५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

गाव नमुना १२
प्रदीप महाडिक

मागील वेळी सात-बारा उतारातल्या काही गोष्टी वाचल्या असतील. नंतर गाव नमुना १२ मध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही बघणार आहोत, पण तत्पूर्वी ‘गाव नमुना ७’ (अधिकार अभिलेखपत्र) मध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मनुष्याच्या शरीरात जसं हृदयाचं स्थान महत्त्वाचं आहे तसंच जमिनीच्या मिळकतीच्या बाबतीत सात-बारा हे हृदयच आहे. शरीरातील इतर अवयवाप्रमाणे सात-बाराच्या इतर नोंदीही महत्त्वाच्या आणि उपयोगाच्या आहेत. कारण दिवाणी दाव्याच्या कामी पोलीस कारवाईबाबत, कब्जेवहिवाट शाबीत करण्यासाठी बँका, पतसंस्थांकडून कर्ज घेण्यासाठी, न्यायालयात जामीन राहण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवासी आणि जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी, महसुली कारवाईबाबत, विजेचे मीटर घेण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी सात-बाराचा उपयोग होतो. खरेदीदारात लक्षात ठेवावे की सात-बाराची नोंद ही केवळ हक्क नव्हे तर दायित्व व कर्जही दर्शविते. सात-बारावर नुसती शेतजमीनच दाखविलेली नसते तर जमिनीतून जाणाऱ्या रस्त्याचा विहिरीतील पाण्याचा किंवा कुळाचा हक्क अशा अनेक हक्काचे रेकॉर्ड असतात.
सात-बारावर पक्की नोंद फेरफाराचीसुद्धा असते ती खरेदीदाराच्या नावाखाली किंवा वरील बाजूस नंबराला गोल करून टाकली जाते किंवा पूर्वीच्या नावास किंवा नोंदीस नवीन नोंदीने वर्तुळातील नंबरास कंस केला जातो. मंजुरीपूर्वीसुद्धा तलाठी पेन्सिलीने सात-बारावर कच्ची नोंद टाकू शकतात. कच्ची नोंद टाकली तरी नोंद मंजूर करण्याचे खरे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांनाच (सर्कल ऑफिसर) असतात. जमिनीच्या मालकी हक्कात मुख्यत्वे चार प्रकारे बदल होतात.
१) उपनिबंधाकडे (सबरजिस्ट्रार) नोंदल्या गेलेल्या दस्तऐवजाद्वारे.
२) वारसा हक्काने किंवा वाटणीद्वारे.
३) नोंद न झालेल्या तोंडी कराराद्वारे झालेले व्यवहार.
४) दिवाणी न्यायालय किंवा महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये झालेले फेरबदल, अशा बदलांना ‘फेरफार नोंद’ असे म्हणतात.
फेरफार नोंद योग्य त्या रजिस्टरमध्ये नोंदवले जातात. प्रत्येक नवनवीन बदल सतत घडत असतात. प्रत्येक बदल रजिस्टरमध्ये नोंदवला गेला पाहिजे. असे झालेले सर्व फेरबदल ओळीने नोंदविले जातात. अशा ह्य़ा ‘गाव नमुना ७’ मध्ये नावाप्रमाणे सर्व नोंदी महत्त्वाच्या आहेत. तसाच खालील बाजूस किंवा मागील बाजूस असणारा ‘गाव नमुना १२’ ही महत्त्वाचा असतो. म्हणजे पिकांची नोंदवही नियम १९७१ यातील नियम २९ यामध्ये पिकाखालील क्षेत्राचा तपशील असतो.
- कुठले वर्ष आणि किती वर्षे शेती कसत आहे.
- पिकाचे नाव, शेतीचा हंगाम, पिकाखालील किती क्षेत्र.
- शेतीला कोणकोणत्या आधारे जलसिंचित आणि अजल सिंचित केले जातं व जलसिंचनासाठी कुठल्या साधनांचा उपयोग होतो याचा तपशील असतो.
- लागवडीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचे स्वरूप आणि क्षेत्र दाखवलं जातं.
- जमीन करणाऱ्याचे नाव.
- शेवटी शेरा असतो, असे १६ भाग आणि खालील बाजूस ‘अस्सलवर हुकूम’वर नक्कल तयार. ता.’ असे आणि तलाठय़ाची सही व शिक्का असतो.
पिकाखालील क्षेत्र म्हणजे शेतकरी कोणत्या पद्धतीने जमीन कसतो तो तपशील म्हणजे बागायती किंवा जिरायती शेती असा होतो. याव्यतिरिक्त गाव नमुना १२ मध्ये ‘रजि’ किंवा ‘रीत’ असे सदर असते.
रजि किंवा रीत नं. १ - जमीन मालक स्वत: कसणार असतो.
रजि किंवा रीत नं. २ - मालक मजुराकडून जमीन कसून घेतो.
रजि किंवा रीत नं. ३ - मालक कुळाकडून जमीन कसून घेतो.
रजि किंवा रीत नं. ४ - कूळ मालकाला पिकातला वाटा देतो.
रजि किंवा रीत नं. ५ - कूळ मालकाला रोख पैसे देतो.
रजि किंवा रीत नं. ६ - मालकाला रोख पैसे व पीक दोन्हीही देतो.
तलाठी मूळ रेकॉर्डमधील नोंद पाहून सात-बाराचा उतारा तयार करतो आणि खालील बाजूस (१२ च्या) सही आणि तारीख टाकतो. सात-बारा सार्वजनिक दस्तऐवज (पब्लिक डॉक्युमेंट) आहे. तो कोणालाही पाहण्यासाठी उपलब्ध असतो. तसेच तिसऱ्या माणसाचाही सात-बाराचा उतारा आवश्यकतेप्रमाणे तत्परतेने अद्ययावत केल्यास नंतर इतर प्रश्न उद्भवत नाहीत. तसेच शेतकऱ्याने सात-बारावर गरजेप्रमाणे वेळच्या वेळी बदल केल्यास पुढे आपण निश्चिंत राहू शकतो. प्रत्येक खातेदाराने वेळेवर सात-बारा उतारे काढावेत व ते तपासणे कधीही शहाणपणाचे असते. असे हे उतारे आणि ८ अ खाते उतारा दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी/ मार्चमध्ये काढून ते जपून ठेवावे. या वेळी फेरफार ‘६ अ’ सुद्धा काढावा. हे सर्व दस्तऐवज स्वतंत्र फाइल करून ठेवावेत. खातेपुस्तिका असल्यास वर्षांतून एकदा तरी संबंधित तलाठय़ाकडून भरून घ्यावी. खातेदारांना महसुली वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होते हे लक्षात असावं.
response.lokprabha@expressindia.com