response.lokprabha@expressindia.com