५ एप्रिल २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

एप्रिल-फूल विशेष
‘ब्रेकिंग न्यूज’.. : काँग्रेसचे ‘संकटमोचक’
एप्रिल फूल बनाया..
माझा कपडे धुण्याचा छंद
‘फूल डे’चे राडे!
मराठी भाषेतले एप्रिल फूल
चार दांडय़ा, एक फूल..
एप्रिलमधले ‘रावणायण’
रेडिओवरचे एप्रिल फूल
पक्या.. पिऊ आणि पाणी!
सेलिब्रिटी एप्रिल फूल

अर्थसंकल्प विशेष

क्रीडा

स्मरण
चर्चा
सेकंड इनिंग
आरोग्यम्
भन्नाट
कविता
पाठलाग
माझं शेतघर
शब्दरंग
संख्याशास्त्र
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
गृहप्रवेश
सिनेमा
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एप्रिल-फूल विशेष

संकलन : प्रभा कुडके
कोण म्हणतो, फक्त आपणच एप्रिल फूल होतो म्हणून? रुपेरी पडद्यावर सफाईदारपणे वावरणारे आपले सेलिब्रिटीही १ एप्रिलला चक्क फूल होतात..

चहात साखर की..? - अनुष्का शर्मा
एप्रिल महिन्यातील कुठल्या दिवशी माझ्यावर काय विघ्न येईल हे सांगता येत नाही. खास करून मला सतावण्यासाठी सर्वात उत्तम हा महिना असल्याचं माझ्या मित्रमैत्रिणींना वाटतं. कॉलेजच्या दिवसांत तर दरवर्षी एप्रिल महिन्यात मला काही तरी मूर्ख बनवण्याचे प्लॅन्स केले जायचे आणि ते प्लॅन्स उत्तम सक्सेस व्हायचे. टीवायला असताना माझ्या मैत्रिणींनी सिनेमाला जायचे ठरवले. आता सिनेमाचे नाव आठवत नाही, परंतु कुठला तरी इंग्रजी हॉरर चित्रपट होता. त्या वेळी ग्रुपमध्ये डरपोक म्हणून मला कायम मधली सीट मिळत असे. खास करून सिनेमा पाहताना मलाच मधली सीट हवी, असा माझा आग्रहच असे. हा इंग्रजी हॉरर सिनेमा पाहताना मात्र माझी चांगलीच गोची झाली होती. कॉलेजमधील बहुसंख्य क्राऊड हा चित्रपट पाहण्यासाठी जमा झाला होता. त्यामुळे बहुतांशी ओळखीचे चेहरे होते, परंतु माझ्या मैत्रिणींनी मात्र माझं तिकीट एका कपलच्या बरोबरीने काढलेलं होतं. ते कपल सिनेमा पाहण्यासाठी आलेलं नव्हतं हे आता वेगळं सांगायला नको. त्या वेळी माझी जी काही पंचाईत झाली हे मला शब्दात सांगता येणार नाही. मला सिनेमा अध्र्यावर असतानाच उठून जावं लागलं होतं. हा किस्सा मी कधीच विसरू शकणार नाही.
अजून एक दुसरा किस्सा म्हणजे १ एप्रिलला सकाळी माझ्या घरी मित्रांचा ग्रुप आला. बेड टीची माझी सवय. पण त्यादिवशी बेड टी आला तरी मी तो न घेता फ्रेश व्हायला गेले. तेवढय़ात माझ्या मित्रांनी त्या चहामध्ये मीठ टाकले. तो चहा पिताना मला उलटीच आली होती, पण मला नेमकं हे कुणी केलं हेच कळलेलं नव्हतं. अखेर त्या दिवसाच्या शेवटी माझे मित्र मला म्हणाले, अगं, तुमच्यात चहामध्ये साखर टाकतात की मीठ?

मेणाचे लाडू आणि मेणाची मिठाई -रणवीर कपूर
कपूर घराणं आणि खाणं याचं एक जवळच नातं आहे, पण हेच खाणं कधी तुम्हाला तोंडावर पाडेल सांगता येत नाही. सलग तीन वर्षे मी एप्रिल फूल झालोय खाण्याच्या पदार्थामुळे. मला चिकनमधील बहुसंख्य पदार्थ खूप प्रिय आहेत, खास करून तंदुरी, पण असं असलं तरी मिठाई म्हणजे जीव की प्राण.. माझ्या बहिणीच्या काही मैत्रिणी व मित्र घरी खूप सारे खाण्याचे पदार्थ घेऊन आले होते. पार्टीचा माहोल म्हणून मीही त्या पार्टीत फक्त खाण्यापुरता सहभागी झालो. सर्व पदार्थ मनसोक्त खाऊन झाल्यावर कधी एकदा डेझर्टची चव घेतोय असं मला झालेलं. मोतीचूरचा लाडू, गुलाबजाम असे विविध पदार्थ त्यात होते, पण त्याला अजून कुणीच हात लावला नव्हता. अखेर डेझर्ट खाण्याची सुरुवात झाली. मिठाईचे तीन बॉक्स होते, त्यातल्या एका बॉक्सकडे कुणीच वळत नव्हतं. या बॉक्सकडे कुणीच वळत नाहीये, हे मीे हेरलं. मग या बॉक्समध्ये काही तरी गडबड आहे हे ओळखलं आणि तो बॉक्स मी उघडलाच नाही, पण ज्या बॉक्समध्ये शेवटचे तीन लाडू उरले होते त्या बॉक्समधला एक लाडू मी खाल्ला व पटकन आता निघून गेलो. बाहेर येताना वाह! किती मस्त लाडू आहे, असं म्हणत तोंड हलवत बाहेर आलो. दुसरा लाडू न घेता मी गुलाबजामचा बॉक्स उघडला, त्यातही मला काही तरी प्रॉब्लेम वाटला; पण इतर सर्व मैत्रिणी व मित्र मात्र आरामात आस्वाद घेऊन खात होते. माझ्याच बाबतीत असं का होतंय हे मला कळत नव्हतं म्हणून मी न खाताच आतमध्ये गेलो. बेडरूममध्ये १ एप्रिल फूलचे ग्रीटिंग आणि चिठ्ठी माझी वाट पाहात होती. त्यावर लिहिलं होतं- ये व्ॉक्स का कमाल हैं.. आणि व्ॉक्सच्या सर्व मिठाईंचे फोटो होते..

विगमध्ये दगड - दीपिका पदुकोण
‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये मला मेकअप होता, पण या मेकअपच्या बरोबरीने विगचा रोल खूप महत्त्वाचा होता. एका शॉटमध्ये मला विग सांभाळता येईना इतका वेळ तो सतत पडत होता. विगचं वजन मला पेलवत नव्हतं इतकं जड झालेलं होतं, पण नेमकं कारण काय हेच कळत नव्हतं. अखेर तीन तासांनंतर मी तो विग काढला तेव्हा मला कळलं होतं की, त्या विगमध्ये सफरचंदाच्या आकाराचा दगड ठेवला होता. हे कृत्य होतं माझ्या बहिणीचं. पहिल्यांदाच सेटवर आल्यावर तिने जो काही प्रकार केला होता त्याने माझी चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानंतर मात्र तिला सेटवर नेण्याचा मी शहाणपणा कधीच केला नाही. तरीही ती माझ्या सेटवर कधी तरी पाऊल ठेवते त्या वेळी नशीब या चित्रपटात आपल्याला विग नाही हे समाधान मला अधिक असते.

जानू, आय लव्ह यू.. - परिणिती चोप्रा
मुंबईत मी आल्यावर माझी सर्वात पहिली नोकरी होती पीआरची. पीआर म्हणून काम करताना अनेक पत्रकारांशी संवाद साधण्याची संधी मला मिळत असे. त्यामुळे पत्रकारांशी बोलणं म्हणजे खूप मोठ्ठं दिव्य काम आहे असं मला वाटे. त्यांच्याशी बोलताना खूप विनम्रपणे बोलावं लागे. तिथे माझी खरी कसोटी लागायची. अनेकदा मला हे नाही जमत म्हणून सीनिअर्स ओरडायचे, पण कालांतराने पत्रकारांशी कसा संवाद साधायचा हे मला अवगत झाले. अनेकदा त्यामुळे मलाच पत्रकारांशी संवाद साधण्याचे काम करावे लागे. एकदा ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्याच्या डेस्कवर एका इंग्रजी दैनिकातल्या पत्रकाराचा फोन आला. माझ्याशी फोनवर बोलताना तो खूपच लूझ टॉक करत होता. मला अधूनमधून ‘जानू, आय लव्ह यू’ वगैरे बोलत होता. मला कळेचना कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं ते. तरीही मी कुणाला काहीच सांगितलं नाही. दोन तासांनी पुन्हा त्याच पत्रकाराचा फोन आला आणि माझ्याशी पुन्हा अघळपघळ गप्पा मारू लागला. त्यानंतर मात्र मी फोन ठेवून रडूच लागले. अखेर ऑफिस सुटल्यावर आम्ही खालच्या एका रेस्तराँमध्ये गेल्यावर आमच्या ऑफिसमधल्या एका कलीगने माझी मस्करी करायला सुरुवात केली आणि सेम त्या पत्रकाराच्या स्टाइलने तो बोलत होता. सर्वानी एकच कल्ला करत मला एप्रिल फूल केले होते..

खाजखुजली डान्स - अक्षयकुमार
गोव्याला आम्ही सोळा जण मित्र पिकनिकला गेलो असताना अचानक मला अंगाला खाज सुटू लागली. ही खाज सुटल्यावर माझा ताबाच सुटला आणि मी नाचतच सुटलो. अंगात घातलेले कपडे काढून मी बीचवर पळू लागलो आणि लोळू लागलो. सर्व जण हा तमाशा अगदी मनमुरादपणे बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर मला खरा प्रकार काय आहे तो कळला होता. १ एप्रिलला माझ्या मित्रांच्या तावडीत मी न सापडल्यामुळे मला गोव्याला नेण्याचा प्लॅन तयार करण्यात आला. गोव्यामध्ये गेल्या क्षणी माझी बॅग पाण्यात भिजवण्यात आली. त्यामुळे माझ्या अंगावर कपडे घालायलाही नव्हते. म्हणूनच मित्राचे कपडे मी अंगावर चढवले. त्या कपडय़ांमध्ये खाजखुजलीची पावडर टाकल्यामुळे माझा डान्स सुरू झाला होता. तो डान्स इतका भयंकर होता की, दुसऱ्या दिवशी मी बीचवर गेल्यावर मला डान्स करताना ज्या पर्यटकांनी पाहिलं होतं ते सर्व माझ्याकडे पाहून चक्क मोठय़ाने हसत होते.