५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संख्याशास्त्र्

सातवार आणि संख्याशास्त्र
उल्हास गुप्ते

आशिया खंडात तुर्कस्थानात टीग्रिस नदीच्या काठी मोसल नावाचे शहर आहे. त्याच्या समोरच्या बाजूला जमिनीत निनेव्हे नावाचे शहर सापडले, त्या वेळी तिथे काही पुरातन वस्तू सापडल्या त्यात तेथील सार्वजनिक पुस्तकालयात ज्योतिषशास्त्रावरचा एक ग्रंथ सापडला, त्याचे नाव.. म्हणजे ‘बेल याने केलेले वेध’ असे असून त्याचे ६० भाग आहेत. त्यावरून असे स्पष्ट दिसते की रविवारपासून शनिवापर्यंत ज्या क्रमाने हल्ली वारंवार ग्रहाचे आधिपत्य आहे, तसेच त्या वेळी म्हणजे इ. सनापूर्वी २५०० वर्षांच्या सुमारास होते. (आधार ज्योतिर्मयुख)
एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जाणारा जो काल असतो त्यास वार असे म्हणतात. तसेच वासर असेही म्हणतात. हे वार सात आहेत. त्यांची नावे १) रविवार किंवा आदित्यवार वा भानुवार २) सोमवार, इंदुवार किंवा चंद्रवार, ३) मंगळवार किंवा भौमवार, ४) बुधवार किंवा सौम्यवार, ५) बृहस्पतिवार किंवा गुरुवार ६) शुक्रवार किंवा भृगवार ७) शनिवार किंवा मंदवार.
जगामध्ये सर्व ठिकाणी सर्व देशांत प्रत्येक दिवसाला एक वार याप्रमाणे क्रमाने हे सात वार मानले जातात. या सात वारांपैकी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे चार वार सर्व कामास शुभ मानले जातात. तर रविवार, मंगळवार आणि शनिवार हे वार क्रूर वार म्हणून मानले जातात. या वारांना पूर्वी शिकार करणे, शस्त्राचा वापर करणे, युद्ध करणे आदी गोष्टी करीत असत. सात ग्रहांच्या नावावरून सात वारांची निर्मिती केली आहे. हे सात वार व त्यांचे महत्त्व पाहू.
रविवार (१-४)
जगातल्या जास्तीत जास्त देशात रविवार हा दिवस सुट्टीचा मानला जातो. या सात वारांमध्ये रविवार हा वार अतिशय महत्त्वाचा वार मानला जातो. रविवार ते शनिवार असा सात दिवसांचा एक आठवडा पुरा होतो. ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो, अशा लोकांवर रवी ग्रहाचा प्रभाव असतो. रवी या ग्रहाचा अंक १ मानला जातो. संख्याशास्त्रातही संख्यांची सुरुवात १ अंकापासून होते. या अंकाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जुलै २१ ते २० ऑगस्ट दरम्यान ज्यांचा जन्म रविवारी व १, १०, १९ व २८ या तारखांपैकी एका दिवशी झाला आहे. अशा व्यक्ती खूपच साहसी, प्रभावी नेतृत्व करणाऱ्या असतात. अशा लोकांना राजकारणात मोठे स्थान प्राप्त होत असते आणि अशा व्यक्ती आपल्या उद्योगधंद्यातही उत्तम रीतीने यशस्वी होत असतात. संकटे, भास, शत्रू आदींवर शौर्याने मात करतात व नेहमीच विजयी होतात. रविवार हा वार जरी क्रूर वार मानला असला तरी या दिवशी शुभारंभ, शुभकार्ये करण्यास काहीच हरकत नसते.
सोमवार (२-७)
सोमवारचा ग्रह स्वामी चंद्र आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला खूप महत्त्व आहे. चंद्र लग्नी ठेवून राशिकुंडली तयार केली जाते व त्या पत्रिकेवरून गोचर ग्रहाची (चालू स्थितीतील ग्रहांची) स्थिती पाहून भविष्य निदान करण्याची पद्धत आहे.
ज्या राशीत चंद्र असतो, त्या राशीत शनी आला की साडेसातीचा त्रास सुरू होतो. समजा, आता तूळ राशीत शनी आहे तर आता बाराव्या स्थानातील कन्या राशीला व द्वितीय स्थानातील वृश्चिक राशीला साडेसाती सुरू होते. अशा वेळी मारुती उपासना फलदायक ठरते व शनिवार या दिवशी ही उपासना करावी, कारण शनिवार हा वार मारुती उपासनेसाठी फार महत्त्वाचा मानतात.
ज्यांची जन्मतारीख २, ११, २० व २९ आहे. व अशांचा जन्म जर २१ जून ते २० जुलैदरम्यान झाला असेल व त्या दिवशी जर सोमवार असेल तर अशा लोकांवर चंद्र ग्रहाचा विशेष अंमल असतो. अशा व्यक्ती खूपच हळव्या, भावनाप्रधान असतात. पण ही माणसे तितकीच खूप विचारवंत आणि प्रतिभाशाली असतात. चंद्राच्या नकारात्मक बाजूचा अतिरेक झाला तर थोडक्यात पत्रिकेत जर चंद्र पापग्रहयुक्त असेल तर अशी माणसे मानसिकरीत्या खूपच दुबळी बनतात व त्याचा मनावर परिणाम होऊन त्यांना मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते. माणसाच्या मनावर चंद्र ग्रहाचा अंमल असल्यामुळे पूर्ण मनाचे अस्तित्व चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. संपूर्ण शरीरावर मन नावाच्या न दिसणाऱ्या गोष्टीचा पूर्ण अंमल असतो, तसेच मानसिक स्थितीचे आणि चंद्राचे खूप जवळचे नाते आहे. जे समुद्राच्या भरती-ओहोटीचे गणित चंद्रावर अवलंबून असते. अगदी तसेच मनाचे असते. मनाची चांगली-वाईट अवस्था चंद्राच्या प्रभावाखाली येते. चंद्राचा सकारात्मक-नकारात्मक परिणाम मनावर फार खोलवर होत असतो.
२ व ७ हे दोन्ही अंक म्हणजे एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत. या दोघांमधील हळवेपणा, मृदुत्व सारख्याच प्रमाणात असते. २ बरोबर ७ वरही चंद्राचा तितकाच प्रभाव असतो. म्हणून २ अंकाबरोबर जोडून ७ अंकाचा उल्लेख केला जातो. विशेषत: ज्यांचा जन्म ७, १६ व २५ या तारखांना झाला आहे. अशांना सोमवार हा वार खूपच लाभदायक ठरतो.
मंगळवार (९)
मंगळवार हा वार जरी क्रूरवार मानला असला तरी तो विघ्नहर्ता गणेशांचा वार मानला जातो. या वारावरती मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ या ग्रहाला लग्नकुंडलीत (पत्रिकेत) फार महत्त्व दिले आहे. आणि या ग्रहाबद्दल बरेचसे चांगले-वाईट गैरसमज निर्माण केले आहेत.
संख्याशास्त्राप्रमाणे मंगळवारची संख्या ९ येते. ही संख्या तशी खूपच पवित्र मानली जाते. आध्यात्मिक क्षेत्रात या संख्येला जपजाप्याच्या बाबतीत खपूच महत्त्वाचे स्थान आहे. ज्यांची जन्मतारीख ९, १४, २८ आहे त्यांचा जन्म २१ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान मंगळवारी झाला असेल अशा व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. अशा व्यक्ती खूपच कार्यक्षम आणि मेहनती असतात. निर्भय, साहस आणि एकनिष्ठ या गुणांवर हे आपले स्वत:चे अस्तित्व सिद्ध करत असतात. उत्साह, जोश, जोम, प्रेरणा या गुणांचा अंतर्भाव यांच्यात अगदी लहानपणापासून असतो. त्यामुळे स्पर्धात्मक जगात यांना खूपच नावलौकिक प्राप्त होत असतो. सर्व ग्रहांत रवी ग्रहाच्या बरोबरीने नेतृत्व करणारा, जपणारा असा हा मंगळ ग्रह यांचा मंगळवार मंगलमय ठरतो.
response.lokprabha@expressindia.com