५ एप्रिल २०१३
मुखपृष्ठ
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ
फसलेले नियोजन आणि ढळलेला तोल!
राज्याला सध्या भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. या दुष्काळाची तुलना सर्व जण १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाशी करत आहेत. तो दुष्काळ ज्यांनी पाहिला ती सर्व मंडळी त्या दुष्काळाशी संबंधित गोष्टींचा पाढा वाचताना दिसतात. साहजिकच यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पावर त्यामुळे दुष्काळाची गडद छाया पाहायला मिळते. अर्थसंकल्पातील एक महत्त्वाचा भाग या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वापरण्यात येणार आहे आणि ते तेवढेच साहजिकही आहे. अर्थसंकल्पात त्यामुळे सिंचनासाठीही काही पैसे राखून ठेवलेले दिसतात, तेही स्वाभाविकच म्हणायला हवे. पण अलीकडे सिंचन असे म्हटले की, सामान्य जनतेच्या मनात त्यापाठोपाठ येणारा शब्द असतो.. घोटाळा किंवा गैरव्यवहार. दुष्काळाप्रमाणेच राज्यात अलीकडेच उघडकीस आलेल्या सिंचन गैरव्यवहाराची पाश्र्वभूमीही या अर्थसंकल्पास आहे. शिवाय सिंचन आणि दुष्काळ यांचेही वेगळे समीकरण आहे. अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आले की, दुष्काळाची तीव्रता किंवा शक्यता कमी होते. हे समीकरण बिघडले की, दुष्काळ अटळ ठरतो.गेल्या अनेक वर्षांमध्ये राबविण्यात आलेल्या सिंचन धोरणात अनेक त्रुटी आहेत आणि त्यामुळेच आपल्याला यंदाच्या वर्षी जबरदस्त दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. सिंचनाच्या संदर्भातील आपले नियोजन चुकल्याचेच या दुष्काळाच्या ताळ्याने सिद्ध केले आहे.

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता मिळाली किंवा मिळाली नाही, तरीही पक्ष संघटनेत प्रचंड फेरबदल करण्याचा निर्णय काँग्रेस महासमितीच्या काही गुप्त बैठकांमध्ये झाला असून निवडणुकीनंतर राजसंन्यास घेण्याचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मनसुबे पक्षातूनच उधळून लावले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. शिंदे यांच्यावर सोपविल्या जाणाऱ्या एका अतिमहत्त्वाच्या जबाबदारीपूर्वी या जबाबदारीस ते पात्र आहेत किंवा नाहीत याची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे अतिवरिष्ठ नेते अत्यंत गुप्तपणे करीत आहेत. काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच याची सूत्रबद्ध पूर्वतयारी सुरू असली तरी अद्याप खुद्द शिंदे यांना मात्र त्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याची पक्षाच्या वरिष्ठ आणि ‘जनपथप्रिय’ सूत्रांकडून समजते. निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थितीवर शिंदे यांच्या गृहखात्याचे बारीक लक्ष असून आगामी निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत आघाडीला सरकारस्थापनेची संधी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचा गृहखात्याच्या काही यंत्रणांचा अंदाज आहे. अर्थात, निवडणुकीस अद्याप बराच कालावधी असल्याने मधल्या काळात विरोधी पक्षांच्या बदनामीची आणि शकले उडविण्याची अनेक षड्यंत्रे आखली जात असून त्याचा फायदा पक्षाला उठविता येईल, असाही अहवाल या यंत्रणांनी दिल्याचे समजते.

एप्रिल-फूल विशेष
एप्रिल फूल बनाया..
एक एप्रिल म्हटले की, आपोआप हे गाणे आपल्या ओठांवर रेंगाळू लागते, ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया’ आणि मग मनात दाटून येतात त्या असंख्य आठवणी, आठवणी ज्यांत आपण कोणाला तरी मूर्ख बनविलेले असते किंवा आपण तरी मूर्ख ठरलेलो असतो. हा मजेशीर जागतिक मूर्खदिन कसा चालू झाला हे आजही एक कोडेच आहे. ‘एप्रिल फूल डे’ला ऑल ‘फूल डे’ असेही म्हणतात. बहुतेक जणांच्या मते या दिवसाचा उगम १५८२ साली फ्रान्समध्ये झाला. पोप ग्रेगरी १३ वे यांनी जुन्या प्रचलित ज्युलियन कॅलेंडरच्या जागी नवीन ग्रेगरियन कॅलेंडर वापरात आणायचे ठरविले त्यामुळे नवीन वर्षांरंभ १ एप्रिल ऐवजी १ जानेवारी ठरला. त्या काळी काही कर्मठ लोकांनी हा बदल स्वीकारायचे नाकारले तर दळणवळण, संदेशवहनाच्या साधनाच्या अभावी काही जणांपर्यंत हा बदलच उशिरा पोहोचला. जे लोक एक एप्रिललाच नवीन वर्ष साजरे करायचे त्यांना इतर जण मूर्ख ठरवू लागले व अशा रीतीने ‘एप्रिल फूल’चा जन्म झाला. फ्रान्समध्ये ज्यांना मूर्ख बनविले जाते. त्यांच्यापाठी पेपरचे फिश (मासा) चिकटवले जातात व मग मोठय़ाने ‘एप्रिल फिश’ म्हणून चिडविले जाते. काही लोकांच्या मते रोमन राजवटीत साजऱ्या केल्या जाणारा ‘हिलेरिया फेस्टिवल’ हा एप्रिल फूलचा जनक आहे तर स्पॅनिश बोलणाऱ्या देशांमध्ये ‘फिस्ट ऑफ फूल’ हा उत्सव एप्रिल फूलचा प्रथम अवतार आहे असे मानले जाते.


एप्रिल-फूल विशेष
माझा कपडे धुण्याचा छंद
एकदा मी वॉशिंग मशीन लावून बसलो होतो. मधल्या वेळात काय करायचं म्हणून बासरी वाजवत बसलो. किती वेळ गेला कळलंच नाही. मशीनचं काहीतरी बिघडलं होतं. त्यातून पाणी येऊ लागलं. घरभर पाणी झालं, मशीन बंद. मनात विचार आला कपडे हाताने का धुऊ नयेत. नगरला असताना मोलकरणीला कपडे धुताना पाहिलेलं. कुठं युक्रांदमध्ये असताना बाहेरगावी असलो की कपडे हाताने धुवायचो, त्यालाही अनेक र्वष झाली. मी वाण्याकडे गेलो. म्हटलं, ‘कपडे धुवायचा साबण द्या.’ तोही चकित झाला. म्हणाला, ‘आज हे काय?’ नेहमी मला ओरिगामीसाठी घोटीव कागद घेताना त्यांनी पाहिलं होतं. अनेक प्रकारचे साबण त्याने पुढय़ात टाकले. निळा कागद असलेला, ५०१ चा बार, निरमा, एरवी हे सगळं जाहिरातीतच पाहिलेलं. आज प्रत्यक्षच बघत होतो. घरी दोन-तीन साबण आणले. निळं रॅपर काढलं, तर खाली आणखी एक पातळ ट्रेसिंग पेपरसारखा कागद. तो ओढला तर साबणाचा भाग चिकटून आला, दुसरा साबण उलगडला तेव्हा हाताने एक टोक धरलं. दुसऱ्या हाताने साबण घट्ट धरला आणि हळूहळू कागद ओढत गेलो जसा तो न फाटता, साबण न चिकटता येऊ लागला. तो बाजूला काढून ओरिगामीच्या कागदांमध्ये ठेवला.साबण हाताला किंचित लागला होता. दोन शर्ट आधी धुवायचे ठरवलं. एक माझ्या ठाण्याच्या मानलेल्या मुलीने वाढदिवसाला दिलेला. न वापरता तो तसाच पडून होता. तरीही धूळ जमली होती. म्हटलं, आता धुऊन वापरावा. तिलाही बरं वाटेल. शर्ट भिजवून साबण लावू लागलो. दुसरा शर्ट वापरलेला होता.

एप्रिल-फूल विशेष
‘फूल डे’चे राडे!
‘‘किमया, अंकितने शेवटी तुला गाळात घेतलंच ना?’’ सुप्रियाच्या या शेरेबाजीवर किमया उद्गारली, ‘‘तसं म्हणा हवं तर! पण तो कधीपासूनचा माझ्यावर मरतोय, तुम्हा सर्वाना ठाउकच आहे.’’
‘‘पण कालपर्यंत तर तू त्याला कटवत आणि सटकवत होतीस, मग आज एकदम काय झालं?’’
‘‘अगं, आज सकाळी सकाळीच त्याचा एसेमेस आला. आय लव्ह यू, किमया!’’
‘‘आणि तू लगेच पाघळलीस? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि असंच करायचं होतं तर इतके दिवस त्याला कशाला टांगवलंस?’’
‘‘वाटलं, बिचारा आत्महत्या बित्महत्या करायचा! आणि पाप माझ्या माथ्यावर बसायचं!’’
‘‘कोणी आत्महत्या करत नाही आणि केली तर केली! असं पापबिप लागत नसतं.’’
‘‘माझ्यावर अंकितचं खरंखुरं प्रेम आहे. नाहीतर त्याने पहाटे पहाटे एसेमेस केला नसता, जाऊ दे. पण ही बातमी तुला कोणी दिली?’’
‘‘अंकितच सगळ्यांना सांगत सुटलाय. सबंध सोसायटीभर ही ब्रेकिंग न्यूज पोचली आहे. त्याने हे दोस्तांनासुद्धा कळवलं असणार. पण तुझ्या आई-बाबांना हे बोललीस का?’’
‘‘ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत.’’

एप्रिल-फूल विशेष
मराठी भाषेतले एप्रिल फूल
एक एप्रिल, जागतिक मूर्खदिन या दिवशी आपण निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून इतरांना मूर्ख बनवायचे उपाय शोधत असतो. पण कधी कधी भाषेमधील गंमतच नकळतपणे आपली किंवा दुसऱ्यांची विकेट उडवत असते. भाषेतील काही शब्द, म्हणी यांच्यामुळे गोंधळ उडून एप्रिल फूल होणे म्हणजे क्रिकेटमधील हिट विकेटसारखाच प्रकार, कधी कधी शब्दांचा शब्दश: अर्थ घेतल्याने किंवा कधी कधी म्हणींचा मथितार्थ न कळल्याने तर कधी कधी एकाच शब्दाचे दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये विभिन्न अर्थ असल्याने आपण एप्रिल फूल होऊ शकतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मराठीतील ‘महाराज’चे आधिपत्य राज्यावर असते, पण हिंदीतील ‘महाराज’ आधिपत्य मुदपाकखान्यावर असते. तेव्हा आज तुमच्याशी शेअर करतो, अशाच काही माझ्या आयुष्यातील गोष्टी जिथे एक तर मी एप्रिल फूल बनलो किंवा इतरांना तरी एप्रिल फूल बनताना अनुभवले. ही गोष्ट आहे माझ्या मावसभावाची, हेमंतची. तेव्हा त्याचे वय होते अवघे पाच - सहा. उन्हाळ्याची सुट्टी लहानग्या हेमंतला एक एप्रिलपासूनच मिळाली होती. सुट्टी एन्जॉय करायला हेमंत आजोळी आला होता.आमच्या आजोबांची स्वत:ची बिल्डिंग असल्याने, स्वतंत्र गच्चीचा थाटमाट आमच्या आजोळी असायचा. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची बेगमी म्हणून मग कुरडया, पापड यांचा घाट घातला जायचा, माती लावलेले कडवे वाल व धान्यदेखील सुकविण्यासाठी गच्चीवर पसरली जायची. माझी आई (हेमंतची मावशी) हेमंतला घेऊन याच कामासाठी गच्चीवर गेली होती.

एप्रिल-फूल विशेष
चार दांडय़ा, एक फूल..
फुकटचा चहा पिण्यासाठी माझ्या काही मित्रांची घरं मी बांधून ठेवली आहेत. चंद्रकांत ऊर्फ बबल्या चुरमुरे हा त्यातलाच एक. बँकेत मोठा ऑफिसर असल्यामुळे बाकीचे असंख्य लोक त्याला चुरमुरेसाहेब म्हणत असले तरी मी बबल्याच म्हणतो. बबल्या म्हणत असलो तरी बबल्याचं आजचं वय एकोणसाठ आहे आणि त्याला एक बायको, एक अविवाहित मुलगा (अमित)आहे. अमित अमेरिकेत इंजिनीअर आहे आणि उत्तम कंपनीत नोकरी करतो.
थोडक्यात बबल्याची आíथक परिस्थिती उत्तम आहे. मी त्याच्याकडे चहा प्यायला गेलो तरी बऱ्याच वेळा भरपूर काही खाऊनपिऊनच त्याच्या घरून बाहेर पडतो.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी त्याच्या घरी गेलो तर घरी सुतकी वातावरण! बबल्या आणि वहिनी, दोघेही प्रचंड चिंतेत. मी गेलो, बसलो. थोडा वेळ कोणीच काही बोलेना. मला वाटलं, बहुतेक जवळचं कोणी तरी गेलंय. मी बबल्याचे आई, वडील, काका, काकू जेवढे म्हणून अतिवरिष्ठ नातेवाईक माहीत होते तेवढे डोळ्यांसमोर आणू लागलो.
शेवटी बबल्यानं बर्फ फोडला. (‘टु ब्रेक द आइस’ म्हणतात ना.)
‘‘गंप्या, (हे माझं त्याच्या लेखी असलेलं नाव), अमितचं पत्र आलंय.’’
वहिनीनी सूचकपणे बबल्याकडे बघितलं.

भविष्य